नवी पहाट...भाग १४

" अगं काल घाईत सांगायचं विसरलेच बघ. तू एक काम कर येताना छान स्टीलची मोठी कढई, सात लिटर चा प्रेस्ट?

मागील भागात आपण बघितले…

" राहूदे उद्या जाऊ आपण. काही हरकत नाही."... नंदिनी

" नको नको मला जमणार नाही. रविवारी पण जायचे आहे ऑफिसला. तू उगाच वेळ नको घालवूस. जा आणि कर शॉपिंग."... नीरज

" पण पैसे ठेवले नाहीत तुम्ही मला." …नंदिनी

" बाबांकडून घे ना सध्याचे. मग बघू हिशोब नंतर." …नीरज

" आई ने सांगितले आहे घरात बेडशीट चे दोन नवीन सेट पाहिजेत, दोन चादरी, दोन ब्लँकेट. ते पण घे."... नीरज

नीरजा मागून सगळं ऐकत होती. नंदिनीचा चेहेरा पडला होता. 

" अगं तू घे तुला काय हवंय ते. बाकी नंतर बघू."... नीरजा.

आता पुढे …

फोन झाल्यावर नंदिनी, नीरजा आणि स्वरा खरेदी साठी निघून गेल्या. दीपकराव त्यांना कपड्यांच्या दुकानात भेटणार होते. जसे ते आधी भेटत. 

" नंदिनी आधी सासूने सांगितलेलं सामान घेऊ मग तुझी खरेदी करू." … नीरजा

" हो आई, नाहीतर उगाच राग यायचं त्यांना." …नंदिनी

त्यानुसार तिघी आधी त्यांच्या नेहमीच्या दुकानात गेल्या. बेड शिट, चादरी, ब्लँकेट घेतले. तो पर्यंत दीपकराव सुद्धा तिथे आलेत. पैसे देऊन चौघे पुढच्या खरेदीला गेले. 

" आता तुला काय पाहिजे सांग? " दीपकराव नंदिनीला विचारत होते.

" नंदिनी बाळा साड्या जास्तं घे. तुझ्या सासूला ड्रेस घातलेले आवडणार नाहीत असं वाटतं. त्यामुळे घरात घालायच्या साध्या साड्या घे आणि बाहेर जायला चांगले ड्रेस घे. तसे लग्नात बरेच कपडे घेतलेत तू. पण ते सगळे घरात नाही घालता येणार तुला." नीरजा

" हो आई आपण आधी सध्या साड्या घेऊ मग ड्रेस." नंदिनी

ठरल्याप्रमाणे चौघे साडीच्या दुकानात गेले. नंदिनीने अगदी सध्या तीन साड्या घेतल्या ज्या घरात नेहमीच्या वापरात येतील. त्या नंतर मोर्चा वळला ते ड्रेसकडे. 

दुकानात शिरताना नंदिनीला एक ड्रेस दिसला तसाच ड्रेस तिला महाबळेश्वरला दिसला होता. जो तिला खूप आवडला होता. ती त्या ड्रेसकडे बघतच दुकानात शिरली. दुकानदार ड्रेस दाखवत होता, पण ह्या वेळेस नंदिनी ड्रेस बघायची त्याचे किमतीचे लेबल बघायची आणि आवडला नाही म्हणून दुसरा दाखवा सांगायची. हा खेळ बराचवेळ चालला. राहून राहून न कळत नंदिनी त्या बाहेर लावलेल्या ड्रेस कडे बघत होती. 

तिचा चालेल गोंधळ सगळेच टिपत होते.

" बाबा हि अशी का करते आहे? ड्रेस काही फार माहाग नाहीत. तरी लेबल बघून नाही सांगते." स्वरा हळूच दीपकरावांच्या कानात कुजबुजली.

" तेच मी पण बघतो आहे. तिला बाहेर चा ड्रेस आवडला आहे पण ती काहीच बोलतं नाहीये. तू एक काम कर तो ड्रेस घेऊन ये दुकानदारा कडून. " दीपकराव

" आहो, मला वाटतं नीरजने तिला पैसे दिले नाहीत म्हणून नंदिनी काचरत आहे घ्यायला." नीरजा

" थांब मी बघतो.

