Login

स्त्रीत्व भाग ७०

Story Of Women's Facing Tough Situation


स्त्रीत्व भाग ७०
क्रमश: भाग ६९
प्रसादने रागिणीला हातात उचलून घेतले ..अभयने कार चालवत लगेच हॉस्पिटलला आणले.. आयुष्यात पहिल्यांदा प्रसाद खूप घाबरला होता .. रागिणीला असे रक्ताच्या थारोळ्यात पाहून त्याचा जीव घुसमटत होता .. त्याचा रुमाल त्याने तिच्या जखमेवर घट्ट पकडून ठेवला होता .. टेबलचा कॉर्नर घुसल्यामुळे मोठी जखम झाली होती .. हॉस्पिटल मध्ये गेल्यावर टाके घालण्यासाठी आत मध्ये नेले तेव्हाच डॉक्टरांनी प्रसादला सांगितले कि रागिणी प्रेग्नंट आहे ..
प्रसाद " काय ?"
डॉक्टर " येस .. शी इज मोअर दयान वन मंथ प्रेग्नंट "
प्रसाद " डॉक्टर , कधी शुद्धीवर येईल ती ?"
डॉक्टर " जखम खोल आहे , टाके घालावे लागतील . शिवाय रक्त खूप गेलंय त्यामुळे रक्ताची बाटली लावावी लागेल .. "
प्रसाद " प्लिज डॉक्टर टेक केअर ऑफ हर .. शी इज माय लाईफ "
डॉक्टर " येस , डोन्ट वरी .. तुम्ही प्रोसिजर करून घ्या .. आम्ही लगेच टाके घालण्यासाठी ऑपरेशन थिएटर मध्ये घेतो "
अभय " काँग्रट्स बडी .. यु आर गोइंग टू बिकम फादर सून "
त्रिवेणी " काँग्रट्स , प्रसाद दादा "
प्रसाद " थँक यु .. अभय .. पण बघ ना रागिणी ला किती लागलंय .. माझ्या साठी जीव धोक्यात घातला रे तिने ..कशी आहे हि .. आणि हि त्रिवेणी पण किती बिनधास्त वागतात रे या मुली .. जरा पण कळत नाही .. आपला जीव किती टांगणीला लागतो ते .. त्रिवेणी तुला पण कळत नाही का ? काही केलं असते तर त्याने ? अरे जरा सांभाळून वागा ना .. " रडकुंडीला आला होता तो
अभय " खर आहे यार .. रागिणीच्या मानेवर चाकू ठेवला ना त्याने हृदयाचा ठोका चुकला होता माझ्या ?"
प्रसाद " मग काय ?"
त्रिवेणी " तुम्हीचं फक्त आमच्यावर प्रेम करता का ? आम्ही पण करतोच ना ..जरी शरीराने तुमच्या इतक्या ताकदवान नसलो ना तरी आपल्या नवर्यावर आलेल्या संकटावर मात करण्यासाठी कुठलीही स्त्री पुढे येईल .. त्यावेळीस ती जीवाची पर्वा करत बसत नाही "
प्रसाद ने तिथेच हॉस्पिटल मध्ये असलेल्या गणपती बाप्पाच्या मूर्तीला नमस्कार केला " बाप्पा , माझ्या रागिणीला आणि माझ्या बाळाला सुखरूप ठेव "
माझे बाळ .. किती छान वाटत होते त्याला .. आत्त्ता बातमी कळून ५ मिनिटे झाली असतील तर लगेच माझे बाळ त्याच्यासाठी नतमस्तक झाला होता तो ..
-----------------------------------------------------------

