सुखाची ओंजळ... भाग30 (अंतिम)#मराठी कादंबरी

Baghta baghta nau mahine purn zale docterani sumanla sijar sangital hot

सुखाची ओंजळ... भाग 30 अंतिम


आधीच्या भागात आपण पाहिले की,


सुमनच्या सर्जरी व्यवस्थित झाल्या..त्यांनतर सुमनला तिच्या प्रेग्नन्सी बद्दल कळलं, राज आणि सुमन दोघेही खूप खुश होते..


काही दिवसांनी ते परत आले आणि सरळ सुमनच्या आई बाबाकडे गेले..आईनी तिला तिथेच राहण्याचा सल्ला दिला..राजनी पण हो म्हटलं..


बघता बघता महिने उलटले..


निधी आणि सुमनच डोहाळेजेवण झाले..तिथे एक बाई सुमनला नको ती बोलली, सुमन उदास झाली तेव्हा निधीनी समजावलं...कार्यक्रम पार पडला, निधी तिच्या घरी गेली, सुमन थकल्यामुळे लवकर झोपली..राज तिच्या उशाशी बसला..


आता पुढे,


बघता बघता नऊ महिने पूर्ण झाले, डॉक्टरांनी सुमनला सिजर सांगितलं होतं, सुमनला लेबर पेन सुरू झाले आणि तिला हॉस्पिटलमध्ये एडमिट केलं.. सुमन दोन दिवस हॉस्पिटलमध्ये राहिली डॉक्टरांनी नॉर्मल डिलेवरीची वाट बघितली..


 त्याच दरम्यान निधीला ॲडमिट करण्यात आलं, तिलाही लेबर पेन सुरू झाले होते...

सुमनला आता दोन दिवस झाले डॉक्टरांनी आपल्याला सिझेरियन करावं लागेल असं सांगून तिला ओ टी मध्ये घेऊन गेले, सुमनची डिलिव्हरी झाली...


 तिला मुलगा झाला आणि काही वेळातच निधीची नॉर्मल डिलिव्हरी होऊन तिला मुलगी झाली..


 सगळ्यांना खूप आनंद झाला, सगळे खूप खुश होते पण ह्या दोघी एकमेकींना बघू शकत नाही याचं दुःख त्यांना वाटत होतं...


 सहा दिवसानंतर दोघींनाही डिस्चार्ज मिळाला आणि दोघी आपापल्या घरी गेल्या.. सव्वा महिना झाला आणि दोघींनी नाव ठेवण्याचे ठरवलं.. तोही कार्यक्रम एकत्रच करण्याचं ठरलं..


 नामकरण सोहळ्याची सगळी तयारी झाली, दोघेही आपापल्या बाळांना घेऊन आल्या..


 पंडितजींनी जन्म नुसार काही अक्षरे सांगितली.. त्यावरून सुमननी आणि राजनी त्यांच्या मुलाचं नाव “हर्ष” ठेवलं.. हर्ष म्हणजे आनंद..

तो या दोघांच्या जीवनामध्ये आनंद घेऊन आला होता आणि म्हणून त्यांनी त्याचं नाव हर्ष ठेवलं.. निधीच्या मुलीचं नाव अ वरून निघालं तर निधी आणि दिपकने त्यांच्या मुलीचं नाव “आनंदी” ठेवलं...
 नामकरण सोहळ्याचा कार्यक्रम छान पार पडला..

आत्ता सुमन तिच्या बाळाला घेऊन राजच्या घरी राहायला गेली..


 हळू हळू दिवस सरकत होते.. सकाळी राज ऑफिसला गेला की सुमन दिवसभर एकटीच हर्षच सगळं करायची.. राज संध्याकाळी ऑफिसमधून लवकर येऊन सुमनची मदत करायचा...


हळूहळू हर्षच्या हालचाली सुरू व्हायला लागल्या.. एक एक क्रिया पूर्ण होत गेली.. बघता बघता एक वर्ष होऊन गेला, हर्ष एक एक पाऊल टाकायला लागला आता दिवसभर घरभर फिरायचा आणि सुमनला त्याच्या मागे मागे करावं लागायचं..

