नवी पहाट... भाग २३

वृंदाची हाक ऐकून नीरजा आणि नंदिनी दोघी बाहेर आल्या." नमस्कार भाऊ. कसं काय येणं केलत? नंदिनी चे बाबा अजून आले नाहीत ऑफिस मधून." नीरजा बोलत होती." माहीत आहे भाऊ अजून घरी आले नाहीत. म्हणून मुद्दाम जरा लवकर आलो. मला तुमच्याशीच बोलायचे होते." मध्यस्ती मामा " बोला ना." नीरजा" ताई तुम्ही एक स्त्री आहात. एकट्या बाईला समाजात वावरताना किती त्रास होती, ह्याची जाणीव आहे तुम्हाला. म्हणूनच मी मुद्दाम तुमच्याशी बोलायला आलो आहे. मान्य आहे तुमचे मुलीवर खूप प्रेम आहे. पण आता तिचे लग्नं झाले आहे. तेव्हा ते लोकं जे म्हणतील तसं तिला वागावं लागेल. अहो जगाची रीतच आहे ही. थोडाफार त्रास कोणत्या मुलीला होत नाही? म्हणून काय कोणी असं घर सोडून देतात का?


नवी पहाट… भाग 23


मागील भागात आपण बघितले….


" दोष तुझा नाहीच आहे. दोष त्या लोकांचा आहे ज्यांना शंभर नंबरी सोनं पारखता आलं नाही.


बाळा, हे अश्रू अनमोल आहेत. असे वाया घालवू नकोस. हिमतीने आपल्याला ह्या परिस्थितीला सामोरे जायचे आहे." नीरजा नंदिनीच्या हाताची ओंझळ स्वतः च्या हातात घेत म्हणाली.


" तू स्वतः ला कमी आकू नकोस." वृंदा दोघींचे बोलणें ऐकत होती.


तितक्यात दाराची बेल वाजली. वृंदा ने दार उघडले. समोर मध्यस्थी मामा होते.


आता पुढे…


" मामा तुम्ही? या ना आत या. आई मामा आलेत." मामांना आत येण्यास सांगून वृंदाने नीरजाला आवाज दिला.


वृंदाची हाक ऐकून नीरजा आणि नंदिनी दोघी बाहेर आल्या.

" नमस्कार भाऊ. कसं काय येणं केलत? नंदिनी चे बाबा अजून आले नाहीत ऑफिस मधून." नीरजा बोलत होती.


" माहीत आहे भाऊ अजून घरी आले नाहीत. म्हणून मुद्दाम जरा लवकर आलो. मला तुमच्याशीच बोलायचे होते." मध्यस्ती मामा


" बोला ना." नीरजा


" ताई तुम्ही एक स्त्री आहात. एकट्या बाईला समाजात वावरताना किती त्रास होती, ह्याची जाणीव आहे तुम्हाला. म्हणूनच मी मुद्दाम तुमच्याशी बोलायला आलो आहे. मान्य आहे तुमचे मुलीवर खूप प्रेम आहे. पण आता तिचे लग्नं झाले आहे. तेव्हा ते लोकं जे म्हणतील तसं तिला वागावं लागेल. अहो जगाची रीतच आहे ही. थोडाफार त्रास कोणत्या मुलीला होत नाही? म्हणून काय कोणी असं घर सोडून देतात का?

मला काय म्हणायचे आहे की, तुम्हाला दुसरी मुलगी आहे. तिचा विचार करा. एकीचं जे झालं ते झालं पण आता तिच्यासाठी तुम्ही स्वराचा बळी का देता? आपल्या कडे म्हणतात ना ताई मुलगी दिली तिकडे मेली.

नंदिनी तुला तरी कळायला नको का? तूझ्या सुखसाठी तू तुझ्या बहिणीचे आयुष्य पणाला लावते आहेस.


आणि मी सांगतो की त्यांना समजावून की असा त्रास देऊ नका. तुम्हाला काय पाहिजे ते स्पष्ट सांगा तिच्या वडिलांना. मग तर झालं?" मध्यस्ती मामा नीरजा आणि नंदिनीला बोलत होते

मध्यस्ती मामांच्या बोलण्यावर नीरजा रागाने लाल झाली होती.

" भाऊ मुलगी तीली तिकडे मेली म्हणणारा काळ आता गेला. आम्ही आमच्या मुलीचा बळी नाही देणार. थोडाफार त्रास म्हणता तुम्ही? माझ्या मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. ठीद्याकरणावरून आत्महत्या करणारी मुलगी नाही माझी. नक्कीच जास्तं त्रास आहे म्हणून असं पाऊल उचललं तिने. आणि राहिला प्रश्न स्वराचा तर तिची काळजी तुम्ही करू नका. तिच्या नशिबात असेल ते होईल.
भाऊ परत मला असं काही सांगायला येऊ नका." नीरजा रागात बोलत होती. पण तिचा आवाज अजूनही नरम होता. नात्याची मर्यादा तिने ओलांडली नव्हती.


