सुखाची परीभाषा

मनातली तगमग
कवितेचे नाव- सुखाची परिभाषा
विषय-सुखाची परिभाषा
स्पर्धा- राज्यस्तरीय करंडक कविता स्पर्धा

मनातली ही तगमग सारी
सावरून तारेवर कसरत..
कशी सुखाची परिभाषा अन
शब्दांनी मी रेखू गम्मत..

रंग बदलते इथे नभाचे
रंग बदलतो या धरणीचा..
धरा थरथरे पाहून अवघे
विळखा इथला प्रदूषणाचा..

धूर कोंडतो अस्मानी ह्या
श्वास तयाचा इथे अडकतो..
नदीत इतके विष सोडूनी
तरीही माणूस निवांत राहतो..

जन्म घालतो पुढची पिढी
जन्मतः इथे विकार अनावर..
औषध औषध अवघे जिवन
रोग इथे तर तळहातावर..

हिरवी अवघी वनराई ती
गिळून गेली गिळून जाईल..
कवी कोणती सुख परिभाषा
नसलेल्या डोळ्याने पाहिल..
मिटलेल्या हाताने लिहिल..

?️सचिन पाटील..
जिल्हा- सातारा व सांगली