सुखाची ओंजळ..भाग 11
आधीच्या भागात आपण पाहिले की,
प्रतीक निधी कडे जाऊन समीर शी बोलला, त्याला राज आणि सुमन बद्दल सांगितलं... त्याला सुमन शी लग्न करायचे आहे हे ही सांगितल...
आणि सुमन ला मिळवण्यासाठी मी काहीही करेल असेही समीर ला सांगितल...
समीरची मदत मागीतली आणि समीरही पैशासाठी मदत करायला तयार झाला....
निधी नी सुमनला सांगितलं, दुसऱ्या दिवशी सुमननी निधीकडे येऊन तिला समीर पासून वेगळं होण्याचा सल्ला दिला, सुमन त्याच विचारात गडलेली असताना समीर आणि त्याची आई आली, समीर नी निधीचा हात मुरगळल्या मुळे तिचा हात सुजलेला होता... त्यामुळे तिनी स्वयंपाक केला नव्हता...
आता पुढे,
रूम मधून सासूबाईचा आवाज आला,
“ आज जेवायला मिळणार आहे की नाही?...
“ निधी सासूच्या रूम मध्ये गेली,
“ आज मी काहीच बनवलेलं नाहीये, माझा हात सुजला आहे मला काहीच बनवता येत नाहीये ....
“अगं, मग सांगायचं ना.…समीर रागारागात घरून निघून गेला, निधी रूम मध्ये जाऊन बसली, तिने सुमनला घडलेला सगळा प्रकार सांगितला...
“ निधी, तू स्वतःची काळजी घे.. मी येते संध्याकाळी , आपण पोलिसात तक्रार करूया...
संध्याकाळी निधी आणि सोनम पोलीस स्टेशन मध्ये गेल्या, त्यांनी पोलिसांना झालेला सगळा प्रकार सांगितला आणि पोलिसांनी निधीला मदत करण्याचं आश्वासन दिलं.. आता निधीला ही वाटू लागलं की आपण समीरच्या जाचातून सुटू शकतो, आपला त्रास कमी होऊ शकतो आणि आपली सुखाचे दिवस येऊ शकतात.
तिनी आता आपल्या मनाची तयारी केली, तिनी आई बाबांना सगळं सांगितलं पण ते या गोष्टीला तयार नव्हते..
निधीनी त्यांनाही बजावून सांगितलं की आता
“ मी समीर सोबत राहणार नाही, त्यानी मला जो त्रास दिला तेवढे पुरे झाला आता मी कुठलाही त्रास सहन करणार नाही, मी एकटी राहिल स्वतःच्या बळावर... नोकरी करेन पण त्याच्यासोबत राहणार नाही.. तिचा ठाम निर्णय बघून सुमनला आणि राज ला बरं वाटलं, पोलिसांनी समीरला चांगला चोप दिला, आधी समीरला सगळं खोटं खोटं वाटत होतं, पण आता त्याचाही विश्वास बसला की निधी काहीतरी करू शकते म्हणून तो निधी सोबत प्रेमाने वागण्याचा प्रयत्न करू लागला...
“ निधी, असं काय करतेस ग?.. मी चुकीचा वागलो, मी मान्य करतो यानंतर माझ्याकडून अशा चुका नाही होणार, मी तुला त्रास नाही देणार, निधी पण प्लीज तू मला सोडून जाऊ नकोस.. तुझ्याशिवाय आम्ही एकटे होऊन जाऊ ग , आई ला पण कोणाचा आधार आहे आणि मी कसा जगेन तुझ्याशिवाय....
“ तुम्ही मला खूप त्रास दिला आहे, आता यापुढे मी तुमचा त्रास सहन करणार नाही, आई बाबा साठी मी गप्प होते हे सगळं सहन करत राहिले पण आता नाही.. मी स्वबळावर जगेल निदान तेवढा प्रयत्न तरी करू शकते मी...पण मला तुमच्या सोबत राहायचं नाही .
