सुख म्हणजे नक्की काय असतं?

सुखाची परिभाषा सांगणारी माझी ही सुंदरशी कविता


ईरा राज्यस्तरीय स्पर्धा

फेरी-कविता फेरी

विषय-सुखाची परिभाषा
कवितेचे शीर्षक-सुख म्हणजे नक्की काय असतं?
जिल्हा-पुणे

***************************************************


सुखाची परिभाषा वेगवेगळी प्रत्येकाची
सुख म्हणजे जणू अनुभूती पुण्याची

खरे सुख स्वतःमध्ये दडलेले असते
मन मात्र भौतिक सुखाकडे धाव घेते

आईच्या हातचं जेवण्यात सुख अनुभवावे
दिवसभर दमल्यावर आईच्या कुशीत निजावे

निसर्गाचा सृजनाचा सोहळा पाहण्यात असतं सुख
मुलांना नि कलाकृती घडताना अनुभवण्यात सुख

सुखाच्या लाटा दुःखाच्या हिंदोळ्यावर तरंगतात
जीवन पटावर सुख दुःखाचा मेळ जुळवतात

सुख असतं आपल्या जवळची माणसं जपण्यात
सुख एकमेकांच्या पाठीशी खंबीर उभं राहण्यात

जीवनाचा आस्वाद घेत मनाचं तारुण्य जपावे
खरे सुख प्रत्येक क्षण समाधानाने जगण्यात अनुभवावे

©®सुप्रिया शिंदे महादेवकर