सुधा मुर्ती यांची मराठीतील पुस्तके(Sudha Murthy Books In Marathi)

This Blog Is About Sudha Murthys Books Translated In Marathi

सुधा मूर्ती या खूप प्रभावशाली लेखिका आहेत आणि सुधा मूर्ती यांनी त्यांच्या जीवनातील अनुभव पुस्तकांच्या (Sudha Murthy Books) माध्यमातून मांडले आहेत. सामान्य माणसाच्या व्यथा मांडणाऱ्या आठ कादंबऱ्याही त्यांनी लिहिल्या आहेत. या सर्व कादंबऱ्यांमध्ये स्त्री पात्रे अतिशय कणखर आणि तत्त्वांवर ठाम असल्याचे दाखवले आहे. याशिवाय त्यांनी तांत्रिक पुस्तके, प्रवास, लघुकथांचे संग्रह आणि नॉन-फिक्शन तुकडे, तसेच लहान मुलांसाठी इंग्रजी आणि कन्नडमध्ये पुस्तकेही लिहिली आहेत.


सुधा मूर्ती यांची पुस्तके सर्व प्रमुख भारतीय भाषांमध्ये अनुवादित झाली आहेत. सुधा मूर्ती यांना २०११ मध्ये कर्नाटक सरकारने कन्नड साहित्यातील उत्कृष्टतेसाठी अतिमाबे पुरस्काराव्यतिरिक्त २००६ मध्ये साहित्यासाठी नारायण पुरस्कार आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे. सुधा मूर्ती यांनी लिहिलेल्या काही पुस्तकांबद्दल जाणून घेऊया जे तुम्हाला आयुष्यामध्ये प्रेरणा देण्यास मदत करतील.



Sudha Murthy Book list in Marathi
1.अस्तित्व

2.Wise and Otherwise

3.आयुष्याच्या धडे गिरवताना

4.3000 टाके

5.डॉलर बहु

6.महाश्वेता

7. आजीच्या पोथडीतल्या गोष्टी (Grandma Bag of Stories)


8.ओल्ड मॅन अँड हिज गॉड: डिस्कव्हरिंग द स्पिरिट ऑफ इंडिया


9.. जेंटली फॉल्स द बकुला बाई


10. हाऊ आय टॉट माय ग्रॅंडमदर टू रिड अॅण्ड अदर स्टोरीज


11.द डे आय स्टॉप्ड ड्रिंकिंग मिल्क

12. हाऊस ऑफ कार्ड्स



1. अस्तित्व (Astitva Book in Marathi PDF)

सुधा मूर्ती यांची ही मराठी भाषेतील पहिली कादंबरी आहे, ही कादंबरी मूळची कन्नड मध्ये तुमुला या नावाने प्रसिद्ध आहे. ए आर यादी द्वारे मराठी मध्ये अनुवादित केलेले हे कादंबरी आहे. हे कादंबरीतील मुख्य व्यक्ती मुकेश राव (मुकेश) च्या नावाच्या एका तरुणाचे स्वतःचे अस्तित्व शोधण्याचा धडपड शब्दात व्यक्त करणारी उत्कंठवर्धक कादंबरी.

मुकेशच्या आयुष्य सुखासमाधान नांदत होते, परदेशात आपल्या परिवारासह राहत होता. वडिलांना हृदयविकाराचा झटका आल्याने तो देशात परतला त्यातच त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. वडिलांच्या मृत्यूने तो खूप दुःखी होता. वडिलांच्या मृत्यूनंतर संपत्तीची वाटप कसे होईल हे मृत्युपत्रात नमूद केले होतेच, पण त्याच्या बहिणीच्या नवऱ्याला पैशाचा मोह होता, त्याने एक रहस्य उलगडून टाकतो व मुकेशच्या आयुष्यात वादळ येता, असलेल्या कौटुंबिक बंधन तुटून जातो.त्यातील खरे रहस्य म्हणजे मुकेश हा त्यांच्या वडिलांचा खरं मुलगा नसतो तर तो मानलेला असतो, यातूनच खरे मुख्य अस्तित्वाची परीक्षा सुरू होते तर मग मानणाऱ्या नावापेकषा रक्तातील नाते श्रेष्ठ, हेह्या असे अनेक प्रश्नांचा शोध घेता घेता

अनेक प्रश्नांचा शोध त्याच्या अस्तित्वाचा शोध सुरू होतो. ते तुम्ही नक्की वाचा. खूप मोठे देखील पुस्तक नाही आहे जेमतेम 105 पानांचे पुस्तक आहे. तुम्ही एकदा तरी हे वाचलेच पाहिजे.


2.Wise And Otherwise Book in Marathi PDF

या पुस्तकाचा मराठी अनुवाद लिना सोहनी यांनी केला आहे. मेहता पब्लिकेशन हाऊसने तेे प्रकाशित केले आहे.


सुधा मूर्ती या लेखिका सामाजिक क्षेत्रात खूप सक्रिय आहेत. सामाजिक क्षेत्रात त्यांनी स्वतःला वाहून घेतले आहे.

त्यांना त्यांच्या आयुष्यात शिकलेले व्यक्ती पेक्षा न शिकलेल्या व्यक्तींकडून आयुष्यात खूप काही शिकू शकतो असे सुद्धा मूर्ती यांना वाटते. सुधा मूर्ती या सामाजिक कार्यात सक्रिय असताना विविध लोकांमधील व मागास लोकांना भेटल्या त्यातील अनेक अनुभव सुखकारक व दुःखदायक आहेत. या सर्व अनुभवातून त्यांनी या पुस्तकाचे निर्मिती झाली आहे.

हे सुधा मूर्ती यांचे सर्वाधिक वाचलेले पुस्तक आहे. वास्तविक जीवनातील घटनांमधील पन्नास विजेट्सचा संग्रह असलेले हे नॉन-फिक्शन पुस्तक आहे. सुधा मूर्ती यांनी या पुस्तकात देशभरातील लोकांबद्दल काही मार्मिक आणि डोळे उघडणाऱ्या कथा कथन केल्या आहेत.यासोबतच पुस्तकात उदारतेच्या अविश्वसनीय उदाहरणांचाही उल्लेख आहे.

त्यामुळे संपूर्ण पुस्तक वाचताना आपण तेथेच आहोत. असे आपल्याला भास होते. या पुस्तकातील बरेच प्रसंग मन हेलावून टाकणाऱ्या आहेत. या पुस्तकांमधील आपल्याला भारतातील मागास भागातील लोकांच्या समस्या समजण्यास थोडेफार मदत होईल

हे पुस्तक २०२२ मध्ये प्रकाशित झाले होते. सुधा मूर्ती यांच्या Wise and OtherWise या पुस्तकाच्या इंग्रजीमध्ये ३० हजार प्रती विकल्या गेल्या आहेत आणि सर्व प्रमुख भारतीय भाषांमध्ये अनुवादित केले गेले आहे.


वरील पुस्तक हवे असल्यास ऑनलाईन खरेदी करु शकता.


3. आयुष्याच्या धडे गिरवताना (Ayushyache Dhade Giravtana Book in Marathi PDF)

मूर्ती यांच्या संकल्पनेतून अवतरलेले हे 156 पानांचे पुस्तक मेहता पब्लिकेशन प्रकाशित केलेले आहे. या पुस्तकात सुधा मूर्ती यांच्या लघुकथाचा हा अनुवाद आहे. यातील पहिलीच कविता प्रेक्षकांची ठाव घेणारी कविता आहे. सुधा मूर्ती यांनी विविध क्षेत्रातील उत्तीर्ण/प्रसिद्ध त्या सर्व अनुभवांचा कथा स्वरूपात मांडलेले हे पुस्तक.

मूल्यावर असणारी श्रद्धा आणि तसेच माणुसकी या सर्व बाबी या कथाचा पाया आहेत. यातील कविता सुधा मूर्तींच्या आहेत तसेच ते आपल्या व तुमच्या आयुष्यातील आहेत असेच वाटते. सहज सोप्या कथन शैलीत उलगडात जाणारा कथा तुम्ही नक्की वाचलेच पाहिजे.



4. 3000 टाके


या पुस्तकात सुद्धा ११ खऱ्या गोष्टी आहेत. ज्या सुधा मूर्ती ह्यांनी इन्फोसिस मध्ये काम करताना अनुभवल्या आहेत.

कर्नाटकातल्या ३००० देवदासींचं पुनर्वसन, मुलांच्या एंजिनियरिंग कॉलेज मध्ये शिक्षण घेणाऱ्या एकट्या मुलीच्या दृष्टीने आलेले अनुभव, फिल्म इंडस्ट्री अशा वेगवेगळ्या विषयांवरच्या शॉर्ट स्टोरीज यात तुम्हाला वाचायला मिळतील!

5. डॉलर बहु(Dollar Bahu book in Marathi PDF)
डॉलर बहु हे पुस्तक सुधा मूर्ती यांचे हे पुस्तक देखील खूप प्रसिद्ध आहे. या पुस्तकातील गोष्टीची सुरुवात चंद्रकुमारया व्यक्तिरेखा बद्दल आहे, या पुस्तकांमध्ये चंद्र आणि विनिता यांच्या प्रेमाची कहाणी आहे. एक विलक्षण पुस्तक आहे. चंद्र च्या संपूर्ण जीवनातील जडणघडण या पुस्तकातून पहावयास मिळते.

पैशांमुळे माणूस एकमेकांपासून कसा दुरावतो, नात्यांमध्ये कशी कटुता येते, कुटुंब कशी तुटतात हे तुम्हाला डॉलर बहू ह्या पुस्तकाच्या कथेत अनुभवायला मिळेल.

प्रेम आणि विश्वास यांच्या जोरावरच नाती टिकतात हेच ह्या पुस्तकातून सांगायचं प्रयत्न सुधा मूर्ती ह्यांनी केला आहे!

"डॉलर बहू" या कथेत विनिता एका बँक क्लार्क गिरीशशी लग्न करते आणि कुटुंबासह बंगलोरला राहते. पती, सासरे आणि सासू गोरम्मा यांची काळजी घेत ती तिच्या नवीन कुटुंबाशी चांगली जुळवून घेते, पण विनिताची तुलना नंतर तिच्या पतीच्या मोठ्या भावाची पत्नी 'डॉलर बहू'शी केली जाते. त्यानंतर हळूहळू ती आजारी पडू लागते. यानंतर गोरम्मा अमेरिकेत राहणाऱ्या तिच्या मुलाकडे आणि सुनेकडे जाण्याचा निर्णय घेते. भारतीय मध्यमवर्गीय जीवनावर नियंत्रण ठेवणार्‍या कठोर नियमांपासून दूर राहून स्वतंत्र जगणे कसे असू शकते हे ती पाहते, परंतु तिला हे देखील समजू लागते की केवळ डॉलर्सने भारतातील तिचे प्रेम आणि आदर विकत घेऊ शकत नाहीत. हे नाते प्रेम आणि विश्वासाने कसे जिंकता येते, याचे कथेत खूप छान वर्णन केले आहे.



या पुस्तकातून डॉलर हरतो की रुपये जिंकतो असे सगळ्यात शेवटी निदर्शनास येते. हे पुस्तक आंतरराष्ट्रीय स्तरावर हे गाजलेले आहे.


6. महाश्वेता

सुधा मूर्ती यांचे महाश्वेता हे पुस्तक त्यांच्या आवडत्या पुस्तकांपैकी एक आहे. हे पुस्तक भ्रम आणि विश्वासघाताने ग्रासलेल्या जगात धैर्य आणि लवचिकतेची प्रेरणादायी कथा आहे.

महाश्वेता या पुस्तकात अनुपमा नावाच्या मुलीची कथा सांगितली आहे. अनुपमाला ल्युकोडर्मा आजार झाल्याचे कळते आणि तिचे लग्न होते. या कथेत अनुपमा ही एक विवाहित स्त्री आहे. जिला पतीने दूर केले असून सामाजिक कलंक मिटविण्यासाठी ती मुंबईला येते.

जेंव्हा मुंबईत येते तेंव्हा तिला मिळालेल्या यशामुळे ती सन्मानाने ताठ मानेने जगायला शिकते! येथे तिला नवीन जिवनासोबत यश, सन्मान मिळतो.


हे पुस्तक सुधा मूर्ती ह्यांचे सुद्धा अत्यंत आवडते पुस्तक आहे. कौटुंबिक कथानक जरी असलं तरी त्यातून बरंच शिकण्यासारखं सुद्धा आहे.



7. आजीच्या पोथडीतल्या गोष्टी (Grandma Bag of Stories Book in Marathi)

पुस्तकांच्या नावावरूनच तुम्हाला लक्षात येईल की, हे पुस्तक कशावर असणार आहे. आजी आपल्या नातवांना गोष्टी सांगत आहे. यातील गोष्टी खरे आहेत की खोटे हा भाग वेगळा.

पण या पुस्तकातील गोष्टी खूप खास आहेत.


पुस्तकाचे सुरुवात होते ते उन्हाळ्याच्या सुट्टीपासून ज्यामध्ये चार मुले आपल्या आजोबाच्या घरी जाण्यासाठी खूप उत्साहात असतात, हे पुस्तक आजी आजोबा आपल्या नातवांसोबत घालवलेल्या वेळेचा एक प्रकारे संदर्भसह स्पष्ट करतो.

सुधा मूर्ती यांचे हे पुस्तक आजी-आजोबांच्या कथांमधून गूढ पात्रांच्या आणि प्राण्यांच्या आठवणी जागविते. आदी, कृष्णा, रघू आणि मीना त्यांच्या आजी आणि आजोबाच्या शिगगावातील घरी पोहोचल्याने कथेची सुरुवात होते.


आजी प्रत्येक दिवशी लहान मुलांनाएक नवीन गोष्ट सांगत असते व प्रत्येक गोष्टी मधून मुलांमध्ये नैतिक मुल्यांची जाण निर्माण करण्याचा प्रयत्न ती करत असते. या पुस्तकात एकूण 22 गोष्टी सांगितल्या गेलेल्या आहेत. तर हे पुस्तक तुम्ही नक्की वाचावे.


8. ओल्ड मॅन अँड हिज गॉड: डिस्कव्हरिंग द स्पिरिट ऑफ इंडिया

सुधा मूर्ती यांचे हे पुस्तक त्सुनामीसारख्या नैसर्गिक आपत्तीच्या काळात लोकांच्या उदारतेच्या आणि स्वार्थाच्या कथा कथन करते.ज्यामध्ये महिला जगासमोर बोलण्यासाठी खूप धडपडत आहेत आणि ज्या त्यांचे ऐकत नाहीत, यासोबत तरुण व्यावसायिकांच्या कहाण्या आहेत. सुधा मूर्ती यांचे हे पुस्तक खूप लोकप्रिय आहे.


9. जेंटली फॉल्स द बकुला बाई

हे लोकप्रिय पुस्तकांपैकी एक आहे. हे पुस्तक दोन विरोधी समुदायांशी संबंधित आहे आणि श्रीकांत आणि श्रीमती यांच्या लग्नाची कथा आहे. जी महत्वाकांक्षा आणि स्वार्थाच्या रूपात आपला मार्ग गमावते. सुधा मूर्ती यांनी लिहिलेली ही त्यांची पहिली कादंबरी आहे जी आधुनिक मूल्ये आणि कार्य नैतिकतेच्या तपासणीशी ध
संबंधित आहे.

10. हाऊ आय टॉट माय ग्रॅंडमदर टू रिड अॅण्ड अदर स्टोरीज

या पुस्तकात आजीला कसे वाचायला शिकवले, इतर कथा कशा शिकवल्या याचा त्यात उल्लेख आहे. हे पुस्तक २५ अर्ध-आत्मचरित्रात्मक लघुकथांचा संग्रह आहे. या पुस्तकातील सर्व कथा अतिशय साध्या आणि हृदयस्पर्शी आहेत.
या पुस्तकातील सर्व कथा वाचकांना प्रेरणा देतात. अतिशय आवडलेल्या या पुस्तकात लेखकाने कथा सोप्या आणि मनोरंजक पद्धतीने मांडल्या आहेत.

11.द डे आय स्टॉप्ड ड्रिंकिंग मिल्क

द डे आय स्टॉप्ड ड्रिंकिंग मिल्क हा सुधा मूर्ती यांच्या अनुभवांचा संग्रह आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भारतातील रस्त्यांचा शोध घेताना लिहिलेले हे पुस्तक आहे. या पुस्तकात सुधा मूर्ती यांनी भारतातील स्त्री-पुरुषांच्या दैनंदिन जीवनावर लघुकथा लिहिल्या आहेत.


12. हाऊस ऑफ कार्ड्स

हाऊस ऑफ कार्ड्स हे सुधा मूर्ती यांनी लिहिलेल्या आवडत्या पुस्तकांपैकी एक आहे. ग्रामीण जीवनातील साधेपणा आणि शहरी जीवनातील गुंतागुंत यांच्यातील संघर्षाचे वर्णन पुस्तकात आहे. या पुस्तकात मृदुला नावाच्या एका पात्राची कथा सांगितली आहे जी एका साध्या उत्साही खेड्यातील मुलीच्या भूमिकेत आहे आणि डॉ. संजयशी लग्न केल्यानंतर बंगलोरला गेली आहे. ही कथा कौटुंबिक जीवनाविषयी आहे आणि ते शहरातील स्थितीत कसे वाढतात, परंतु त्यांना त्यांच्या नातेसंबंधात फरक दिसू लागतो या विषयी सांगण्यात आले आहे.


सुधा मूर्ती या लेखिका सामाजिक क्षेत्रात अग्रेसर आणि त्याचबरोबर तंत्रज्ञान क्षेत्रातील एक महिला अभियंता म्हणून काम केलेले आहेत. इन्फोसिस या कंपनीच्या कार्यात त्यांचा विशेष सहभाग आहे.

एक उत्कृष्ट लेखिका, सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांचे नाव संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. हे पुस्तके नक्की वाचलीच पाहिजे हा लेख वाचल्यानंतर तुम्हाला कसे वाटले, हे नक्की कळवा.

धन्यवाद.


©® राखी भावसार भांडेकर

***********************************************