सुनंदा - एक शोकांतिका ( भाग -14 ) ( अंतिम भाग )

Sunanda

   

        सुनंदा आई कडे गेल्यावर दोन, तीन दिवस विचार करण्यात घालवते, पण पुढे काय......ह्या विचाराने चं तीला काहीच सुचत नसते. मग ती ठरवते, काही काम मिळेपर्यंत हे मंगळसूत्र तरी सोनाराकडे गहाण ठेवून थोडे पैसे आणते. आणि मग सोनाराकडे जाऊन मंगळसूत्र गहाण ठेवून पैसे आणते.

        त्या पैश्यात तिचे सहा महिने जातात. आणि सहा महिन्यांनी पुन्हा काय हा प्रश्न पडल्यावर ती विचार करते कि मला शेतीच्या कामांची  माहिती आहे तर इथे कोणाच्या शेतात काम मिळत का ते बघू, तिच्या डोळ्यात खूप पाणी येत असत, ती सारखी देवाला सांगत असते कि देवा तू हे काय दिवस दाखवलेस तू मला.....एकेकाळी  आमच्या स्वतः च्या शेतात गडी  माणसं  काम करायला होती आणि मी त्याच्यावर देखरेख करायला, त्यांना मदत  करायला  शेतात जातं होती.

        आज मी स्वतः दुसऱ्या च्या शेतात मोलमजुरी करायला जाणार, ह्याच तीला खूप वाईट वाटत होत, पण परिस्थिती चं अशी होती कि जगण्यासाठी काहीतरी हालचाल  तर करावीच लागणार होती. म्हणून मग सुनंदा ठरवते, इथे कोणाला तरी गावच्या बायकांना विचारून कुठे काम मिळत का ते बघते.

            सुनंदा ला एका शेतात काम मिळत, सुनंदा रोज सकाळी जाऊन संध्याकाळी येत असे. तिथे बाकीच्या बायकांनबरोबर जरा बोललं, चाललं कि तीला बरं वाटत असे. सुनंदा सकाळी स्वतः साठी जेवणा चा डब्बा घेऊन जातं असे, आणि तिथे सगळ्यांबरोबर जेवत असे. मग संध्याकाळी आल्यावर तीला बरेचदा  एकटीलाच घर खायला उठत असे, कोणीच बोलायला नसे, त्यामुळे ती कधी जेवण वाटल तर बनवत असे, तर कधी कधी अशीच उपाशी  झोपत असे.

         अशीच मध्ये पाच वर्ष निघून जातात. सुनंदा पण आता वयाने थकत चालली होती. तीला शेतात  काम करायला वयानुसार त्रासदायक वाटू लागले, कधी पाय दुखत असत, तर कधी कधी तीला पित्ताचा भयंकर  त्रास होत असे.

          पित्त झाल्यामुळे डोकं दुखत असे, कधी कधी पाय खूप वळत असत. पण सुनंदा पूर्णपणे त्याकडे दुर्लक्ष करत असे, एखादी गोळी काहीच न खाता पिता घेऊन झोपत असे, एकटी साठी स्वयंपाक करायला पण तीला नको वाटत असे. नंतर नंतर सुनंदा चं डोकं खूप चं दुखत असे, पण ती गोळ्या घेऊन दिवस घालवत होती.

          अशीच मध्ये दोन वर्ष निघून जातात, आणि सुनंदा चे पाय खूप दुखू  लागतात, त्यांनंतर तीला पाय सुजने चालू होते, डायबिटीस पण वाढलेला असतो, जेव्हा खूप चं त्रास होऊ लागतो तेव्हा सुनंदा डॉक्टर कडे जाते सर्व टेस्ट केल्या नंतर समजत किडनी खराब झाली आहे, भरपूर गोळ्या घेऊन घेऊन.

          सुनंदा हे ऐकून घाबरून चं जाते कारण तिच्याकडे उपचारासाठी पैसे चं नसतात. पण त्रास पण अति चं होत असतो. मग ती डॉक्टर कडून गोळ्या घेऊन  घरी परत येते, डॉक्टर सांगतात, उदया कोणाला तरी तुमच्या बरोबर हॉस्पिटल ला घेऊन या आपण तुम्हाला ऍडमिट करून पुढची ट्रीटमेंट करू,. सुनंदा हा बोलून तिथून निघते.

         सुनंदा रात्रभर विचार करते, काय करू, कोण येणार बरोबर, आणि त्यात ह्या उपचारासाठी पुरेसे पैसे पण नाहीत आपल्याकडे, सुनंदा विचार करून आणि रडून शेवटी नको ते पाऊल उचलते, सुनंदा आई च्या चं घराच्या पाठच्या बाजूच्या विहिरीत उडी मारून जीव देते. सकाळी विहिरीवर पाणी काढायला एक बाई आलेली असते तीला सुनंदा चे प्रेत तिथे दिसते. आणि मग ती सर्वांना गावात जाऊन सांगते.

         सुनंदा चं तर तिथे कोणीच नसतं पुढचं सर्व करायला, मग गावातली लोक चं पैसे काढून पुढचं क्रिया कर्म करतात. आणि अशाप्रकारे सुनंदा ची जीवनयात्रा इथे संपते...

( कथा कशी वाटली ते नक्की कंमेंट करून कळवा. ...धन्यवाद.....)

लेखिका... सौ. सोनल गुरुनाथ शिंदे ( देवरुख - रत्नागिरी )

🎭 Series Post

View all