सुखाची ओंजळ... भाग 8 #मराठी- कादंबरी

Sumanla college dur padat aslyamule tine mavshikade rahnyacha nirnay ghetla

सुखाची ओंजळ...भाग 8


आधीच्या भागात आपण पाहिले की,


 सुमन कॉलेज मध्ये टॉप आली, तिच्या घरचे सगळे खुप खुश झाले,
सुमन ने समोर शिक्षण घेण्यासाठी बाबांना परमिशन मागितली, बाबा तयार नव्हते, आईच्या सांगण्यावरून ते तयार झाले...

सुमननी खूप अभ्यास करून ती एन्ट्रान्स मध्ये पहिली आली, तिला चांगल्या नामांकित कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळालं.. सुमनच कॉलेज सुरू झालं आणि राजचा बिझनेस सुरू झाला.... त्यामुळे  दोघांनाही बोलायला खूप कमी वेळ मिळायचा... 


एक दिवस कॉलेजमध्ये सुमनला प्रतिक दिसला , त्याच्याशी काही जास्त न बोलता सुमन घरी आली.... घरी आल्यावर छान फ्रेश गच्चीवर गेली,  आई-बाबा आणि आरोही पण आले... सगळे गाण्याच्या भेंड्या खेळले, आणि नंतर आपल्याला खोलीत झोपायला गेले, सुमनला खूप प्रसन्न वाटत होतं ,तिला आज खूप छान झोप लागणार होती ..

आता पुढे,


सुमन ला कॉलेज खूप दूर पडत असल्यामुळे तिने मावशीकडे राहण्याचा निर्णय घेतला, तशी सुमन मावशीकडे राहायला गेली.. मावशीची मुलगी प्रीती आणि सुमन या दोघींच खूप पटायचं , खूप जमायचं ... दोघी खूप धमाल करायच्या...

सुमनची मैत्रिणी निधी तिचे घर मावशीच्या कॉलनीमध्ये असल्यामुळे एक दिवस सुमन निधीला भेटायला गेली....


 निधीने दार उघडला, ती सुमन कडे बघून


“ सुमन तू इथे?.. इथे कशी काय?..


“ असं का विचारतेस निधी?...


“अग काही नाही, तू फोन नाही केलास ना आणि अचानक आलीस म्हणून विचारलं....


“ सॉरी निधी, मी तुला फोन करायला हवा होता पण सरप्राईस  द्यायचं म्हणून मग मी फोन नाही केला, सॉरी......


“ तू ये ना आत...


 सुमनने निधीवर नजर फिरवली आणि तिला विचारलं 


“निधी काय झालं?... सर्व ठीक आहे ना?.. अशी का दिसतेस?..


“ नाही ग, सगळे ठीक आहे.. तू ये बस..


  सुमन मनातल्या मनात विचार करत होती की,हिचा अवतार असा का दिसतोय, अंगात मरगळलेली साडी, लांब हाताचे ब्लाऊज,  घामाने भिजलेला चेहरा, केस ही अस्ताव्यस्त... सुमन तिच्याच विचारात गडलेली होती..
 निधीने पाणी आणलं 


“सुमन सुमन ...काय कुठे हरवलीस.. पाणी आणलं सुमन..
सुमन पाणी प्यायली


“ तू बस मी तुझ्यासाठी चहा नाश्ता च बघते..


“निधी एक मिनिट.. काही आणू नकोस..तू इथे बस माझ्याजवळ आपण किती किती महिन्यानंतर भेटतोय, मला तुझ्याशी खूप काही बोलायचे, तू बस इथे आरामात....


 सुमन बसून पाच मिनिट होत नाही तर आतून आवाज आला 


“सुनबाई.... सुनबाई चहा टाकलास ना, मेलीस की काय किचनमध्येच किती वेळची वाट बघते मी....?”


 निधी अगदी बावरल्यासारखी झाली तिच्या मनात निर्माण झालेली भीती चेहऱ्यावर दिसत होती, ती ताडकन सोप्या वरून उठली


“ काय झालं निधी?.. कोण ओरडतय ,?..


