May 15, 2021
नारीवादी

सुनेची थेरं

Read Later
सुनेची थेरं

"काय हो.. तुमची सून या नवरात्रीमध्ये नऊ रंगाच्या साड्या नेसून जात आहे म्हणे.." शेजारच्या काकू म्हणाल्या..

"हो.. आणि तिची इच्छा आहे तर जाऊ दे ना.. आपण कशाला अडवायचं.." स्वप्नाच्या सासूबाई..

"काय बाई ही थेर.. कशाच काय आणि कुणाचं काय?? आम्ही पण उपवास करतो म्हणावं.. असली थेर कधी केली नाहीत.." शेजारच्या काकू

"अहो ताई.. आपला काळ वेगळा होता.. आता मुली सक्षम बनत आहेत.. निर्भर बनत आहेत.. आजच्या जमान्यात काय चाललंय त्याप्रमाणे वागायचं?? उगीच आमचा जमाना करून त्यांना अडवायच नाही.." स्वप्नाच्या सासूबाई

"अहो तुमची स्वप्ना एक नोकरी करते.. आमची घरातच असते ना.. मग हिला कशाला पाहिजे तसल.." शेजारच्या काकू

"एक मिनिट.. थेर आणि तसलं म्हणजे काय?? साड्याच तर नेसतात ना.. दुसरं काही करत नाहीत ना.. त्यात बदल म्हणून नेसल्या नऊ दिवस नऊ साड्या तर बिघडलं कुठं?? अगदी भारतीय संस्कृतीला साजेसं तर वागतात ना.. मग त्यांना बोलण्याचा काय अधिकार आहे??" स्वप्नाची सासूबाई

"अहो ते बरोबर आहे.. तुमची सून नोकरी करते.. तिने नविन नविन साड्या नेसल्या तर बिघडत नाही.. ती ऑफिसात बसूनच असते.. पण आमची घरातच असते ना.. मग ही रोज नवीन साड्या नेसून कसे करणार??" शेजारच्या काकू

"करेल की.. आणि नऊ दिवसांचा तर प्रश्न आहे.. तिचं ती बघेल की.. तुम्हाला का इतकी काळजी??" स्वप्नाची सासूबाई

"हमम.." शेजारच्या काकू

"आणि हो.. नवरात्रीला उपास करून, स्त्रीयांविषयी लेख लिहून, भाषण ठोकून, स्टेटस ठेवून स्त्रीशक्तीचा जागर करायचा.. स्त्रीविषयीचा आदर दाखवायचा.. आणि घरात येऊन आई, मुलगी, बायको, सून, बहिण यांना कमी लेखायचे, त्यांना ओरडायचे, त्यांचा अपमान करायचा.. याला महत्व नाही.. एक वेळ तुम्ही स्टेटस ठेवू नका.. उपवास करू नका.. पण घरातल्या स्त्रीला तिचा मान द्या.." स्वप्नाच्या सासूबाई

हे अगदी खरं आहे.. स्त्रीला जर सन्मान द्यायचा असेल तर घरापासून सुरूवात करायला हवी.. जग सुधारायचे असेल तर प्रत्येकाने आपल्या घरापासून सुरूवात करायला हवी.. तरच जग सुधारेल.. त्यासाठी बाहेर जाऊन उपदेश द्यायची गरज नाही..

आवडल्यास कमेंट आणि लाईक करायला विसरू नका..
हक्क लेखिकेकडे राहतील.. शेअर करायचे असल्यास नावासह करावे..
धन्यवाद..

Circle Image

Priyanka Abhinandan Patil

मनात जे काही येतं ते लिहिते.. मनापासून लिहायला आवडते..