सुगरण

.सासुबाई आठ दहा दिवसा करता लेकीकडे गेल्या .त्यामुळे" रानी हूं में घर की"असे फिलिंग मीनूला जाणवत होते.?सासुबाई. तशा प्रेमळ ,सर्व नीट नेटक संभाळत . मीनूला फारसा कामाचा सोस नव्हता, आणि सासू बाईं चा फोर्स ही नव्हता.पण---आपले पाक कौशल्य दाखवून मंदारला इम्प्रेस करायचा आयता चान्स मिळाला असा वाया कसा घालवायचा?? हम भी कुछ कम नही ?!टोपलीत दोन तीन केळी पाहून तिला सासुबाई नी केलेले केळ्याचे थालीपीठ आठवले. पणsssथालीपीठ??? जरा बॅकवर्ड ,जुनी रेसिपी?? आणि मिनू मॅडम " नयेजमाने की नारी हूं मै ."?त्यामुळे बनाना पॅन केक विथ हनी टॉपिंग असे हाय फाय नांव,? डोक्यात ठेवून किचन कडे मोर्चा वळवला-----------------------------------------


सुगरण?

मी --सुगरण सुगरणs करते ssसंसार सुखाचा, मीनू राणी आपल्या भरदार आवाजात गाणे,? गात गात--किचन मध्ये काम करत होती.
आज काहीतरी मस्त करून नवरा आणि मुलीला इम्प्रेस करावे ?
.
सासुबाई आठ दहा दिवसा करता लेकीकडे गेल्या .त्यामुळे" रानी हूं में घर की"असे फिलिंग मीनूला जाणवत होते.?
सासुबाई. तशा प्रेमळ ,सर्व नीट नेटक संभाळत .
मीनूला फारसा कामाचा सोस नव्हता, आणि सासू बाईं चा फोर्स ही नव्हता.
पण---आपले पाक कौशल्य दाखवून मंदारला इम्प्रेस करायचा आयता चान्स मिळाला असा वाया कसा घालवायचा??
हम भी कुछ कम नही ?!टोपलीत दोन तीन केळी पाहून तिला सासुबाई नी केलेले केळ्याचे थालीपीठ आठवले.
पणsssथालीपीठ??? जरा बॅकवर्ड ,जुनी रेसिपी?? आणि मिनू मॅडम " नयेजमाने की नारी हूं मै ."?
त्यामुळे बनाना पॅन केक विथ हनी टॉपिंग असे हाय फाय नांव,? डोक्यात ठेवून किचन कडे मोर्चा वळवला.
एरवी तिने ती केळी जुनी झाली म्हणून ढुंकूनही पाहिलं नसतं. पण-- मी सुगरण ,सुगरणीचा वसा घेतला.? मग मी पहा काsssही वाया जाऊ देत नाही हेही दाखवायचे होते.
यूट्यूब वाल्या सुगरणी ला फॉलो करत त्याप्रमाणे केकचे बॅटर तयार झाले पण हाय रे देवा नेमका वीज गेली.
त्यामुळे तव्यावरच घातला व मंद गॅसवर ठेवून सखी ला फोन लावला
काय मीनू कसे काय ?? लव बर्ड दोघंच आता मग काय?? वगैरे वगैरे करत करत वीस-पंचवीस मिनिटे झाली आज स्पेशल काय वगैरे बोलत असताना आतून कसला वास येतो असे वाटले.
अरे देवाss करत किचनमध्ये धावली.
केक चा?खमंग की जळल्याचा वास म्हणून झाकण उघडले. केक जवळ जवळ जळण्याच्या मार्गाला लागला होता.?
उलथण्याने खरवडून पलटताना मास्टर शेफप्रमाणे उडवावा असे मीनूच्या डोक्यात आले. त्याप्रमाणे केक उडवला पण हाय रे किस्मत तो धप्पकनखाली ओट्यावरच आदळला.
केक ते दोन तुकडे, ?अरे,sss देवा हे काय,,फुगला ही नाही?? सोडा कमी पडला वाटतं! डोळ्यासमोर यूट्यूब वाला केक नाचू लागला तेवढ्यात मंदार व नताशा मीनू ची लेक, दोघेही हजर.
"काहीतरी खायला दे."
मीनू न त्या केकचे दोन हार्ट शेप चे तुकडे कापून ."घ्या हार्ट शेप❤️ केक विथ बनाना स्लाईस असे मोठ्ठै नांव देत खायला दिले.
मंदार चे सगळे लक्ष मॅच मध्ये पण लेकीने तरी वाव,माम असे म्हणावे या आशेने पाहिले.
""हे काय आहे मम्मा,"?? वाकडे तिकडे तोंड करत. लेकीने बॉम्ब टाकला.?

"अगं केक, बनाना केक विथ हनी."

"बनाना कमी आणि आटा जास्त लागतोय केक कुठे आहे ही"???
सासूबाईंची नातशोभते होsss महा चिकित्सक. त्यांचा गूण नाही पण वाण लागला. उतरले हो गुण आजीचे .?
हा प्रयोग तर फसला.मनातल्या मनात चरफडत.
आता उद्या गिनी डोसा
करेन हं,?
नकोsss मंदार व नताशा ने संयुक्त आवाजात निषेध व्यक्त केला .?
मिनू चा पडलेला चेहरा पाहून मंदारला तिची कींव आली
"मिनू राणी किती काम करशील ?? उद्यासुट्टी आपण मस्त आऊटिंगला जाऊ तिथेच डोसा खाऊ".हं. असे म्हणत मंदार ने केकचा जळका तुकडा मिनूला भरवला.
-----------------------------------------