“ कोणी नाही माझ्या म्हाताऱ्या सासुबाई आहेत, त्यांना मी चहा देणार होते, तू आलीस आणि चहा बनवायचा राहिला, त्यांच्यासाठी चहा बनवून देते

 निधी आत गेली, तिनी चहा टाकला ,सुमनने संपूर्ण घरावर नजर फिरवली....   घर अगदीच अस्ताव्यस्त दिसत होतं, काय कुणास ठाऊक पण घरात अगदीच प्रसन्नता वाटत नव्हती.. निधीने तिच्या सासूला चहा दिला आणि ती सुमन जवळ येऊन बसली.. थोड्यावेळ दोघांच्या गप्पा रंगल्या दाराचा बेलचा आवाज आला, तिने दार उघडले तर समोर समीर होता निधीचा नवर..


 कोण आलय?.. बाहेर चप्पल दिसते....


“ सुमन आहे ती बघा माझी मैत्रीण सुमन... 


“ हाय जिजू ..


समीर तिच्याकडे न बघता...


“निधी मी आत आहे, मला चहा आणून दे....


“ हो आणते....


 निधीने चहा नेऊन दिला...


“ नुसता चहा घेऊन आलीस,  खायला काही आणले नाहीस....


 सुमन आली आहे ना, मग मी तिच्याशी बोलत बसले आणि मी काही बनवून ठेवल नाही, मी पटकन बनवते.....


“ तुला साधं समझत नाही, मला चहा सोबत काहीतरी खायला लागत.. तुला माहितीये ना मग का बनवून ठेवलं नाहीस ...


“ अशा तुझ्या मैत्रिणी येण मला चालणार नाही...


“ अहो..कुठे माझ्या मैत्रिणी येतात.. आजच तर आली आणि सुमन इतक्या महिन्यानंतर आली...


“ते काहीही असो तू तिला पत्ता का दिलास?..
“ नाही नाही मी तिला पत्ता नाही दिला, तिची मावशी राहते इथे, ती मावशीकडे राहायला आली आहे... तिच्या घरापासून कॉलेज खूप दूर पडते ना म्हणून ती तिच्या मावशीकडे च राहणार आहे ...


“ अच्छा आता मावशीकडे राहायला आली तर आता आपल्याकडे तिच्या रोज चकरा होणार, हो ना...


“ नाही नाही अहो, असं काय बोलताय.. ती आजच आली आहे, मी तिला सांगेल ना ....


“अच्छा म्हणजे तिच्या तोंडावर सांगणार की बाई तू माझ्याकडे येऊ नकोस माझ्या नवऱ्याला प्रॉब्लेम आहे म्हणजे तिच्या मनात माझी वाईट इमेज तयार होईल....

“ तुम्ही प्लीज उलट अर्थ काढू नका ना..


 सुमननी बाहेरून दोघांचं बोलण ऐकलेलं आणि सुमन चुपचाप तिथून निघून गेली, निधी रुमच्या बाहेर आली तेव्हा तिला कोणीच आढळलं नाही निधी समजली की सुमनला सगळं कळलं, ती गुमान तिच्या कामाला लागली.....


 सुमन घरी आली , तिच्या डोक्यात निधीचेच विचार घोळत होते, तिने प्रीती ला हे सगळं सांगितलं, तिला या गोष्टीच आश्चर्य वाटलं कारण जेव्हा ही निधी घराबाहेर निघायचे ती खूप आनंदी दिसायची त्यामुळे कोणाच्याही लक्षात येणार नाही त्यांच्याकडे काहीतरी प्रॉब्लेम   आहे, निधीचा विचार करत बसलेली असताना मावशी आली,


“ काय ग सुमन,काय विचार करतेस?... तिने मावशीला निधीबद्दल सगळं सांगितलं 


“सुमन बेटा हे रोजचंच झालंय मला माहितीये सगळं, घरात तीनच लोक आहेत पण तरीही घरात सुख नाही, सासुबाई तिच्याबरोबर रोज भांडण करते, समीर दारू पिऊन येतोय ,काही कारण नसताना तिच्या चुका काढतो,  समीर दारू पिऊन तिला मारहाण करतो....


