"आई,आपले नशिबाचे भोग हे, होईल सार निट मी आहे ना?"
ह्या विरूच्या वाक्याने तीला धीर येत होता.पण सागर गेल्यावर सुनेने तिच्या हक्कासाठी कोर्टात धाव घेतली होती.
ताईला जसा आधार हवा होता तसा तीला ही एक आधाराची गरज होती पण तीला ताईसोबत राहायचं नव्हतं.
ताईला जसा आधार हवा होता तसा तीला ही एक आधाराची गरज होती पण तीला ताईसोबत राहायचं नव्हतं.
"माझ्या सागरची सावली गं, माझं नातवंड माझ्या उतरत्या काळात राहू दे माझ्या सोबत"
म्हणतं ती सुनेच्या विनवण्या करत होती पण सुन परत यायला तयार नव्हती नातवाच्या काळजीने ताईने तीचा हिस्सा तीला देऊ केला व आता विरूसोबतच जगणं व त्यांच्यासोबतच मरण म्हणतं ती शहरांत मुलांसोबत चालली गेली..आता दोघं मायलेकांचच जग होतं पहिल्या सूनेत फसलेली ताई आता विरूच्याच कलाने त्याच लग्न करायचं ठरवत होती.विरूची उत्तरोत्तर प्रगती होत होती.त्यातच त्याला आॅफिसमधली नयना पसंत पडली .दोघांचे सुत जुळले होते.त्यामुळे ताईने विरूच्या आनंदात आनंद मानत लग्नाला होकार दिला..
नयना व विरूचा संसार सुरू झाला.ताई आता चिंतामुक्त झाली.दोघेही नवराबायको ताईची काळजी घेत.शहरात ती आनंदात रहात होती त्यातच काळाने घात केला..विरूचा आॅक्सिडंट झाला व सारंच संपलं... ताईच्या आयुष्यातील सर्वात जवळची एकुलती एक व्यक्ती तीही काळाने हिरावून घेतली..
आता ताईला ना आधार होता ना साथ देणार कुणी.विरूची सारी संपत्ती नयनाच्या स्वाधीन झाली.विरूची आई व कमवती नयना आता ताईचा तिरस्कार करू लागली..दोघांच जमेनास झालं.. ताईला आता गावाकडे परत येण्याशिवाय पर्याय नव्हता..
गावाकडच छोटंसं घर कधीच पडित होतं.आता पुन्हा त्यात येण होत कि नाही अशीच विरूची प्रगती होती.पण विरूच सुखही ती बघू शकली नाही.नात्यांमध्ये ती सगळं काही हिरावून एकटेपणाची शिकार झाली..
अतीविचार व आपल्या माणसांच जाणं ताईच्या मनावर आघात करून गेलं,अतीविचार व खाण्यापिण्याची गैरसोय ह्यामुळे ताईच जीवन नरक बनलं..दोन वेळच अन्न व सा-या गोष्टींसाठी तीला स्वतःलाच झटाव लागतं असल्याने ती लवकर थकू लागली..दोन वेळेस जेवणापेक्षा आता ती एकदाच जेवू लागली...पण आजही आशा होती.नातवंड व सुना जवळ येतील याची.पण म्हणतात ना,आपले नसले जवळ तर परक्यांना काय?काळजी आपली.सुनांना आता ताईची गरज नव्हती.व तीची जबाबदारी घ्यायची नव्हती..
एकेकाळी आनंद,सुख, सौंदर्य व संपत्तीत लोळणारी ताई पै पै साठी कासावीस होती.कुणी जवळ येत नव्हतं... सौंदर्यचा सुखाला शाप असावा अशी तीची परिस्थिती होती.. नरकयातना तीच्या नशिबी आल्या होत्या.हळूहळू मन,तन,व शरिराने थकत तीने जीव सोडलेला होता..
कष्ट व सहनशीलता होती, मोठ्या हिमतीने पुन्हा पुन्हा उभी रहात होती पण आयुष्याच्या बेरजेत कायमचं दुःखाचा विजय झालेला होता.. नात्यांची वजाबाकी व दुःखाचा गुणाकारच तीच्या जीवनात होता..
"अभागी पणाचा शाप डोक्यावर घेऊन ती आज अनंतात विलीन झाली होती.."
शेवटच्या क्षणी एकुलता एक नातू व सुना कोणीही तीच्या शेवटच्या दर्शनासाठी आलं नव्हतं.गावच्या लोकांनी व लाजेने भावाने तीचं अंतिम कार्य केलं होतं...
वडिलांच्या जीवांवर कोणतेही दुःख न बघितलेली ताई..शेवटी दुःखाच्या चक्र व्युहात इतकी आटकली होती कि..सुखाचा क्षण तीच्या वाट्याला कधी आलाच नाही...
आयुष्य म्हणजे एक खेळ,तो कधी बाजी मारेल व कधी डाव बदलेल सांगू शकत नाही.. सुखाच्या गादीवर आनंदाने नांदणाऱ्या व्यक्तीला कधी दुःखाचे ऊन लागेल सांगू शकत नाही... जीवन म्हणजे एक सतरंज,येथे आयुष्याची कधी बेरीज होते तर कधी वजाबाकी..जीवनाचा डाव फक्त आपण रंगावायचा असतो.कर्मातून कोणाची सुटका नसतेच.काय? लिहिलं विधात्याने त्याची कल्पना नसते,रोजचा प्रवास फक्त सुरू असतो नव्या आशेसोबत,नव्या उमेदीने जगणारा....
(समाजातील हेळसांड व विधिलिखित कोणी टाळू शकत नाही हेच सत्य मांडण्याचा हा प्रयत्न...हि घटना सत्य फक्त पाञ व थोडासा भाग काल्पनिक आहे..."आयुष्याचा खेळ नसतो सोपा,हाती आलेला डाव व कर्म जे असेल ते आपल्या करवी सारं करवून घेत असतो...ह्या चक्रव्यूहात भोगांची राशी जगावीच लागते... त्याशिवाय मोक्ष नसतो.. फक्त पाञांची जबाबदारी बदलते ".
स्ञी असो कि पुरूष...आयुष्याची बेरीज वजाबाकी ठरलेली असते..)
समाप्त...
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा