सुखद क्षण

सुखद क्षण


शिर्षक- सुखद क्षण*

दाटता मेघ ते नभी
बरसती जलधारा,
थै थै नाचती वीज
सोबत वाहतो वारा.

रोमांचित होऊनी धरा
फुलतो निसर्ग हिरवा,
मनमोहक सुंदर शितल
पसरतो चौफेर गारवा.

झोंबतो जेव्हा गारवा
तो क्षण वाटे हवा हवा,
प्रफुल्लीत प्रसन्न करूनी
वाटतो जन्म हा पुन्हा नवा.

रखरखणा-या जीवनात
काही क्षण अलवार येती,
आनंदाचे सुखद क्षण ते
गोड गारवा मनास देती.
-----------------------------------
सौ.वनिता गणेश शिंदे©®

🎭 Series Post

View all