सुखाची ओंजळ ... भाग 5

Navryala dhamkavtes ho jar navra chukat asel tar tyala dhamkvaylach hav

आधीच्या भागात आपण पाहिले की,


 राज आणि सुमन नी लग्न केले.. त्यांनी दोघांच्याही घरी सांगितलं नव्हतं... एक दिवस ते पार्क मध्ये गेले तिथे पोलीस हवालदारानी त्यांना पकडले कसे तरी तिथून पळाले आणि सुटले..


परीक्षा जवळ येणार म्हणून सुमन अभ्यासाला लागली, तिनी राज ला पण बजावून सांगितलं होतं की चांगला अभ्यास करायचा,हलगर्जीपणा मला चालणार नाही...


आता पुढे,


राज गमतीने,..


“ नवऱ्याला धमकावतेस?...


“ हो, नवरा जर चुकत असेल तर त्याला धमकव्हायलाच हव... 


“अरे बापरे मला विचार करायला हवा,  कारण लग्नानंतर जर तू अशीच वागत राहिली तर, माझं जगणं मुश्कील होऊन जाईल...


राज हसून


“चल ठेवतो फोन...


“ अच्छा भेटू ऊद्या.. 
“ मग  बघतोच तुला...
 मिस्किलपणे दोघेही हसले ..


सुमन त्याचे स्वप्न बघत झोपली....


दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये दोघांची भेट झाली...


लेक्चर सुरू झाला आणि सगळे आपापल्या क्लासमध्ये गेले, सुमन मुलींच्या लाईन मध्ये जाऊन बसली... राज मुलांच्या साईडने जाऊन बसला.. 


 प्रोफेसर कदम आले, क्लास सुरु झाला, राजचे लक्ष सुमन कडे होते प्रोफेसर कदमच्या ते लक्षात आलं आणि त्यांनी खडूचा तुकडा राजच्या तोंडावर फेकून मारला... 


राज बिथरला,


“ राज स्टॅन्ड अप... लक्ष कुठे आहे?.. तु कॉलेजमध्ये शिकायला येतोस की मुलीकडे बघायला येतोस... कुठे लक्ष आहे तुझं,,,काय शिकवत होतो मी, राज सांग काय शिकवत होतो?..

“  राज:  सॉरी सर सॉरी..
“ नॉट सॉरी, गेट आउट ऑफ माय क्लास....

“ सॉरी सर सॉरी ,  पुन्हा नाही होणार...

“ प्लीज गेट आऊट राज..


 राज खाली मान घालून क्लास च्या बाहेर गेला..क्लास संपल्यानंतर सुमन बाहेर गेली तेव्हा राज क्लासच्या बाहेर नव्हता, थोड्या वेळाने तिला कळलं की राजला ऑफिसमध्ये बोलावले गेले, राज प्रिंसिपल्स ऑफिसमधून बाहेर आला सुमन वाट पाहत उभीच होती..


“ राज.. राज काय झालं? काय म्हणाले सर? आणि काय असा वेड्यासारखं का वागतोस?...


 कुठे लक्ष होत तुझं ?...


काय करत होतास तू?.. प्रोफेसर कदम शिकवत होते तेव्हा काय करत होतास?.. कुठे लक्ष होत तुझं?..

“ हे सगळं तुझ्यामुळे झालं...
“ मी काय केले आता?..


“मी तुझ्याच कडे बघत होते


 “राज अभ्यासाच्या वेळी अभ्यास, बाकी गोष्टी बाकीच्या वेळी, तुला कळत कसं नाही राज आता आपल्यासाठी अभ्यास महत्त्वाचा आहे, आपल्याला शिक्षण पूर्ण करून जॉब करायचा आहे ...त्यासाठी ते ध्येय समोर ठेवून तू अभ्यासाला लाग, तुला कितीदा सांगते....

“काय म्हणाले सर?..


“  उद्या बाबांना घेऊन ये म्हणाले..


“ मग आणणार आहेस राज बाबांना...


