सुखाची ओंजळ... भाग 4

Navardev mandapat aala

सुखाची ओंजळ भाग 4


आधीच्या भागात आपण पाहिले की,


सुमनची मैत्रीण निधी चा लग्नसोहळा होता, निधी सांगून गेली होती की मंडपपासून यायचं आहे....सुमन मंडप पूजनाला गेली, तिथे मेहंदी आणि संगीत चा कार्यक्रम झाला, सगळ्यानी  खूप एन्जॉय केलं...लग्नाचा दिवस उजाडला....सुमन सकाळी तयार होऊन राजची वाट पाहत होती, थोड्याच वेळात राज आला, सुमन त्याच्या बाईक वर बसून लग्नाला गेली....

लग्नविधीला अजून वेळ होता, सुमन निधी ला भेटायला तिच्या रूम मध्ये गेली, दोघींचं बोलणं झालं सुमन तिथून निघाली आणि राज जवळ येऊन बसली....


आता पुढे,


नवरदेव मंडपात आला, नवरी पण मंडपात आली..


 लग्न विधीला सुरुवात होणार होती राज सुमनला 


“सुमन एक मिनिट....चल माझ्यासोबत मी तुला काही दाखवतो...


“ वेडा आहेस का तू?.. आता लग्न सुरू होतोय ना, आता कुठे मधातच....


 थांब जरा वेळ... चल ना प्लीज


राज तिला हॉलच्या बाहेर असलेल्या मंदिरात घेऊन गेला..

 “आपण आता इथे का आलोय?


“थांब जरा कळेल तुला.. तू बस एका ठिकाणी.. राजनी सुमनला बाकावर बसवलं आणि तिथे त्यानी काही लाकडे जमा केली ती पेटवली...


 राजने खांद्यावर दुपट्टा घेतला, सुमन च्या साडीच्या पल्लुला दुपट्टा ची गाठ बांधली..


 तिकडे निधीचे मंगलाष्टक सुरू झाले, राजने सुमन च्या गळ्यात माळ घातली आणि तिला स्वतःच्या गळ्यात माळ घालायला सांगितली.....


निधी चे सात फेरे मंत्र सुरू झाले ......


तिकडे निधीच्या लग्नाची विधी सुरू होती आणि इकडे सुमन आणि राज चे विधी सुरू होते..... 


एक एक फेर्‍या सोबत ते एकमेकांसोबत बांधले जात होते, सुमन काहीच न बोलता निशब्द त्याच्याकडे बघत होती आणि त्याच्या मागे मागे फेऱ्या करत होती... म्हणता म्हणता सातफेरे पूर्ण झाले आणि राज ने सुमनच्या भांगात कुंकू भरलं, गळ्यात मंगळसूत्र घातलं आणि क्षणातच सुमन भानावर आली....


“ राज , तू काय केलेस?.... तू हे काय केलेस राज?... आपल्या घरचे हे लग्न कधीच मान्य करणार नाही...

“ का करणार नाही,?..

“ राज तू स्वतः विचार कर आपण आता शिकतच आहेत आपल्याकडे स्वतःचा काहीच नाही.. कोणत्या गोष्टी बघून माझे आई बाबा तुझ्या हातात माझा हात देतील हा तरी विचार केलास... अरे लग्न करणे, हे सात फेरे घेणे हे तुला आता छान वाटतंय पण समोर..... समोरचा विचार केलास तू?...

 मला जर तुझ्या घरी नेलं आणि तुझ्या आई बाबांनी तुला घराच्या बाहेर काढलं तर कुठे घेऊन जाणार आहेस मला?.. काय काम करणार आहेस?.. काय खाऊ घालणार आहेस मला?... याचा कधी विचार केलाय..…

“ सुमन… सुमन.. रिलॅक्स, अगं मी तुला आत्ताच घेऊन जात नाहीये , आता आपलं फक्त लग्न झालंय, मी तुला घेऊन जात नाही आहे..  तू तुझ्या आई-बाबांसोबत राहणार आहेस...
“ही अशी....  गळ्यात मंगळसूत्र, भांगात कुंकू.. हे घेऊन जाऊ मी घरी... सांगना राज हे सगळं घेऊन जाऊ का मी घरी?... का केलेस तू..

