सुख..

सुख म्हणजे नक्की काय हे माझ्या एका कवितेच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न


विषय - सुखाची खरी परिभाषा
फेरी - राज्यस्तरीय काव्य स्पर्धा 
कवितेचे नाव - सुख


सुखाची परिभाषा करणे
असतेच जरा अवघड...
सुख आपल्याच कवेत असूनही
ते शोधण्याची किती धडपड...

जो तो फक्त इतरांनाच
सुखी आहे म्हणतो...
स्वतःला कायम मात्र
दुःखी, कष्टी जाणतो...

सारेच नश्वर असते इथे
मग घोर चिंता कशाची?
किती गमवले किती मिळविले
आहे हौस ही बिनकामाची...

माणसाच्या अपेक्षा वाढताच
सुख पळवाट शोधते...
जे जवळ आहे त्याचे
समाधान कुणासही नसते...

सुख सर्वत्रच आहे सारखे फक्त
बघण्याचा दृष्टिकोन नवा असावा...
लहान सहान गोष्टींसाठी मनात
तेवढा संयम मात्र बाळगावा...

जे लाभले ते स्वीकारले
की सुख आपोआपच मिळते...
दुःखाची पायवाट धूसर होऊन
सुख आपसूकच दार ठोठावते...

सुखाची खरी परिभाषा
कोणालाही उमगली नाही...
मानलं तर असंख्य सुख
अन्यथा हर्षाचे टिपूसही नाही...

©®
नेहा खेडकर 
टीम नागपूर.