“ नाही, बाबांना तर मी आणेन पण खरे बाबा नाही येणार...


“ राज डोन्ट डू धिस ...तू हे करणार नाही आहेस, राज तुला माझी शपथ आहे, तू हे करणार नाहीयेस.... तुझी चुकी झाली आहे, बाबांच खोटं नाटकं करायची गरज नाही आहे..


“ प्रत्येक ठिकाणी तुझी फिलॉसॉफी नको लावत जाऊ...
 दोघांमध्ये थोडा वाद झाला आणि सुमन कॅन्टीन मध्ये जाऊन बसली, सुमनला एकटी बघून प्रतीक तिच्या साईडला जाऊन बसला..

“हाय सुमन...
 सुमन चेहरा बनवुन 
“हाय...
“ ऐकटीच बसलीस, राज नाही आला...
“ नाही तो क्लासमध्ये आहे..
“  तुला काही बोलायचं का माझ्याशी?.. नसेल बोलायचे ते इथून जा प्लीज ...
“अरे बापरे,, तु रागात दिसतेस काय झालं?...
“ प्रतीक कामाशी काम ठेव मला तुझ्याशी आता बोलायचं नाहीये सो प्लीज.....
“ऐक ना सुमन...
 सुमन हात जोडून त्याच्याशी बोलत होती
“ प्लीज तू जा...
 असा कसा जाऊ आज तर तू मला इथे एकटी भेटलीस प्रतीक मनातल्यामनात बोलला
 “तू काही बोललास का?...
“ तू काही ऐकलस का?...
“ नाही...
“ मी काहीच बोललो नाही...
“ प्रतीक ओवर-स्मार्ट बनू नकोस..
“ ओके ओके मी जातो,
 प्रतीक गेला...थोड्यावेळाने सुमन क्लासमध्ये गेली, सगळे क्लास संपल्यानंतर सुमन घरी जायला निघाली वाटेत तिला पुन्हा प्रतीकनी गाठलं
“ हाय सुमन... चल मी तुला सोडतो माझ्या बाईकवर....
“ नाही मी जाईल...
“ अगं असं काय करतेस, आता राज बोलला असता तर गेली असतीस ना, मग मी पण राजसारखाच आहे ना जसा राज तुझा मित्र, तसाच मी तुझा मित्र .…आता तरी माझ्या बाईक वर बसणार ना...


“  हे बघ, प्रतीक सध्या माझा मूड नाहीये तुझा जा उगाच मी काही बोलून देणार आणि तुला राग येईल...मला जाऊ दे...


 सुमन थोडा समोर गेली ,प्रतीक पुन्हा बाईक घेऊन तिच्या मागे मागे गेला तिच्यासमोर बाईक आडवी करून तिला अडवलं प्रतीक बाइकवरून उतरला...,


 त्याने सुमनचा हात पकडला तुझ्याशी तेवढा वेळ बऱ्या बोलाने प्रेमाने वागतोय तर तू जास्तच करायला लागलीस, मला नकार देते प्रतिक ला नकार देतेस... काय म्हणालीस मला बसायचं नाही आहे, तुला फक्त बाईकवर बसायला सांगतो ना त्यालाही तयार नाहीस  ...


राजच्या प्रेमात वेडी झाली , राज तुला फसवतो आणि तू फसतीयेस... तुला तुझ्या प्रेमावर खुप विश्वास आहे ना, बघू तुझं प्रेम.. तुझा विश्वास.. तुला वाचवतो का माझ्यापासून..
 बोलव.. बोलव तुझ्या राजला... प्रतीकने सुमन चा हात पकडला आणि तिला त्रास देण्याचा प्रयत्न केला.. 

“ राज प्लीज मला वाचव, राज ...


 दूर दूरपर्यंत तिथे कोणीच नव्हतं त्यामुळे कुणाला आवाज पोहोचलाच नाही.. प्रतीकने सुमनवर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला, पण पप्रतीक चा प्रयत्न फसला कारण तो काही करण्याआधीच राज तिथे पोहोचला....


