सुखाची ओंजळ... भाग 12 #मराठी-कादंबरी

Ye hat sod ticha hat sod kay re rastyat parkya baicha hat pkdayla laj nahi vatat tula

सुखाची ओंजळ भाग 12
आधीच्या भागात आपण पाहिले की,


निधीनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला, निधी सुमनला भेटायला गेली, तिथे समीर आणि प्रतीकही आले...


 समीर सुमनला तू माझ्या बायकोला भडकवले म्हणून ओरडायला लागला, त्याने निधीचा हात पकडुन घरी चलायला सांगितले, पण ती जायला तयार नव्हती, प्रतीकनी सुमन चा हात पकडला, सुमननी त्याच्या  कानशीलात दोन लावल्या,

त्यानी सुमनच्या चेहऱ्यावर ऍसिड हल्ला केला, सुमन खाली पडली दोघेही तिथून पळाले..

निधीनी ॲम्बुलन्स ला फोन करून सुमनला  हॉस्पिटल ला पोहोचवलं आणि ती स्वतः पोलीस स्टेशनला गेली,

तिथे पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला पोलीस स्टेशन मधून बाहेर पडली तर बाहेर समीर उभा होता,


“ माझ्या विरोधात तक्रार केलीस म्हणून त्याने तिचा हात पकडून मुरगडला तितक्यात पोलीस आले


आता पुढे,


“ये हात सोड तिचा ... हात सोड... काय रे रस्त्यात परक्या बाईचा हात पकडायला लाज नाही वाटत तुला?...


“ ओ साहेब ही परकी बाई नाही माझी बायको आहे..


“ये दारुड्या, चल पोलीसकोठडीत डांबतो तुला, तिकडे पोलिसाचा हिसका दाखवतो... काय असते तुलाही कळेल...

चल.. असं म्हणत पोलीस हवालदार समीरला घेऊन गेले,, त्याला तिथे दंडयाचे एक-दोन हिसके दाखवले


“नाव काय रे तुझं?...


“साहेब , समीर गायकवाड
“म्हणजे ती बाई खरच तुझी बायको होती तर...
“हो साहेब...


“दारू पिऊन मारहाण करतोस?...


“नाही साहेब...अहो मी तर हातही लावत नाही...खोटं बोलू नकोस...
आपल्याला खोटं बोललेलं खपत नाही...


“नाही साहेब...साहेब जाऊ द्या ना ...


“हा प्रतीक कोण आहे?...
“कोण प्रतीक?...
“ये मी तुला विचारतोय..तू उलट मला काय विचारतोय...

बऱ्याबोलाने सांग तू ओळ्खतोस ना त्याला...
“नाही ओ साहेब...


“पण तुझी बायको तर बोलली की तू ओळ्खतोस...
“ नाही हो साहेब तिला वेड लागले, वेड्यासारखी वागते ती..
“ कळेलच की आम्हाला कोणाला वेड लागले आणि कुणाला नाही... 


ये टाक रे याला आत मध्ये...


 दोन दिवस इथे घालवशील तेव्हा तुला कळेल...तुझा सगळा माज उतरेल.. तू काही सांगणार नाहीस तरी आम्ही सगळी माहिती काढू आणि तुझ्या साथीदाराला पण ताब्यात घेऊ.. 

“साहेब सोडा हो मला.. जाऊ द्या हो साहेब.. मी काही नाही केलं.. काही नाही केलं.. मी त्याला ओळखतही नाही साहेब, सोडाना साहेब...


“ये गप्प, जास्त ओरडायचं नाही इथे...


तिकडे सुमन वर ट्रीटमेंट सुरू झाली सुमन चा चेहरा पूर्ण जळालेला होता डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न सुरू झाले...
 घरच्यांना सुमनचा त्रास बघवत नव्हता त्यांनी दवाखान्यात जायचं सोडूनच दिलं..


 तिथले डॉक्टर आणि नर्स हे खूप चांगले असल्यामुळे तेच सुमनची सगळी काळजी घ्यायचे,  बाबा अधूनमधून जायचे पण आईचा धीर होत नव्हता..ती आणि आरोही दोघीही खूप हळव्या होत्या..


