सुखांत भाग ७

in this part asavari had accident

सुखांत भाग ७

क्रमश: भाग ६

आसावरी काहीच बोलली नाही .. " शी यार आजचा दिवसच खराब आहे वाटते .. आज पियू ची तब्बेत पण बरी नाहीये .. सकाळी मिस चा फोन आला होता .. तिला आणायला जावे लागणार आहे "

सिद्ध " कुणीकडे आहे ती ?"

आसावरी " सेंट**** स्कूल ऑफ पाचगणी "

सिद्ध " ओह .. लांब आहे मग ..

आसावरी " हो ना .. जायला चार तास लागतात . होप शी विल बी  फाईन आफ्टर मेडिसिन "

सिद्ध " आय  फील बॅड फॉर दयाट लिटल एन्जल .. एवढया लहानपणी तिला एकटे राहावे लागतंय .. आज तर तिला तुझी खूप आठवण येत असेल "

आसावरी " हो ना ..आज माझी हि मिटिंग नसती ना तर मी लगेच गेले असते तिला आणायला . लेट मी फिनिश इट देन आय विल गो "

सिद्ध " ऑल  द बेस्ट फॉर मिटिंग .. कारण तुझी ज्याच्या बरोबर मिटिंग आहे तो जाम खडूस आहे .. "

आसावरी " कोण? शशिकांत ?"

सिद्ध " शशिकांत नाहीरे तो खूप चांगला आहे .. मी आशुतोष बद्दल बोलतोय "

आसावरी " देन डोन्ट वरी .. माझी मिटिंग शशिकांत बरोबर आहे "

सिद्ध " सगळे निर्णय आशुतोष घेतो ..शशिकांत फक्त पुढे असलेला प्यादा आहे "

आसावरी " हो का ? ठीक आहे .. आय कॅन हँडल युअर आशुतोष अल्सो "

सिद्ध " तुला एक सांगू .. तो माणूस नाहीये .. तो महा भयानक प्राणी आहे .. तो वर्षानुवर्षे नुसता कामच करत आलाय .. तो फक्त आकड्यातच बोलतो "

आसावरी " वेल .. सिद्ध .. चलो तू आधी उतर .. ऑफिस आलंय .. आणि एक मला ओळखतॊस असे ऑफिस मध्ये सांगू नकोस कोणाला . मी ऑफिस मध्ये फार  वेगळी असते . "

सिद्ध " माझ्या सारख्या एक्सिकटिव बरोबर मैत्री आहे याची लाज वाटते का तुला ? ओहो .. म्हणून एवढा विचार चालू आहे माझ्याशी फ्रेंडशिप बद्दल .. "

आसावरी " शट अप सिद्ध .. असे काही नाहीये "

सिद्ध " मग कसे आहे मॅडम .. "

आणि सिद्ध उतरून निघून जातो

आसावरी " खरंच  हा मुलगा ना काहीपण बोलतो .. ?"

सिद्ध उतरून त्याच्या कॅबिनेट कडे गेला . तेवढयात समोरून शशिकांत मस्त ब्लेझर वगैरे घालून आसावारीला अटेंड करायला तयार होता

सिद्ध " गुड मॉर्निंग सर "

शशिकांत " गुड मॉर्निंग "

सिद्ध ला लगेच कळले  शशिकांत आसावरीला  रिसिव्ह करायला चाललाय "

थोड्याच वेळात आसावरी आणि शशिकांत चालत आत आले .. शशिकांत तिला एका कॉन्फरंन्स   रूम  मध्ये घेऊन गेला

तिथे आलरेडी बरेच जण होते .. सगळे हेड , व्हीपी , मॅनेजर बसले होते .. तिला टी अँड स्नॅक्स ऑफर केला ..

सिद्ध सगळे काही त्याच्या कॅबिनेट मधून डोके वर काढून बघत होता

बऱ्याच  वेळाने प्रोजेक्टर ऑन झाला ..  आसावरी मध्ये मध्ये लॅपटॉप कडे बघत होती .. मध्ये मध्ये प्रेसेंटेशन देत होती .. बाकीचे  तिच्या प्रेझेन्टेशन कडे बघत होते का तिच्याकडे हे मात्र सिद्ध ला कळत नव्हते . आसावरी एकदम कॉन्फिडन्ट आणि स्मार्ट  दिसत होती.