 एक दिवस हर्षच्या तोंडून “आई” हा शब्द निघाला, तो सुमनच्या कानावर पडला ..सुमनला इतका आनंद झाला की तिचा आनंद गगनात मावेनासा झाला,


“ हर्ष बाळा.. अजून एकदा बोल.. अजून एकदा बोल हर्ष..
 आई.. आई.. बोल हर्ष..


एकदा हर्ष बोलला की दुसऱ्यांदा बोलायचंच नाही त्याला कितीही म्हटलं तरीही तो बोलायचा नाही....


हर्षचा पहिला वाढदिवस आला आणि राजनी त्याला छोटीशी तीन चाकी स्कूटर घेऊन दिली....


 त्यावर बसून हर्ष दिवसभर या खोलीतून त्या खोलीत करायचा आणि सुमनला तिच्या मागे मागे मागे मागे करत राहावं लागायचं..

 एक दिवस राज खूप उशिरा आला, हर्ष झोपलेला होता आणि सुमन वाट बघत बसली होती.. राज आला सुमनी दार उघडलं,
“ राज आज खूप उशीर झाला रे..


“ हो ग खूप काम होत आज, आता खूप थकायला होतंय मला..
“ तू बस, मी पाणी आणते आणि जेवण गरम करते जेवून घे आणि आराम कर...


“ तू जेवलीस?..
“ नाही रे.....
“सुमन जेवून घेत जा गं, माझ्यासाठी अशी वाट बघत जाऊ नकोस.. तुला बाळाचे दिवसभर करावे लागते, उगाच माझी वाट पाहत बसण्यात काही अर्थ नाही..


“ ठीक आहे रे.. आता सोबत घेऊया तू थकून येतोस आणि मग  एकटाच बसतोस.. हे मला नाही आवडत... एकत्र जेवुया आणि झोपूया..


“ ठीक आहे.... दोघांनी जेवण केले आणि राज रूम मध्ये गेला मागोमाग सगळं आटपून सुमन पण गेली...
“ राज तुला माहिती आज काय गंमत झाली?..


“ काय?..
“हर्षने आज पहिल्यांदा आई शब्द काढला आहे... तो मला आई बोलला, फक्त एकदाच बोलला त्यानंतर मी त्याला किती विनवण्या केल्या, बाळ आई बोल रे.. त्यानंतर अजिबात बोलला नाही तो..


“ बोलेलं ग, आता कुठे शब्द बोलायला लागला तो...
 “किती भराभर दिवस गेले ना, आपल लग्न झालं, आपण सिंगापूरला गेलो, तिथे सर्जरी झाली आणि मी प्रेग्नेंट राहिले...
 पाहता पाहता नऊ महिने गेले आणि हर्ष आपल्या लाईफ मध्ये आला, सगळं किती भराभर झाल्यासारखं झालं ना आणि आता बघ ना पाहता पाहता हर्ष एक वर्षाचा झाला... 


“ हो ग, ये निधीची आनंदी पण बोलत असेल ना गं...


“ हो रे.. खूप महिने झाले माझा आणि तिचं बोलणं झालं नाही, शिफ्ट झाल्यापासून तिने मला फोन केला नाही..


“ हो बिझी असेल..छोटसं बाळ, घर, तिचा जॉब.. वेळ मिळेल तेव्हा करेल फोन, नाही तर तू कर तिला फोन.. तिलाही बरं वाटेल...
“हो करते उद्या..चल झोपूया..


 लाईट ऑफ केले..
 दुसऱ्या दिवशी हर्ष झोपल्यानंतर दुपारी सुमनने निधीला फोन केला
“ हॅलो... 
“ हॅलो निधी, सुमन बोलते..


“ हा सुमन बोल, कशी आहेस?.. आज खूप महिन्यानंतर फोन केलास...
“ हो ग तू पण फोन करत नाहीस..
“ अग इकडे शिफ्ट झालो ना तर खूप काम वाढलीत माझे...
“ हो ग, माझा ही हर्षच्या मागे मागे करता करता पूर्ण दिवस कसा जातो ते ही कळत नाही...


“ आनंदी चालायला लागली ना तेव्हापासून तिच्या मागे करावं लागतंय.. ऑफिस, घर, आनंदी यांच्यात माझा वेळ कसा जातो कळतच नाही...