आरोहिनी निधी कडून राजचा नंबर घेऊन तिने राजला फोन केला पण राज फोनच उचलत नव्हता, दिवसातून चार-ते पाच वेळा आरोही त्याला फोन करायची पण एकदाही त्याने फोन उचलला नव्हता...


 आता खरंच आरोहीला राजचा राग यायला लागला होता,
“ असा कसा हा मुलगा ?.. असा कसा वागू शकतो?.. माझ्या बहिणीला आता गरज आहे तर आता तो  तिच्याजवळ नाही... काय अर्थ आहे याला?.. हेच त्याचे प्रेम?... तिला अर्धवट सोडून गेला, तिला कळेल तर किती दुःख होईल...


निधीच्या तक्रारीवरून पोलीस हॉस्पिटलमध्ये जाऊन चौकशी केली, सुमन शुद्धीत नव्हती आणि तिच्या घरचे तिथे कोणी नसल्यामुळे पोलीस सुमनच्या घरी गेले..


 दाराची बेल वाजली..


 आरोहिने दार उघडला..
“ कोण आलय ?..आरोहीच्या बाबानी विचारलं,


“ बाबा.. पोलीस आहेत..


“ अरे इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही इथे?.. या या बसा..
“ आम्हाला चौकशी करायची होती..
“बोलाना साहेब..


“ तुमच्या मुलीवर ॲसिड हल्ला झालाय , कोणी केला असेल काही कल्पना आहे तुम्हाला?..


“ नाही हो साहेब, माझ्या मुलीच्या वाट्याला कोण जाईल.?. ती कुणाचं काही बिघडवत नाही, कोणाच्या मध्ये राहत नाही, कोण करेल अस?..


“ तुम्ही प्रतीकला ओळखता?.


“ हो, प्रतीक तिच्या कॉलेजमधला मुलगा.. एक दोनदा घरी आलेला आहे, तेवढाच ओळखतो मी त्याला...


“ तुम्हाला कल्पना आहे का त्यानीच हे सगळ केले आहे...
“ तुम्ही काय बोलता साहेब?.. तो का करेल असा?..


“ ते तुम्हाला सगळं कळेलच पण आता तुम्हाला माझ्यासोबत पोलीस स्टेशनमध्ये यावं लागेल?..
“ मला… मला कशाला साहेब?..


“ सुमन ची मैत्रीण निधी तिने तक्रार नोंदवली आहे प्रतीक विरोधात, ती एकमेव साक्षीदार आहे या केसची... काही प्रक्रिया पूर्ण करायच्या आहेत तर तुम्हाला आमच्या सोबत चलावे लागेल..


“ ठीक आहे साहेब मी येतो...


 सुमन चे बाबा पोलीस स्टेशन मध्ये जाऊन सर्व प्रक्रिया करून आले, त्यानंतर त्यांनी निधीला फोन करून बोलावून घेतलं...
“ निधी काय झालं असं?.. काय झालं की प्रतीकने असं केलं?... तुझ्यात आणि समीर मध्ये काय झालं बेटा?...


“काका समीर मला त्रास द्यायचा, तो आणि त्याची आई माझ्याशी चांगले वागत नव्हते, मी आई बाबांना पण सांगितलं पण त्यांना खर वाटत नव्हतं.. एक दिवस सुमन घरी आली आणि तिला सगळं जाणवलं, तिनी खोदून खोदून मला विचारलं, मी ही सगळ सांगितलं....

सुमननी मला वेगळा होण्याचा सल्ला दिला, समीरला जेव्हा हे कळले तेव्हा तो खुप चिडला.. त्याला वाटलं मी हे काही करू शकणार नाही...त्यानी माझ्याशी चांगलं वागण्याचा प्रयत्न केला पण मी ऐकणार नाही हे समजल्यावर त्याच वागणं बदलल...


प्रतीकच सुमनवर एकतर्फी प्रेम आहे अस तो समीरजवळ बोलला होता , सुमनशी लग्न करायचं होतं...


