सुख आपल्या अंतर्मनी

Gavsale na saukhya ithe Hari shodhile nandanvani Bhandar sukhache aahe dadle aapulyach antarmani

राज्यस्तरीय साहित्य करंडक

फेरी - कविता

विषय -सुखाची परिभाषा

शीर्षक  -सुख आपल्या अंतर्मनी

टीम - भंडारा



सुखावते कित्येकांसी त्यांचे भरले गोकुळ

लेक जाता दूरदेशी मन होतसे व्याकुळ



रिद्धी सिद्धीच्या दरबारी लाभे सुख रे कुणास

मदिरा अन् मदिराक्षीचा इथे असे कुणी दास



वेचती कवडसे सुखाचे जरी झोपडी चंद्रमौळी

कुबेरासही भासते इथे रितीच त्याची झोळी



मग्न होऊनी स्वतःत कुणी लुटतो स्वानंद

जोपासण्या सौख्य कुणी जपताती नाना छंद



पाहुनी दुःखात परांस कुणा सुखही बोचते

उद्धारातच दीनांच्या कुणी आयुष्य  वेचते



एकाचा आनंद होई दुसऱ्यास दुःखकारण

होते अवघड समजण्या सुखाचे समीकरण



फुल सौख्याचे वेचण्याची असे प्रत्येकास आशा 

परी बदले व्यक्तिगणिक इथे सुखाची परिभाषा



गवसले ना सौख्य इथे जरी शोधिले नंदनवनी

भंडार सुखाचे आहे दडले आपुल्याच अंतर्मनी



©® मुक्ता बोरकर - आगाशे

        मुक्तमैफल