“ कधी तरी भेटायला ये, किती महिने झाले आपली भेट झाली नाही..
“ हो ग नक्की येईल, वेळ मिळाला तर नक्कीच येईल.. ठीक आहे सुमन मी ठेवते आता फोन...


निधीने फोन ठेवला.. तिच्या आयुष्यात आनंदी होती तिचे छान सुखाचे दिवस चालले होते...


 हळूहळू दिवस महिने वर्षे उलटली.. पाहता पाहता हर्ष पाच वर्षाचा झाला आता सुमनला थोडा वेळ मिळायला लागला...
 सुमन एका नवनिर्मित फाउंडेशनची जुळली, तिथे सुमनसारख्या ऍसिड अटॅक मुलींना आधार देण्यासाठी म्हणून ती संस्थेची निर्मिती केली गेली होती.....


 प्रत्येकालाच सुमनला मिळाली तशी फॅमिली मिळेलच अस नाही आणि राजसारखा नवरा मिळेलच असं नाही... काही काही जणींना त्यांची फॅमिली टाकूनही देते.. अशा मुलींसाठी ही संस्था काम करते, त्यांना आधार देते, त्यांना जगण्याची नवी उमेद देते...


 सुमन या फाउंडेशनशी जुळली आणि त्या फाउंडेशनसाठी तीनी काम करायला सुरुवात केली...


 सुमनला तिथे काम करायला खूप छान वाटायचं, वेगवेगळ्या मुलींशी भेट व्हायची आणि त्यांच्या आयुष्यातील स्ट्रगल तिला जाणून घेता यायचं..    
सुमन तिथे नवीन नवीन उपक्रम करायची, त्या मुलींना काहीतरी नवीन नवीन काम शिकवायची.. जेणेकरून ते स्वतः ते सगळं तयार करून त्यांना त्यांचा मोबदला मिळू शकेल.. तिथे काम करता करता सुमनला बराच अनुभव आला आणि तिला आता असं वाटलं की आपण स्वतःचं काहीतरी असं करावं...


 तिनी राजजवळ आपल्या मनातली कल्पना बोलून दाखवली, राजनी पण तिला दाद देत तिच्या मनासारखं करण्याची मुभा दिली...


 काही महिन्यातच सुमनने “खुशी फाउंडेशन” नावाचं स्वतःच फाउंडेशन उघडलं आणि हळूहळू तिचं काम सुरू झालं.. 


खुशी फौंडेशन मध्ये सगळ्यात आधी आलेली मुलगी फक्त दहा वर्षाची होती, तिच्या आयुष्याची व्यथा ऐकताच सुमनचे डोळे पाणावले, आजपर्यंत सुमन फक्त स्वतासाठी रडली होती पण त्या दहा वर्षाच्या मुलीची व्यथा ऐकून सुमन स्वतः ढसाढसा रडली...


सुमन देवा समोर उभी राहिली आणि देवाला विचारलं 


“देवा का रे असा वागतोस, त्या निष्पाप जिवाच्या आयुष्यात इतके घोर संकट का टाकतोस.. काय कळत त्यांना यातलं तर काहीच नाही....खेळण्याचे, बाळगण्याचे दिवस असताना त्यांच्यासोबत नाही नाही ते प्रसंग घडतात.. कदाचित तिच्या ह्या प्रश्नाचे उत्तर कुणाजवळही नव्हतं.. 


खुशी फाउंडेशन मधली ती पहिली मुलगी असल्याने तिचे नाव खुशी ठेवले.. आता खुशीही तिच्या जीवनातली महत्वाची व्यक्ती झाली, तिची फॅमिली झाली.. हर्षची मोठी बहीण झाली...


 बघता बघता सुमनच खुशी फाउंडेशन वाढायला लागलं, राजही जमेल तेवढी सगळी मदत करायचा.. 


सुमन सगळ्यांना जीवनात उपयोगी वस्तू घरी कशा तयार करायच्या हे शिकवायची आणि त्यातून आपण पैसे कसे कमवता येतील याचे धडे द्यायची, त्यांना गृह काम द्यायची म्हणजे त्यात त्यांचे मनही रमेल आणि आपल्याला काही तरी मिळतंय याचा समाधान वाटेल यासाठी सुमनचा नेहमी प्रयत्न असायचा...


