बेरीज वजाबाकी आयुष्याची भाग -३(वैशाली देवरे)

जीवनातील स्थित्यंतराची कहाणी


शरदरावांची मौज व परिवाराला साथ करत मोठ्या सुनेच कर्तव्य निभावणारी ताई , कोणतेही बंधन नसलेला नवरा व दोन मुलांची जबाबदारी व सारा संसार सांभाळणारी ताई असं जीवनाच समिकरण होतं तीचं, मुलं मोठी होत होती.संपत्ती हळूहळू संपत होती.. परिवारात आता सुखाची जागा कलहाने घेतली होती..
  लहान दिर आता त्याचा हिस्सा मागू लागला होता.सास-ंयांचा रोष शरदरावांवर वाढू लागला होता.जपलेल आता संपू लागल होतं.आणि ह्याच क्षणी एखाद्याचा भावनेचा बांध फुटावा व नको ते व्हावं तसंच झालं..मोठ्या मुलाने सारा संसार होत्याचा नव्हता केल्याने सास-यांनी जीवच सोडला..आफाट कर्ज,लोकांचा रोष, संपलेली संपत्ती व लहान भावाचा तळतळाट सारंच सहन करण्याशिवाय ताईला पर्याय नव्हता.. शेवटी संगनमताने उरलेल सारं दिराच्या नावावर करून तीने व शरदरावांनी माहेर गाठलं..
श्रींमतीत वावरणारी व चार नोकरचाकरांमध्ये जीवन जगलेली ताई आता माहेरी उप-याच जीण जगू लागली..

"नाकर्त्या नव-याला दाबल नाही व आली आमच्या उरावर बसायला"..

भाऊ व भावजयीच वाक्य ऐकून ताईने दिनकररावांना वेगळा संसार थाटते म्हणून विनवणी केली..बापच तो त्याने ताईला दोन एकर जमिन व घर बांधून दिलं..आता ताईच्या आयुष्यात दुःखाची बेरिज वाढत होती पण थोडं सुखही आलं होतं.. मुलं मोठी होत होती.संस्कारी व हुशार मुलांमुळे तीचं जीवन लवकर पलटी घेणार होतं..


"दुःख भरे दिन गये थे भैय्या अब सुख आयों रे.."

अशी स्थिती येऊ लागली होती.शरदरावही मार्गी लागले होते.त्यांनी केलेल्या चुकांचा पश्चात्ताप होऊन ते कामधंद्याला लागले होते.. शेतीत प्रगती होत होती.ताईही जोमाने काम करू लागली होती.सार मागच विसरून नव्या उमेदीने ती संसारात गुंतली होती..मोठा सागर व छोटा विरू दोघेही आता नोकरीजोगते झाले होते..

सागर तसा हुन्नरी मुलगा , चांगल्या मार्कांनी पास झाला व नोकरीला लागला.आता भांडवल व घरात पैसा खेळू लागला..ताईचे सुखाचे दिवस पुन्हा आले होते.शरदराव ही आता संसारात व मुलांच्या आनंदात स्वतःला धन्य मानू लागले होते.. दिनकररावांना मुलीचा अभिमान वाटू लागला होता आता कोणतीही चिंता नव्हती..तीने स्वतःच्या पायावर व हिमतीवर पुन्हा सारं पुर्वपदावर आणलं होतं..

सागर लग्नाचा आला होता आता सुन घरात येणार व हळूहळू परिवार फुलणार होता.सुखाचा सडा पडणार होता.सागरला स्थळ येऊ लागली होती.नात्यातीलच सुनिताच स्थळ आलं व सागर आणि सुनिताच लग्न झालं.. सुनिता तशी सर्वसाधारण पण सागरला पसंत पडली,ताईचही भलं मोठं स्थळ भेटाव असं काही नव्हतं.पण खाऊन पिऊन सुखी परिवार होता..आहे त्यात समाधान माणून जगणं शिकले होते सारे... लग्न झालं वर्षात घरात बाळाच आगमन झालं..घरात आनंदी आनंद होता पण क्षणात सुखाच पारडं फिरल व शरदरावांना एका दुर्धर आजाराने त्रस्त केले..ताई आता पुर्णपणे नव-यात अडकली ,दवाखाना व कष्ट ह्या पलिकडे, मुलांच्याही संसारात कुरबुरी सुरू झाल्या..नवर्याकडे बघावं कि संसाराकडे,कि मुलांच्या व सुनेच्या भांडणाकडे... सर्वच गोष्टींमुळे ती खचू लागली पण तीचं खचली तर चालणार थोडीच होतं..
बायकोचा ञास व परिवारातील सुरू असलेल्या परिस्थितीत सागर व्यसनाच्या नादी लागला.बायको मुलाला घेऊन माहेरी गेली.आता तर ताईची कसरतच सुरू झाली..

"सरिता थोडी कळ सोस बाई, बाबांना बरं वाटलं कि मी तुझ्या संसारात मदत करेल पण तु सासरी परत ये.."

अशी विनवणी ती सुनेला करू लागली पण तीने ते अमान्य केलं.मुलाची व्यसनाधीनता नव-याच आजारपण व पैशांची कमतरता..ह्यात ताई पुरती फसली होती..रोज नवा डाव व रोज एक नवी लढाई सुरू झाली होती..सुखाचा कवडसा शोधावा व दुःखाचे ऊन पडावे अशी परिस्थिती होती.पण ह्या आयुष्याच्या लढाईत ती लढतच होती हिमतीने...न कोणाची साथ होती न आधार वडिल ही देवाघरी गेलेले..भावाने तिच्याकडे पाठ फिरवलेली व आई कोणत्याच कामात नसलेली..आता आशा होती विरूच्या साथीची बस...

विरूही जाणता झाला होता.त्याला परिस्थितीची जाणीव होती..त्याने आईला मदत म्हणून नोकरी जाईंन्ट केली..
म्हणतात,

"बुडत्याला काठीचा आधार"

तसं विरूचा चार आकडी पगारही तीला सुखाची झुळूक देऊ लागला..थोडा हाताला हातभार लागला पण सागर पुर्णपणे बरबाद झाला दिवसेंदिवस टेन्शन व भांडणांनी शरदरावांची तब्येत खालावली व एक दिवस शरदराव झोपेतच संपले...

देखण्या ताईबाईच कपाळाच कुंकुच गेलं.नवरा म्हणजे आधार असतो बाईचा ,शरदराव गेले व ताईकडे लोकांचा बघण्याचा दृष्टीकोनच बदलला.स्वाभिमानी ताई आता समाज ,संसार व संतंतीशी लढून थकली होती.. दुःख वाट सोडत नव्हत त्यातच सागरने एका दिवशी रहात्या घरात फाशी घेतली... आता ताई पुरती कोलमडून पडली होती.नवरा व मुलगा नाही व त्यात विरू शहरात..घरात एकटी मग काय? एकट्या देखण्या ताईला समाजाचा ञास सुरू झाला...

"आयुष्य नसे सोपे..येथे परिक्षा रंगते रोजच,निकाल विधात्याच्या हाती, आपल्या कर्माचे भोगावे लागतात भोग ".
अशी ताईची परिस्थिती झाली...


क्रमशः

बघू पुढे काय?घडत ताईच्या आयुष्यात..

🎭 Series Post

View all