ऊन्हाळा

Poem On Summer

वाटते..

या रखरखीत ऊन्हात...
डोकं किती तापतं...
गाल किती लालबुंद होतात...
ओठ किती शुष्क होतात...
डोळेही चुरचूरतात..
पण..

पण, तरीही हवाहवासा वाटतो
हा ऊन्हाळा....
वाटतो तो मला जणू
हिरवाईचा मळा....!!


जेव्हा लागते ऊन्हाची
चुणूक..
तेव्हा हवीहवीशी वाटते मग
वाऱ्याची ही मंद झुळूक...!!


पावसात चिंब भिजल्यावर ही
आपण ऊन्हाच्या शोधात असतो...
गोड गुलाबी थंडीतही
आपण कोवळ्या ऊन्हात बसतो...;
तरीही का नाही आवडत हा ऊन्हाळा...?
का आवडतो सगळ्यांना पावसाळा आणि हिवाळा...?



- कु. हर्षदा नंंदकुुमार पिंंपळे