थोड्याच वेळात प्रेझेन्टेशन झाले .. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या "

आसावरी चेअर वर बसली आणि पाणी पियू लागली

मग शशिकांत बोलत  होता .. आणि ती एकेक मुद्दा लिहून घेत होती ..

तेवढयात आशुतोष जो कि मार्केटिंग चा सर्वे सर्वा होता तो डायरेक्ट केबिन च्या दिशेने निघाला

सिद्ध त्याच्या जागेवरून उठला आणि कॅन्टीन च्या दिशेने पळाला . मार्केटिंग एक्सिकटिव ऑफिस मध्ये बसलेला दिसला कि तो गेलाच समजा .. आशुतोष चांगलाच फायर करायचा मग "

सिद्ध तिकडून नाहीसा झाला

इकडे आशुतोष केबिन मध्ये गेला तसे सगळे उभे राहिले .. आसावरी चे लक्ष नव्हते आणि कोण आलाय हे तिला माहित पण नव्हते ..

तो आल्यावर बाकीचे सगळे बाहेर निघून गेले आणि शशिकांत आणि आशुतोष दोघेच राहिले

आसावरी काहीतरी चार्ट बघत होती तिच्या चेहर्या समोर तिचाच लॅपटॉप होता .. त्यामुळे आशुतोष चा चेहरा तिला आणि त्याला तिचा चेहरा अजून प्रॉपर दिसला नव्हता . शशिकांत ने आशुतोष ला बसायला जागा दिली आणि तो त्याच्या बाजूला बसला.

आसावरी " मिस्टर शशिकांत .. आय गॉट इट ..   .. तुमच्या त्या कन्साईनमेंट ला प्रॉब्लेम आमच्या कंपनीमुळे नव्हता झाला .. तुमच्या पॅकिंग मध्ये काहीतरी गडबड होती .... "  आसवारीने ते मेल शशिकांत ला फॉरवर्ड केले आणि मग समोर बघितले ..

आसावरी " ओह .. बाकीचे सगळे गेले .. सॉरी मला कळलंच नाही .. मी कामात होते "

शशिकांत " मिस आसावरी .. मीट मिस्टर आशुतोष "

आसावरीने आशुतोष बद्दल बरेच काही ऐकले होते . त्यामुळे साहजिकच कोण आहे हा हे बघण्यासाठी ती उत्सुक झाली होती "

ति उठून उभी राहिली .. आशुतोषला बघून ती एकदम स्तब्ध झाली .. दोघे एकमेकांकडे बघू लागले  "

शिशिकांत " आशुतोष सर , मीट आसावरी .. व्हिपी ऑफ abc लिमिटेड "

आशुतोष " हाय नाही काहि नाही "

शशिकांत " सर .. यु वॉन्ट टू डिस्कस ऑन  दीज फाईव्ह पॉईंट्स ना "

आशुतोष " शशिकांत कॅन  आय आलोन हॅन्डल इट . यु मे लिव्ह "

आसावरी " नो मिस्टर शशिकांत .. माय अपॉइंटमेंट वाज फिक्स्ड विथ यु .. यु मस्ट स्टे "

आशुतोष " आय वॉन्ट टू डिस्कस सम पॉईंट्स "

आसावरी " धिस मिटिंग इज  ओव्हर फ्रॉम माय साईड .. आसावरीने  थरथरत्या हाताने पाणी पियुन घेतलं आणि लॅपटॉप बंद करू लागली "

आशुतोष ने शशिकांत ला शेवटी  बाहेर पाठ्वलेच

आसावरी " प्लिज लेट मी गो "

आशुतोष " आसावरी .. कशी आहेस ? कुठे होतीस ?"

तोपर्यंत असावरीने तिचा लॅपटॉप बंद केला आणि घाई घाईत कॉन्फरन्स रूम च्या बाहेर निघाली

आशुतोष " आसावरी कम ऑन स्पिक अप .. मी किती शोधतोय तुला .. कुठे कुठे शोधलय?"