दुसऱ्या दिवशी सकाळी समीर साठी कोर्टाकडून नोटीस आली, समीर बघताच क्षणी त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली, सगळं खोटं वाटत होतं रात्री तो जे काही बोलला निधीला, तो विसरला आणि पुन्हा आपल्या मूळ स्वभावात आला...
“ निधी हे काय आहे?.. तू मला नोटीस पाठवलास?..
“ मला घटस्पोट हवाय...
“ अक्ख आयुष्य पडलय तुझं,आता कुठे लग्नाला वर्षे झालेला नाही आणि तुला घटस्पोट हवाय...
“ हो मला तुमच्याकडून घटस्फोट हवा आहे, मी माझी एकटी बघू घेईल काय करायचे ते...
“ तुला माहिती आहे ना दोघांचे परवानगीशिवाय घटस्फोट मिळत नाही.. तुला माझ्यापासून घटस्फोट हवाय पण मला नको आहे त्यामुळे मी या पेपरवर साईन करणार नाही आणि माझ्या सही शिवाय तुला घटस्फोट मिळणार नाही... निधी आता तर मी तुला एवढा सहजासहजी सोडणार नाहीये, आता तू कोर्टात जा नाही तर आणखी कुठेही.. गाठ माझ्याशी आहे...
“ समीर का वागता तुम्ही असं?.. काय चुकलं हो माझं ?..काय चुकते सांगा ना कोणत्या चुका घडतात माझ्याकडून तुम्ही माझ्याशी असे वागता, सगळ्यांसाठी सगळं करते मी तरी तुम्ही माझ्या छोट्या छोट्या चुका काढून माझ्यावर ओरडत असतात... कंटाळा आलाय आता मला तुमच्या ओरडण्याचा.. तुमच्या त्रासाचा.. आता मला सुखाने जगू तरी द्या नाहीतर सुखाने मरू तरी द्या ...
निधी घराबाहेर पडली, समीर तिच्या मागे मागे गेला..निधी नी सुमन ला फोन करून बोलावलं ती समोर जाऊन एका कोपऱ्यात उभी होती समीर तिच्या मागे मागे गेला, काही दूर उभा राहून त्याने प्रतीक ला फोन केला, प्रतिक ला फोन वर त्यानी सगळा प्रकार सांगितलं, प्रतीक रागारागात आला..
“ कुठे गेली ती?..
“ तिकडे उभी आहे, सुमनला फोन केला असावा, वाट बघत आहे ती कुणाची तरी...
“ प्रतीक ही सुमन जाम राडा करतीय.. तिचा काहीतरी बंदोबस्त करायला हवा..
“ हो तिचा बंदोबस्त तर करणारच आहे मला एका संधीची ची गरज होती आत्ता ती संधी मला मिळाली, आता तर मी आज तिला सोडणार नाही असा मनात दोघे एका कोपऱ्यात उभे राहिले ...
दोघांची नजर निधीवर होती काही वेळाने तिथे सुमन आली.. दोघीही बोलत होत्या काही क्षणात तिथे प्रतीक आणि समीर पोहोचले..
“ तुम्ही?.. तुम्ही दोघे इथे?... इथे काय करताय?..
“ तुम्ही दोघी काय करताय?...
“ काही नाही मी हीला भेटायला आले होते..
“ माझ्या बायकोच्या डोक्यात घटस्फोटाचा विचार तू टाकलास ना नाही तर तिची कुवत नव्हती इथं पर्यंत जाण्याची..
“ कोणाची किती कुवत आहे हे तुम्हाला कळेलच...
“चल निधी..
“तिला कुठे घेऊन चाललीस?..
“ तुम्ही दोघेही इथे असताना मी बोलू शकत नाही..
समीरने निधीचा हात पकडला,
“ निधी तू कुठेही जायचं नाहीस...
“समीर हात सोडा माझा .. समीर हात सोडा माझा प्लीज ....
निधीच बोलणं सुरू असतानाच प्रतीकनी सुमनचा हात पकडला,
“ तू माझ्यासोबत चल..
सुमन: प्रतीक हात सोड माझा.. प्रतीक हात सोड माझा.. समीर जीजू तुम्ही निधीचा हात सोडा, आम्हाला जाऊ द्या...
“ नाही आता तर मी निधीचा हात सोडणारच नाही, आता मी तिला घरी घेऊन जाणार, तू तुझ्या वाटेने जा आम्ही आमच्या वाटेने जातो...
“ प्रतीक माझा हात सोड,... प्रतीक..
सुमननी प्रतीक वर हात उचलला, त्याच्या कानशिलात दोन लावल्या तसाच प्रतीक तडफडला आणि त्याने खिशातून काही तरी काढून सुमन च्या दिशेने फिरवली .... तसाच सुमनचा किंचाळण्याचा आवाज झाला...
क्षणात काय झालं कुणालाही कळलं नाही, समीरनी निधीचा पटकन हात सोडला आणि तो पळाला, प्रतीक सुमनकडे बघून घाबरला आणि तोही पडायला लागला..
सुमन खाली पडून विव्हळत होती...
निधी तिच्या जवळ जाऊन, सुमन..सुमन.. काय झालं ग हे..
प्लीज कोणीतरी मदत करा, हेल्प हेल्प...निधी सगळ्यांना मदत मागत होती पण कुणीच मदत करायला तयार नव्हत, सगळे गोळा होऊन फक्त बघत होते...
निधीनी ॲम्बुलन्सचा नम्बर डायल केला...
“ सुमन सुमन बोल ग काहीतरी, थांब पाणी आणते, निधीनी तिच्या चेहऱ्यावर पाणी घातलं , तशीच सुमन आणखी विव्हळली, सुमन घाबरली तिला तर सूचेना झालं, काय करू काय नाही?..
दहा मिनिटात ॲम्बुलन्स आली, तिने राजला फोन केला,आणि त्याला सगळा घडलेला प्रकार सांगितलं , राजच्या हातून फोन खाली पडला आणि तो तसाच काही सेकंद स्तब्ध उभा राहिला...
निधीनी पुन्हा फोन केला तेव्हा राज भानावर आला आणि तसाच हॉस्पिटल ला गेला...
हॉस्पिटल मध्ये सुमनच्या अंगावर थंड पाण्याच्या बादल्या ओतल्या, खूप पाणी टाकलं तिच्या अंगावर... सुमन रडत राहिली, किंचाळत राहिली...
थोड्या वेळाने तिच्या घरी फोन केला, तिच्या घरचे ही रडत रडत हॉस्पिटलला पोहोचले, ज्या रूममध्ये सुमनला ठेवले होते तिथे कोणाला जाण्याची परवानगी नव्हती..
सगळे बाहेरूनच सुमनला बघत होते, राजही तिथे जवळ जाऊन सुमन कडे बघतच राहिला, तो स्तब्ध उभा होता...निधी त्याच्या जवळ गेली त्याच्या खांद्यावर हात ठेवला
“राज...
“ निधी कस झालं हे सगळं?... कोणी केलं?..
“ प्रतीकनी...
सॉरी राज हे सगळं माझ्यामुळे झालं, तुम्ही दोघे माझी मदत करायला गेलात आणि समीर आणि प्रतीक दोघांनी मिळून हे सगळं केलं..
मी माफीच्या लायकीची नाही आहे रे मला माफ कर, निधी त्याच्यासमोर उभी होऊन रडत होती...
“ तुझी काहीच चुकी नाही, चूक आमची आहे ,आमच्या प्रेमाची आहे, आम्ही एकमेकांवर प्रेम केलं हे आमचं चुकलं...
