नवी पहाट...भाग १९

नंदिनी दार का उघडत नाही ह्या विचाराने स्वरा जरा घाबरली. बेशुद्ध पडली की, काय ताई असं तिला वाटलं. ?

नवी पहाट...भाग १९

मागील भागात आपण बघितले…

नंदिनीने नीरजाच्या बोलण्यावर मान डोलावली. थोड्या वेळात नीरजा निघून गेली तेव्हा दुपारचे साधारण चार वाजत आले होते. 

नीरजा घरातून निघाल्यावर बाहेरच तिला स्वरा भेटली. 

" येते स्वप्ना मावशीला भेटून." असं सांगून नीरजा निघून गेली.

मैत्रिणीशी बोलून स्वरा दहा मिनिटांनी घरी आली. तीन वेळा घराची बेल वाजवली पण नंदिनी दार उघडत नव्हती.

आता पुढे….

नंदिनी दार का उघडत नाही ह्या विचाराने स्वरा जरा घाबरली. बेशुद्ध पडली की, काय ताई असं तिला वाटलं. कारण नुकतीच नंदिनी आजारातून उठली होती. स्वराने काळजीने परत एकदा बेल वाजवली. सोबत जोर जोरात दारावर थाप मारत होती. ह्यावेळेस नंदिनीने दार उघडले. 

नंदिनीला समोर सही सलामत बघून स्वराने सुटकेचा श्वास घेतला आणि पटकन नंदिनीला दारातच एक मिठी मारली.

" काय गं काय झालं?" नंदिनी स्वराच्या पाठीवर हात फिरवत विचारात होती.

" काही नाही. इतका उशीर का लावला दार उघडायला? घाबरले ना मी. चक्कर येऊन पडलीस, की काय असं वाटलं." स्वरा नंदिनीच्या मिठीतून बाजूला होत बोलत होती.

" अगं टॉयलेटला गेले होते. म्हणून उशीर झाला दार उघडायला." नंदिनी आतल्या खोलीत जात बोलली.

" एक मिनिट. तू रडत होतीस? डोळे का असे दिसत आहेत." स्वरा नंदिनीला थांबवत बोलली.

" काही नाही. तू जा फ्रेश हो." नंदिनी

" ह्मम ठिक आहे." स्वरा फ्रेश होण्यासाठी निघून गेली. नंदिनी तिच्या खोलीत बसली होती. एकटक कुठेतरी शून्यात तिची नजर होती. बाथरूमचे दार वाजले तसे नंदिनी बळीच एक गाणं गुण गुणायला लागली. जणू काही झालेच नाहीये. तिच्या मनात काही सुरू नाहीये हे दाखवत होती.

" ताई जरा अर्धा तास लेटते मी. जाम पाय दुखत आहे. मग आपण चहा घेऊ." स्वरा फ्रेश होऊन बाहेर आल्यावर तिच्या पलंगावर आडवी होत बोलत होती. 

नंदिनीने मान डोलावली. स्वराने कुस बदलली आणि डोळे मिटले. खूप थकवा असल्यामुळे स्वराला लगेच झोप लागली. 

अर्ध्या तासाचा एक तास कधी झाला तिला कळलेच नाही. अचानक तिला जाग आली. स्वरा झोपेतून खडबडून जागी झाली. बाजूला बघितले तर नंदिनी तिच्या जागेवर नव्हती. स्वराने उठून तोंडावर थंड पाण्याचे शिपके मारले. टॉवेलला चेहेरा पुसत ती हॉल मध्ये आली. तिला वाटलं नंदिनी टी. व्ही बघत असेल. पण नंदिनी तिथे पण नव्हती. 

स्वराने किचन मध्ये डोकावले. नंदिनी ओट्याकडे तोंड करून उभी होती. पाठमोऱ्या नंदिनीला बघून स्वरा हसली.

" तुला गं कसं समजतं ,की मी आता उठेल.?" स्वरा किचनच्या दारात उभे राहून बोलत होती. 

" चहा करते आहेस ना? अद्रक जरा जास्त घाल. नाहीतर मी करू का चहा? तू बस." स्वरा एकटीच बोलत होती.

" अगं सांग ना. काय करते आहेस?" स्वराने टेबल वरील पाण्याची बाटली ओठांना लावत नंदिनीला परत आवाज दिला.