 बघता बघता पाच वर्ष झाली आणि सुमनच्या खुशी फाउंडेशनला गव्हर्मेंट करून मान्यता मिळाली. . सुमनचा कार्याबद्दल सुमनचा सत्कार करण्यात आला, सुमनला शाल आणि सन्मानचिन्ह देऊन तिचा सत्कार झाला..


 घरी परत आल्यानंतर सुमन ते सन्मानचिन्ह घेऊन बसली होती, राज तिच्या जवळ आला


“ काय ग अशी काय बघतेस त्याच्याकडे....
“ काही नाही या सन्मानचिन्ह कडे बघत आहे, राज कुठे होते मी आणि आज कुठे आहे?.. 


खरच मला तुला थँक्यू म्हणावसं वाटतंय, तु माझ्या आयुष्यात परत आला नसतास ना तर आज मी तिथेच त्याच जागी घुटत राहिले असते किंवा कदाचित हे जग सोडून गेले असते... राज फक्त तुझ्या आणि तुझ्याच मुळे माझ आयुष्य सुखमय झालं, माझ्या आयुष्यात तू आनंदाचे क्षण भरलेस.... तू एका निर्जीव देहाला खतपाणी घालून सजीव केलंस ....


मी तुझे आभार मानावे की नाही मला नाही माहित पण खरच तू नसतास ना तर मी आज नसते रे राज....


 तू काय विचार करतेस असा सुमन... 


“ मला विचार करायला भाग पाडले, दहा वर्ष.. दहा वर्ष कमी नसतात, राज या दहा वर्षात माझ्यासाठी काय नाही केलं ते सांग, प्रत्येक क्षणाला प्रत्येक संकटाला माझ्या सोबत उभा राहिला ...सोबत नाही तू तर माझ्या समोरच उभा राहायचस... संकट झेलण्यासाठी त्या संकटाची झळ मला लागू नये म्हणून तू आधी सामोरे जायचास...


आज एक एक क्षण आठवले ना राज तरी डोळे भरून येतात रे...


खरच तू माझ्या जीवनात

 सुखाची ओंजळ भरलीस.. 


दोघांनीही एकमेकांना मिठी मारली आणि दोघेही एकमेकांत विलिन झाले...


“आयुष्यात तू येताच
जीवन भरले सुंदर क्षणांनी
साथ दिलीस अशी की
ओंजळ भरली सुखांनी”


समाप्त...

सदर कथेतील पात्र काल्पनीक आहेत....
सुमनच्या जीवनात राज आला आणि त्याने तीच आयुष्य बदलून टाकलं...राज, सुमन आणि हर्ष तिघेही खूप छान,आनंदात  जीवन जगत आहेत...


पण,


या समाजात कितीतरी सुमन आहेत ज्यांच्या जीवनात अजूनही राज सारखा कोणी आलेला नाही,  सुमनच भाग्य चांगलं होतं की तिला राज मिळाला, पण बाकीच्यांचं काय?.. त्यातल्या काही मुली तर जीवही देतात, काहींना त्यांचे कुटुंब सोडून देतात.. अशा मुलीसमोर काहीच पर्याय नसतो...त्यांच पुढे काय हा एक प्रश्न निर्माण होतो..


 खुशी फाउंडेशन सारख्या संस्था यांच्यासाठी कार्य करतात खरच हे खूप महान कार्य आहे...या संस्थेमुळे त्यांना जगायला बळ मिळत..जगण्याची नवी उमेद मिळते... त्यांच्या कार्याची अशीच प्रगती व्हायला हवी..कितीतरी मुलींचे जीवन यांच्यावर अवलंबून असतात...


त्यांच्या कार्याला सलाम...


वाचकहो तुम्हाला माझी कथामालिका कशी वाटली ते कंमेंट मध्ये नक्की कळवा आणि तुमचे याबद्दल काय मत आहे हे ही नक्की कळवा...


धन्यवाद
ऋतुजा वैरागडकर

🎭 Series Post

View all