“ नाही राज असं बोलू नकोस , सुमन स्वतःपेक्षा जीवापाड प्रेम तुझ्यावर करते, तू आता तिला सोडून जाऊ नकोस राज, एकटी पडेल ती... तिला आता सगळ्यात जास्त तुझी गरज आहे.... तिची साथ कधी सोडू नको राज...
राज काही न बोलता निघून गेला,
आरोही आणि तिचे आई बाबा हादरून गेले, आरोहीनी टाहो फोडला
दि...दि करत दरवाजा जवळ उभी होती, आपल्या बहिणीला विव्हळताना बघत होती, निधी तिच्याजवळ गेली,
“ आरोही शांत हो.. शांत हो...
“ निधी कसं झालं हे सगळं, सगळं चांगलं व्यवस्थित सुरु होत आणि हे काय झालं?...
राज कुठे आहे?.. तो आला होताना?...
“ त्यानी बघितलं आणि तो गेला...
“ गेला... असा कसा गेला?... त्याला आता दि जवळ राहायला हव.. असा कसा गेला तो... सुमनदि ला त्याची गरज आहे, आणि तो गेला.. कुठे गेला?. तुझ्याकडे नंबर आहे ना, फोन लाव त्याला...
निधीनी फोन केला पण राजनी फोन उचलला नाही, निधीनी खूपदा प्रयत्न केला पण राजनी नाही उचलला...
“ तो फोन उचलत नाहीये गं,
आरोही स्तब्ध होऊन खुर्चीवर बसली,
“ राज तिला सोडून गेला.. राज दि ला सोडून गेला.. असं म्हणत तिने हंबरडा फोडला.. दि ला जेव्हा हे कळेल की तो तिला सोडून गेला तिला किती दुःख होईल, ती त्याच्याशिवाय नाही जगू शकणार...
सुमनची ट्रीटमेंट सुरू झाली, निधी पोलीस स्टेशनला गेली..
“ साहेब मला तक्रार नोंदवायची आहे...
“कोणा विरोधात?..
“ समीर. माझा नवरा समीर गायकवाड याच्या विरोधात..
“ काय तुमचा प्रॉब्लेम ?..
“तो मला मारहाण करतो, घरी दारू पिऊन येतो आणि मला मारतो..
आणि मला अजून एका विरोधात तक्रार नोंदवायची आहे , प्रतीक इनामदार.. यानी आज भर चौकात माझ्या मैत्रिणीच्या चेहऱ्यावर ऍसिड हल्ला केलाय,, याची एकमेव साक्षीदार मी आहे... मी निधी गायकवाड.. समीर गायकवाड ची पत्नी...
“तिथे तक्रार नोंदवा आणि निघा..
“साहेब काहीतरी करा हो...
“हे बघा, आम्हाला असच कोणालाही अटक करता येत नाही, आधी आम्ही त्याची तपासणी करू आणि मग काय तर विचार करू...
“ अहो साहेब , मी साक्षीदार आहे.. त्यानी माझ्यासमोर माझ्या मैत्रीणीच्या तोंडावर ऍसिड टाकला आहे आणि तुम्ही वाट काय बघता, आत्ताच्या आत्ता त्याला पकडा साहेब...
माझी मैत्रीण तिथे मृत्यूशी झुंज देत आहे आणि मी वाट बघत बसू..मी हात जोडून विनंती करते, काहीतरी ॲक्शन घ्या साहेब..
निधी पोलीसस्टेशन मधून निघाली , रस्त्यात तिला समीरने गाठलं,
“ पोलीस स्टेशनला गेली होतीस तू?.. माझ्या विरोधात तक्रार केली?..
“ हो केली , तुझ्या विरोधात तक्रार करून आले मी आणि प्रतीक विरोधात सुद्धा..
समीरने तिचा हात पकडून तिचा हात मुरगळला
तितक्यात पोलीस आले.....
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा