संघर्ष भाग दोन

Struggle


*संघर्ष भाग दोन*


राणीच बालपण सुखात गेले ते आई बाबा मुळेच.. बहिण सायली आणि राणी यांच बहिणीच नातं खुप प्रेमाच नव्हते. सायली मनात हेच घेऊन बसली की, राणी झाली मला त्रास झाला. राणी च्या जन्माच्या वेळी आत्या कडे रहावे लागले. आत्या ने वर्षभराचे धान्य सायली कडून निवडून घेतले, आत्या ने डोक्याला लावायला तेल, शॅम्पू दिला नाही मग डोक्यात उवा झाल्या. मग शाळेत एक मैत्रीण जवळ बसेना. सायली ला एक मैत्रीण राहिली नाही. आत्याला दोन हजार रुपये दिले होते आत्याने शाळेची फिस भरली नाही. 8 तास सायलीला वर्गाच्या बाहेर उभे रहावे लागले. गुबगुबीत असलेल्या सायलीला आत्या कडे अर्धीच पोळी आत्या द्यायची. सायली बारीक झाली 2 महिन्यातच. आत्या तिच्या 2 मुलासाठी सकाळी खाऊ आणायची. सायली ला घरातून बाहेर हाकलून द्यायची 8 वाजता सायलीची शाळा 12.35 ला दुपारी एवढ्या वेळ कुठे जायचे. सायली तिची आई ज्या जि. प. शाळेत शिकवायची त्या ग्राऊंडवर झाडाखाली बसून रोज मुंबई ला मामाच्या पत्यावर पत्र लिहायची, पाठवायची. पिवळे पोस्टकार्ड किंवा निळे आंतरदेशीय पत्र आत्या ने अस केल, तस केले.. साडे अकरा वर्षाची सायली सहावीत होती पत्र लिहून पोस्ट करण जमत होते. सायली ची शाळा बुडू नये म्हणून औरंगाबाद ला आत्या कडे होती.


इकडे सायली ची आई मुंबईतील KEM मध्ये बाळंतीण. साडे सात महिन्याची PREMATURE मुलगी झाली. कावीळ झालेला, काचेच्या पेटीत ठेवलेली होती. साडे सातशे ग्रॅमच होती. आईचे सिझरचे टाके 3 वेळा उघडले आणि 3 वेळा घातले डाॅक्टर म्हणाले आता उघडले तर हि बाई वाचत नाही. आई बाबा मुंबईला आईचा मोठा भाऊ, भावजय, त्यांचे 3 मुल 1 मुलगी, आईची आई होती. 2 महिन्याच्या नंतर बाळ आणि बाळंतीण वाचले दवाखान्यातून डिस्चार्ज मिळाला. मुंबईला घरी आल्यावर आईच्या आईने सगळी सायलीची पत्र दिले आणि लगेच बाळ आणि बाळंतीण औरंगाबाद ला आले आत्या कडून सायली ला घेऊन आपल्या स्वतःच्या घरी औरंगाबाद मधल्या आले..


सायलीला राणी विषयी प्रेम नसायचे. राणी झाली मला त्रास झाला हेच डोक्यात बसले होते. आईने जि. प. शाळेतून खेळाच्या ऑफिस मध्ये बदली करून घेतली. आई ऑफिस मध्ये गेली की राणी सायली च्या तावडीत. राणीला रडवायची मी चालले आई कडे राणी लहान रडायची. बाबा बाहेर गेलेले असायचे. सायली राणीला उन्हात रिंगण करायची यातून बाहेर आले की मारेल. राणी दिवसभर रिंगणात उन्हात. हे औरंगाबाद च्या मामी ने पाहिले आणि सायली चे नाव तिच्या आईला सांगितलं. सायलीला आई रागवली असेल. राणीने नाव सांगितले असेल म्हणून राणीला सायलीचा मार बसला. राणी ची बहिण मोठी प्रेम नाही कडक रहायची.

राणी शाळेत बसने पहिलीत जाऊ लागली. सगळे स्टॉप नाव, बस रूट सायली ने राणी कडून पाठ करून घेतले. बस मध्ये खुप गर्दी असायची. शाळा, कॉलेज, ऑफिस, संध्याकाळी पिक्चर सुटायचा खुपच गर्दी.. सायली गर्दी मध्ये लपून बसायची. राणी रडत तिला शोधायची बस मध्ये एकटीच चढायची. घरी चालत एकटीने राणी जायची. घरी पाहिले तर सायली हिच्या आधी पोहचलेली.

सायली फारच मारायची राणीला. एकदा टिपऱ्या खेळाव्या वाटल्या म्हणून चोरून राणीने टिपऱ्या तयार केल्या. साडी नेसून तयार झाली सायलीचा साखरपुडा झाला होता. मिलिट्री मधला नवरा होता तिचा. आई ने ठरवले लग्न. सायलीचा नवरा, सायली नवरात्र साठी त्यांच्या घरी जाणार होते. ते गेले. तेवढ्यात चोरून राणी टिपऱ्या खेळायला गेली. सायली परत कशा साठी आली महित नाही. तिने पाहिले राणी टिपऱ्या खेळायला गेली. त्याच टिपरीने वळ येईपर्यंत मारत तिथून घरी सायली राणीला घेऊन आली. भावजी वाचवत होते. एखादं टिपरी त्यांना लागत होती. सायलीला आवडत नव्हते टिपऱ्या खेळलेले, नटाफटा केलेले , नाचलेले.. तिथे येणार्‍याच्या नजरा मुली कडे कसे पहातात. नटाफटा केला राग आला. राणी ला मारू नकोस सायली ला आई सांगत होती. पण मार तर राणीला मिळालाच होता.


