सुखी रहायचा हक्क तुला ही आहे भाग 1

सुखी रहायचा हक्क तुला ही आहे
सुखी रहायचा हक्क तुला ही आहे भाग 1

©️®️शिल्पा सुतार
.......

"मी घरी यायला निघालो आहे." नितीनचा मेसेज आला. अदितीने पटकन घर आवरल. चहा ठेवला. बिस्किट शोधून ठेवले. स्वतः च आवरल.

सासुबाई, सासरे पुढे बसलेले होते. नणंद निधी बघत होती अदितीची गडबड. "वहिनी दादा निघाला का ऑफिस हून यायला?"

हो.. अदितीने सांगितल.

नितीन आला. तो आई बाबांशी दोन मिनिट बोलून आत आला. किचन मधे येवून त्याने अदितीला हळूच मागून मिठीत घेतल.

"अहो नको ना किती वेळा सांगितल मी अस करु नका. सगळे घरात असतात." तिच मागे लक्ष गेल.

निधी मागे उभी होती. दोघ पटकन बाजूला झाले.

" वहिनी आत्ताच शाम काका आले आहेत. आईने त्यांचा चहा ठेवायला सांगितला." ती बाहेर गेली.

आता अदिती नितीन वर चिडली होती. "मी किती वेळा सांगितल तुम्हाला आपल्या बेडरूम शिवाय अस माझ्या जवळ यायच नाही. "

" माझी बायको आहे. मी काहीही करेन. मी तुला जवळ घेणार. तू मला अडवू नको." तो मुद्दाम हट्टी पणा करत होता. त्याने तिचा हात ओढला. ती त्याच्या मिठीत होती. अदिती घाबरली. तिने स्वतःला सोडवून घेतल. "तुम्ही ना. जा आवरा. शाम काका आले आहेत. बाहेर बसा. "

अदिती चहा घेवून बाहेर गेली. सगळ्यांना चहा दिला. नितीन येवून बसला. अदितीने त्याला चहा दिला.

निधी अदिती, नितीन कडे बघत होती. छान जोडी आहे ही. ते दोघ कस बोलतात. छान हसतात. दादा हिच्या मागे मागे करतो.

आजकाल अदितीला ही गोष्ट लक्ष्यात आली होती की निधी मुद्दाम आम्ही दोघ असलो की आत येते. म्हणून ती नितीनला म्हणत होती अस किचन मधे मला जवळ नका घेत जावू.

अदिती नितीनच आता दोन महिने झाले लग्न झालं होत. नितीनच्या घरचे बघायला आले तेव्हा त्यांनी निधी बद्दल सगळी माहिती दिली होती. निधी विधवा होती. तिचे मिस्टर एक वर्षा पुर्वी एक्सीडेंट मधे वारले होते. सासरच्या लोकांनी पंधरा दिवसात तिला माहेरी पाठवून दिल. खूप दुःखी होती ती. पहिले सहा महिने ती रडत होती. घरचे सगळे काळजीत होते. तरुण मुलगी विधवा त्यात आपल्या समाजात दुसर लग्न करू शकत नाही. काय करणार कसतरी तिला चालत बोलत केल होत.

निधी नितीन पेक्षा दोन वर्षानी लहान होती. लग्ना नंतर अदितीने तिला खूप सांभाळून घेतल. प्रत्येक गोष्टीत तिला सोबत घेतल. सासुबाई सासरे निधीच्या काळजीत होते. ते आता थोडे तरी निश्चिंत झाले होते.

नितीन अदिती वर खूप खुश होता. ती खूप हुशार होती घरच छान सांभाळून घेत होती. दोघांच खूप पटत होत.

अदिती आणि निधीने सोबत एम कॉमला अ‍ॅडमिशन घेतल होत. सकाळी त्या दोघी सगळ आवरून कॉलेजला जात होत्या. खूप पटत होत त्यांच. निधी खूप हुशार होती. अदिती ती मिळून अभ्यास करत होती. दिवस भर अदिती तिच्या सोबत असायची.

संध्याकाळी दादा आल्यावर अदिती नितीनच वेगळ जग होत. निधीला या वेळी करमायच नाही. तिला तिच्या मिस्टरांची आठवण यायची. ती अगदी एकटी पडली होती. तरुण होती तिला वाटायच कोणी तरी माझ्या वर प्रेम कराव. माझ्या मागे मागे कराव. माझ्या साठी हट्ट करावा. पण काही इलाज नव्हता. मन मारून जगत होती.

आजकाल तिला उत्सुकता लागली होती दादा वहिनी काय करत असतिल? कस असेल त्यांच मॅरीड लाइफ. हे दोघ किती खुश असतात.

वहिनी किती सुंदर दिसते. ती साडी नेसली की दादा अजून तिच्या मागे मागे करतो. सगळ तिला विचारुन करतो. सारख रूम मध्ये बोलवतो. मला पण कोणी तरी हव अस प्रेम करणार.

ती नेहमी चोरून त्यांच्यावर लक्ष ठेवत होती. तिला त्या दोघांना बघून आनंद मिळत होता. ती तिच्या मनातला संसार यांना बघून पूर्ण करत होती. तिला समजत होत हे चुकीच आहे. तरी तिच मन ऐकत नव्हत.


🎭 Series Post

View all