बेरीज वजाबाकी आयुष्याची भाग -१ (वैशाली देवरे)

जीवनातील स्थित्यंतराची कहाणी


अष्टपैलू लेखन स्पर्धा
दुसरी फेरी-जलदब्ॅलाग लेखन


ताईबाईच प्राथिव अंगणात काढण्यात आलं.काहीच उरल नव्हत त्या भारदस्त शरिराच,काय?होती ती ,भारदार बांधा लांबसडक कमरेपर्यंत लोळणारी वेणी,घारे डोळे,अंगकांती तर इतकी दुधाळ कि हिरव्या धमण्या मोजून घ्याव्यात...बघताच क्षणी कोणीही मोहात पडेल अशी ही लावण्यवती पण तीच आयुष्य म्हणजे एक नियतीचा खतरनाक खेळ हो...!, वयाच्या साठाव्या वर्षांपर्यंत जगतांना तीचे भोग काही सरले नाहित ती गेली त्यांचं दुःख करायला कोणी वाली ही उरला नाही अशी तीची दैना...

तोच लोकांनी गर्दी करायला सुरुवात केली.
"अरे कोणाची वाट बघताय रे..कोणी आहे का?,शामरावच आहे फक्त, घे रे निर्णय लवकर किती वेळ ठेवायचं ह्या प्रेताला..".

बायकांची एका कोपऱ्यात कुजबुज सुरु होती.
"आजही येणार नाहीत का?सूना व नातवंडे,मग कोण करेल बाई इच अंतिम कार्य..".

एक बाई म्हणाली,"शामराव सख्खा भाऊ पण बाई तोही फायदेखोरच निघाला हो..!,जसा दाजी गेला कधी फिरून बघितलं नाही बहिणीला,भावजय तर नुसती तोंड मुरडायची  बाई..कधी दोन घास अन्न नाही घातलं बाई ननंदेच्या मुखात.."

"हो ना ?पण शामराव भलताच फायदेखोर हो..!,ताई शेवटपर्यंत कर्तव्य काही विसरली नाही माई..दिवाळीला शामरावांना शोभतील असे कपडे घेऊन ठेवत असे ती व तोही ओवाळायला येई कपडे घेई पण कधी ताटात रूपया टाकला नाही बरं.."

"बाई गं...काय?नालायक माणुस गं, त्यांच्या खिशात काय?शंभर पाचशे नसतील काय?हो ,पण नियती साफ नाही ना?"

"हो ना?माई,ताई म्हणतं असे बाई दारात येतो तेच खुप आहे,मला त्याने काही घ्यावं अशी आशा नाही हो.. फक्त दोन शब्द पोटभरून "ताई"हाक मारली ना? आधार भेटतो बघा, बायको पुढे काही चालत नाही.. एकुलता एक भाऊ मलाच कोण?आहे, घेते मी वर्षातून एकदा कपडे त्यांच्या अंगावर कपडे दिसले ना ,आत्म्याला समाधान लाभत बघा.."

"बाई गं..काय?मोठ्या मनाची बाई गं ही,किती गं वादळ इच्या जीवनात, देवाने दुःख किती द्यावं माय...इच्या वाट्याला सटवाई सुख लिहायची विसरली असेल काय? गं माई..".

"हो माय.. असतं गं , एखाद्याच फुटक्या कर्माच नशिब तशीच होती ताई..साफ मनाची, दिलदार, कधीच कुठेच तक्रार नाही जे आलं वाट्याला त्याला निभावून नेणारी पण कर्मापेक्षा तीच्या गतजन्माचा हिशोब वेगळा असेल बाई म्हणून तर एक एक घाव झेलत जगत होती गं.. तीच्या जागी दुसर कोणी टिकल नसतं बघ पण तीने मरेस्तोवर जीवनाला साथ दिली,संकटांचा सामना केला बाई...".

क्रमशः...



🎭 Series Post

View all