नंदिनी बाळा तुला जो आवडेल तो ड्रेस घे. पैशाची काळजी करू नकोस. हे ड्रेस आणि साड्या तुला आमच्याकडून. ह्याचे पैसे नाही घेणार मी नीरज कडून." दीपकराव

" नाही हो बाबा, तुम्हाला का खर्च उगाच. तुम्ही आधीच खूप दिलं आहे मला. खरं तर ह्याची गरज नाहीये पण… " नंदिनी बोलता बोलता थांबली.

" अगं नवीन लग्न तुमचं. नीरजला वाटतं असेल तुझ्याकडे खूप कपडे असावेत. " …नीरजा

" तुला हा ड्रेस आवडला आहे ना? बघ ट्राय करून कसा होतो ते." …दीपक राव नंदिनीला तो बाहेर लावलेला ड्रेस देत म्हणाले. 

ड्रेस बघून नंदिनीचा चेहेरा एकदम खुलला. पण ती लगेच " नको बाबा." म्हणाली.

" तुला सांगितलं ना की माझ्याकडून तुला गिफ्ट आहे हे. मग कसला विचार करतेस. घेऊन टाक. माझी लेक लग्नं झालं म्हणून मला काही परकी नाही."... दीपकराव

*****

सगळी खरेदी झाली. उशीर झाला होता म्हणून बाहेरचं जेवणाचा बेत ठरला. वृंदा आणि समरला हॉटेल मध्ये बोलावून घेतले, आणि सगळे जेवण करून घरी गेले.

दुसऱ्या दिवशी सकाळी निताचा फोन आला.

" हॅलो नंदिनी, झाली का खरेदी?"... निता

" हो आई. तुम्ही सांगितलेलं सामान घेतलं. आणि माझी पण खरेदी झाली." …नंदिनी

" अगं काल घाईत सांगायचं विसरलेच बघ. तू एक काम कर येताना छान स्टीलची मोठी कढई, सात लिटर चा प्रेस्टिज चा कूकर, एक मोठा गालिचा, माझ्या साठी पण दोन भारितल्या साड्या घेऊन ये. तिथे हे सगळं चांगलं मिळतं ना म्हणून सांगते आहे चल मी ठेवते जरा बाहेर जायचं आहे." …निताने नंदिनी काही बोलायच्या आत फोन ठेवला सुद्धा. 

नंदिनी केविलवाण्या नजरेने नीरजा कडे बघत होती.

" हे सगळं आहे घरात मग का हवं आहे ह्याना परत?" …नंदिनी

नीरजाला सुद्धा आवडत नव्हतं निताच असं वागणं. मनात काही ठरवून नीरजा नंदिनीला घेऊन खरेदी करून आली.

निताने सांगितलेले सगळे सामान एका बाजूला करून ठेवले. 

" नंदिनी बेटा हे बिलं आहेत तुझ्या सासूने सांगितलेल्या सामानाचे. जे आम्ही त्यांना देणार आहोत. ह्यात फक्त तुझ्या कपड्यांचे बिल नाही." … नीरजा

" हो आई. मी तर म्हणते की माझ्या कपड्यांचे बिल पण द्या त्यांना. तुम्ही का खर्च उचलता आहात. तुम्ही दिलं आहे सगळं. हे त्यांना पाहिजे म्हणून घेतलं. तर त्यांनीच करावा खर्च." …नंदिनी

" नाही बाळा तू मुलगी आहेस आमची. आम्हाला पण नाही पटणार की हे पैसे त्यांच्या कडून घ्यावे. किमान ह्या वेळेस तरी. पुढच्या वेळेस घेऊ आम्ही." …दीपकराव

दुसऱ्या दिवशी परत निताचा फोन आला.

" नंदिनी अगं नीरज आणि त्याच्या बाबांसाठी साठी दोन तीन शॉर्ट घेऊन ये." …निता.

ह्या वेळेस फोन स्पीकर वर होता. ते ऐकताच नीरजाने नंदिनीच्या हातातून फोन घेतला.

" नमस्कार निता ताई. अहो आता काही बाहेर जायला जमणार नाही आम्हाला. आणि आवडीचा, मापाचा गोंधळ होतो त्यामुळे नीरज येतील तेव्हा ते आणि नंदिनी जाऊन घेतील की काय पाहिजे ते, त्यांच्या आवडीने."... नीरजा अगदी प्रेमाने हसून बोलत होती.

ह्यावर निताला काही जास्तं बोलता आले नाही तिने बरं म्हणून जुजबी बोलून फोन ठेवला.

संध्याकाळी दीपक राव आल्यावर त्यांना घडलेला प्रकार सांगितला.

" नंदिनी मी बघितलं की तू ड्रेस घेताना लेबल बघत होती. तुला पैसे देणार नाही नीरज असं वाटतं होतं का? तसं असेल तर आत्ताच सांग." …दीपकराव.

" नाही बाबा अजून मला काही अंदाज नाही त्याच्या स्वभावाचा. म्हणून जरा हात राखून खर्च करत होते." …नंदिनी बोलत होती पण तिला महाबळेश्वरचा प्रसंग आठवत होता. नीरज तिला काहीच साध बघू सुद्धा देत नव्हता. त्यामुळे तो खर्च करणार नाही ह्याची कल्पना तिला आली होती. तरी घरच्यान पासून हे सगळं ती लपवत होती. 

फक्त हा विचार करून की अजून नवीन आहे. समजायला त्याला आणि मला वेळ लागेल. 

बघता बघता नंदिनीचा जायचा दिवस आला. नीरज तिला घ्यायला आला होता.  

" नीरजराव. हे घ्या सगळं समान घेतलं आहे. आणि हे त्याचे बिल. नीट बघून घ्या सगळं. नंदिनीच्या कपड्यांचे बिल नाही ह्यात. ते आमच्या करून तिला."... दीपकराव नीरजच्या हातात बिल म्हणाले. 

" बाबा आता पैसे काढायचे विसरलो मी बँकेतून. नंतर देतो. "... नीरज उसने हसू आणत बोलत होता. पण त्याने ते बिल हातात घेऊन नंदिनीकडे एक करडा कटाक्ष टाकला.

" काही हरकत नाही. पण सामान बराच आहे. तुम्ही डायरेक्ट टॅक्सी करून जा. "...दीपकराव

" हो पण तोच विचार करत होती. पण तुम्हाला आत्ताच बोललो की पैसे काढायचे राहिलेत बँकेतून. तुम्ही नंतर सामान आणून द्या." …नीरज बोलता बोलता थांबला.

" आम्हाला यायला जमणार नाही इतक्यात. मी देतो टॅक्सी चे पैसे तुम्ही काळजी करू नका."... दीपकराव.

सगळ्यांचा निरोप घेऊन नंदिनी आणि नीरज निघून गेले.

" बाबा असं कसं विसरला हा बँकेतून पैसे काढायचे."... समर

" आता आपण कसं बोलणार काही? शेवटी जावई आहे. विसरला असेल खरंच." …नीरजा

तरी सगळ्यांना नीरज चे वागणे पटले नव्हते.

दुसरीकडे…

नंदिनी आणि नीरज टॅक्सीत बसून निघून गेले. जाताना नंदिनी ने नीरज ला विचारले.

" तुमच्या साठी आणि बाबांसाठी शर्ट घ्यायचा होते ना? " …नंदिनी

" आता काही नकोय मला. तुला सांगितलं तर तू नाही आणलेस आणि वरून तुझ्या बाबांनी हे बिलांचे कागद दिले मला. " …नीरज जरा रागावून बोलत होता.

" पण ते का देतील ह्या सामानाचे पैसे. ? " …नंदिनी

" का ? मुलीसाठी इतकं करू शकत नाहीत का? आता हा विषय नको. चल घरी आता. " …नीरज

नीरजच्या बोलण्यावर नंदिनी त्याच्याकडे बघतच राहिली. आपला निर्णय चुकला ह्याची पहिली जाणीव तिला त्या वेळेस झाली. 

पुढील बघत बघू अजून काय वाढून ठेवलं आहे नंदिनी च्या समोर.

क्रमशः

© वर्षाराज

प्रिय वाचक मित्रांनो ही कथा काल्पनिक नसून सत्य घटनेवर आधारित आहे. ह्यात लिहिले जाणारे प्रसंगाचे वाचनाच्या दृष्टीने नाटकीय रूपांतर केले आहे. तरी कथेतून कोणाला दुखावण्याचा हेतू नाही. कोणी दुखावले गेल्यास क्षमा असावी. ही घटना एका व्यक्तीची आहे. कोणीही वयक्तिक संदर्भ लावू नये. तुम्हाला माझी कथा कशी वाटली. हे नक्की कळवा. तुमचा अभिप्राय लेखकासाठी मोलाचा असतो. पुढे काय काय घडणार आहे हे जाणून घेण्यासाठी वाचत रहा नवी पहाट. आणि लाईक करायला विसरू नका.

🎭 Series Post

View all