 दोघांमध्ये खूप फायटिंग झाली दोघांनी एकमेकांना खूप मारले..


 राजनी प्रतीकला धमकावले “यापुढे सुमन कडे वाईट नजरेने जरी बघितलास ना तर डोळे फोडून ठेवीन मी तुझे, माझ्यापेक्षा वाईट मुलगा नाही बरा बोला ना आमच्या आयुष्यातून निघून जा नाही तर त्याचे परिणाम खूप वाईट होतील . 


 त्यावेळी प्रतीक निघून गेला पण त्याच्या मनात राज बद्दल  तिटकारा होताच.. 


 त्याच्याबद्दलच्या राग आणि तो कधी ना कधी बाहेर पडणार होता, जसा प्रतीक निघाला सुमन राजला जाऊन बिलगली आणि खूप रडली...


“ राज सॉरी ...
राज सॉरी, मी तुझ्याशी वाद घातला आणि इकडे निघून आले त्याचा फायदा प्रतिकने घेतला...  तो माझ्या मागावर होता कॅन्टीनमध्ये पण आला होता, माझ्या बाजूला बसला होता माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण मी नाही बोललो त्याच्याशी....


“ राज सॉरी यानंतर मी तुझी कधीच भांडणार नाही, मी कधी तुला काही बोलणार नाही पण प्लीज मला सोडून जाऊ नको... प्लीज राज मला कधीच सोडून जाऊ नकोस......


 राज नी तिला घरी नेऊन सोडलं, दुसऱ्या दिवशी सुमन कॉलेजला गेली नाही... राजनी सुमनला सगळीकडे शोधलं ती कुठेच दिसली नाही हे बघून त्याने सुमानला कॉल केला
“ काय ग? आज का आली नाहीस कॉलेजला?..


आज मला बरं वाटत नाही ...
“ हे काय झालं ?...मी येऊ का तुला भेटायला...

 नको नको तू येऊ नकोस उगाच घरी प्रॉब्लेम नको व्हायला.. 
“झालं काय तुला?.. 
माझं डोकं दुखत आहे, अंगात ताप फणफनत आहे....
“ दवाखान्यात गेली होतीस का?….


“ मी घरीच गोळ्या घेतल्या आहेत, आराम केला की मला बरं वाटेल तू काळजी करू नकोस ...


 तू लेक्चर अटेंड कर सगळे आणि सगळे लेक्चर कर उगाच बंक मारू नकोस.. 


“ सुमन तू नाहीयेस तर उगाच माझं  मन नाही लागणार ग...
“ आज पुन्हा बोलायला लावू नकोस मला...


“ सगळे लेक्चर कर आणि घरी परत जा...


“ ओके ओके बाबा तू चिडू नको तू आराम कर मी जमेल की संध्याकाळी येतो भेटायला काकांना काय सांगायचे ते मी सांगेन पण तू आता आराम कर ...


राजने फोन ठेवला, राजनी सगळे लेक्चर अटेंड करून संध्याकाळी सुमन ला भेटायला गेला....


दार सुमनच्या बाबानी उघडलं,
“ कोण आहेस?.. कोण पाहिजे?..
 “ मी सुमनच्या क्लास मध्ये आहे, राज... मला सुमनला भेटायचं होतं, तिला बरं नव्हतं ना ती क्लासमध्ये आली नव्हती तर मी तिला नोट्स द्यायला आलो...

 “सुमन काही बोलली नाही, तू येणार आहेस म्हणून...तिच्या तर बऱ्याच मैत्रिणी आहेत त्या आल्या असत्या...तू का आलास?..तिला भेटायला आलास?..


“ भेटायला नाही... नाही तसं काही नाही, आज तिच्या दोन मैत्रिणी कॉलेजला नाही आल्या ना मग मीच विचार केला नोट्स द्याव्या सुमनला,  परीक्षा जवळ आली आहे तिला अभ्यासाला थोडी मदत होईल...