पण नंदिनी काहीच बोलत नव्हती. जणू ती ह्या जगात नव्हती. तिचं लक्ष दुसरीकडे होते. 

ताई का बोलत नाही? अशी का उभी आहे? ते बघण्यासाठी स्वरा नंदिनीच्या जवळ गेली. तरी नंदिनीचे लक्ष नव्हते. 

स्वरा नंदिनीचा चेहेरा बघण्याचा प्रयत्न करत होती. तोच तिला कसला तरी आवाज आला. म्हणून तिने ओट्यकडे बघितले आणि जोरात किंचाळली. 

" ताई…" स्वराने नंदिनीला ओट्या पासून जोरात दूर केले. नंदिनीचा हात झटकला. स्वराचा राग इतका अनावर झालं होता की, पहिल्या आणि शेवटच्या वेळेस तिने नंदिनीच्या कानाखाली एक जोरदार जाळ काढला. नंदिनीला ओढत ती हॉल मध्ये घेऊन आली. आणि लगेच स्वप्ना मावशी कडे नीरजाला फोन केला.

" मावशी, आई असेल तशी तिला घरी पाठव एक मिनिट सुद्धा उशीर करू नकोस." स्वराच्या आवाजात राग आणि चिंता दोन्ही होते. 

स्वरा ने अचानक असा का फोन केला? आणि काहीच सांगितले नाही. काय झाले असेल? अशा विचारातच 

स्वराचा फोन ठेवताच नीरजा, स्वप्ना, प्रज्ञा तिघी धावतच दहा मिनिटात आल्या. नीरजाने धापा टाकत दार वाजवले.

स्वराने पटकन दार उघडून त्यांना आत घेतले. स्वरा आताही शांत झालेली नव्हती. तिच्या काळजाचे ठोके अजून पण जोर जोरात धावत होते. डोळ्यातून गरम वाफा निघत होत्या. 

नंदिनी सोफ्यात बसून रडत होती. पण बोलत काहीच नव्हती. दोघींना अशा अवस्थेत बघून सगळेच घाबरले.

" काय गं काय झालं?" नीरजा स्वराच्या दोन्ही खांद्याला पकडून विचारात होती.

"हिला विचार काय झालं आहे ? इतक्या वेळा विचारून काही बोलली नाही. मला जाग आली नसती किंवा जरा जरी उशीर झाला असता तर काय झालं असतं हीचं ह्याची कल्पना पण करवत नाही. हे बघ हे खत होती. तुझ्या झोपेच्या गोळ्या." स्वराने हातातील झोपेच्या गोळ्यांची पाकीट नीरजा पुढे धरले. पाकीट अख्खे खाली होते. त्यातील गोळ्या किचन मध्ये पडलेल्या होत्या.बोलताना स्वराच्या डोळ्यात आग धग धगत होती. डोळ्यातून पाणी वाहत होतं. 

ते बघून नीरजाच्या पाया खलची जमीनच सरकली. नीरजा लगेच नंदिनी जवळ गेली. तिला जवळ घेतले.

" बेटा आता तरी सांग काय झाले आहे. आम्हाला सांगण्या पेक्षा, मरण सोपं वाटलं तुला?" नीरजा आणि नंदिनी एकमेकींना पकडून रडत होत्या. स्वप्ना दोघींना सांभाळण्याचा प्रयत्न करत होती. प्रज्ञा स्वराला सावरत होती.

" चल आधी डॉक्टर कडे जाऊ." नीरजा लगबगीने उठत म्हणाली.

" मी पाकीट बघितले एकच गोळी घेतली गेली आहे. बाकी खाणार तितक्यात मी पोहोचले आणि त्या हातातून झटकल्या. तुला फोन केल्यावर डॉक्टरांशी बोलले. ते म्हणालेत एका गोळीने काही होणार नाही. आणि गोळी कमी पॉवर ची आहे. त्यामुळे काळजी चे कारण नाही. तरी ते औषध पाठवतो म्हणालेत. मी दादा ला येताना औषध आणायला सांगितले आहे." स्वरा डोळ्यातील पाणी पुसत बोलत होती. 

" पण झोपेच्या गोळ्या घरात आल्या कुठून." प्रज्ञा

"मी खूप वर्षांपूर्वी खूप आजारी होते. त्याचा त्रास अजूनही कधीतरी होतो मला. मग झोप लागतं नाही म्हणून डॉक्टरांनी ह्या गोळ्या दिल्या आहेत." नीरजाने स्पष्टीकरण दिले.