मी एकटी राहण्याचा निर्णय घेतला ,  मला आता समीरसोबत नाही राहायचं आणि यासाठीच राज आणि सुमन मला मदत करत होते आणि प्रतीकच सुमन वर प्रेम होत, पण सुमन आणि राजच लग्न झाल्यामुळे त्याला शांत बसवत नव्हतं..
सुमन चे आई बाबा आश्चर्यचकित होऊन,
“काय?..राज आणि सुमनच लग्न...


निधी काय बोलतेस तू..


“हो काका दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं .. आणि त्यांनी मंदिरात लग्न ही केलं होतं...  ते काही दिवसानंतर तुम्हाला सांगणार होते.. राजला नोकरी नव्हती म्हणून ते गप्प होते काही दिवसांनी ते तुम्हाला सर्व सांगणार होते..

प्रतीक अधूनमधून त्यांना ब्लॅकमेल करायचा, तुम्हाला हे सगळे माहिती नाही याचाच फायदा म्हणून नेहमी सुमनशी विचित्र वागायचा मला तुझ्याशी लग्न करायचा असं सांगायचा त्याला सुमन शी लग्न करता येणार नाही ही गोष्ट त्यानी मनावर घेतली आणि सुमन जर माझी होणार नसेल तर ती कोणाचीच होणार नाही ही वृत्ती त्याच्या मनात आली.... आणि त्याने सुमनचा घात केला...


“ काका मला माफ करा हे सगळं माझ्यामुळे झाले, सुमन मला मदत करायला समोर आली नसती तर प्रतीक असा वागला नसता... मला माफ करा काका...


“ नाही पोरी तुझी काही चूक नाही तिच्या नशिबात जे होतं तेच झालं तिने आम्हाला सांगितलं की आम्ही काही मदत करू शकलो असतो पण आम्हाला काहीच माहिती नव्हतं हे सगळे आमच्या मुळे झालाय आम्ही आमच्या मुलींना विश्वासात घ्यायला हवं होतं त्याचा विश्वास दाखवायला हवा होता मी

"नाही नाही काका तुमचा खरच दोष नाहीये ते दोघे तुम्हाला सांगणार होते त्यावेळी राज्याचे शिक्षण सुरू होतो म्हणून आता राग बिझनेस करायला लागला की मला नोकरी लागल्यानंतर दोघे सांगणार होते तुम्हाला...


चूक कुणाची नाही चूक वेळेची आहे,  वेळ चुकीची होती म्हणून हे सगळं घडलं...

"काका आता आपण थांबायचं नाही , रडायचं नाही.. समीर आणि प्रतीक विरोधात आपल्याला लढायचं आहेे, तीला न्याय द्यायचा आहे आणि आणि मी तुमच्यासोबत आहे कोणी मला कितीही अडवलं,  कितीही काही केलं तरी मी आता मागे हटणार नाही काका,  मी तुमच्यासोबत आहे ...

" समीर कुठे आहे बेटा?..

"पोलिसांनी त्याला लॉकअपमध्ये टाकलं, त्याच्या विरोधात मी तक्रार नोंदवून आले होते, काही दिवस पोलीस स्टेशन मध्ये राहिल्यावर अक्कल येईल त्याला.. पोलिसांनी सतत दोन दिवस समीरला फिजिकली आणि मेंटली टॉर्चर करून त्याच्याकडून सगळी माहिती काढून घेतली...

तर त्यानी प्रतीक बद्दल सगळं सांगितलं  काही तासाच्या आत पोलिस प्रतिकच्या घरी गेले त्याच्या बाबांनी दार उघडला
“ इन्स्पेक्टर साहेब तुम्ही इथे?...


“ हो.. प्रतीक तुमचा मुलगा ना?..
“ हो साहेब ...
“ मग बोलवा त्याला...


“ तो घरी नाहीये , बाहेर गेलाय ...
“कुठे गेलाय?....फोन करून बोलवा.. 


“मीच त्याला खूप वेळचा फोन करतो आहे, पण त्याचा फोन बंद दाखवतो.. काय झालं साहेब?..


“ हे बघा, तो जिथे कुठे असेल तिथून तर आम्ही शोधून काढूच.. आता बरा बोल्याने   त्याला बोलवा...


“ खरच सांगतो साहेब, घरी नाहीये पण काय झालं?..
“ तुमच्या मुलाने खूप मोठा गुन्हा केलाय..?


“ कोणता गुन्हा?..
“  ऍसिड हल्ला केलाय त्याने, एका तरुण मुलीच्या चेहर्‍यावर त्याने ऍसिड टाकलंय, त्याची आता निर्दोष मुक्तता नाही..

तुमच्याकडून आम्हाला सहकार्य मिळेल अशी आम्ही आशा करतो... तो घरी नाहीये मी त्याला शोधून काढून आकाश-पाताळ एक करून त्याला शोधून काढू..


 असं म्हणत इन्स्पेक्टर तिथून निघाले
इन्स्पेक्टरनी प्रतीकचा मोबाईल टॅग केला त्याचा मोबाईल जेव्हाही सुरू होईल तेव्हा पोलिसांना लोकेशन कळेल...पोलिसांनी चारही बाजूने पोलीस तैनात करून ठेवले...


पोलीस चौकीत समीर कडून सर्व माहिती घेतली..
दोन दिवसानंतर समीरची आई रडत रडत पोलीस ठाण्यात आली,


रडत रडत पोलिसांना सांगत होती..
“साहेब माझ्या मुलाला का डांबून ठेवलंय, अहो त्यानी काही नाही केलं, सगळं त्या सटविणे केलं, माझ्या मुलाचं सुख तिला बघवत नाही... पांढऱ्या पायाची बाई आहे ती, घरात आली पण साध सुखही देऊ शकली नाही, मला नातवाचे तोंडही दाखवलं नाही..पांढऱ्या पायाची मुर्दाळ..


 साहेब तुम्ही तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका, तिचे चालचलन काही ठीक नाही, माझ्या पोराला फसवायला आली ती... साहेब सोडा माझ्या पोराला, काहीच केलं नाही त्यानी....
“ये बाई तुझी बळबळ बंद कर आधी,  हे घर नाही तुझं ..पोलीस ठाण आहे, येथे आवाज नाही करायचा.. बस तिकडे बाजूला....साहेब येतील तेव्हा साहेबांना सांग सगळं ....


 हवालदाराने तिला एका कोपऱ्यात टेबलावर बसायला सांगितलं समीरची आई जाऊन बसली पण तिची बडबड सुरू होतीच...


“ माझ्या पोराच आयुष्य बरबाद केलं रे या पोरीने ...
पाप लागेल तिला, कधी सुखी नाही राहणार, कधी सुखी नाही राहणार ती, माझ्या पोराच्या जीवाचं वाटोळ वाटोळं केलं तिनी ..ती काही सुखात राहणार नाही तीच जीवन नरकात जाईल,  कुठं फेडेल ही पाप...


थोडया वेळाने इन्स्पेक्टर आले, तशीच समीरची आई धावत आली साहेबांच्या पाया पडून रडत रडत


“साहेब माझ्या पोराला सोडा हो त्याने काहीच केलं नाही... ती सटवी ,पांढऱ्या पायाची..नरकात जाओ..


“हे बघा, इथे अशी भाषा चालणार नाही...
“ माफ करा साहेब, अहो पण माझ्या पोरानी काहीच केलं नाही...


“कळेलच तुम्हाला काय काय केलं त्याने...
“जा तुम्ही घरी, उगाच तुमचा आणि माझा वेळ वाया घालवू नका...


तुम्ही इथे बसून काहीही उपयोग होणार नाही आहे, शिक्षा तर त्याला होईलच..


समीरवर बायकोला मारहाण करणे, तिला मानसिक आणि शारीरिक त्रास देणे, दारू पिऊन शारीरिक अत्याचार करणे आणि प्रतीक ची साथ दिली त्याबद्दल कलमा लागल्या...

समीरची केस आता कोर्टात दाखल झाली होती...


क्रमशः

🎭 Series Post

View all