“ अच्छा दे माझ्याजवळ आणि जा....
“ मला भेटता आलं असतं तर....
“नोट्स द्यायचे होते ना तुला, दिलेस ना तू, मग जा आता....
“ बरं जातो मी....
 राज तिथून निघाला,
 थोडा समोर येऊन त्याने सुमनला फोन केला
“ हॅलो राज बोल...
“ किती खडुस आहेत तुझे बाबा, साध आत बोलावलं नाही मला....
“ तू घरी आला होतास?...
“ हो आता तुझ्या घरातूनच निघतोय, तुला नोट्स देण्याच्या बहाण्याने आलो होतो, तुझ्या बाबांजवळ दिले, मी म्हणालो मला तुझ्याशी भेटायचं  . . पण नाही म्हणाले...
 किती खडूस आहे?...
“ राज, ते तुझे सासरे आहेत खडूस वगैरे बोलू नकोस... शोभत का तुला...
“  सॉरी सॉरी ....बरं तू आराम कर मी निघतो आता..
 राज घरी गेला ,  आणि पलंगावर लोळला तो लोळलाच राहिला,....


सुमननी खूपदा कॉल केले पण राज नी नाही उचलले ....तो झोपला होता त्याला जाग आली तेव्हा पन्नास मिस कॉल दिसले, तो ताडकन उठला आणि सुमन ला कॉल केला,


“ हॅलो सुमन... तू मला फोन केलास, माझ्या लक्षातच आलं नाही... मी झोपलो होतो सॉरी सॉरी सॉरी सॉरी सॉरी सॉरी ...

“तू कसा काय झोपू शकतो,  मला किती बोलायचे तुझ्याशी आणि तू  झोपला होतास ,आय हेट यू राज...


“ सॉरी ना .. खरच मी झोपलो होतो आणि यानंतरच नाही होणार अस, खरच प्रॉमिस 
आय लव यु सुमन...
“ आय लव यु टू.….
“ आता कशी आहे माझी बच्चा?.. ताप उतरला आहे का?..
“ हो आता ताप उतरला आहे, बरी आहे मी ,उद्या येईल कॉलेजमध्ये ..


“अगं नाही.. नाही.. काही दिवस आराम कर,आता येऊ नकोस.. आता आराम केलास तर परीक्षेच्या वेळेस प्रॉब्लेम होणार नाही, नाहीतर उगाच परीक्षेच्या वेळी ताप यायचा तुला... आता आराम कर, दोन-तीन दिवस कॉलेजमध्ये येऊ नकोस, मी नोट्स पोहचवेन तुला.. चिंता करू नकोस...


“ तसं नाही रे, घरी बसून कंटाळा आला मला, कॉलेजमध्ये येईल तर थोडं बरं वाटेल...


“ काही नाही उलट बाहेरची थंड हवा लागली की अजून ताप चढेल, तु जिद्द करू नकोस..
“प्लीज राज....
“ नाही म्हणतोय ना मी मग झालं, नाही यायचं तू दोन दिवस कॉलेजला...
“ओके, नाही येणार...
“गुड गर्ल....मी नोट्स पोहोचवून देइल ...
“ओके...
 आता यापुढे काही बोलायचं नाही आराम कर आता मी उद्या येतो घरी....

 सुमन आराम करत असताना प्रतिकचा कॉल आला..सुमन नी नाही उचलला.. प्रतीक ने पुन्हा कॉल केला तरी सुमननी नाही उचलला.. प्रतीकचा दहा ते बारा वेळा कॉल येऊन गेला मोबाईलची रिंग वाजून वाजून आता बाबांनाही कळलं..
 बाबा खोलीत आले,
“ किती वेळचा फोन वाजतोय, उचलत का नाहीयेस ...
“माझ्या क्लास च्या एका मुलाचा फोन आहे, आता मला नाही बोलायचे बाबा म्हणून मी उचलला नाही..

 “दे माझ्याकडे ,दे मी बोलतो..


“ नाही बाबा असुद्या मी सायलेंट वर करून ठेवते फोन असे म्हणून तिने फोन सायलेंटवर केला...

 क्रमश:

🎭 Series Post

View all