Login

अशी नणंद हवी गं बाई भाग -1

कौटुंबिक
विषय --- सौंसारात नंदेची भूमिका.
भाग -1
जलद लेखन स्पर्धा.

सकाळ चे आठ वाजले होते, मधुराची मात्र घाई चालली होती.

"शी गं बाई... अजुन काहीच तयारी नाही झाली, हा हा बोलता बारा सुद्धा वाजतील आणि मग... " मधुरा स्वतःशीच पुटपुटत होती.

आज रविवार असताना देखील मधुरा इतकी घाई गडबड का करतेय ह्याचा विचार मदनला येत होता.

" काय गं काय झालं..? आज रविवार असताना देखील लवकर उठलीस आणि इतकी धावपळ करतेय..? " मदन शेवटी न राहुन विचारतो.

" अहो असं काय करताय विसरलास की काय..?" मधुरा बोलते.

मदन मधुराच हे बोलणं ऐकुन विचारात पडतो, " काय... काय विसारलो मी...? मला नाही कळलं..? " मदन बोलतो.

" अहो ताई येतायत आपल्या.. मी म्हणाले होते की तुम्हाला.. " मधुरा बोलते.

" अगं पण.. तुला माहित आहे ना.. मग तु का बोलावलंस तिला..? पुढे ढकलायचं की.. " मदन बोलतो, त्याच्या चेहऱ्यावर ताई येते ऐकल्यावर त्याला अतिशय घाम फुटतो.

" अहो, काही काय बोलताय.. कस तिला नको म्हणणार... त्या काय विचार करतील..? " मधुरा त्याला समजावत बोलते.

" सांगायचं जे आहे ते.. " मदन चे शब्द कंपत होते.

" तुम्ही काळजी नका करू, मी सांभाळून घेईन सर्व.. " असं बोलुन मधुरा त्याची समजुत काढते.

" आता तुझ्या पुढे काय बोलणार, तु बोलशील तस. बरं मला आता चहा तयार असेल तर तेवढा मात्र दे.. " मदन बोलतो.

मधुराला मदन च्या बोलण्याचा अर्थ कळत होता, आणि त्याची होणारी चिडचिड सुद्धा कळतं होती.
पण तिला शेवटी हसुन सारी पुढ्यातली परिस्थिती पुढे न्ह्यायची होती.

मधुरा ने सारं जेवण पद्धतशीर तयार केलं होतं, कसलीच कमी तिने ठेवली नव्हती.

दारावरची बेल वाजते, तसा मदन जरा घाबरतोच, " ताई आली वाटतं..? " मदन मधुरा ला बोलतो.

" अहो मग दार खोला तरी, त्याच असणार.. असे घाबरता काय..? " मधुरा विचारते..
न राहुन स्वतः जाऊन दार उघडते..

दारात ताई उभी होती.. शिफोनची साडी, लांब सडक केस.. हातात मनगटावर घड्याळ... अगदी श्रीमंती तिच्या चेहऱ्यावर जणु नाचत होती.

हो श्रीमंती... ताई च लग्न अगदी श्रीमंतातल्या श्रीमंताच्या घरात झालं होतं.

ताई म्हणजे मधुराची नणंद लता..

मदन ने लता चं लग्नं अगदी पाहुन करून दिलं होतं, गरिबी ची झुळूक कधीच तिला लागु नये म्हणुन..