सुखी रहायचा हक्क तुला ही आहे भाग 2

सुखी रहायचा हक्क तुला ही आहे

सुखी रहायचा हक्क तुला ही आहे भाग 2

©️®️शिल्पा सुतार
.......

शाम काका थांबणार होते. जेवण झाल. त्यांची आणि बाबांची गादी पुढे टाकली होती. दुसर्‍या बेडरूम मधे सासुबाई निधी झोपणार होत्या . नितीन पुढे बसुन शाम काकां सोबत बोलत होता.

अदिती रूम मध्ये होती. तिने कपडे बदलून नाइटी घातली होती. ती लोळून पुस्तक वाचत होती. दार वाजल तिला वाटल नितीन असेल. "अहो किती उशीर. कशी वाटते आहे ही तुम्ही आणलेली नाइटी." तिचे केस मोकळे होते. छान तयार होती ती.

"वहिनी मी आहे." निधी आलेली होती. ही या वेळी इथे. ती पटकन उठली. तिने पटकन केस बांधले. "काय हव निधी?"

"वहिनी तुझी वहि दे ना मी थोड लिहिते ."

"हो ये ना." अदिती वहि शोधत होती. निधी बघत होती अदितीने स्लिव्हलेस व्हाइट नाइटी घातलेला होता. या आधी कधी बघितल नाही हा नाइटी. म्हणजे ती या खोलीत वापरते वाटत हा. दादा सोबत.

"वहिनी तू छान दिसतेस." निधी काॅटवर बसली. स्वच्छ टाकलेली चादर. शेजारी ठेवलेल्या दोन उश्या. पांघरायला एक पांघरुन. किती छान वाटतय. त्यांचा बेड निधी बघत होती. तिने हळूच बेडशीट वरून हात फिरवला.

नितीन आत आला त्याने पटकन दार लावल. दादा वहिनीची रूम दार लावल की किती वेगळी वाटते ना. समोर निधीला बघून तो गडबडला. तो अदिती कडे बघत होता.

"निधी ही घे वही."

" मी जाते. " निधी उठली.

"बस ना निधी. कसा सुरू आहे अभ्यास? " नितीन बोलला.

"ठीक चालला आहे दादा. तुम्ही आराम करा मी जाते." ती बाहेर गेली.

नितीन आत येवून बसला. "निधी या वेळी इथे?" त्याने अदितीला विचारल. काय सांगणार आता. अस करते ती.

"हो तिला नोट्स पूर्ण करायच्या होत्या." अदितीने सांगितल.

"छान दिसतेस तू. " त्याने पाण्याची बाटली हातात घेतली. ती रिकामी होती." अदिती पाणी आण. "

हो... ती बाहेर आली. निधी अजून त्यांच्या रूमच्या बाहेर उभी होती. अदिती आल्या मुळे ती दचकली. आत निघून गेली. अदिती पाणी घेवून आत गेली.

ती तिच्या विचारात होती. काय कराव. निधी बाबतीत वाईट वाटत खूप.

सकाळी ती पोहे करत होती. निधी चहा ठेवत होती.

" अदिती आत ये." नितीनचा आवाज आला.

अदिती गेली. निधी त्यांच्या रूम कडे बघत होती.

नितीन ऑफिसला जायला तयार होता. अदिती आत आल्यावर त्याने दार लावून घेतल.

" अहो काय आहे हे?"

"आता ही आपली रूम आहे ना. इथे ही अस?" तो हसत होता.

"बोला पटकन." निधी बाहेर आहे हेच तिच्या मनात होत.

"माझा रुमाल दे. पाकीट कुठे आहे. गाडीची चावी हवी. त्याशिवाय मी कस जाणार ऑफिसला. तू सकाळी इथे माझ्या समोर असायला हव. तुला माहिती आहे ना तुला भेटल्या शिवाय मी जात नाही. " नितीन तिच्या जवळ येत होता. ती मागे सरकली. त्याने तिला मिठीत घेतल.

"अहो जावू द्या ना. तुमच सगळ सामान टेबल वर आहे. "

" घेतो. आता काय करणार बायको बिझी आहे. " तो आवरत होता.

" अहो मला तुमच्याशी थोड महत्वाच बोलायच आहे."

"बोल ना. काय हव? सामान का. लिस्ट दे. मी संध्याकाळी घेवून येईल."

"नाही सामान नको. म्हणजे मी कस सांगू ." अदिती विचार करत होती.

" काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? "

हो.

"बोल. "

"आता नाही संध्याकाळी बाहेर जावू. "

" कोणी काही बोललं का तुला? "

"नाही. घरचे चांगले आहेत. समजून घ्या ना. इथे बोलता येणार नाही. "

" काही सिरियस नाही ना? "

"नाही सिरियस नाही पण महत्वाच आहे."

"ठीक आहे मला फोन कर मी सांगतो किती वाजता ये ते."

"बाहेर कोणाला सांगू नका. "

हो. नितीन तिच्या कडे बघत होता. काय झालं आहे काय माहिती?


🎭 Series Post

View all