Login

सून घ्यावी भाग्याने

Sun Ghyavi Bhagyane
आदिनाथ आणि आईचा वाद दिवसेंदिवस विकोपाला जात होता ,जिथे आई शिवाय त्याचे पान हलत नव्हते तिथे आता तो आईसोबत इतका वाद घालत होता की तो आईला जरा ही सहन करत नव्हता . त्याला आईने त्याच्या आयुष्याचा हा पहिलाच निर्णय चुकीचा वाटत होता, नाही चुकीचा नाहीतर तिची त्याच्या आयुष्यात अवाजवी ढवळाढवळ वाटत होती.आत्तापर्यंत तिने जे काही निर्णय घेतले ते त्याने तिचा मान आणि आदर होता आहे,आणि राहील ह्या दृष्टीकोनातून घेतले होते, ती आई आहे आणि ती कधी चुकू शकत नाही, आणि माझ्या बाबतीत तर ती काही गैर होऊ देणारच नाही, ती माझे वाईट होऊ देणार नाही हे त्याला माहित होते, बऱ्याचदा तर त्याने ही त्याचे निर्णय घेतले होते पण तेव्हा आईचा पूर्ण पाठिंबा होता आणि म्हणूनच तो चुकला तरी आई सांभाळून घेत होती. त्याला आईचा आपल्या आयुष्य घडवण्यात बाबा इतकाच सिंहाचा वाटा आहे हे मनोमन पटत होते, त्याच्यावर तसे संस्कारच होते. जाणीव होती त्याला की आई बाबा खूप कष्ट घेत आहेत ,मग आपण ही त्याचे चीज करायचे आहे,इथून पुढे त्यांना ही असेच सुख आपल्या कडून द्यायचे आहे .मग इतके माहीत असून ही का हा आईचा आत्ता राग करत होता याचे नवल वाटत होते, आईला ही त्याचा हा निर्णय का पटत नव्हता.आदिनाथ खूप होतकरू,समंजस मुलगा ,दिसायला स्मार्ट, कर्तबगार, कोणाला ही भावी नवरा असावा तर असा, जावई असावा तर असा वाटणारा होता, संस्कार तर होतेच,पण घरची मंडळी ही छान होती, पैसा पाणी, घर दार, सगळे अगदी सुव्यवस्थीत होते ,मग काय हे बघून की तो चांगल्या मोठ्या पगाराची नौकरी करत आहे, त्याला कोणाचे काही कर्तव्य करायची गरज नाही हे डोळ्यासमोर चांगले स्थळ आहे,मग हातचे स्थळ का सोडायचे ,ही बाब त्याच्या मामाच्या डोळ्यात आली, मग आपली मुलगी तिथे द्यावी ही त्याची लगबग सुरू झाली.त्यात वाईट काही नाही पण जो माणूस कधी भाच्याला कधी बोलत चालत नव्हता, त्याच्याशी कधी मामा म्हणून कर्तव्याला ही उभा नसत तो आता मात्र वरचे वर त्यांच्या घरी येऊ लागला होता, आंब्याच्या पेट्या, गावाकडचे धान्य, फळ,भाज्या, बहिणीला साडी चोळी करू लागला, तुची विचारपूस करू लागला. कधी ही तिला माहेरपण काय असते हे बाप आणि आई गेल्यानंतर दिले नाही,मोठा भाऊ म्हणून तिला कधी दोन शब्द गोड बोलला  नाही तो दोन वर्षांपासून लेक इथे देऊ पण आधी तसे पुन्हा नाते तयार करू म्हणून सगळे सोयीस्कर जुळवून घेऊ लागला, म्हणजे अगदी अचानक जर मुलीला करून घे म्हणालो तर ताईला शंका येईल, आणि मग नात होणार नाही.आदिनाथ ला मामाचा हा खेळ माहीत झाला होता, त्याला त्याच्या मावशीच्या मुलाकडून कळला होता, त्याने सांगितले होते की मामा त्याची मुलगी तुला नौकरी लागण्या आधी मला देणार होता पण मला जी नौकरी होती ती तुझ्या नौकरी पेक्षा कमी पगाराची आहे हे कळल्यावर त्याने मला हळूहळू टाळने सुरू केले ,आणि मग तुला तो जावई करून घेण्यासाठी धडपडू लागला आहे...आदिनाथ चा खूप संताप झाला होता, हा मामा फक्त पैस्यांवर भाळला आहे  आणि त्याने आईला ही आपल्या मुलीला सून म्हणून तयार करण्यासाठी तयार केले आहे पण मला हे स्थळ मान्य नाही ,आणि मी ते करणार नाहीपण आईला त्याने नकार आहे ह्या स्थळासाठी,तू कोणते ही स्थळ सांग पण मी हे स्थळ अजिबात करणार नाही, माझी ह्या नात्याला मुळापासूनच ,म्हणजे तिच्या बापाचे माझा मामा असल्यापासून च नापसंती आहे पण मला पुढे ह्या नात्याला नवीन वळण द्यायचे नाही..आईला हे नाते फक्त यासाठी करावे वाटत होते की ती नात्यातली आहे,ती भावाची मुलगी आहे ,आणि ती काही झाले तरी नाते निभावून नेणारी असेल,शेवटी ती जवळची आहे....आईला ही त्याचे आता हा निर्णय पटत नव्हता ,पण तिला आपल्या भावाच्या सुखापेक्षा मुलाच्या आनंदात आणि सुखात सुख माणण्याशिवाय पर्याय नव्हता, घरात कोणी मुलगी येण्याआधी जर ना चा सूर असेल तर त्या नात्याला ही काही अर्थ रहात नाही.... कोणाची मुलगी घरी येणार तर ती सुखी असेल तर घर सुखी असते...आईने आदिनाथ च्या संमतीने ह्या नात्याला विराम द्यायचा हे ठरवले, आणि स्वार्थी नात्याला वेळी च गोड करून अंतर दिले... तिला कळले होते की फक्त मुलगी नाही तर मुलीचे आई वडील ही नात्याची जपणूक करायला महत्वाची भूमिका पार पाडत असतात...सून आपल्या आवडीची असण्यापेक्षा मुलाच्या आवडीची असावी, संसार त्याला करायचा आहे, इथे प्रश्न त्यांच्या आयुष्याचा आहे, बहीण भावाच्या नात्यात प्रासंगिक खोटे खरे वागले तरी जमते पण नवरा बायकोच्या नात्यात हे नको असते. जसे भाग्याने चांगले वाईट नाते आपल्या आयुष्याशी जोडले जातात तसेच सून ही भाग्याने मिळते, हे समजून आईने मुलाच्या निर्णयावर सहमती दाखवली.सून ही भाग्यानेच मिळते हे म्हणून त्यांनी विषय संपवून टाकला, आणि आपल्या घरातील वाद ही विकोपाला जाण्यापासून थांबवला, जिथे वाद मिटवणे आपल्या हातात असते तिथे आपणच माघार घ्यावी ही शिकवणी त्यांनी आदिनाथ ला नेहमीच दिली होती,इथे आज त्या शिकवणीचा अवलंब त्यांनी ही केला होता.?

0