“  लग्नात किती छान वाटला होता तो...


 एका दिवसात माणसं ओळखता नाही येत बेटा... अग तो आधीपासूनच तसा होता, त्यांनी लग्नात दिखावा केला असेल चांगला होण्याचा.. पण तो बदलला नाहीये लग्नाआधी तसाच होता नी आताही तसाच आहे, ती तुझी मैत्रीण आहे मला माहिती असतं तर मी काहीतरी बोलले असते,हे लग्न होऊ दिल नसतं, पण मला माहिती नव्हतं...


“ मावशी मला तिच्या बद्दल खूप वाईट वाटतंय गं, आपल्याला काही करता येईल का तिच्यासाठी?...


“ आपण काय करणार आहोत?. हे आता तिच्या आईवडिलांनी तिच्यासाठी काहीतरी करायला हवं... त्यांना सगळं माहिती आहे पण तरी ते गप्प आहेत...


“का कुणास ठाऊक पण मला आता बघवत नाही आहे...काहितरी करावंसं वाटतंय ..
“ हो बेटा,पण आपण त्याच्या भानगडीत कसे पडणार, आपण तर परक्या, दूरच्या आहोत...


“ मावशी ती माझी खूप जवळची मैत्रीण आहे ..


“ माहिती आहे बेटा, पण आपला नाईलाज आहे सगळ्या गोष्टी कायद्याने झालेल्या बरे असतात 


“मावशी जर आपण पोलिसात तक्रार केली तर....


“ निधीच तयार होणार नाही तर पोलिसात तक्रार करुन काय उपयोग निधी तयार व्हायला हवी, तिनी समरला थांबवायला हव, त्याला प्रत्युत्तर द्यायला हवी, स्वतःचा बचाव करायला हवा, ती असं काहीच करत नाही, गप गुमान सगळे ऐकत राहते आणि त्याचा मार खात राहते.....


“ चल आता तू जेवून घे आणि अभ्यासाला बस उद्या कॉलेज/आहे ना तुझं...


“ हो मावशी, सुमननी जेवण केलं, रूम मध्ये गेली पण तिच्या डोक्यात तिचेच विचार गिरक्या घालत होते, तिच्यासाठी काहीतरी करायला हवं असं तिला वाटत होतं पण एकुलती एक मुलगी काय करणार होती... विचार करता करता सुमनचा डोळा लागला आणि ती झोपी गेली....


 सकाळी उठून भरभर आटपून कॉलेजला गेली, कॉलेजच्या अभ्यासात सुमन एवढी गुंतली की आता निधीचे विचारही तिच्या मनात आले नाही...


 एक दीड महिना झाला, सुमन घरी गेली नव्हती म्हणून तिनी बाबांना घ्यायला बोलावले आणि बाबासोबत घरी गेली..

घरी सुमननी निधीबद्दल सगळं सांगितलं तिला निधी साठी काहीतरी करायचं हेही सांगितलं पण सगळ्यांनी तिला हा सल्ला दिला की त्याचा काही उपयोग होणार नाही....
 दुसऱ्या दिवशी सुमन राजला त्याच्या ऑफिस मध्ये भेटायला गेली,


“ हाय राज..


“हाय, अग किती दिवसानंतर... मावशीकडे गेली होतीस ना.. आत्ताच आलीस की काय...


“ हो रे कालच आले, बाबांना बोलावलं होत घ्यायला..
“काय ग टेन्शन मध्ये दिसतेयस...


“राज, मला तुला काही सांगायचे..


“ काय सांगायचंय...