आत चाललेला संवाद दीपक राव बाहेर उभे राहून ऐकत होते. त्या दिवशी योगायोगाने दीपक राव जरा लवकर घरी आले. दारा समोर त्यांना बापूंची चप्पल दिसली आणि आतून काह शब्द कानावर आले. दार उघडं असल्यामुळे त्यांना बोलणें स्पष्ट ऐकू येत होते. नीरजाची प्रतिक्रिया काय असेल हे त्यांना ठाऊक होते. तिचे बोलणे संपताच दीपक राव आत गेले.


" बापू. तुम्हाला मे आधीच सांगितलं होतं की आम्ही मुलीला पाठवणार नाही. आता त्यांना सांगा की जे काय बोलायचं आहे ते आमच्या समोर येऊन बोला." दीपकराव घरात येऊन सोफ्यावर बसत बोलले.


" भाऊ, मी तर तुमच्या भल्याचा विचार करत होतो. पण तुम्हाला ऐकायचाच नसेल तर मी तरी काय करू शकतो? ते लोक मग त्यांच्या नातेवाईकांना घेऊन बैठकीला येतील." मध्यस्थी मामा तावातावत बोलत होते.


" त्यांना कोणाला घेऊन यायचे ते येऊदेत. मला भीती नाही कोणाची. माझ्या मुलीचा जीव महत्त्वाचा आहे माझ्यासाठी. आणि तुम्ही त्यांची इतकी बाजू घेत आहात, तर मला एक सांगा. मी नंदिनीला परत पाठवल्यावर माझ्या मुलीच्या जेवाचं काही बरं वाईट झालं तर तुम्ही घ्याल का त्याची जबाबदारी? माझी मुलगी परत अनाता येईल का तुम्हाला? नाही ना? मग तिला परत पाठविण्याचा अट्टाहास का करत आहात तुम्ही? मला तर वाटतं तुम्ही मुद्दाम हे स्थळ आणले माझ्या मुलीसाठी. खरं सांगा तुम्हाला माहित होतं ना की, ही माणसं चांगली नाहीत ते? तुम्ही फसवले आम्हाला." दीपकराव खूपच चिडले होते.


" नाही भाऊ गैरसमज नका करून घेऊ. मला खरच नव्हतं माहीत. आता माझा मित्र असला तरी घरात आत मध्ये काय चालतं हे थोडी कळतं कोणाला. त्यांचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहेत हे मला नव्हतं माहीत." मध्यस्थी मामा जरा नरमले.


" बापू, शेवटचं सांगतो आहे. नंदिनी परत जाणार नाही. त्यांना सांगा आमचा निरोप." दीपकराव अजूनही संतप्त होते.

" ठिक आहे. जशी तुमची इच्छा. मी येतो आता." असे म्हणून मामा निघून गेले.


" बाबा आपण खरंच बरोबर करतो आहोत ना? स्वराच्या भविष्याचा प्रश्न आहे." नंदिनी मामांच्या बोलण्याने परत एकदा विचलित झाली.


" नंदिनी, आपण करतो आहोत ते खूप आधीच करायला पाहिजे होते. तू अजिबात काळजी करू नकोस. आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत." वृंदा


" हो नंदिनी, आणि राहिला प्रश्न स्वराचा. तर तूच सांग तुला तुझी बहिण स्वार्थी वाटते का? जी बहिण्याच्या गळ्यावर पाय देऊन तिच्या सुखाचा महल उभरेल?" दीपकराव बोलत होते.


" नाही बाबा. आपली स्वरा अशी नाही. म्हणून तर आपण तिची काळजी केली पाहिजे ना." नंदिनी बोलत होती.


" तिची काळजी आहेच, पण आता तुझी लढाई महत्त्वाची आहे. सासर सोडून माहेरी येणारी तू एकटीच मुलगिंनही ह्या जगात. अशा अनेक मुली आहेत. आणि त्या हिमतीने लढतात. त्यांचा मार्ग शोधतात. तू देखील खंबीर हो. हा समाज ना बसू देतो ना चालू देतो. म्हणून आपण आपली वाट शोधायची. जे आपल्यासाठी योग्य आहे ते आपण करायचे. " दीपकराव नंदिनीला समजावत होते.



नंदिनीचा हा नवीन प्रवास सोपा तर नक्कीच नसेल पण त्यातून ती स्वतः ला सावरू शकेल की नाही?


क्रमशः
© वर्षाराज



प्रिय वाचक मित्रांनो ही कथा काल्पनिक नसून सत्य घटनेवर आधारित आहे. ह्यात लिहिले जाणारे प्रसंगाचे वाचनाच्या दृष्टीने नाटकीय रूपांतर केले आहे. तरी कथेतून कोणाला दुखावण्याचा हेतू नाही. कोणी दुखावले गेल्यास क्षमा असावी. ही घटना एका व्यक्तीची आहे. कोणीही वयक्तिक संदर्भ लावू नये. तुम्हाला माझी कथा कशी वाटली. हे नक्की कळवा. तुमचा अभिप्राय लेखकासाठी मोलाचा असतो. पुढे काय काय घडणार आहे हे जाणून घेण्यासाठी वाचत रहा नवी पहाट. आणि लाईक करायला विसरू नका.



🎭 Series Post

View all