नवी पहाट... भाग ३०(अंतिम)

तेजू शी बोलून तिला मुलाची माहिती दिली. सुदैवाने तेजूचा जवळचा मित्र संदीप जो सध्या अमेरिकेत होता त्याच्या मित्र मुलाच्याच कंपनी मध्ये कामाला होता. तेजू आणि स्वराने त्यांच्या त्या अमेरिकेतील मित्राला सगळी हकीकत सांगितली आणि त्याने निव्वळ चार दिवसात त्या मुलाची सगळी माहिती काढून दोघींना सांगितली. ह्यावेळी चूक होण्याची शक्यता कमी होती करणं माहिती काढणारा आणि देणारा दोघे जवळेचे होते.


मागील भागात आपण बघितले…


माणसांवरून विश्वास उडालेल्या स्वरा आणि नंदिनीला पुन्हा नव्याने उभारी देण्याचे काम राज ने केले. स्वराच्या आयुष्यात नवी पहाट आणि नंदिनीच्या आयुष्यात नव्या पहाटेची स्वप्नं रुजविण्याचे काम राजने केले. त्याच्या येण्याने नीरजा आणि दीपक राव निश्चिंत झाले. त्यांना जणू दुसरा मुलगा मिळाला होता. नंदिनीला भावासारखा मित्र, समरला भाऊ, आणि स्वराला प्रेम मिळाले होते.


आता पुढे…


"ताई, मग आम्ही आता तुझ्यासाठी मुलं बघायला सुरुवात करतो. आई बाबा चला तयारीला लागू आपण सगळे. ताई साठी एकदम छान मुलगा शोधू. तिला आवडेल असा." राज


"राज तुम्ही आलंय आणि माझ्या 3काच नाही तर दोन्ही मुलींच्या आयुष्यात नवी उमेद घेऊन आलात." नीरजा हात जोडून बोलत होती.


"आई काहीही काय. मी माझा कर्तव्य करतो आहे. स्वराशी लग्न केले तेव्हाच तुम्ही माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग झालात. तुम्ही देखील माझं कुटुंबच आहात ना? मग तुमच्यासाठी म्हणजे आपल्या कुटुंबासाठी मी काही केलं तर त्यात नवल काय? असं बोलून मला परका करू नका." राज नीरजाचा हात हातात घेत बोलला.

नीरजा भावूक झाली होती. कित्येक वर्षांनी तिला नंदिनी साठी आशेचा किरण दिसत होता.


"आई बाबा, फक्त शोधाची सीमा आपल्याला वाढवावी लागेल. म्हणजे जातीची आणि प्रदेशाची अट जरा बाजूला ठेवावी लागेल. मान्य आहे की, हे जरा कठीण आहे. पण आपण माहिती काढूनच सगळं करू त्याशिवाय काही करायचे नाही." राज


"बरोबर आहे तुमचे. मुलगा शोधताना आता मर्यादित भागात न शोधता विस्तृत भागात शोधायचा." दीपकराव बोलले.


काही दिवसांनी स्वरा आणि राज परदेशात त्यांच्या घरी निघून गेले.

आता ह्या गोष्टीला देखील एक वर्ष होत आले होते. स्वरा आणि राज घरच्यांच्या संपर्कात होते. अजून देखील नंदिनीसाठी मनाजोक्ते स्थळ सापडले नव्हते. राज नियमित पणे सगळ्यांना धीर द्यायचे काम करत होता. त्यामुळे ह्यावेळी सगळे विशेषतः नंदिनी न डगमगता उभी होती. तीच्यानात कुठे तरी सुखी संसाराच्या स्वप्नांचा अंकुर फुटत होता त्यामुळेच आता ती स्वतः मुलांची प्रोफाईल बघण्यात पुढाकार घेत होती.


"ताई खूप छान तू स्वतः बघ म्हणजे तुला मुलांची गाळणी लगेच करता येईल." राज


"हो म्हणूनच मीच पुढाकार घेत आहे आता." नंदिनी


"छान म्हणजे आता लवकर तू लाडू दे." स्वरा आनंदाने बोलली


"हो पण माझी एक अट आहे." नंदिनी स्वरा आणि राज ला बोलली तसे दोघे एकमेकांकडे बघू लागले.


"कसली अट?" दोघांनी नी एका सुरात विचारले.


"आता तुमच्या लग्नाला दोन वर्ष झालीत. तुम्ही दोनाचे तीन व्हा. मी एकाचे दोन होते. बोला मान्य असेल तर सांगा?"


स्वरा आणि राजने हसून नंदिनीची अट मान्य केली.

काही महिन्यांनी नंदिनीला लग्नाच्या साईट वर एक रिक्वेस्ट आली. मुलगा महाराष्ट्रातला नव्हता. पण फोटो बघून चांगला असवा असे वाटले. प्रोफाईल बघून त्याची माहिती लिहून घेतली. त्याने सगळे अगदी स्पष्ट लिहिले होते. पण मुलगा मराठी नाही महाराष्ट्रातील देखील नाही त्यामुळे माहिती कशी मिळणार ? दीपक राव आणि नीरजा थोडे काळजीत पडले. शेवटी एकदा फोन करून बघू बोलण्यावरून बरा वाटला तर जाऊन बघू जीव माहिती मिळते का ते बघू असे ठरले.

