आला उन्हाळा...

आला उन्हाळा स्वतः ला सांभाळा..
उन्हाळा भलताच तापू लागला होता. सकाळी सात वाजता पण उन जाणवत होत. सगळ्यां सारखच अवनी आणि तीच कुटुंब म्हणजे नवरा, विपुल आणि बारावीला असलेला मुलगा तेजस तसेच सासू सासरे असे सगळे नेहमीच्या रूटीन मध्ये काम करत होते. अवनीला तहान लागलेली पण आत्ता घेऊ एवढं काम संपवून घेऊ असे तीच सुरू होत. विपुल ला पाण्याची बाटली भरून देताना पण तिने एवढं टेबल वर ठेवते आणि मग पणी पिते असच केलं. पण नवऱ्याला आवरजून पाणी पी रे मधून मधून हे सांगितले. विपुल बाटली तर घेऊन जातो पण कामात तोही विसरतो शिवाय एअर कंडीशन असलेलं ऑफिस म्हणजे तस काही तहान लागतच नाही. उलट चहा कॉफी होते वरचेवर. तेजस ची परीक्षा जवळ आलेली. तहान लागलेली त्याला अजून पण काळात नाही. मग चिडचिड करत राहतो. आणि आई बाबा बीपी चे पेशंट योग्य प्रमाणात पाणी प्यायला हवे त्यांनी.
जास्त काही सांगत नाही. पण खरे सांगू का..मला पण पाणी प्यायचा तसा कंटाळाच. आणि उन्हाळ्यात तर सतत च्या कामाने dehydration होऊन पाणी लागतेच शरीराला. मग मी एक शक्कल लढवली. आता मी सकाळीच आलटून पालटून लिंबू सरबत, कोकम सरबत, ग्लूकोज च पाणी, काही न काही बनवून ठेवते. नुसत्या पाण्यापेक्षा सगळ्यांनाच हे आवडते. आता तुम्ही म्हणाल सकाळच्या कामाच्या गर्दीत अजून हे काय करायचं. पण सोपी पद्धत सांगू का? पाण्यात साखर आणि मीठ घालून ठेवून द्यायचं. नी आपल काम करत राहायचं. थोड्या वेळानं विरघळते साखर मीठ. केल्यावर अंदाज येईलच साधारण किती वेळ लागतो. नाहीतर सगळे काम झाले की पहायचं. आणि त्यात लिंबू पिळून किंवा कोकम चा रस टाकायचा. एकदा हलवले की बनले सरबत. लिंबाच्या गोळ्या पण आणून ठेवल्यात. एक गोळी खाता खाता पाणी प्यायला बरे वाटते. शिवाय एवढ्यावरच न थांबता सगळ्यांना सांगून ठेवलेय की प्रत्येकाने एक बाटली भरून पाणी स्वतःजवळ ठेवायचं. म्हणजे सारखं स्वैपाकघरात जायचा कंटाळा टळला जातो. आणि पाण्याचा कंटाळा आला की सरबतासा ठी मात्र सगळे स्वतःहून आत येतात. आवडते ना??
मातीच्या माठातले थंड पाणी आणि त्यात वाळा, नागरमोथा सारख्या सुकलेल्या वनस्पती अगदी थोड्या प्रमाणात. अहाहा... लिहिताना पण त्याचा थंड पणा आठवला.
खडीसाखर असलेला गुलकंद किंवा एक चमचा गुलकंद पाण्यात घालून घेतला तर पोटासाठी पण उत्तम.
अधून मधून मी अजून एक गंमत करते बर का. उन्हाळ्यात फळं खावी म्हणून फळं आणली जातात. त्यातलीच काही रसाळ फळं घेऊन त्याचे काप करते, केव्हा केव्हा कोथिंबीर, काकडी, टोमॅटो, पुदिना , लिंबू याचे पण काप करते. मस्त पैकी दोन तीन लिटर पाण्यात ते घालून ठेवते. कॉम्बिनेशन स्वतःच ठरवते. केव्हा त्यात थोडी साखर मीठ केव्हा चात मसाला, केव्हा जलजीरा असे टाकते. चांगले चार पाच तास किंवा अगदी रात्र भर पण ठेवते तसेच. मग ते बाटल्या मध्ये भरून देते प्रत्येकाला. पाण्याला चव पण येते आणि फळे, सलाड पण खाल्ले जाते थोड्या प्रमाणात.
ताक, नारळ पाणी असे काही पण यावेळी उपयोगी पडते. केव्हातरी सूप सुद्धा. मुख्य उद्देश हा की काहीही करून शरीराला पाणी कमी पडू द्यायचं नाही. असे झाले तर थकवा येतो, चिडचिड होते, बीपी वाढू किंवा कमी होऊ शकते, काम सुचत नाही, कामात लक्ष लागत नाही, सध्या सध्या चुका होतात, डोकं दुखू लागते, ग्लानी येते, चक्कर येते, अती झाले तर बेशुद्ध पण होतो माणूस. तुम्ही ही केव्हातरी कमी पाणी पिण्याच्या दुष्परिणामांना सामोरे गेले असालच.
म्हणून उन्हाळा आला आता स्वतःला जपा.
कृपया उन्हाळ्यात पाणी कमी पिण्याचे दुष्परिणाम कॉमेंट मध्ये नक्की लिहा. आणि तुम्ही पाण्या ऐवजी काय पिऊन स्वतःला ताजेतवाने ठेवता तेही लिहा.??