A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: fopen(/home/irablogging/public_html/system/cache/irablog_session06087cdf902a9194bd3e100cbb34d8dfe4743a3de1f35b4b3c43813aa6fd90466a23d59e): failed to open stream: No space left on device

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 176

Backtrace:

File: /home/irablogging/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct

File: /home/irablogging/public_html/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: session_start(): Failed to read session data: user (path: /home/irablogging/public_html/system/cache)

Filename: Session/Session.php

Line Number: 143

Backtrace:

File: /home/irablogging/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct

File: /home/irablogging/public_html/index.php
Line: 315
Function: require_once

Sun- in- law or by mind also!
Oct 25, 2020
Love

सन-इन-लॉ की मनापासून!

Read Later
सन-इन-लॉ की मनापासून!

सन-इन-लॉ की मनापासून!

पाच वर्ष झाली, शेखर व नितूच्या लग्नाला. संसारवेलीवर दोन गोड फुलंदेखील फुलली. हळूहळू शेखर त्याच्या ऑफिसच्या व्यापात मग्न झाला. 

 नितू घर नि ऑफिस दोन्ही जबाबदाऱ्या लिलया सांभाळत होती. दिवाळीच्या सुट्टीत गावी सासूसासऱ्यांना भेटायला जायचे. तिची दोन मुलं,नणंदेची दोघं.. जाम धम्माल.

 उन्हाळ्यातही आठवडाभराची सुट्टी काढून सासूसासऱ्यांना शहरातल्या त्यांच्या फ्लेटवर घेऊन यायचे. दिर,नणंद सर्वच जमायचे.आठवडाभर खाण्याची चंगळ. गप्पांना ऊत. टेरेसमधे चांदण्यात गाण्याच्या भेंड्या,भुतांच्या गोष्टी अँड ऑल देट.

सासू,नणंदही स्वैंपाकाला मदत करायच्या. सुरळीची वडी,घावणघाटले,चकोल्या,मणगणं,पुरणपोळी, कटाची आमटी, आंब्याच सांदण,पन्हं..ठेवणीतले सगळे मेनू बाहेर पडायचे. अंगतपंगत बसायची.

 जेवायला सुरुवात करण्याआधी  डोळे मिटून हात जोडून 'वदनीकवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे' आजोबांसोबत नातवंडही एका सुरात म्हणायची. 

यावेळीही अगदी तोच सीन.
नितूची सासू तुपाची वाटी घेऊन आली. तुपाची धार सर्वांच्या वरणभाताच्या मुदीवर धरु लागली. सासरे अजुन एका गुलाबजामसाठी हट्ट करत होते. त्यांच्या वाटीत फक्त एक गुलाबजाम होता. त्या इवल्याश्या एकुलत्या एका गुलाबजामने काही त्यांच समाधान होणार नव्हतं. त्यांच्या अर्धांगिनीने त्यांना नजरेनेच दटावलं.
 
नजरेतच जरब. नितूचे सासरे खाली मान घालून जेवू लागले.

 नितूने हळूच मागून एक गुलाबजाम त्यांना पास केला. सासऱ्यांनी इकडेतिकडे बघत भितभित खाल्ला. काहीतरी भारी केल्याचं थ्रील त्यांच्या चेहऱ्यावर उमटलं..खट्याळ हसू. सुनेला हवेतच टाळी दिली.

 नितूच्या नवऱ्याचं शेखरचं बारीक लक्ष होतं. त्याला ही सुनेची नी सासऱ्याची करामत दिसली. बेडरुममध्ये तो नितूवर डाफरला. "का गं बाबांना गुलाबजाम दिलास? शुगर आधीच जास्त आहे त्यांची."

"असुदेत रे."

"असुदेत काय माझे बाबा आहेत ते. तुझं काय जातय असुदेत म्हणायला. शुगर वाढली तर काय भयानक परिणाम होतात माहितीय का तुला?" त्या शर्मा अंकलचा पाय काढावा लागला. 

