सुभानरवाच लगीन भाग 1

एका समजुतीच्या घोटाळ्यातून झालेल्या विनोदाची इरसाल गोष्ट

दुरपदा !!!!दुरपदा!!!!कोणतरी मोठ्यानं वरडत व्हत.दुरपदाकाकू वैतागलीच.सक्काळी सक्काळी कोण बोंबलायला लागलं?वैतागत तिनं दार उघडलं आणि तिच्या गळ्यात पडून आनशी रडू लागली,"आक्के आता म्या काय करू??म्या काय आता जगत नसते!!!दारात तमाशा नको.दुरपडकाकूने पटकन तिला आत घेतलं. आनशी म्हणजे दुरपदाची धाकटी बहीण.पडेगावच्या सुभानराव पाटलांची कारभारीन ..शेतीभाती, दूध दुबत आणि चांगला सुखी संसार.पण.....आनशी मात्र लै कटकटी.सारख सुभानराव आणि पोरांना बोलत रहायची.दुरपदा तिला नेहमी सांगायची,"आनशे, आग सारख बोलू नाही,देवानं सुख दिल ते पहावं."आनशीला मात्र कायम धान्यातला खडाच पहायची सवय.आता नक्की काय झालं असेल?याचा विचार करतच दूरपदाने आनशीसाठी गरम पाणी उतरलं.आनशी मस्त आंघुळ करून आली,"आक्के चा दे बया,आन कायबाय खायला आसल तरी ते दि थोडं."आता मात्र दुरपदाला राग आला.तरीपण स्वतःवर ताबा ठिवून तिने चा आणि खायला दिल.
आनशीने चहा घेतला आणि मग दूरपदाने हळूच इशय काढला,"काय ग??दाजींशी भांडलीस का काय??बस एवढा प्रश्न विचारायला आणि आनशीने परत वरच्या पट्टीतला सूर लावला,"काय सांगू आक्के!!मला तर आता जगावं वाटना.... आपलाच दाम खोटा मग दुसऱ्याला काय बोलायचं".आता मात्र दुरपदा चिडली,"आनशे गप...जरा काय झालं की लागली गळा काढायला.जरा नीट सांगती का मला".सुभानराव काय बोलल का तुला?



मला कशाला काय बोलत्यात आता?आता त्या नव्या पोरी हायेत ना सायेबाच करायला..(म्हंजी आनशीच्या सुना बरं का!खरतर यातलं एक लग्न दुरपदाने स्वतः जमवलं होत.पोरी गुणी होत्या.)म्हंजी ग???दूरपदाने गालात हसत ईचारलं. आनशी फुरंगटून म्हणाली,"आक्के तू पण हासतीयास मला,घरी दारी जरा बोलायला गेले तर वस्ककन अंगाव येत्यात. आता मात्र दुरपदा पुढं झाली,आनशे,मी हाये ना तुला.काय झालं माझे बाय???म्या आता येते तुझ्याबरुबर. बघतेच सुभानरावाला.हे ऐकून आनशीला धीर आला.ती पूड बोलू लागली.



आक्के!आता ह्या नव्या पोरी आन त्यांची तऱ्हा... तू सांग ते पंजाबी का फंजाबी घालून फिरत्यात..फिदीफिदी हासत्यात.मला काय पटत न्हाय.दुरपदा हसली,"आनशे आग तू पाचवारी नेसतीस नव्ह??तुझी सासू नऊवारी नेसायची...तसच हाये ते.आता आनशी चिडली,"म्या कुठं न्हाई म्हणते तवा.तुमचं तुमि काय बी करा की!!!आग पर...मला फिराय घिऊन जायचं म्हणून ते कसलं ड्रेस घिऊन आल्या..आन आमचं ह्ये बी नंदीबैल त्यांचा आवाज फकस्त माझ्याफूड.म्या न्हाई म्हणले.आता त्यो इशय सोडून दिला .तर आता सुभानराव म्हंजी तुझं दाजी मला सोडून दुसरं लगीन करायला निगाले. काय??????दुरपदा मोठ्यांदा किंचाळली. काही पण काय बोलते???कशावरून दाजी दुसरं लगीन करायला निघाले????आनशीने परत सूर लावला,"म्या माझ्या कानांनी ऐकलं आक्के,त्ये फोनवर म्हणत हुत, जुनी काय काम देत !!नवी आणू म्हंजी मस्त मजा यील आणि मला बघून फोन ठिवून दिला...




दुरपदा तरीही म्हणाली,"आग पण एवढ्यावरून ते लगीच दुसरं लगीन करत हाये अस कुठं शाबीत व्हत???आनशी परत रडत म्हणाली,"परवा ती थोरली भवानी तिच्या आयला सांगत व्हती,"पप्पांना आता जुनी शोभत नाही,नवीन आणू मस्त वजनाने हलकी आणि दिसायला पण सुंदर.आता तू सांग???याचा आर्थ काय???दुरपदा विचारात पडली.तरीही सुभानरावाशी बोलायला पायजे.तिने आनशीची कशीबशी समजूत काढली.तिला जेऊ खाऊ घातलं आणि दुपारच्या टायमाला तिने सुभानरावाला फोन लावला. नमस्ते दाजी!!!काय म्हणती आमची बायकू???पलीकडून गडगडाटी हसत सुभानराव म्हणाल.दूरपदाने सगळी हकीकत सांगितली.ती ऐकून सुभानराव आणखीच हसायला लागलं. आक्का कावीळ झाली की समद पिवळ दिसत तस झालं बघा तुमच्या भणीच.. एवढे बोलून त्यांनी सगळी हकीकत सांगितली.ती ऐकून दुरपदाला हसावं का रडावं ते कळेना.पण...यावेळी आनशीच्या या सारख तिच्याकडे रडत येण्याच्या सवयींचा बिमोड करायला पायजे.थोडा विचार करून तिने सुभानरावाला एक भन्नाट कल्पना सांगितली.....
काय असेल दुरपदाची कल्पना????पाहूया पुढील भागात

🎭 Series Post

View all