कुठे बाहेर गेल्यावर राणीने काय बोलायचे, काय करायचे, काय नाही. हे खाणाखुणा ठरवून दिलेल्या असायच्या राणी ने तसेच नाही केले तर घरी आल्यावर मार ठरलेला.

बाबाही कडक होते. एक हाक मारली की गल्लीत आवाज जाईल असा आवाज होता. एक हात मारला की डोळ्यासमोर अंधार खुप वेळ. बाबांना घरात गाणे म्हणालेले आवडतच नसे. बाबाचे गाणे आवडीचे ठरलेले. के. एल. सायगल, पं. भिमसेन जोशी, तुकारामाचे अभंग.... हे ऐकायला आवडायचे.

राणीची औरंगाबाद ची मामी राणीला शाळेत शिकवायला. राणी लहानपणी खोडकर होतीच. पण मामी कधीच नीट बोलत नव्हती. मेली. म्हशे.. डांबरट... कमी लेखणे, हेच बोलणे सख्या मोठ्या नणंदेच्या मुलीला / राणीला हि मामी औरंगाबाद ची पाण्यातच पहायची. सायली चे लग्न झाले. दुसऱ्या दिवशी शाळेत पेपर होता. फायनल परीक्षा. हजारदा राणीने विचारले कोणता पेपर आहे. किती वाजता. लग्नामुळे शाळा बुडली होती. मामीने शेवटपर्यंत सांगितले नाही. शाळेच्या सहलीला कोल्हापूर ला 3 दिवस राणी, मामी गेलेल्या सहलीला. पहिल्याच दिवशी पहिल्यांदा पाळी सुरू झाली. मामीने सगळे शिकवले राणीला. याच मामीचा नवरा औरंगाबाद चा मामा आणि राणीची आई एकाच ऑफिस मध्ये नोकरीला होते. सख्खे बहिण - भाऊ एकाच खेळाच्या ऑफिस मध्ये नोकरीला.


राणी च्या जन्मतः डोळ्याचा आकार डायमंड शेप होता. गोल नव्हता. गल्लीतले जोशी काका राणीला बांगे हाक मारायची मुद्दाम दिसली की. कदम काका शेजारी होंडी हाक मारायची मुद्दाम राणीला. सायली घरी केस कापायची राणीचे. वाकडी तिकडी कट करणार कदमची मोठी मुलगी कुचकट हसणार.
कदमची लहान मुलगी राणीच्या वह्या, खेळणी, पैसे चोरले होते. राणीच्या वडीलांना कदम शी बोललेले आवडत नसायचे. ते बोलले तरी राणीला बाबांची बोलणी, मार खावा लागायचा. राणीशी लोक वाईट वागायचे. कारण नसताना. राणीची पाळी जशी सुरू झाली तसे बाबांनी तिला मारले नाही.


राणीचा संघर्ष हा सुरू होता. जन्माच्या वेळी जगण्यासाठी, थोडी मोठी झाल्यावर पाण्यात पाहणाऱ्या लोकांशी, वाईट अनुभवाशी....


राणी सायलीला, वडीलांना, मोठ्यांना उलट उत्तर देत नव्हती. मोठी बहिण म्हणून सायली ला ताईच कायम म्हणायची. मोठ्या बहिणीला मोठी म्हणून मानच द्यायची. हा गुण राणीची आई बोलून दाखवायची सारखा....


सायलीच्या लग्नानंतर भावजी कडुन लुना शिकली राणी. सहावीत असताना. सायलीची लुना आईने घेऊन दिलेली. सायकल येत असल्यामुळे काही अवघड गेले नाही. लवकरच शिकली. बॅलन्स येतच होता. सायलीला आवडले नाही. राणीला सांगितले भावजी शी बोलायचे नाही. तिला का नाही बोलायचे हे कारण कळले नाही. राणी लहान आणि निष्पाप होती.

पुढे राणी आठवीत असताना सायलीला मुलगी झाली. नंतर दहावीत असताना दुसरी मुलगी झाली. त्या मुली लहान राणी जवळ गेलेल्या सायलीला चालत नव्हत्या. ती लहान मुलींना मारायची राणीच्या जवळ गेल्या म्हणून उचलून घराबाहेर लहान मुलीला टाकले..

सायली आई- बाबांच्या जवळपास भाड्याने घर घेऊन रहायची. भावजी मिलिट्री मध्ये ते बॉर्डर वर असायचे. सायली आणि 2 पोरी रहायच्या. मग तिला सोबतीला बाबा तिच्या घरी रहायचे.

आई आणि राणी स्वतःच्या घरात रहायच्या ते घर आईच्या नावावर होते. आईने स्वकष्टाने घेतले होते.


राणी आईने पाठवलेले डबे घेऊन आली. तरी सायली राणीला तोंड काळं कर कशाला आली निघ म्हणून हाकलून द्यायची. आता सायलीचे म्हणणे होते आई राणीवरच प्रेम करते. सायलीवर नाही. तसे नव्हते. सायली राणीचा अपमान करायची हाकलून द्यायची म्हणून बाबा राणीला रागवायचे ती अपमान करते तु येतेच कशाला.

क्रमशः 

सौ. भाग्यश्री चाटी सांबरे 

©®. 13.9.2021


🎭 Series Post

View all