सुनेच कन्यादान

वीणाताईंना झालेल्या नुकसाना पेक्षा सुनेच्या बेजबाबदारपणाचे दुःख जास्त होते, पण मनीष समोर त्या काही बोलल्या नाही तरी-- व्हायचे ते झालेच मनीष निशाला खूप बोलला रागाने बाहेर निघून गेलाआताशा मनीषचा चिडचिडेपणा वाढतच चालला सा वाटत होतानेमके कारण काही कळत नव्हते एक-दोनदा माधवरावांनी विचारले "कां रे ऑफिसमध्ये काही?? तर स्पष्ट असे बोलला नाही निशाला तर विचारण्यात अर्थच नाही.

*सुनेच कन्यादान*


आश्रमातल्या संध्यापूजेची वेळ झाली. एक एक करत पुरुष स्त्रिया हाॅल मध्ये जमा होत गेली.


वीणाताई, केळकर ताईंचा हात धरून त्यांना सोबत घेत प्रार्थनेला आल्या.
\"शुभंकरोती\" पासून सुरू होत \"ओम जय जगदीश हरे\" पर्यन्त पाच सहा आरत्या म्हणेपर्यंत सात वाजले.
वीणाताईंनी माधवरावांच्या फोटो ला नमस्कार केला व त्या हाॅल मध्ये आल्या
सात वाजता वीणाताई टीव्ही वर येणारी एक मालिका नियमित पहात त्या मालिकेमुळे आपण ही घरातल्यांच्या सोबत असल्यासारखे त्यांना वाटायचे.
मालिकेतल्या पात्रांचे वागणे आपसातील संबंध यावर मग त्या आणि केळकर ताई गप्पा मारत, कधीतरी मालिकेच्या कथे वरुन वाद विवाद ही करत.

नऊपर्यंत जेवण झाली तशी सर्व सदस्य आपापल्या खोलीत झोपायला गेली .
वीणाताईना निशाचा त्यांच्या सुनेचाएक दिवसाआड फोन येत असे.
आज फोन येणार म्हणून त्या जाग्या होत्या .बराच वेळ झाला निशा च्या फोन ची वाट पाहता पाहता वीणाताईंच्या डोळ्यासमोर आनंद चा चेहरा तरळला.

आनंद त्यांचा एकुलता एक मुलगा बँकेत नोकरी लागली आणि वीणाताई आणि माधव रावांना त्याच्या लग्नाचे वेध लागले ,पण-- आनंद ने परस्पर निशाशी लग्न ठरवले .
अनाथाश्रमात वाढलेली,बारावी पास निशा दिसायला खूप सुंदर ,अल्हड पण जरा वेंधळीच.
या उलट वीणाताई नीटनेटक्या वक्तशीर कामसू ,निशाचा वेंधळेपणा त्यांना अजिबात खपत नसे त्या तिला बरेच वेळा रागवत समजावत "आजकालच्या जगात
इतक वेंधळेपणा बरोबर नाही आणि दुसरं म्हणजे निशाला कोणी नाव ठेवू नये या करता त्या तिला बोलत.
आनंद ला हे सर्व आवडत नसे यावरून त्याचे आणि ताईंचे बरेच वेळा वाद होत.
माधवराव ही वीणाताईंना समजावत अग ती आईविना पोर आहे पण वीणाताईंच म्हणणे म्हणून च मी तिला वळण लावते, मी तिच्या चांगल्यासाठीच करते.

माधवराव रिटायर होऊन दोन वर्षे झाली ते व वीणाताई पंधरा दिवस देवदर्शनाला नाशिक त्रंबकेश्वर फिरायला गेले. जाताना त्या निशाला घराबाबत नीट समजावून गेल्या.
परत आल्या तो घरात चोरी झाल्याची बातमी कळली निशाच्या वेंधळेपणाचे एक आणखीनच उदाहरण समोर आले आनंद म्हणाला "आई तिने मागचे दार नीट बंद केले नव्हते चोरांना फावले".
वीणाताईंना झालेल्या नुकसाना पेक्षा सुनेच्या बेजबाबदारपणाचे दुःख जास्त होते ,पण आनंद समोर त्या काही बोलल्या नाही तरी-- व्हायचे ते झालेच आनंद निशाला खूप बोलला रागाने बाहेर निघून गेला
आताशा आनंदचा चिडचिडेपणा वाढतच चालला सा वाटत होता
नेमके कारण काही कळत नव्हते, एक-दोनदा माधवरावांनी विचारले "कां रे ऑफिसमध्ये काही?? तर स्पष्ट असे बोलला नाही निशाला तर विचारण्यात अर्थच नाही.