त्यानंतर खूप वेळ नीरजा नंदिनीला विचारात होती, पण नंदिनी फक्त रडत होती. 

" अजूनही काही बोलत नाही पोरगी. काय करू मी आता. स्वप्ना तू बघ बाई बोलून, सांगते का बघ काही." म्हणत नीरजा स्वरा आणि प्रज्ञाला घेऊन दुसऱ्या खोलीत निघून गेली."

स्वप्नाने नंदिनीला जवळ घेतलं. प्रेमाने डोक्यावर हात फिरवला. तशी नंदिनी अजून रडायला लागली.

" बोल बेटा. बोलली नाही तर कसं समजेल आम्हाला." स्वप्ना नंदिनीचे डोळे पुसत बोलत होती.

" स्वरा आणि प्रज्ञाच्या समोर मी बोलू शकत नव्हते गं मावशी. आणि आईला तरी कसं सांगू? हा प्रश्न पडला होता." नंदिनी शांत होण्याचा प्रयत्न करत होती.

" मग मला सांग मी सांगेल आईला." स्वप्ना नंदिनीला विश्वासात घेत होती.

" माणसं नाहीत गं ते लोक, हैवान आहेत. पहाटे चार पासून रात्री बारा पर्यंत काम करत असते मी. नंतर तो झोपू देत नाही. 

सतत मला भीती वाटत राहते की, हे लोकं मला मारून टाकतील. कपडे सुकत घालताना तुला इथून धक्का देऊ असं म्हणतात. अंघोळीला गेले की गिझर ची वायर पाण्यात टाकू म्हणतात. सतत भीती असते. " नंदिनी सांगत होती पण तिच्या चेहेऱ्यावर भीती दिसत होती.

" पण का असे वागतात ते. आणि तू आधीच का बोलली नाही." स्वप्ना

" त्यांना पैसे पाहिजे आहेत. तुझ्या बाबांना सांग दुकान घेऊन द्यायला ज्यात तू पार्लर सुरू कर. आणि कमाई आम्हाला दे म्हणतात. का तर तू आली घरात आणि आमचा एका माणसाचा खर्च वाढला. मग तुझ्या खाय प्यायचे राहण्याचे पैसे पाहिजेत आम्हाला." नंदिनी

" तुझा नवरा काही बोलत नाही का त्यांना?" स्वप्ना विचारात होती.

" तो काय बोलेल. तोच खूप खोटारडा आहे. फसवले आपल्याला त्या लोकांनी. लग्ना आधी पगार पंचवीस हजार सांगितला. पण खरा पगार फक्त तीन हजार आहे. ऑफिस मध्ये त्याची माहिती सांगणारे त्याचेच मित्र. त्यांनी त्याच्या सांगण्यावरून खोटी माहिती दिली. 

आम्ही महाबळेश्वरला गेलो होतो तेव्हा त्यानी सगळं सांगितलं. खरं तर तेव्हाच घरी सांगणार होते पण म्हटलं पागराच कमी आहेना, करू थोडी तडजोड. वाढेल पगार अजून सुरुवात आहे. म्हणून गप्प बसले." नंदिनी

पुढील भागात बघू नंदिनी काय सांगते ते. त्यावर दीपक राव आणि नीरजा ची काय प्रतिक्रिया असेल.

क्रमशः

© वर्षाराज

प्रिय वाचक मित्रांनो ही कथा काल्पनिक नसून सत्य घटनेवर आधारित आहे. ह्यात लिहिले जाणारे प्रसंगाचे वाचनाच्या दृष्टीने नाटकीय रूपांतर केले आहे. तरी कथेतून कोणाला दुखावण्याचा हेतू नाही. कोणी दुखावले गेल्यास क्षमा असावी. ही घटना एका व्यक्तीची आहे. कोणीही वयक्तिक संदर्भ लावू नये. तुम्हाला माझी कथा कशी वाटली. हे नक्की कळवा. तुमचा अभिप्राय लेखकासाठी मोलाचा असतो. पुढे काय काय घडणार आहे हे जाणून घेण्यासाठी वाचत रहा नवी पहाट. आणि लाईक करायला विसरू नका.

🎭 Series Post

View all