“ तुला माझ्याशी लग्न करायचं नव्हतं का?... तुझं माझ्यावर प्रेम नाही आहे का?...

“ प्रेम आहे रे, खूप प्रेम आहे... मला लग्न तुझ्याशीच करायचं, पण ही अवस्था बघता आज ही वेळ चुकीची होती रे, आपण चुकीच्या वेळेवर चुकीचे काम केले...

“ काही चुकीचं केलेलं नाहीये , तू चिंता नको करू.... 
चल आपण लग्न एन्जॉय करू आणि घरी जाऊ... मी तुला घरी पोहोचवतो....


“ थांब राज..
“ काय झालं?..


“ मंगळसूत्र सध्याचे तुझ्याजवळ ठेव आता मी नाही नेऊ शकणार... मंगळसूत्र तुझ्या जवळ ठेव काही दिवस...
 दोघेही मंडपात जातात लग्नाचा संपूर्ण विधी झालेला असतो. सगळा कार्यक्रम करून राज सुमनला तिच्या घरी सोडतो..
 घरी गेल्या गेल्या आईचं लक्ष तिच्या भांगे कडे जात..

“ सुमन हे काय आहे?...


 “काही नाही आई... मी खाली बसुन फुल वेचत होते तर कुणाच्या तरी हाताने कुंकू खाली सांडलं...


“ अग,सांडल्यासारखं दिसत नाहीये ,तू लावल्यासारखे दिसतंय...

“ आई प्लीज... प्रश्न करू नकोस ग, आधीच मी कंटाळले आहे... जाऊदे मला रूम मध्ये.. मला आराम करायचंय आई..
“ आरु कुठे आहे?


“बाजूच्या काकूकडे गेली ती..


“ ती आली की पाठव माझ्या रूम मध्ये...
 सुमन तिच्या रूम मध्ये जाऊन लेटली, थोड्या वेळाने आरोही घरी आली..


“ दि.. सुमन दि.. आलीस का तू.. आणि हे काय पडलीस इथे?... काय गं काय झालं बरं वाटत नाहीये का?..


की राज च प्रेम उतू गेलंय त्याने तुला कंटाळा आला की थकवा आला...

“  बस इथे...मी सांगते तुला काय केले राज ने... तुला माहितीये आज राजने काय केले?...


“ काय केले?.. सांग आता एकचएक बोलतेयस...
“ त्यानी हे बघ... हे माझ्या माथ्याकडे बघ...


 आरोही किंचाळून 
“तू लग्न करून आलीस....


“ हळू... हळू बोल जरा.. आल्या आल्या आईने प्रश्न केला.. तू प्रश्नांचा भडीमार करु नकोस.. सांगते मी तुला सगळं...


 तिकडे निधीचे लग्न सुरू होते आणि राज मला मंदिरात घेऊन गेला आणि तिथे त्याने चक्क माझ्याशी लग्न केलं...मी काही बोलण्याआधी सगळं करून झालं होतं..


“मंगळसूत्र कुठे आहे?..


“ ते त्याच्याजवळ ठेवून आले...


“ दि बाबांना कळलं तर....


“आरु आता तू घाबरू नकोस ग.. मी तसही खूप टेन्शन मध्ये आहे, तू उगाच माझं टेन्शन वाढवून नको...


“ सॉरी, दि पण तुला खुश असायला हवं ना.. मग तू खुश का नाहीये....


“ अरे मला आई बाबाची खूप भीती वाटते , त्यांना कळलं तर... माझं टेन्शन अधिक  वाढत चाललय...


“ टेन्शन घेऊ नकोस गं.. त्यांना नाही कळणार....


 दुसऱ्या दिवशी सुमन कॉलेजला गेली, परीक्षा जवळ येणार होती आता सुमन अभ्यासाला लागली.. आणि तिने राज शी कॉन्टॅक्ट थोडा कमी केला, कॉलेज बंद असल्यामुळे राज अधून मधून तिला पार्कमध्ये भेटायला बोलवायचा... परीक्षेच्या आधी दोघेजण पार्कमध्ये भेटले..


“ हाय राज.. कसा आहेस?..


“ फाईन तू कशी आहेस..


“ काय म्हणतो अभ्यास...


“ माझा छान चाललाय, तू सांग.. अभ्यास करत आहेस ना..
“ कंटाळा येतो मला....


“ कंटाळा करून नोकरी मिळवणार आहेस का?.. अभ्यास करूनच काहीतरी मिळणार ना..


“ सुमन प्लीज, तू फिलॉसॉफी सुरू करू नकोस ग... आता मी इथे तुझ लेक्चर ऐकायला नाही आलो...


“ अच्छा तर मग आपण कशाला आलोय.......”सुमन मिश्किलपणे
“ चल आपण तिथे बसुया,  मी तुझ्यासाठी आइसक्रीम घेऊन येतोय, तू बस..

 राज दोघांसाठी आईस्क्रीम घेऊन आला, दोघांनीही एकमेकांना शेअर करत आईस क्रीम खाल्ली.. दोघेही एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून बसलेली, एकमेकांच्या हातात हात, एकमेकांकडे प्रेमाचा कटाक्ष टाकत होते...
“ काय झालं अशी का बघतेस...


“ काही नाही...


“ सांग ना प्लीज ...काय बघतेस अशी??..
“ तुला बघते, खूप दिवस झाले आपण भेटलो नव्हतो... आज खूप बघावं वाटतय तुला राज... आता तू लवकर लवकर काहीतरी जॉब शोध आणि स्वतःच्या पायावर उभा हो आणि मला घेऊन जा तुझ्या घरी..


“माझ्या घरी?..
“आपल्या घरी..
 मला तुझी खुप आठवण येते...


“ अच्छा आठवण येते, एक फोन तरी करतेस का तू...
“ नाही रे घरी असताना फोन करता येत नाही, सगळे असतात घरी... उगाच कुणाला कळलं तर प्रॉब्लेम व्हायचा..


“ सुमन आय लव यू...
“ आय लव यु टू राज....


 दोघांनी एकमेकांना आलिंगन केलं आणि काही क्षणासाठी हरवले... आज पावसानीही त्यांच्या प्रेमाला साक्ष दिली...

अधीर मन झाले
मधुर घन आले
धुक्यातुनी नभातले
सख्या प्रिया
सरीतुनी  सुरेल धुंद
स्वर हे आले
अधीर मन झाले
मधुर घन आले

थोड्या वेळा तिथे पोलिस हवालदार आले,
“ हे काय चालले इथे?... काय चाललंय पब्लिक प्लेस आहे समजत नाही का?... उठा उठा.


आवाजाने दोघेही भानावर आले..


“ काय नाव आहे तुझं?...
“राज...
“आणि ही कोण?...
“माझी मैत्रीण....


“मैत्रीण आहे तुझी.. मैत्रीण आहे.. चला पोलीस स्टेशनमध्ये...
“नाही साहेब , जरा समजून घ्या  मैत्रीण नाही बायको आहे माझी..


“ हो.. बायको आहे?..  मंगळसूत्र कुठे आहे.?..


“साहेब नाही घातलं आता.. पुन्हा नाही होणार चूक, माझी बायको आहे,आम्ही घरी सांगितलं नाही म्हणून इथे भेटतोय..
साहेब सोडून द्या ना... पुन्हा अशी चूक नाही होणार ..


“ते सगळ पोलीस स्टेशन मध्ये जाऊन सांगायचं...चूप चाप गाडीत बसा ..


“ मी तुम्हाला रिक्वेस्ट करतोय प्लीज आम्हाला सोडा...


“ तू रिक्वेस्ट करतोय की धमकी देतोय...


“ तुम्हाला हवं ते समजा...


“ हे बघ पोलिसांशी पंगा घ्यायचा नाही महागात पडेल...
“ साहेब मी तुम्हाला प्रेमाने सांगतोय राज शी पंगा घ्यायचा नाही तुम्हाला सुद्धा महागात पडेल...

राज पोलीस हवालदारशी बोलता बोलता त्याने सुमनचा हात घट्ट पकडला.. तिकडे बघा साहेब ती पोर...

जसा हवालदार पलटला

दोघेही जोरात धावत सुटले हवालदार मागे , राज- सुमन समोर...

खूप वेळा नंतर पोलीस हवालदार थकला आणि परत गेला..

पुष्कळ दूर धावत धावत दोघे निर्जन ठिकाणी पोहोचल्यानंतर थांबले...


 दोघांनी लांब श्वास टाकला, एकमेकांच्या चेहऱ्याकडे बघितलं आणि एकदम हसायला लागले. एका ठिकाणी सावलीत एका बाकावर जाऊन बसले... पाणी प्यायले, श्वास टाकला...
“ राज आता निघायच...


“ हो निघूया... राजने तिला घरी सोडलं आणि तो निघाला घरी आल्यानंतर 
घरी आल्यावर सुमन ने आरोहीला सगळा घडलेला प्रकार सांगितला, आरोही विचार करूनच खूप हसली...

सुमननी तर निश्चयच केला की आता राज सोबत पार्कमध्ये  जाणार नाही... सुमन कितीतरी वेळ आठवुन आठवून हसत होती... आईला तिच्या चेहर्‍यावरचं हसू दिसलं आणि आई ने विचारलं


“ काय गं एवढं मनातल्या मनात हसायला काय झालं?...


“ काही नाही ग आई ,अशीच एक गंमत आठवली म्हणून हसायला येत होतं...


 जरा आम्हालाही कळू दे गंमत, आम्ही पण हसू लागू..
“ काही नाही ग..
“चला चला जेवायला बसा मग गप्पा होत राहतील तुमच्या...
 सुमन पान घे वाढायला.. सगळ्यांनी जेवण केल आणि सगळ्या आपल्या आपल्या खोलीत झोपायला गेले..


 सुमननी राजला फोन केला,


“ हाय झोपला होतास?..
“ नाही ग आता जेवण करून गच्चीवर आलोय ...छान थंड वारा सुटला..
“ तू कुठे आहेस.?.
“ मी रूम मध्ये आहे...
“ गच्चीवर नाही गेलीस..?
“ नाही रे.. बाबा बसले आहेत, जायला निघेल आणि दहा प्रश्न करतील... नकोच ते.. असू दे..
“ ओके ओके ..


“दुपारची गंमत आरोहीला सांगितली, केवढी हसली ती आणि मलाही आठवून हसायला येत होतं.. आईने विचारलं का हसतेस
“ मग काय सांगितलं ?..


“काय सांगणार होते काहीच नाही सांगितलं ..मला खरच आताही हसायला येतय राज, ही गंमत आपण आयुष्यभर विसरू शकणार नाही.. हो ना..
“ हो..
“ अभ्यास कसा चाललाय..
“ सुरू आहे..


“ राज तुला चांगला अभ्यास करायचाय, मला अभ्यासात हलगर्जीपणा केलेला मुळीच आवडत नाही, मी कधीच माझा नंबर सोडत नाही.. चांगल्या मार्काने पास व्हावं लागेल, मला नापास झालेल चालत नाही, सो तू अभ्यासाला लाग.. रात्र जाग किंवा काही कर पण मला चांगल्या नंबरनी पास व्हायला हवं तु ...


“माझी गर्लफ्रेंड आहेस कि टीचर...


“तू विसरलास.. मी तुझी बायको आहे..


“ मग बायको, जरा बायको सारखी वाग...दोघेही हसले...


क्रमश: 

🎭 Series Post

View all