Feb 29, 2024
राज्यस्तरीय करंडक कविता

सुखाची परिभाषा

Read Later
सुखाची परिभाषा


.राज्यस्तरीय कविता स्पर्धा फेरी -२

कवितेचे नाव - सुखी कोण आहे ?

कवितेचा विषय :- सुखाची परिभाषा


मानवजन्मी आलो आयुष्य हे लाभले
श्वास मोकळा घेत जीवनात उद्दीष्ट गाठले!
यशापयशाची चिंता कधी मनी नाही केली
वेदनेचे डोळ्यात माझ्या जरी अश्रू दाटले ॥१॥


कर्तव्य मी पार पाडीले आपुले
नाते रक्ताचे आणि परके जपले!
कधी भेदाभेद जातीधर्माचा नाही केला
सारेच कसे वाटले मला आपले ॥२॥

जीवन हे जगता जगता नेहमी
संकटे किती जीवनात माझ्यावर हसली!
सामना धैर्याने करुनी त्याचा
वाट निराशेची टाळुन तमा न केली कसली ॥३॥

थोड्याश्या गोष्टीत मोठे समाधान शोधले
वादविवाद कुणाशी कधी ना केले!
स्वभावच माझा शांत शितल होता
दु:ख आपोआप मग पळत गेले ॥४॥

अंगणात माझ्या सुखाचा पारिजात फुलतो
जाईजुईचा तो वेल हिरवा झुलतो!
येऊनी बसे राघुमैना पेरूच्या झाडावरी
डोळ्यातून माझ्या सुखाचा अश्रू फुलतो ॥५॥

एकदाच मिळे हे आयुष्य मानवजन्मी
ओंजळीत माझ्या जीवनदान भेटले!
काय उणिवा मी शोधु माझ्यात सांगा
माझ्यावरी प्रेम करणारे हृदयी दाटले ॥६॥

कवि:-मोहन सोमलकर
©️®️
टिम- नागपुर
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Mohan Somalkar

Computer Oprator

Poet, Auther

//