सुभानराव _ एक महान पोस्टमन

प्रस्तुत कथेमध्ये सुभानराव या पोस्टमन चे थोरत्व दर्शविले आहे.

" जानकी, ए जानकी!"

" काय हो पोस्टमन भाऊ? माझ्या रोहितचं पत्र आलय का?"

" हो ग.बस तू इथे. आणि काय ग तुला किती वेळा सांगितलं की मला आरे कारे केलंस तरी चालेल.तू मला मोठा भाऊ मानतेस ना?"

" होय हो.पण थोरल्या भावाचा मान हा आदर दिल्यानेच ठेवला जातो.म्हणून मी तुम्हाला अहो जावो करते."

" शेवटी धाकटी बहीण तू माझी. मला काही तू बोलण्यात जिंकू देणार नाहीस!"

" मग ! बर.. बसा तुम्ही मी तुम्हाला चहा टाकते."


" अग चहाच राहू दे.नेहमीप्रमाणे तुला तुझा रोहित काय म्हणतो ते वाचून दाखवतो ना आधी."


" हो हो वाचा लवकर . तस माझं लेकरु गुणाच आहे.म्हणून आईला न चुकता पत्र लिहितो,आणि माझ्यासारख्या अडाणी बापुडीला तुम्ही मात्र तुमचा वेळ खर्चिक करून पत्र वाचून दाखवता."


" केलंस ना मला परकं!एकीकडे भाऊ मानतेस आणि दुसरीकडे असे परके ठरवतेस!"


" राग नका मानू पोस्टमन भाऊ. बर सांगा ना काय म्हणतोय माझा रोहित?"


" अग तो एकदम मजेत आहे.तुझ्या या लाडक्या स्वारीला खेळात बक्षीस मिळालय ; शिवाय चाचणी परीक्षेत ८९% गुणही मिळालेत."


" तुमच्या तोंडात खडीसाखर पडो.अजून काय म्हणतो तो? तब्येत बरी आहे ना त्याची ?"


" हो एकदम ठणठणीत आहे असे लिहिले आहे त्याने. तुझ पोरग चांगल नाव काढणार बघ तुझ."


" खूप खूप धन्यवाद पोस्टमनदादा!"


" बर चल येतो मी .मला दुसरी पत्रे पण वाटायची आहे अजून."


" अहो पण तुमचा आवडता वेलचीचा चहा राहिला की!"


" बघू ग पुढच्या खेपेला! "


" बर. सावकाश जा ."


" हो.हो.. येतो मी."


दुसऱ्या दिवशी,


" आई , ए आई !"


" कोण बाळ रोहित तू? असा अचानक कसा. आलास?"


" आई मी काल तर पत्रात लिहिले होते की मी हॉस्पीटल मध्ये आहे,मला टायफॉइड झाला होता,मला त्वरित काही रुपये पाठव ,माझी सुट्टी होणार आहे असं." 


" अरे पण पोस्टमन भाऊंनी तर तू बरा आहेस असं सांगितलं मला.म्हणजे त्यांनी मला वाईट वाटू नये म्हणून यातल काही सांगितलं नाही.पैशांची आधीच अडचण असल्याने तुझे पैसेही स्वतःच परस्पर भरले वाटत हॉस्पिटल मध्ये."


" काय ?खरच आई! "

" हो रे माझ्या लेकरा.तुझे बाबा गेल्यापासून घराची आर्थिक ,कौटुंबिक घडी पूर्ण विस्कटली.पण या माझ्या थोरल्या भावाने मला नेहमी माया दिली,आधार दिला.खरच खूप उपकार आहे त्यांचे आपल्यावर."

" असे आहे होय.आई तू चल माझ्यासोबत !"

" अरे पण कुठे?"

" टपाल खात्याच्या कार्यालयात.तिथे ते भेटतील आपल्याला."


टपाल कार्यालय ........

" सुभान राव तुम्हाला साहेबांनी बोलावले आहे."

" अरे बापरे कशाला रे? बर जातो लगेच!"

" सुभान राव यांना तुम्ही ओळखता ? "

" हो ही माझी मानलेली बहीण जानकी आणि तिचा मुलगा रोहित.काय झालं साहेब?"

" सुभान राव मला रोहितने सारं काही सांगितलं आहे.खरच तुम्ही तुमचे कर्तव्य चोख पार पाडत आपल्या टपाल खात्याचे नाव उज्ज्वल केले आहे.म्हणून तुमची बढती करून तुमचा सत्कार समारंभ मी ठेवायचं ठरवले आहे."

" काय साहेब खरच? खूप खूप धन्यवाद साहेब."

" अहो सुभान राव तुमच्यासारखे असे थोर समाजकार्य करणारे प्रामाणिक लोक खूप कमी आहेत या जगात.मग त्यांना योग्य मानसन्मान मिळायलाच हवा."


" खूप खूप धन्यवाद साहेब. मीही तुम्हाला शपथ देतो की असे सत्कार्य मी सदैव करत राहीन आणि टपाल खात्याचे नाव नेहमी उज्ज्वल करण्याचा प्रयत्न करीत राहीन."


" हो दादा.माझ्यासारख्या विधवेला तू बहीण मानले आणि माझ्या लेकराला आर्थिक मदत पुरवली.खरच तुझे खूप उपकार झाले माझ्यावर! "


" हे बघ,जानकी.हे माझे कर्तव्यच आहे,त्यामुळे उपकाराची भाषा वापरू नकोस.तुझ्यासारख्या अनेकांना मला आधार देत टपाल खात्याचे नाव उज्वल करायचे आहे, समाजकार्य करायचे आहे."


" भाऊ,तू खरच खूप थोर आहेस.मला तुझ्या रुपात खरा हिरा,खरा भाऊ गवसला. ईश्वरा तुझी मी खूप खूप आभारी आहे."

"पोस्टमन काका , हा तुमचा भाचा देखील तुमच्या पावलावर पाऊल ठेवून जीवनाची पुढील वाटचाल नक्की करेल. तूम्ही केलेली आर्थिक मदत नक्की परत करेल.खुप ग्रेट आहात काका तुम्ही!"

" वाह ,ये हूई ना बात! बघा सुभान राव! तुमच्या या कार्यामुळे एक आदर्श पिढी नक्की निर्माण होऊ शकते.असेच सत्कार्य करत रहा.खूप खूप शुभेच्छा तुम्हाला !"

" धन्यवाद साहेब!"


©® सौ प्रियंका शिंदे बोरुडे 

# फोटो _ साभार गूगल