जखम बरी होत नाही शुगर असली तर. ती वाढतच जाते. बरं आई बघते ना त्यांच पथ्यपाणी मग तू कशाला मधेमधे करते? का तुला आदर्श सून वगैरे म्हणवून घ्यायचंय की काय त्यांच्याकडून!"

"हे बघ शेखर,पहिलं म्हणजे तुझ्याशी हुज्जत घालून मला माझा मुड खराब करायचा नाही. दुसरं, कधीतरी नातवंडांसोबत एखाद गुलाबजाम अधिक खाल्ला तर त्यांची शुगर लगेच पिकवर जाणार नाही आणि गेलीच तर ती खाली आणता येते." 

"कर तुला काय हवं ते."

इतक्यात नितूच्या सासुबाई तिथे आल्या व म्हणाल्या,"अरे शेखर,किती कावतोस तिच्यावर? एका गुलाबजामने एवढं काही विशेष होत नाही. हां सून नि सासऱ्याचं नातं मात्र घट्ट होतं. 

 पावसाळ्यात तुम्ही नर्सरीतून फुलझाडं,फळझाडं आणून लावलीत ना त्यांची मशागत करण्यात,त्यांना पाणी वगैरे घालण्यात यांची शारिरीक उर्जा खर्ची होते. तुला ठाऊक नसेल पण नितूने शुगर चेक करण्याचं मशीन पाठवलंय. त्यावर शुगर किती आहे ते कळतं त्यांना. जास्त असली की जरा जास्त घाम गाळतात नि स्टेबल करतात. तेव्हा उगाच तिच्यावर डाफरू नकोस.

 तुझे जसे आईबाबा आहोत तसे तिचेही आईबाबा आहोत आम्ही. आणि बरं का शेखर, नितू फक्त आईबाबा नावापुरतं म्हणत नाही आम्हाला तर दर आठवड्याला फोन करुन आमच्या तब्येतीची चौकशी करते. नणंदेलाही फोन लावते. दिराच्या लग्नासाठी वधुसंशोधनही चालू आहे तिचं नि तू मात्र एक तुसडं वाक्य बोलून.."

"सॉरी आई. सॉरी म्हंटलं की सगळं सेटल होतं का रे. मनावर उमटलेले ओरखडे सॉरीच्या दोन अक्षरांनी पुसले जातात?"

(नितू टेरेसमधे जाऊन गडदनिळं आभाळ बघत बसली. तिच्या सासऱ्यांनी तिच्या पाठीवर हात ठेवला. त्या मायेच्या स्पर्शाने तिला खूप बरं वाटलं.)

"मग आई,मी काय करु?"

"ऐक नितू आम्हाला जसं आईबाबा म्हणते,तसं लेकीसारखं सुख देते आम्हाला. तुही तुझ्या सासूसासऱ्यांना आईबाबा म्हणतोस. त्यांना कसलं सुख देतोस?"

"का नितूचा भाऊ,वहिनी आहेत की त्यांना जे हवं नको ते बघायला."

"इथेच चुकता तुम्ही पुरुष. सगळ्या अपेक्षा बायकोकडून. तू त्यांना पंधरवड्यातून एकदा तरी फोन करतोस का? कसे अहात आईबाबा?तब्येत काय म्हणतेय? डॉक्टरकडे कधी गेला होता? डॉक्टर काय म्हणाले? बीपी,शुगर ठीक आहे का? तिथे कोणतं औषध मिळत नसेल तर सांगा पाठवून देतो किंवा तुमच्या आवडीचं मासिक पाठवू का?.. अशी चौकशी करतोस का? आम्हाला ती हक्काने इथे बोलावते तसं तू त्यांना वर्षातून साताठ दिवस तरी बोलावतोस का? का फक्त इंग्लिशमधे बोलतात तसा कागदोपत्री सन इन लॉ आहेस. मनाने त्यांचा सन व्हावसं नाही वाटत तुला?"