ठरल्याप्रमाणे दीपकरावांनी मुलाला फोन केला. भाषेचा प्रॉब्लेम असल्यामुळे सगळे संभाषण इंग्रजी मधून झाले. कारण मुलाला हिंदी किंवा मराठी येत नव्हती. तमिळ किंवा इंग्रजी ह्या दोन भाषा त्याला येत होत्या. हे ऐकून नीरजा जरा जास्तच काळजीत पडली.


पण त्याहून मोठा प्रश्न होता माहिती कशी मिळणार?


सगळेच विचारात होते. काही दिवसांनी मुलाचा फोन दीपक रावांना आला.

एकदा आमचं घर बघून जा. म्हणून त्याने आग्रह केला. नंदिनी ने देखील विनंती केली की, \" एकदा बघायला काय हरकत आहे?\"


त्या दिवशी दीपक रावांनी राज आणि स्वराला फोन केला. समोर समर आणि वृंदा देखील होते.


"काय करायचं?" दीपक राव राज ला बोलले?


"बाबा घरातील बाकीचे काय म्हणतात? त्यांना काय वाटतं?"

"नीरजा तर नाहीच म्हणते आहे. समर आणि वृंदा एकदा बघू ह्या पक्षात आहेत. आणि माझं म्हणाल तर माझी द्विधा मनः स्थिती आहे. आपण गेलो तरी मुलाची माहिती कशी मिळेल आपल्याला? आणि जर माहिती मिळणार नसेल तर जाण्यात काय अर्थ आहे."


"बाबा मुलगा काय करतो म्हणाले?" स्वरा बोलली.


"बँगलोरला एका आय टी कंपनीत आहे."


"बाबा काळजी करू नका. मी बघते काही माहिती मिळते का?"


"तू कशी काढशील माहिती?" राज ने प्रश्न केला.


"अरे माझी बेस्ट फ्रेंड तेजू आय. टी मध्येच आहे आणि तिचे मित्र मैत्रिणी माझे पण मित्र मैत्रीण आहेत. त्यामुळे बघू कुठून माहिती मिळते का? मी बोलेल तिच्याशी.
बाबा तुम्ही मला मुलाचे नाव, कोणत्या कंपनी मध्ये आहे? आणि जॉब प्रोफाईल काय आहे ह्याचा एक मेसेज करा."


"ठिक आहे तू बघ तेजूशी बोलून माहिती मिळते का? मग बघू पुढे. तोपर्यंत थांबू आपण आणि आता लगेच माहितीचा मेसेज करतो मी तुला." दीपकराव बोलले.


ठरल्याप्रमाणे दपिकरावांचे बोलून झाल्यावर त्यांनी स्वराला मुलाची माहिती पाठवली. सोबत मुलाचा फोटो देखील पाठवला आणि स्वरा कामाला लागली.


तेजू शी बोलून तिला मुलाची माहिती दिली. सुदैवाने तेजूचा जवळचा मित्र संदीप जो सध्या अमेरिकेत होता त्याच्या मित्र मुलाच्याच कंपनी मध्ये कामाला होता. तेजू आणि स्वराने त्यांच्या त्या अमेरिकेतील मित्राला सगळी हकीकत सांगितली आणि त्याने निव्वळ चार दिवसात त्या मुलाची सगळी माहिती काढून दोघींना सांगितली. ह्यावेळी चूक होण्याची शक्यता कमी होती करणं माहिती काढणारा आणि देणारा दोघे जवळेचे होते.

नंदिनी बद्दल सगळ्यांना माहीत असल्यामुळे. स्वरा ची ताई ती आपली ताई असे मानून सगळ्यांनी अगदी चोख माहिती काढली. शक्य त्या मार्गाने माहिती काढण्यात आली.


"बाबा माहिती मिळाली." स्वरा ने दीपक रावांना फोन करून सांगितले.


"अरे वाह. झटपट माहिती काढलीस. सांग आता काय माहिती मिळाली?"


"बाबा माहिती चांगलीच मिळाली आहे. अगदी त्या मुलाच्या घरापर्यंत जाऊन बघून आला तो माणूस. मुलगा चांगला आहे. ऑफिस मधून पण त्याच्याबद्दल काही वावगं ऐकायला मिळालं नाही."


"बाबा शेवटी बाहेरची माहिती मिळणार तितकी काढण्याचा प्रयत्न केला स्वराने. पण मला वाटतं तुम्ही आता त्याच्या घरी जाऊन या. म्हणजे आपल्याला मिळालेली माहिती आणि खरं तो तसाच आहे का? हे तपासून बघता येईल." राज बोलला


"ठिक आहे. मी पुढच्या आठवड्यातच जाण्याचा प्रयत्न करतो."


"बाबा आम्ही पण येणार." समर आणि वृंदा एकदम बोलले.


"त्याने सगळ्यांनाच बोलावले आहे. आता आपण पाच जणं जाऊ. राज आणि स्वराला तर तिकडून येता येणार नाही." दीपकराव बोलले.


"हो तुम्ही सगळेच जा म्हणजे जो तो आपापल्या परीने निरीक्षण करेल." राज


"ठरलं तर मग आम्ही जाऊन येतो आणि मग तुम्हाला कळवतो काय वाटलं ते." दीपकराव.


तितक्यात दीपक रावांना त्या मुलाचा फोन आला.

"Hello Sir. Can we meet on coming Sunday? As I am coming to Mumbai on tomorrow for office work."

"Yes why not? Come with your parents."

ठरल्याप्रमाणे मुलगा त्याच्या आई वडिलांना घेऊन नंदिनी च्या घरी गेला. एकंदरीत भाषेची अडचण सोडता मुलगा सगळ्यांना आवडला. घरचे सुद्धा छान वाटले.


"Sir, now if you think we can go ahead? Then please visit to my house in Bangalore. You all are invited. Please let me know." असं बोलून मुलगा निघून गेला.

मुलगा तर आवडला होता. माहिती देखील मिळाली होती. त्यामुळे आता घर बघण्याची वेळ आता होती नंदिनी आणि तिच्या घरच्यांची. ठरल्याप्रमाणे पुढच्या आठवड्यात दीपक राव, नीरजा, नंदिनी, समर, वृंदा बँगलोर गेले. तिथे त्यांनी राहण्यासाठी एका हॉटेलवर बुकिंग आधीच केले होते.


मुलाने म्हणजे यशकुमार ने आणि त्याच्या घरच्यांनी नंदिनी आणि तिच्या घरच्यांचे छान स्वागत केले. दोन दिवस दीपक राव कुटुंबीयांसह यशकुमर च्या घरी गेले. त्याच्या नातेवाईकांना भेटले. अर्थात याशकुमार ने स्वतः सगळ्यांची ओळख करून दिली.

त्या दोन दिवसात सगळ्यांचे अगदी बारकाईने निरीक्षण सुरू होते. याशकुमर किंवा त्याच्या घरच्यांच्या वागण्यात कुठेही दिखावा, लबडपणा, किंवा लपवा छपवी जाणवली नाही. विशेष म्हणजे यशकुमार अगदी सरळ स्पष्ट बोलणार दिसला.


तिसऱ्यादिवशी दीपक राव आणि कुटुंब परतीच्या प्रवासाला निघाले तेव्हा यश कुमार ने त्यांच्या जेवणाचा डब्बा आणून दिला.


"Sir, please accept this tiffin. You are our guests and it\"s my duty to serve you best. Don\"t know about future but a I am doing this as a human being."


दीपकराव, नीरजा, नंदिनी, समर, वृंदा सगळेच खुश झाले. घरी आल्यावर राज आणि स्वराला व्हिडिओ कॉल वर इती वृत्तान्त सांगितला. मुलाला नाकारण्याचे कशी कारण नव्हते. पण म्हणतात ना दुधाने पोळलेला ताक देखील फुंकून पितो तशीच काहीशी सगळ्यांची अवस्था होती.


काहीतरी निर्णय घ्यावाच लागणार होता. मग शेवटी नंदिनी वर निर्णय सोपवण्यात आला.
नंदिनी ला मुलगा तर आवडलाच होता. तिच्या अटींत बसणार, देखणा,कर्तबगार, सुस्वभावी मुलगा तिला भेटला होता. त्यात भाषेशी जुळवून घेण्याची तिची तयारी होती. त्यामुळे मोठे साहस करून दीपक राव आणि नीरजा ने लग्नाला होकार कळवला.


आणि शेवटी नंदिनीच्या पहिल्या लग्नानंतर बारा वर्षांनी म्हणजे divorce नंतर तब्बल आठ वर्षांनी नंदिनीच्या आयुष्यात सुखाचे क्षण आले. यश कुमार नंदिनी ची खूप काळजी करणारा मुलगा आहे. दोघांचा संसार सुखाचा सुरू आहे आणि आता त्या संसारात एक फुल उमलले आहे.


आज नंदिनी आणि यशकुमारच्या लग्नाला सात वर्ष झालीत. त्यांना सहा वर्षांचा एक मुलगा आहे. सध्या ते परदेशात स्थित आहेत.


शेवटी सुखाची नवी पहाट नंदिनी च्या आयुष्यात उगवलीच. पण त्याआधी तिला ह्या अंधारातून चालावे लागले, जे सोसावे लागले त्याची कल्पना करणे कठीणच आहे.



समाप्त
© वर्षाराज


वाचक मित्रांनी तुम्हाला माझी कथा कशी वाटली नक्की सांगा. पुन्हा भेटू एका नवीन कथे सह. धन्यवाद.

🎭 Series Post

View all