आसावरी तो काय बोलतोय हे ऐकायच्या पण मनस्थितीत नव्हती .. घाई घाईत ऑफिस च्या बाहेर पडली आणि तिच्या गाडीत बसली .. डोळ्यातून अश्रू , राग वाहत होता .. तिने चर्रकन गाडी रिव्हर्स घेतली आणि गेट च्या बाहेर काढून निघणारच तर ती गाडी जोरात चालवाय च्या  नादात तिचा बँलन्स गेला आणि सिक्युरिटी गेट च्या दाराला गाडी ठोकली .. आसावरीचे डोके स्टेअरिंग वर आपटले आणि रक्ताच्या थारोळ्यात ती बेशुद्ध पडली.

ऍक्सीडेन्ट चा आवाज इतका मोठा होता कि  सगळे गेट वर बघायला बाहेर आले .. त्यात आशुतोष पण होताच  आणि सिद्ध पण होता ..

सिद्ध पुढे जाणार तोच आशुतोष पुढे धावत गेला आणि कार चे दार उघडले .. लगेच ऍम्ब्युलन्स बोलवली .. आशुतोष स्वतः तिला गाडीतून बाहेर काढायला उचलायला गेला तर सिद्ध पुढे गेला

सिद्ध " थांबा .. डोन्ट टच हर .. तिला  आवडत नाही तिला कोणी हात लावलेला .. मी तिचा फ्रेंड आहे .. मी तिला नेतो  हॉस्पिटल ला "

सिद्ध ने स्वतःच्या जॉब चा हि विचार केला नाही आणि तिला उचलून ऍम्ब्युलन्स मध्ये  टाकले आणि हॉस्पिटल ला निघाला

आशुतोष त्याला तेव्हा काही बोलला नाही .. पण ऍम्ब्युलन्स च्या मागे मागे कार ने गेला .

सिद्ध ने तिला ऍडमिट करून घेतले .. लगेचच तिच्यावर ट्रीटमेंट सुरु झाली .

आशुतोष खूप अस्वथ वाटत होता .. हतबल वाटत होता .. सिद्ध कडे येताजाता बघत होता .. सिद्ध पण त्याला बघत होता पण दोघेही एकमेकांशी बोलत नव्हते

सिद्ध ला वाटले कि यानेच तिला नाहीतरी प्रेसेंटेशन च्या वेळी त्रास दिला असेल म्हणून तिचा ऍक्सीडेन्ट झाला आणि आता ती त्याची कंप्लेंट करेल म्हणून इथपर्यंत आलाय "

सिद्ध ची नुसती घाई गडबड चालली होती .त्याने आता तिची जवाबदारी घेतली होती आणि तो ती पूर्ण करत होता .. आशुतोष त्याच्या मागे पुढे करत होता पण सिद्ध त्याला खुन्नस देत होता

सिद्ध " मिस्टर आशुतोष .. तुम्ही घरी गेलात तरी चालेल . एका मुलीशी कशी वागावे हे पण तुम्हाला कळत नाही .. एव्हढे मोठे बॉस आहेत . आमच्या सारखया नवीन मुलांचे तर किंमतच नाही तुम्हाला . "

आशुतोष " शट अप सिद्ध .. आय कॅन फायर यु "

सिद्ध " ए हॅलो .. मला माझ्या लायकी वर यायला लावू नका ? कळले ना ?मला शशिकांत सरांनी सांगितलय कि तुम्ही हिला बघितल्यावर सगळ्यांना बाहेर काढले .. एवढे काय एकट्याने बोलायचे होते तिच्याशी ?"

आशुतोष जरा गडबडला .. " दयाटस  नन ऑफ  युअर बिझनेस . माईंड  युअर बिझनेस ?"

सिद्ध " तुम्ही जा ओ .. इकडून .. मी माझ्या मैत्रिणीला बोलावून घेतलंय .. ती थांबेल तिच्या बरोबर "

आशुतोष " मी काय करायचे हे तू मला सांगू  नकोस "

सिद्ध " तिला अजिबात आवडत नाही कोणी उगाचच जवळीक केलेली .. तुम्ही का तिला एकटीला थाम्बवून घेत होता .. "

आशुतोष " मी तुझ्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर द्यायला बांधील नाहीये ...."

