नवी पहाट... भाग २२

घरात एक वेगळीच शांतता पसरली होती. संध्याकाळी नंदिनी एकटीच खिडकीत उभी राहून एकटक बाहेर बघत होती

नवी पहाट भाग २२


मागील भागात आपण बघितले….


" मी घेऊन येईल नंदिनीला परत तुमच्याकडे. दीपकरावांन जरा शांत होऊ देत." मध्यस्थी मामा नलिनला म्हणत होते.


" काहीही करा पण ती परत आली पाहिजे. आणि एकदा आली की परत तिच्या माहेरी जिवंत काही जाणार नाही ती." इति नीता


आता पुढे…



नंदिनी च्या सासरचे लोक निघून गेल्यावर सगळे शांत बसले होते. त्यांच्या वागण्यामुळे कोणाला काय बोलावे सुचत नव्हते. समर रागाने लाल झाला होता.


" बाबा ह्या लोकांना भर चौकात चापकाने फोडून काढले पाहिजे." समरच्या डोळ्यात आग पेटली होती.


" समर शांततेत घे. राग मला सुद्धा येतो आहे पण, आपण सभ्य लोकं आहोत. त्यांना त्यांच्या चुकीची शिक्षा देऊच आपण पण रीतसर. कायदा हातात घ्यायचा नाही, लक्षात ठेव." दीपकराव त्यांच्या कणखर आवाजात बोलत होते.


" बाबा माझ्यामुळे तुम्हाला त्रास होतोय ना!" नंदिनी केविलवाण्या नजरेने दीपकरावांकडे बघत बोलत होती.


" नाही रे बाळा. त्रास कसला त्यात. उलट तू लवकर सांगितलं नाही आम्हाला ह्याचं दुःख आहे." दीपकराव नंदिनीच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले.


" दीपक आता पुढे काय करायचं?" सतीश


" आता नंदिनीला परत पाठविण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे रीतसर कार्यवाही करू. कदाचित तुम्हाला दोघांना परत एकदा यावं लागेल. कारण आज तुम्ही दोघे होतात आपल्या बाजूने. त्यांच्या बाजूने बोलणारे पण ते घेऊन येतील असा अंदाज आहे." दीपकराव सतीशराव आणि केदार रावांना संभाव्यतेची कल्पना देत होते.


************



दुसऱ्या दिवशी सतीशराव आणि केदारराव निघून गेले.

घरात एक वेगळीच शांतता पसरली होती. संध्याकाळी नंदिनी एकटीच खिडकीत उभी राहून एकटक बाहेर बघत होती. तिला असं शून्यात हरवलेलं बघून तिच्या मानसिकतेचा अंदाज सगळ्यांना येत होता. अर्थात इतकं काही तिच्या आयुष्यात घडत होते की, तिला कळतच नव्हते की आता येणारे क्षण तिच्या समोर कोणते काय घेऊन उभे राहतील? अर्थातच येणारे क्षण सुखकर नक्कीच नसतील ह्याची तिला कल्पना नव्हती. पण आता येणाऱ्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तिच्यासोबत तिची माणसं होती.


" काय रे बाळा ? कसला विचार करते आहेस? होईल सगळं नीट बघ." नीरजा ने नंदिनी क्या पाठीवर हात फिरवला आणि तिच्याच विचारांच्या तंद्रीत हरवलेली नंदिनी भानावर आली.


नंदिनी ची तंद्री तुटली होती पण नजर मात्र अजूनही दूर वर काहीतरी शोधत होती.


" आई कसं असतं ना गं आयुष्य? क्षणात सगळं बदलून गेलं बघ. काय काय विचार केला होता मी लग्नं ठरलं तेव्हा. इतर मुलांसारखी माझी पा स्वप्नं होती गं. सुखाची फुले ओंझळीत घ्यायला तयार होते मी. ही बघ ओंझळ अशी पुढे करून.

हाताची ओंझळ करून नंदिनीने नीरजा पुढे केली. बोलता बोलता नंदिनीच्या डोळ्यातील आसवांचा एक ओघळ तिच्या ओंझळीत पडला.


पण बघ ना, माझ्या ओंझळीत काहीच नाही आलं. ती रीतीच राहिली गं. काय दोष होता माझा? कॉलेज मध्ये कधी लफडी केली नाहीत. सरळ राहिले. लग्नं करताना रूपाला महत्त्व दिले नाही. पैसा ही महत्त्वाचा नव्हतंच. फक्त प्रेमाची अपेक्षा केली होती. खूप काही जास्तं मागितलं होतं का गं मी? कुठे चुकले मी.


विचार केला होता नीरज आणि नीरजा सारखी नावं. तूझ्या नावाचा अंश असेल माझ्या सोबत त्याचा प्रेम मिळेल. पण असं काहीच नाही झालं." नंदिनी ओघळणाऱ्या अश्रूंना पुसत बोलत होती.


" दोष तुझा नाहीच आहे. दोष त्या लोकांचा आहे ज्यांना शंभर नंबरी सोनं पारखता आलं नाही.


बाळा, हे अश्रू अनमोल आहेत. असे वाया घालवू नकोस. हिमतीने आपल्याला ह्या परिस्थितीला सामोरे जायचे आहे." नीरजा नंदिनीच्या हाताची ओंझळ स्वतः च्या हातात घेत म्हणाली.


" तू स्वतः ला कमी आकू नकोस." वृंदा दोघींचे बोलणें ऐकत होती.


तितक्यात दाराची बेल वाजली. वृंदा ने दार उघडले. समोर मध्यस्थी मामा होते.



पुढील भागात बघू मध्यस्थी मामा काय प्रस्ताव घेऊन आलेत.



क्रमशः
© वर्षाराज


सर्वात पहिले सगळ्यांची माफी मागते. भाग टाकायला खूपच उशीर होत आहे. पण वयक्तिक कारणामुळे भाग लवकर टाकने शक्य होत नाहीये. आज सुद्धा थोडाच भाग टाकते आहे. लवकरच पुढचा भाग टाकायचा प्रयत्न करेल.




प्रिय वाचक मित्रांनो ही कथा काल्पनिक नसून सत्य घटनेवर आधारित आहे. ह्यात लिहिले जाणारे प्रसंगाचे वाचनाच्या दृष्टीने नाटकीय रूपांतर केले आहे. तरी कथेतून कोणाला दुखावण्याचा हेतू नाही. कोणी दुखावले गेल्यास क्षमा असावी. ही घटना एका व्यक्तीची आहे. कोणीही वयक्तिक संदर्भ लावू नये. तुम्हाला माझी कथा कशी वाटली. हे नक्की कळवा. तुमचा अभिप्राय लेखकासाठी मोलाचा असतो. पुढे काय काय घडणार आहे हे जाणून घेण्यासाठी वाचत रहा नवी पहाट. आणि लाईक करायला विसरू नका.
 

🎭 Series Post

View all