सुखाचा मूलमंत्र

Definition of Happiness

स्वप्नं माझं सत्यात अवतरलं, 
आणि काय सांगू? 
सुख दारात हात जोडून उभं राहिलं.

मी त्याला विचारलं, 
कुठे होतास एवढी वर्ष?
ते म्हणालं मला,
इथेच होतो मी, पण तुला नाही जाणवला माझा स्पर्श.

मी म्हणाले त्याला,
बरं! आता तू असाच इथेच राहा,
ते म्हणालं मला, 
नाही अन्यथा तुला नाही कळणार माझा अर्थ.

ऐकून हे त्याचे बोल,
हास्य वदनी झळकले,
हास्य पाहून माझे,
समाधान त्वरित अवतरले.

पाहून समाधाना, सुख म्हणे मला,
तुजकडे तर आहे माझा जुना मित्र,
समाधानच तर आहे खर्‍या सुखाचा मूलमंत्र.

- आरती शिरोडकर