नवी पहाट... भाग ५

“ आता तुमचा माझ्यावर विश्वास नाहीये म्हणून तुम्ही इतका विचार करताय. बाकीचे लोक तर मागे लागले आहेत त्यांच्या. तुमच्या मुलीचं भलं व्हावं म्हणून मी थांबवलं आहे त्यांना.”... मामा

मागील भागात आपण बघितले...


“ हे बघ नाही सांगायचं असेल तर काही प्रश्न रहात नाही. पण हो सांगायचं असेल तर अजून बऱ्याच गोष्टी असतात. त्यांचा सुद्धा विचार करावा लागेल नंतर. म्हणजे बघ कुंडली जुळली पाहिजे, घ्याय द्यायच्या गोष्टी, मानपान अशा बरच गोष्टी असतात. त्यामुळे होकार दिला म्हणजे लगेच लग्नं ठरलं असं होत नाही.”... दीपकराव



सगळे आता नंदिनीकडे बघत होते. तिच्या उत्तरावर आता पुढचा खेळ अवलंबून होता.


आता पुढे...


“ आई-बाबा तुम्हाला सगळ्यांना आवडलाना मुलगा? मग माझी काहीच हरकत नाही. लोकं चांगली वाटली. आता बाकी तुम्ही ठराव.”... नंदिनीने आपलं मत सांगून बाकी निर्णय नीरजा आणि दीपकरावांवर सोडला.


 सगळ्यांना घरात माहीत होतं की नंदिनी असचं उत्तरं देईल. तरी समरने, नीरजा आणि दीपकरावांच्या वतीने, “ नंदिनी परत विचार कर. तुला हवा तेव्हढा वेळ घे. कसलीच घाई नाहीये.” असे सांगितले.


“ नाही दादा. खरंच मी विचार करून सांगते आहे. माझी काहीच हरकत नाहीये. नीरजच छोट चार जणांचे कुटुंब आहे. तो त्याचे आई बाबा आणि भाऊ. परत जवळच राहतात. मुलुंड ठाणे काही दूर नाही. सगळं नीट आहे. मग अजून काय पाहिजे.?”... नंदिनी


“ ठिक आहे, अजून उद्या पर्यंतचा वेळ आहे. हवंच तर अजून दोन दिवसांनी सांगू आपण. तो पर्यंत सगळेच परत विचार करा. सोमवार मंगळवार कडे सांगू त्यांना आपला निर्णय. मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. असं काही नाही की रविवारी म्हणजे रविवारीच सांगितलं पाहिजे. त्यामुळे सगळे विचार करा परत.”... दीपकराव


सगळ्यांना अजून विचार करायला वेळ देत दीपकराव सुद्धा परत सगळ्या गोष्टींची जुळवणी करत होते. दोन दिवस विचारात निघून गेले. दरम्यान दीपकरावांनी मामांना फोन केला. दीपकराव काही बोलणार तितक्यात मामांनी बोलायला सुरुवात केली.


“ भाऊ झाला का निर्णय काही.? अहो मुलाकडचे वाट बघत आहेत. मी काय सांगावं त्यानं?”..... मामा


“ मी त्यासाठीच फोन केला तुम्हाला. की अजून दोन दिवस द्या. मंगळवारी नक्की सांगतो तुम्हाला.”... दीपकराव


दीपकरावांच्या ह्या बोलण्यावर मामा जरा रागातच बोलत होते.


“ त्यांच्या मागे अजून बरीच मंडळी लागली आहेत. तुमच्यासाठी थांबली ते. त्यांना पण उत्तरं द्यायची आहेत ना इतरांना.”.... मामा


“ हो बरोबर आहे. पण प्रश्न माझ्या मुलीच्या आयुष्याचा आहे. असा कसा मी लगेच सांगू? फक्त दोन दिवस द्या म्हणतोय मी.”.... दीपकराव


“ आता तुमचा माझ्यावर विश्वास नाहीये म्हणून तुम्ही इतका विचार करताय. बाकीचे लोक तर मागे लागले आहेत त्यांच्या. तुमच्या मुलीचं भलं व्हावं म्हणून मी थांबवलं आहे त्यांना.”... मामा


“ ठिक आहे मग त्यांना सांगा की तुम्ही तुमचा निर्णय घ्या.”... दीपकराव आता जरा रागातच बोलत होते.


