विषय:- सुखाची परिभाषा
शीर्षक:- संसार
ओढातानी रोजची ही, मोडका संसार माझा
रात्र प्रिती जागवीत, फुलला संसार माझा
राहातो प्रेमान, रोटी तुकडा वाटून खातो
फाटक्या चादरीत, फुलला संसार माझा
नाही ऊद्याची काळजी, फिकीर नाही आम्हा
येणारी घटीका सावरत, फुलला संसार माझा
व्रत वैकल्ये देवधर्म, जात ना जाणतो आम्ही
पोट भरण्या कष्ट करीत, फुलला संसार माझा
धुडकावणारे आहेत हयात, सतराशे छप्पन
पोटासाठी भ्रमण करीत, फुलला संसार माझा
आज राहीलो उपाशी, उद्या खाऊच तुपाशी
बेभरवश्याच्या आशेत, फुलला संसार माझा
दुखणे खुपणे गोंजारण्याला, सवड नसे आम्हा
पाय घासीत त्रास सोशीत, फुलला संसार माझा
शालेय शिक्षणाची वाढण्या, आम्हा गरज न वाटे
जीवनाच्या शर्यतीत हारीत, फुलला संसार माझा
चंद्रमौळी झोपडी संगी, चांदण्यांनी भरुन राहो
मंद धुंद चांदण वेलीत, फुलला संसार माझा
०००
संगीता अनंत थोरात
11/08/22
ईरा राज्यस्तरीय करंडक कविता स्पर्धा
टीम:- अमरावती
०००
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा