सुखी रहायचा हक्क तुला ही आहे भाग 3

सुखी रहायचा हक्क तुला ही आहे
सुखी रहायचा हक्क तुला ही आहे भाग 3

©️®️शिल्पा सुतार
.......

पोहे खावून नितीन ऑफिसला गेला. अदिती निधी कॉलेजला आल्या. घरी आल्यावर अदितीने बरच आवरल. अभ्यास करून घेतला. संध्याकाळी जमणार नाही. बाहेर जायच आहे. घरी सांगाव लागेल.

संध्याकाळी तिने नितीनला मेसेज केला. "भेटू या का?"

"मी घरी येतो मग जावू. "

" नको मी येते तिकडे." तिला निधीला सोबत न्यायच नव्हत. तिच्या शिवाय घरून निघण कठिण होत.

"ठीक आहे. ये मग तू ऑफिस जवळ."

ती पुढे हॉल मध्ये आली. सासुबाईं बसलेल्या होत्या.

"आई थोड काम होत. मला यांनी ऑफिस जवळ यायला सांगितल आहे. मी जावु का? "

" हो जा बेटा. "

" आम्ही सोबत घरी येवू. थोडा उशीर होईल."

ठीक आहे.

निधी बघत होती. तिने दुर्लक्ष केल. ती रिक्षाने नितीनच्या ऑफिस जवळ आली. तो आला. " चल कुठे तरी बसु."

ते हॉटेल मध्ये आले. दोन चहा सांगितला.

" काय झालं आहे अदिती? काही प्रॉब्लेम?"

"कस बोलू ते समजत नाही. मी सांगते त्याच्या राग नका मानू."

"पटकन सांग."

" नाही प्रॉमीस करा तुम्ही चिडणार नाही."

" तुझ्यावर चिडतो का मी. ठीक आहे प्रॉमीस."

" मला अस वाटत. निधीच लग्न कराव."

"काय झालं?"

"म्हणजे ती तरुण आहे अजून पंचवीसची नाही. तिचे काही स्वप्नं असतिल. एवढ आयुष्य ती एकटी कशी काढेल. "

" काही झालं आहे का. मोकळ सांग."

"हो म्हणजे निधी आजकाल आपल्यावर लक्ष देवून असते. मला घरात तुमच्या जवळ मोकळ वाटत नाही." ती हळूच बोलली. नितीनला राग आला तर.

नितीन गप्प होता. अदिती काय म्हटली त्याला आता समजल. " हो मलाही जाणवल ते. "

" निधी मुद्दामून करते अस मी म्हणत नाही. ती वाईट नाही. त्यात तिचा काही दोष नाही. तिला समजत ही नसेल की ती अस करते आहे ते. तिला ही वाटणारच. आपल्या बरोबरीची आहे ती. तरुण आहे . "

" हो ना निधी बाबतीत खूप वाईट झाल."

"आपण तिचा विचार करायला हवा. ती सुखी झाली पाहिजे. "

" एक सांगू का? आमच्या ऑफिसचे बॉस आहेत ना. त्यांचा भाऊ लग्नाचा आहे. त्यांची बायको मागच्या वर्षी वारली. त्यांनी मला मागे निधी बद्दल विचारल होत. यंग आहे मुलगा. मोठ्या पोस्ट वर आहे. तेव्हा मी नकार दिला होता. "

" परत बोलून बघा ना तुम्ही त्या लोकांशी . हे झाल तर खूप चांगल होईल. निधीला तीच हक्काच घर मिळायला हव. "

" मला ही निधीला सुखी आनंदी बघायचा आहे. मी बोलतो आई बाबांशी पण ते ऐकतील का? एक तर आपल्या समाजात दुसर लग्न करत नाही. "

" समजून सांगा ना त्यांना. जुन्या गोष्टी सोडून द्यायच्या आता. "

" नक्की. बर झाल आज तू इकडे आलीस. घरी बोलता आल नसत. महत्वाचा आहे हा विषय. "

"अहो तुम्ही ही थोडे दिवस आपली रूम सोडून मला जवळ नका घेत जावू. आपण ही जरा निधीचा विचार करायला हवा. "

" बरोबर मी लक्ष्यात ठेवेल. "

🎭 Series Post

View all