शेखरने आईचा हात हातात घेतला व म्हणाला,"डोळ्यात अंजन घातलस आई."

शेखरचे आईबाबा,दिर,नणंद आपापल्या घरी गेले. नितूने त्यांना चकल्या,चिवडा,अनारसे बांधून दिले. घरी पोहोचल्यावर फोन करा म्हणून आवर्जून सांगितलं.

 आठवडा होऊन गेला. नितूचा बर्थडे होता. यावेळी शेखरने आठ दिवसांची सुट्टी घेतली. नितूच्या आईबाबांना घरी घेऊन आला. नितूला,मुलांनाही यातलं काहीच माहीत नव्हतं कारण तो टूरवर जातो म्हणून सांगून बाहेर पडलेला.

नितूने दार उघडलं तर दारात आईबाबा. तिला अगदी गदगदून आलं. ती आईच्या कुशीत शिरली. बाबा त्या मायलेकींची भेट पाहून त्रुप्त झाले. नितूने आईच्या मागे उभं असलेल्या शेखरला पाहिलं. शेखरने तिला हसतहसत डोळा मारला. 

नितूला स्वैंपाकही करावा लागला.नाही. शेखर सगळं बाहेरून घेऊन आलेला. आईने तिच्या हातचा केक बनवून आणलेला. नातवंड खूष झाली. नितूने बाबांसाठी थोडा मऊ वरणभात लावला. 

कितीतरी वर्षांनी नितूने तिच्या आईबाबांच्या उपस्थितीत तिचा वाढदिवस साजरा केला. नितूच्या आईने तिचं औक्षण केलं. नितूने घरचं लोणी घातलेला आईच्या हातचा मऊसूत केक कट केला. आईबाबांना,शेखरला,मुलांना भरवला. जेवणात तिच्या आवडीची कोफ्ता करी,शाही पुलाव व रसमलाई होती.
रात्री मुलं आजीआजोबांसोबत गोष्टींच्या दुनियेत शिरली.

 इकडे नितू बेडरुममध्ये आली व शेखरच्या गळ्यात तिचे नाजूक हात गुंफत म्हणाली. पाच वर्षातलं हे सर्वात गोड गीफ्ट शेखर. शेखर तिच्या केसांची बट कानामागे करत तिच्या गालावर बोट फिरवत म्हणाला,"नितू, अगं सन इन लॉ नाही व्हायचंय गं एक्च्युअल सन व्हायचंय मला." त्यांचा मुलगा व्हायचंय मला तू कशी माझ्या आईबाबांची मुलगी झाली तसंच. 

नितूच्या टपोऱ्या डोळ्यांत आनंदाचं चांदणं फुललं. तिने शेखरला प्रेमाची झप्पी दिली. मग काय आठवडाभर नुसती धमाल.सासऱ्यांच्या आवडीचं नाटक,सासूच्या आवडीचा संगिताचा कार्यक्रम,मुंबई दर्शन,चौपाटी,भेळपुरी,आयडीयलजवळचा गरमागरम वडापाव,मामा काणेकडचं जेवण, टिटवाळ्याचा गणपती.. जे जे सासूसाससासऱ्यांना बघायचं होतं,अनुभवायचं होतं ते ते सर्व. नितू तर अगदी शाळेतली अल्लड मुलगी झाली होती. 

शेखर आईला फोन करुन म्हणाला,"थँक्स आई, तुझ्यामुळे मी सन-इन-लॉ चा एक्च्युल सन झालो."

आई म्हणाली,"शाब्बास,पण हे तात्पुरतं नको होऊ देऊस.   
हे व्रत मनापासून स्वीकार जसं नितूने स्वीकारलंय अगदी तसंच. 

शेखर म्हणाला,"हो आई."  नितूने त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं. तो नजरेनेच काही नाही म्हणाला नि गालातल्या गालात हसला. नितूही त्याला नजरेनेच 'यडचंय' म्हणाली.

------सौ.गीता गजानन गरुड.