बेरीज वजाबाकी आयुष्याची भाग-२ (वैशाली देवरे)

जीवनातील स्थित्यंतराची कहाणी


देवाने ताईला दिलेले सुंदरतेचे वरदान सोबत होते पण नात्यांमध्ये व आयुष्यामध्ये कायमचं हरलेली ताई आजन्म लढत होती..
 
ताईच बालपण म्हणजे सुवर्णकाळ,बड्या घरात एक लावण्यखणी राजकुमारी जन्माला आलेली,बाप म्हणाल तर ,"खु-याने पैसे ओढणारा".अशी चलती .हात लावेल ती वस्तू व ती गोष्ट ताईच्या दमतीला हाजिर असे.ताईला बघून सारेच म्हणतं

"काय? नशिब काढून आली ही पोरगी, सुंदरता,पैसा व लाडकी सगळ्यांची,नशिब असावं तर ह्या पोरीवाणी".

होतही तसंच सारं घर तीच्या दमतीला,लग्नाचं वय आलं,व वर संशोधन सुरू झालं.दिनकररावांची एकुलती एक व सुंदरता व गुणवत्ता असलेल्या ताईला तिच्याच तोडीच वरसंशोधन सुरू झालं . तालुक्यात त्यांच्या तोडिस कोणी भेटत नव्हतं,

"तिच्या नशिबाच बघा, नशिबात जे असेल तेच घडेल हो..!"
अस आई म्हणतं असे...

तेव्हा बाबा म्हणत,"माझ्या ताईच नशिब मी लिहिल, आजवर ती जशी जगली तशीच पुढेही जगेल,मी आकाशपाताळ एक करेन पण मनाजोगता जावई‌शोधल्याशिवाय रहणार नाही बघ .. सारं गाव काय?तालुका बघत राहिलं माझ्या ताईच लग्न ".

घरातलं वातावरण व ताईचा रूबाब बघता ती स्वतःला नशिबवान समजत असे, देवाने येवढं दिलं त्याचा तीला अभिमान होता पण ताईचा स्वभाव भारी मानी होता, गर्व मुळीच नव्हता,लहान-थोर,गरिबश्रींमताला ती सारखाच मान देई..रूपाचा व पैशाचा माज नव्हता तीला हाच तीचा गुण कोणालाही पटकन आपलसं करून घेई..कामातही तरबेज होती.पण सदन घरात कधी तिच्या वाट्याला काम आलच नाही बघा...

वरसंशोधन सुरू झालं तालुक्यात तसं कोणी भेटत नव्हतं पण लांबच्या नात्यातील शरदरावांच स्थळ ताईला आलं,मुलगा म्हणाल तर एकदम राजबिंडा,घरची परिस्थिती पण छान,चार पिढ्या बसून खातील अशी सदनता,मग काय? दिनकररावांनी मनोमन शदररावांना जावई करून घ्यायचं मनावरचं घेतलं...ताईतही कमतरता नव्हती.. ताईला बघताच होकार आला.सार घर ताईच्या लग्नात गुंग झालं..

ताईच लग्न म्हणजे एका राजकुमारीच लग्न,सोने चांदी व सारंच इतकं भरभरून होतं कि हेवा वाटावा नशिबाचा... आजवर ताईच्या आयुष्यात फक्त सुखाचा गुणाकारच होता हो..!,काही भेटेन ते एका पटीत नाही तर कैक पटिने सुख व सुखच होतं ओंजळीत..लग्न म्हणाल तर आजवर जिल्ह्यातही कोणी केलं नसेल असं दिनकररावांनी काढून दिलं...

"ताई वडिलांना म्हणतं असे,आबा किती काळजी घेतात माझी पण नशिबाने पलटी घेतली तर मला जगणं अवघड होईल हो...!, माझ्या सासरी तुम्ही देण्याची सवय नका लावू आबा, जेणेकरून देता देता तुम्ही थकाल पण घेणारे थकणार नाहीत ‌.."

तेव्हा दिनकरराव म्हणतं,"ताई माझा जीव आहे तोवर तुला काय? तुझ्या सासरच्यांनाही कमी पडू देणार नाही बघं.."

मग काय?मोठाईकी व दानत च्या नादात ताईबाईला भेटीवर भेटी जाऊ लागल्या,पैशाची मागणी केली कि पैसा जाऊ लागला.. शरदराव म्हणजे एक राजकुमार वडीलोपार्जित संपत्ती,कष्ट करण्याची इच्छा नाही व सासर सदन व लाडका जावई ..मग काय? फक्त ऐश आरामात आयुष्य जगणं सुरू झालं..कांजीचे कपडे ,कडक इस्ञी,पायात कोल्हापुरी चप्पल व चारचाकी दमतीला असा शरदरावांचा रूबाब..
घरचा मोठा मुलगा त्यात सारी कमाई व सारा व्यवहार त्यांच्याकडे , विचारणार कोणी नाही धाक तर नाहीच नाही अशी परिस्थिती...दोन सवंगडी दमतीला व मज्जा मस्ती अस शरदरावांच जीवन सुरू झालं... अजूनही सुखाचीच बेरीज होती आयुष्यात व संसारात

लग्नानंतर काही कमी पडलं तर सासर होतंच.त्यात दोन मुलांचा जन्म झाला.आता मुलं झालीत तरी शरदराव काही सुधरले नाहीत त्यांची ऐश आरामाची जिंदगी सुरूच होती..

क्रमशः..

पुढे काय?होतं कथेत बघूयात...

🎭 Series Post

View all