तो दिवस वीणाताईंनाआठवला. येता येता आनंद च्या गाडीला मोठा एक्सीडेंट झाला. सर्वच संपलं.
डोळ्यासमोर लाडक्या लेकाचा शरीराला अग्नी देताना माधवरावांच्या पायातले त्राणच गेले .त्यांना सावरावे की या अल्लड सुनेला वीणाताईची खरी परीक्षा सुरू झाली
आता त्यांच्यातल्या सासूने आईची जागा जणू घेतली त्यां निशाची लेकी प्रमाणे काळजी घेऊ लागल्या.
हळूहळू निशा सावरली पण माधवराव नाही सावरले, ते गेलेच.

काळ कोणासाठी थांबत नाही विणा ताईंनी निशाला पुढचे शिक्षण घ्यायला लावले ग्रॅज्युएट होता होता निशा ही प्रगल्भ झाली वीणा ताईंचे ही आता वय बोलू लागले त्यांनां निशा ची काळजी वाटत होती इतक्या लहान वयात झालेला आघात, आणि पुढे येवढं मोठ आयुष्य एकट्याने जगणं,
आता त्या नीशा साठी स्थळ शोधू लागल्या.

निशाला लग्नासाठी तयार करणे म्हणजे त्यांच्यातल्याआई पणाचा कस लागणार होता..

बघता बघता एक वर्ष पूर्ण झाले
.वीणाताई माधवरावांच्या वर्षश्राद्धाला आश्रमाला भेट द्यायला म्हणून गेल्या असताना तिथल्या संचालकांशी त्यांची चांगली ओळख झाली. त्यानंतर मधून मधून वीणाताई आश्रमात जात असत तिथल्याच एका सद्गृहस्थाने निशाकरता अमोल चे स्थळ सुचवले अमोल अमेरिकेत सॅटल्ड , पहिला घटस्फोट झालेला होता.
स्थळ एकदम उत्तम होते. अमोल ला पाहून विणा ताईंना क्षणभर आनंद चा भास झाला.
निशा ला अमोल, अमोल ला निशा पसंत पडत आहे तरीही निशा लग्नाला तयार होत नव्हती.

वीणाताईंनी तिची खूप समजूत काढली पण, निशा चे म्हणणे मी एकदा आई नसल़्याच काय दुःख असते अनुभवलं आहे
आई तुला या वयात एकटं सोडून दूर देशात मी कशी राहू माझं मन कस आनंदात राहिल.
निशा ची काळजी वीणा ताईंना समजत होती.

\"अग पण, मी पिकल पानं त्याचा काय भरोसा केव्हाही गळून पडेल पण त्याआधी तुला सुखात पाहायची इच्छा आहे"
अमोल सारखा चांगला जोडीदार देवाने तुझ्या नशिबात लिहून ठेवला आहे नाही म्हणू नको ..

\"पण आई मी गेल्यावर एवढ्या मोठ्या घरात एकटी कशी राहशील तू\"?तु ही आमच्या सोबत चल,
तुझे सासरे,माझा आनंद यांच्या स्मृति या जागेत आहे.त्यासोडून मी कशी तुझ्यासवे येऊ?
पण मग तुझी काळजी कोण घेणार? मला तिथे कसं चैन पडेल?

त्यावर वीणाताई म्हणाल्या "मी वृद्धाश्रमात राहिले तर तुला चालेल कां? तिथे माझ्या ओळखीचे बरेच लोक आहे" ‌.
मी एक सुचवू कां आई? "आपण जर हा बंगला च वृद्धाश्रमाला दिला तर आपले घर ही तुला सोडून जावे लागणार नाही आणि एकटेपणा ही जाणवणार नाही"
, निशा चा सल्ला वीणाताईंना पटला त्यांनी वृद्धाश्रमाच्या संचालकांची गोष्टी केल्या त्यांना वृद्धाश्रमास साठी जागा हवीच होती. वीणाताईंनी बंगला वृद्धाश्रमाला दान दिला संचालकांनी आश्रमा ला हवी ती व्यवस्था करवून घेतली . वीणाताई ही त्यातच त राहू लागल्या.
वृद्धाश्रमाला आनंदाश्रम असे नाव दिल .
पुढच्या सगळ्या गोष्टी मग पटापट झाल्या
निशा चे लग्न अमोल शी आनंदाने पार पडले सुनेला लेक मानून तिचे कन्यादान केले .

"अगं केव्हाचा फोन वाजतो आहे तुझ लक्ष कुठे आहे? माझी झोप सुद्धा उघडली" केळकर आजींच्या आवाजाने वीणाताई भानावर आल्या. आणि फोन वर निशा चा आवाज ऐकून उत्साहाने बोलू लागल्या..
-----------------------------------------