Mar 02, 2024
राज्यस्तरीय करंडक कविता

मार्ग यशाचा

Read Later
मार्ग यशाचा
कवितेचं नाव - सुखाची परिभाषा
विषय - सुखाची परिभाषा
स्पर्धा - राज्यस्तरीय करंडक कविता स्पर्धा


सुखाची परीभाषा
*〰️〰️〰️〰️〰️〰️〰️*
आहे प्रत्येकाची वेगळी
इथे सुखाची परीभाषा
मोहवी मनाला नेहमी
जगण्याची नवी आशा

करावा लागतोच सर्वांना
संघर्ष जीवनाच्या वाटेवर
सापडताच मार्ग यशाचा
आनंद मिळतो ढिगभर

अथक परिश्रमांनंतर जेव्हा
पडते गाठ हाता - तोंडाची
चव असते खूप न्यारी तेव्हा
त्या भाकरीच्या गोल चंद्राची

दोन घास सुखाचे मिळावेत
यासाठीच धडपड जीवांची
सुखावतात मनाला नेहमी
नेत्रांमधली स्वप्नं भविष्याची

स्वप्नपुर्ती नित्य देते मनाला
भरपूर शांती अन् समाधान
लाभो देवा सर्व प्राणीमात्रांना
अनमोल असं सुखाचं वरदान
*〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️*
©️®️
✒️ सिद्धार्थ सुर्वे( सिद )
जिल्हा - सातारा , सांगली
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Siddharth Surve

Freelancing

History Lover ☺️

//