“ तुला आठवते ना आपल्या कॉलेजमधली निधी...आपण तिच्या लग्नाला गेलो होतो...
“ हो ग, चांगलीच आठवते तिला कसं विसरणार तिच्या लग्नातच तर आपण लग्न केलं होत ना...


“मी तिच्या घरी गेले होते, मावशीच्या घराच्या बाजूला तिचं घर आहे... तिची अवस्था खूप खराब आहे रे, तिची सासू आणि तिचा नवरा तिच्याशी बरोबर नाही वागत ,  खूप वाईट अवस्था झाली आहे तिची... मला तिच्यासाठी काहीतरी करावस वाटतय... तिला  मला यातून बाहेर काढायचं ...
सांग मी काय करू? माझं मावशीशी बोलून झालं, आई-बाबांशी बोलून झालं,कुणीच काही करायला तयार नाही आहे, पण मला तिला बाहेर आणायचेय, त्या घरातून तिला बाहेर काढायचंय ,  तिच्या आई-बाबांना सगळं माहिती आहे तरी तेही काही करत नाही आहेत.. आपल्याला काही करता येईल का...परमनंट नाही पण काही दिवसासाठी करता येईल...


“ म्हणजे?...


“ म्हणजे तिच्या सासरी काहीतरी खोट सांगून आपण तिला काही दिवस आपल्याकडे आणू शकतो.. तिचं मन रमेल आणि तिला प्रसन्न वाटेल, तिथल्या तीथे त्याच वातावरणात राहून तिचं मनही खराब झाल असेल...


 “ लग्नावेळी समीर किती चांगला वाटला होता ना...पण त्यादिवशी त्यांचं बोलणं माझ्या कानावर आलं, समीर कसा वागत होता तिच्याशी, तिची काहीही चूक नसताना तीच्या चुका शोधत होता... माझ्याजवळ दोन मिनिट काय येऊन बसली सासु ओरडली,  तेव्हा तिच्या चेहर्‍यावरची भीती मला जाणवली, ती खूष नाही आहे राज... आतून तिचं दम घुटल्यासारखं होत असेल..


तिची वाईट अवस्था होण्याच्या आधी आपल्याला तिला बाहेर काढावे लागेल, नाहीतर हे लोकं तिला मारून देतील आणि कोणाला पत्ता ही  चालणार नाही...


“ सुमन शांत हो... आपण करू याचा विचार.. माझ्या मित्राचे काका वकील आहेत, मी त्यांच्याशी बोलून बघतो, पण तोपर्यंत काळजी करू नकोस ...


 इतक्या दिवसानंतर आली आहेस विचार करण्यात दिवस घालवणार आहेस कस, आनंदात राहा... राज तुझा बिजनेस कसा चाललाय?...


“ माझा मस्त....
“ तुझं कॉलेज?...
“ छान चाललंय....


“ नवीन कॉलेज, नवीन मित्र मैत्रिणी...मज्जा आहे एका मुलीची...
राज सुमानला चिडवायला लागला...


 “हो आहे पण आपल्या ग्रुप सारखा नाही आहे..


“ अच्छा तू फक्त बोलण्यासाठी बोलतेस ना , तू खुश तर आहेस ना..


“ का रे, अस का विचरतोस?..


“मावशीकडे राहतेस ना म्हणून विचारलं...


“ बरं वाटतं मला,माझा तर सगळा वेळ कॉलेज आणि अभ्यासात जातो त्यामुळे इतर गोष्टींचा विचार करायला मला वेळ नसतो..


“ मी काय म्हणतो आता पण घरी सांगायचं का?.. माझा  पण चांगला सुरू झालाय , व्यवस्थित चालतोय... तुझे शिक्षण आता पूर्ण होतंय आपण घरी बोलू आता...


“ नाही राज, काही दिवस थांबून जाऊया... आधी माझा जॉब आणि मग लग्न...


“ ठीक आहे तुला जसं वाटतं तसं...

चल बाहेर जाऊया...

क्रमशः

🎭 Series Post

View all