दोघे हॉस्पिटल मध्ये भांडू लागले

तेवढयात नर्स बाहेर आली " शु... काय चाललंय हे हॉस्पिटल आहे "

आशुतोष " कशी आहे ती ? तिला शुद्ध कधी  पर्यंत येईल "

नर्स " आताच टाके घातलेत अर्धा तासाने शुद्ध यायला हवी .. लेट्स होप फॉर द  बेस्ट "

आशुतोष " मी थाम्बतो इकडे तू घरी जा .. "

सिद्ध " नको तिला शुद्ध आली तर .. ती तुम्हाला बघून पुन्हा हायपर  होईल .. त्यापेक्षा तुम्ही जा "

आशुतोष " मी काय सांगतोय तुला कळत नाही का ?"

सिद्ध " तुम्ह मला सांगणारे कोण ? इथे तुम्ही माझे बॉस नाहीये "

नर्स " हॅलो .. तुम्ही लोक काय करताय ?" जस्ट कीप सायलेन्स "

दोघे थोडावेळ गप्प बसले.

सिद्ध " तुम्ही तिचा एक्स बॉयफ्रेंड आहे का ?" कोण आहात ?"

आशुतोष त्याच्या कडे रागाने बघतो

सिद्ध " नक्कीच कोणीतरी आहे .. मला आठवले तिला आशु म्हणून हाक मारली तर चिडली होती ती माझ्यावर .. नक्कीच तुमच्या नावाशी काहीतरी गडबड वाटतेय मला "

आशुतोष नुसता अस्वस्थ वाटत होता .. ह्याला का उत्तर देऊ ? हा नक्की हिचा कोण आहे ? हा हिला इतके कसे ओळखतोय ? आणि त्याला सिद्ध चा राग  पण येत होता .. अतिशय आगाऊ मुलगा आहे हे त्याला कळत होते . पण तेवढाच तो आसावरी साठी काळजीने करत पण होता .. तिच्या बद्दल त्याला नक्कीच  काळजी आहे हे तरी त्याला नक्कीच पटले होते .

आशुतोष ला काय बोलू ? काहीच कळत नव्हते ? एक सारखा उठून तिला शुद्ध आली का बघत होता .. तिच्या चेहऱ्याला एकटक  पाहत होता. त्याचे डोळे भरून आले होते .. पण तो दाखवत नव्हता ..

तेवढयात सिद्ध ने त्याला कॉफी चा  मग दिला

सिद्ध " घ्या .. कॉफी घ्या .. "

आशुतोषने पण कॉफी मग घेतला .. तिथल्याच बेंच वर बसले आणि दोघे कॉफी घेऊ लागले

आशुतोष " तिला शुद्ध आली कि मी तिला घरी घेऊन जाईन "

सिद्ध " ए हॅलो .. काही पण काय ? काय प्रायव्हेट इस्टेट आहे काय ? म्हणे घरी घेऊन जाईन "

आशुतोष " तिचा ऍक्सीडेन्ट माझ्या मुळे झालाय ना तर मीच तिला बर करेन "

सिद्ध " काहीही काय ? मी तिला माझ्या घरी नेईल .. माझ्या घरी माझी आई आहे ... बहीण आहे .. मोठी वाहिनी आहे .. तिची सर्व जणी काळजी घेतील ."

आशुतोष "तरीही मी तिला माझ्या घरी नेणार आहे .. "

सिद्ध " मिस्टर आशु तुम्ही तिचा बॉयफ्रेंड असला नाहीतर नसाल.. सध्या तरी ती तुमच्या बरोबर येण्याच्या मनस्थितीत नक्कीच नाहीये .. हा विचार तिला  सोडून देताना करायला पाहिजे होता .. तुम्ही तिचे एक्स असलात तर मी तिचा करंट बॉय फ्रेंड आहे .. त्यामुळे तिला मी माझ्याच घरी नेणार "

आशुतोष ने त्याची कॉलर पकडली " तिच्या बद्दल असले  बोलायची हिम्मत कशी झाली तुझी ? बॉयफ्रेंड म्हणे .. शक्यच नाही .. मी तिला चांगला ओळखतो.. हे असले फ़्रेंडशिप ब्रेडशिप करणाऱ्यातली नाहीये ती .. हे मला चांगले ठाऊक आहे "

सिद्ध " कोण आहेस कोण तू ? "

आशुतोष " मी नवरा आहे तिचा "

🎭 Series Post

View all