सुंदरतेला रंग नाही

It's about skin tone. Beauty has no skin tone. Today lot of people judge over the skin ton. If everyone look around the nature has never set any rules for beauty. Two incidents are I have been through. Maintaining what nature has given it is blessin

नमस्कार,

सुंदरतेला रंग नाही. सुंदरता म्हणजे काय हो? कशी असते ही सुंदरता? सुंदरता फक्त रंगांमध्येच असते का?  का बघणार्‍याच्या डोळ्यात असते? 

बहुतेक करुन कथा, कविता आणि गाणी असो, एखाद्या व्यक्तिचे वर्णन हे अश्या प्रकारे केलेली असते की प्रत्येकाला सुंदरच दिसायची इच्छा होते. मग येतात वेगवेगळ्या प्रकारचे घरगुती,  केमिकल युक्त सुंदर बनवणारे उत्पादने,  महाग असे खाद्यपदार्थ आणि गोळ्या औषधे. 

सुंदरता ही बघणार्‍याच्या डोळ्यात असते. निसर्ग निर्मित झाडे, प्राणी,  पक्षी आणि जलचर सगळ्यानाच सुंदर दिसते. पण मग मनुष्याच्या बाबतीत का लागु होत नाही? एखादी व्यक्ती ही गोरी असेल तरच सुंदर असते का? 

जगात सगळ्यात जास्त पैसे आकारणारी मॉडेल ही रंगाने जरी काळी असली तरी तिच्या सुंदर कांती कडे पाहिल्यास नक्कीच हेवा वाटेल.  

माझ्या आयुष्यातील एक घटना,  एकदा मुंबई मधील काम संपवून एका छोटेखानी उपहार गृह मध्ये जेवायला गेले. तर,  तिथे शेअर टेबल प्रकार होता. तिथल्या वेटर ने एक उपलब्ध टेबल दाखवले. तिथे आधी पासूनच एक काळ्या रंगाची व्यक्ती बसलेली होती.  माझ्या सोबत असलेल्या व्यक्तीने मागाहून येऊन दुसर्‍या टेबल ला जायचा आग्रह केला. कोणाला ऐकू नाही जाणार अशा वादा नंतर दुसर्‍या टेबल वर बसलो. खूप विचारल्यावर सोबत असलेल्या व्यक्तीने उत्तर दिले की,  तो व्यक्ति खूप काळा होता. मी मनातच स्वतःशी म्हणाले, स्वतः जसे की खूप गोरापान असल्यासारखे दुसर्‍याला रंगावरून अप्रत्यक्षपणे हिणवले. ही गोष्ट मनाला लागली.  विचार करायला भाग पाडले.  किती सहज कोणी कुणाला रंगावरून हिणवत. मग ते समोर असो किंवा पाठीमागे किंवा अप्रत्यक्षपणे. मग स्वतःचा रंग काही का असेना.  

आपण पाश्चिमात्य लोकांचा गोरा रंग पाहतो. पण हा रंग म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने कमजोर. वय वाढत जाते आणि त्यासोबतच त्याच्या समस्या.  खूप जवळून ह्या लोकांच्या त्वचारोग पाहिल्यावर नकळतच आपण किती नशीबवान आहोत असे वाटून गेले. 

सुंदरतेला रंग नाही.  एकदा का स्वतः चा स्वीकार केला तर आयुष्य खूप सुंदर आहे. जो रंग निसर्गाने बहाल केला आहे त्यालाच छान पणे देखभाल केल्यास वाढत्या वयात नक्कीच अजून जास्त सुंदर असेल यात वादच नाही.  

धन्यवाद.