त्यांना मामांचे बोलणें आवडले नव्हते.


दीपकरावांचा बदलेला सूर पाहून मामा जरा नरमाईने बोलू लागले.


“ अहो भाऊ. रागावू नका. सांगतो मी त्यांना तुमचा निरोप. मग तर झालं?.... मामा


दोघांचे बोलून झाल्यावर दीपकराव जरा रागातच होते.


“ काय हो काय झालं? रागात दिसताय.”... नीरजा


“ बापू पण कमाल करतात. असं कसं लगेच सांगणार आपण? असे निर्णय घाईत घ्यायचे नसता. असो आता म्हणालेत की देतो तुमचा निरोप त्यांना.”... दीपकराव


“ बरं शांत व्हा.”... असं म्हणत नीरजा किचनमध्ये निघून गेली.


दोन दिवसांनी सगळे परत निर्णय घ्यायचा म्हणून बसले.


“ काय विचार केला सगळ्यांनी?”... दीपकराव


“ मला वाटतं काही हरकत नाहीये. फक्त एकदा मुलाचं घर बघून येऊयात आपण.”... नीरजा


“ हो ते मी बोलणारच आहे. त्याची काळजी नको करुस तू.”..

 दीपकराव


“ आम्हाला पण वाटतं काही प्रोब्लेम नाही.” समर आणि वृंदा एकदम बोलले.


“ माझा पण होकार आहे. पण मला सुद्धा घेऊन जा घर बघायला.” नंदिनी थोडी लाजून बोलली.


सगळ्यांच्या सहमतीने होकार द्यायचं ठरलं. त्यानुसार दीपकरावांनी मामांना फोन केला आणि होकार कळविण्यास सांगितले. आणि सोबतच मुलाची जन्म पत्रिका मागितली.


“ बापू आमचा होकार आहे. पण त्या आधी कुंडली जुळवून बघुयात. तर मुलाची जन्म तारीख आणि वेळ द्यायला सांगा त्यांना. आपण पण त्यांना नंदिनीची जन्म तारीख आणि वेळ देऊ. जुळली कुंडली तर मग पुढची बोलणी करायला बैठक ठेवू.”.... दीपकराव.


“ उत्तम. मी लगेच नलिनरावांना कळवतो. दोन दिवसात कुंडली दाखऊन देऊ.”.. मामा


ठरल्या प्रमाणे मामांनी थोड्याच वेळात मुलाची जन्म तारीख आणि वेळ कळवली. दुसऱ्याच दिवशी नीरजा आणि दीपकराव त्यांच्या गुरुजींना कुंडली दाखवण्यासाठी घेऊन गेले. योग जुळून यायचे असतील तर ते येतातच असं म्हणतात. त्या नुसार दोंघांची कुंडली जुळली.


“ कुंडली छान जुळते आहे. छत्तीस पैकी साडे अठ्ठावीस गुण जुळतात.”... गुरुजी


“ गुरुजी बाकी काही अडचण नाही ना? सगळं नीट आहे ना?”... नीरजा. आईचा जीव शेवटी कसा असतो ना. की काहीही करून आपल्या लेकराच चांगलं झालं पाहिजे. हीच अशा असते. त्याचं काळजीपोटी नीरजा विचारतं होती.


“ हो काही काळजी करू नका. सगळं उत्तम आहे.”... गुरुजी.


 नीरजा आणि दीपकराव घरी आले. आल्यावर त्यांनी समर, वृंदा, नंदिनी आणि स्वराला कुंडली जुळते हे सांगितले. सगळ्यांच्याच चेहेऱ्यावर आनंदाचे भाव उमटले.  दीपकरावांनी परत मामांना फोन केला.


“ बापू. आत्ताच आलो गुरुजींकडून. कुंडली जुळते आहे. आता काही प्रश्न नाही.”...दीपकराव


“ अरे वाह. योग जुळून येतात म्हणजे.”... मामा


“ नलिनरावांनी दाखवली का पत्रिका त्यांच्या गुरुजींना?”.. दीपकराव


“ हो ते कालच गेले होते. त्यांच्याकडे सुद्धा गुरुजींनी होकार दिला आहे.”... मामा


“ बरं मग आता पुढची बोलणी कधी करायची?”... दीपकराव


“ मी त्यांच्याशी बोलतो. बहुतेक येत्या रविवारीच म्हणतील ते यायचं. चालेल का? तर तसं सांगेल मी त्यांना.”... मामा


“ हो चालेल. पण आम्हाला त्यांचं घर बघायचं होतं. हे त्यांच्या कानावर घातलं तर बरं होईल.”... दीपकराव.


“ हो नक्कीच ते तर बघायलाच हवं. मी सांगतो त्यांना तसं.”... मामा


असं म्हणत मामांनी फोन ठेवला. आणि घरात एक नवीनच उत्साह संचारला. आता समर आणि स्वरा तर नंदिनीला चिडवून हैराण करत होते.


तितक्यात परत मामांचा फोन आला.


“ हॅलो भाऊ. बोललो मी नलिनरावांशी. ते म्हणालेत की बैठक पुढच्या रविवारी करू. त्यांच्या काही जवळच्या नातेवाईकांना घेऊन येतील ते. तुम्ही तुमच्या नातेवाईकांना बोलवा. आणि त्या आधी ह्या रविवारी तुम्ही जाऊन त्यांचं घर बघून या.”... मामा


“ चालेल आम्ही रविवारी जाऊ. तुम्ही पण या सोबत म्हणजे बरं पडेल जरा.”... दीपकराव


“ ठिक आहे. रविवारी सकाळी जाऊ मग. कोण कोण येणार तुम्ही?”... मामा


“ कोण म्हणजे...? आम्ही सगळेच. म्हणजे मी, नीरजा, समर, वृंदा, नंदिनी शक्य असेल तर स्वरा.”... दीपकराव


“ नंदिनीला नाही येत येणार. त्यांच्या कडे लग्ना आधी मुलगी येत नाही घरी. म्हणजे घरी येते ती माप ओलांडूनच त्या आधी नाही. असं सांगितलं त्यांनी. त्यामुळे तुम्ही सगळे या नंदिनीला सोडून.” मामा


“ ठिक आहे.” ... दीपकराव जरा नाराज होतंच हो म्हणाले.


“ नंदिनी तुला नाही येता येणार बेटा. घर बघायला.”... दीपकराव


“ पण का? तिला नको का दिसायला घर?” ... नीरजा


“ हो पण त्यांच्या कडे चालत नाही असं लग्ना आधी मुलगी म्हणजे सून घरी गेलेली.”... दीपकराव


“ ठिक आहे बाबा तुम्ही जा सगळे. काही हरकत नाही.”... नंदिनी


“ स्वरा तू ताई सोबत घरीच थांब. असही तुझं काही काम नाही तिथे. आम्ही जाऊन येतो चौघे.”... दीपकराव


“ बरं. पण मला ही यायचं होतं. ... स्वरा जरा नाराज होत हो म्हणाली.


“ तुझं काय काम गं तिथे. उगाच पहिल्याच वेळेस इतके लोकं जाणं बरं नाही. त्यामुळे नंदिनीला नेता आलं असतं तरी तुला आम्ही घरीच ठेऊन गेलो असतो.”... समर स्वराला चिडवत होता.


“ काय रे दादा. किती दुष्ट आहेस तू. जा बाबा सगळे असच करतात मला.” ... स्वरा.


रागावलेल्या स्वराला बघून सगळेच हसायला लागले. नंदिनी पण खळखळून हसली.


कसं असेल नीरजच घर? आवडेल का दीपकराव , नीरजा, समर आणि वृंदाला?


क्रमशः



प्रिय वाचक मित्रांनो ही कथा काल्पनिक नसून सत्य घटनेवर आधारित आहे. ह्यात लिहिले जाणारे प्रसंगाचे वाचनाच्या दृष्टीने नटकीय रूपांतर केले आहे. तरी कथेतून कोणाला दुखावण्याचा हेतू नाही. कोणी दुखावले गेल्यास क्षमा असावी. ही घटना एका व्यक्तीची आहे. कोणीही वयक्तिक संदर्भ लावू नये. तुम्हाला माझी कथा कशी वाटली. हे नक्की कळवा. तुमचा अभिप्राय लेखकासाठी मोलाचा असतो. पुढे काय काय घडणार आहे हे जाणून घेण्यासाठी वाचत रहा नवी पहाट. आणि लाईक करायला विसरू नका.


🎭 Series Post

View all