स्पृहा डॅडनी आणलेली साडी नेसून खाली आली .. तर डॅड आणि बाबा गप्पा मारत बसले होते .. आणि आदी त्यांच्यात नव्हता .. पण आता विचारणार कोणाला ? हा कुणीकडे गेला ? काहीच बोलला पण नाही ? खूप बेचैन झाली ती .. तिची नजर फक्त आदीलाच शोधत होती ..
स्पृहाने देवाला नमस्कार केला ..मग डॅड आणि बाबांना वाकून नमस्कार केला .. आई ,आजीला पण केला
डॅड " स्पृहा , बेटा एक काम करशील का ? आदी तुमच्या टेरेस वर गेलाय .. त्याला बोलावून आणशील प्लिज "
स्पृहाने एक नजर बाबांकडे पाहीले इकडे डॅडला कळून चुकले कि प्रत्येक गोष्ट बाबांना विचारून करते ..
श्रीधर काही बोलायच्या आतच
डॅड " स्पृहा , आदी आज नक्कीच त्याच्या मॉमला मिस करत असेल . म्हणुणच एकटा बसला आहे . वरती .. तू त्याच्याशी जरा बोललीस तर त्याला छान वाटेल "
श्रीधर " स्पृहा , जा बघ बाळा .. जा त्याला खाली घेऊन ये "
स्पृहा बाबांच्या बोलण्याची जणू वाटच बघत होती .. पटकन वरती टेरेस वर गेली .. टेरेस वर एक छोटासा झोपाळा होता .. त्यावर एकटाच बसला होता तो
स्पृहा मागून पटकन गेली आणि तिने त्याचे डोळे मिटले .. पण त्याच्या डोळ्यांतील अश्रू तिच्या हाताला लागले
स्पृहाने तिच्या रुमालाने त्याचे डोळे पुसले
स्पृहा " आदी, मॉमची आठवण येतेय ?"
आदीने मान हलवून होकार दिला " आज मॉम असती तर सगळ्यांत जास्त खुश झाली असती .. मॉम ना माझे खूप लाड करायची .. फार कमी प्रेम मिळाले मला तिचे .. म्हणूनच खूप चीड चिडा झालोय "
स्पृहा " आदी ,उद्या आपण त्यांचा आशीर्वाद घ्यायला जाऊ .. "
आदी " हो .. तू येशील उद्या घरी .. "
स्पृहा " आदी , मला यायचंय .. तू बाबांची परमिशन घेशील .. प्लिज .. उद्या संडे आहे ना तर उद्या मला पूर्ण दिवस तुझ्या बरोबर घालवायचाय .. जसा आपण घालवणार होतो ना तसा .. "
आदी " म्हणजे उद्या आपली डेट आहे " आणि गोड हसला .. आणि ती तर काय बुवा लाजली होती
आदी " स्पृहा .. कसली गोड दिसतेय तू साडीत .. किती मस्त आणलीय साडी डॅडनी .. आणि हे काय केस कशाला बांधलेस ?... म्हणतच तिचा क्लचर काढून टाकला त्याने .. टेरेस वर गार वारा सुटला होता .. आणि हे दोघे सामोरा समोर उभे होते .. आदी एकटक तिला बघत होता .. तिचा चेहरा हातात घेऊन तिच्या कपाळावर किस केले त्याने " सॉरी माझ्याकडे आज तुला दयायला काहीच गिफ्ट नाहीये "
स्पृहा " आज , तू किती मोठे गिफ्ट दिले आहेस मला .. आई बाबांची परमिशन मिळवली आहेस तू .. तेही तुझ्या प्रेमामुळे तयार झाले आदी .. बाकी काही नकोय मला "
आदी " तू पण माझ्या बद्दल बाबांना खूप सांगितलेस .. थँक यु "
स्पृहा " थँक यु काय ? पण तुझ्या इतके नाही काही जास्त करू शकले मी "
आदी " आता लवकरच आपले लग्न होईल स्पृहा , तू खुश आहेस ना नक्की ?"
स्पृहाने लाजूनच होकार दिला
आदी " हाय !! तू अशी लाजून बघतेस ना डोळ्यांनी माझ्याकडे तेव्हा एकदम हृदयाचा ठोका चुकतो माझा "म्हणतच त्याने परत तिच्या कपाळावर किस केले.
स्पृहा "आता पुढचे प्लॅनिंग काय आहे ?"
आदी " आई शपथ हे तू विचारतेय ? एकदम घाई करतेय आता ? हा मी मघाशी केलेल्या किस चा परिणाम आहे वाटतं ?" तिला चिडवायला बोलू लागला
स्पृहा " उम्म .. आदी नको ना लाजवू अजून .. आणि खरं सांगू .. आता नाही थांबायचंय मला .. आता फक्त तूच पाहिजेस आजू बाजूला मला .. "
आदीने पटकन तिला घट्ट मिठीत घेतले " फायनली , स्पृहा तू ओपन होतेय हळू हळू .. किती मोजकं बोलायचीस तू माझ्याशी माहितेय का तुला ?"
स्पृहा " आदी , आज पहिल्यांदा मला अजिबात भीती वाटत नाहीये .. आज माझ्या मनात कोणतंच गिल्ट नाहीये .. आज आई बाबांनी आजीने , डॅड ने आपल्या नात्याला परवानगी दिलीय त्यामुळे किती ओझं उतरल्या सारखं वाटतंय मला काय सांगू ?"
आदी " आज खरंच आपल्या आयुष्यातला महत्वाचा दिवस आहे यार .. तुला माहितेय आज ना मॉमचा वाढ दिवस आहे .. मला तर वाटतंय वरतून मॉम ने आपल्याला आशीर्वादच दिलाय जणू "
स्पृहा " काय ? "
आदी " हो .. आय लव्ह यु मॉम .. " म्हणतच त्याच्या डोळ्यांतला अश्रू स्पृहाच्या पाठीवर पडला
स्पृहा " आदी , प्लिज रडू नको ना ... त्या बघत असतील .. तुला आनंदात बघायचंय त्यांना तर तू अश्रू काढतोस डोळ्यांतून " म्हणतच तिने त्याचे डोळे पुसले .. त्याच्या ओल्या पापण्यांवर ओठ ठेवले ..
आदी " स्पृहा , मी कधीही चिडलो , चुकलो , तुझ्यावर ओरडलो तरी मला अंतर देऊ नकोस काय ? प्लिज .. मी हट्टी आहे थोडा .. कधी कधी मला पाहिजे म्हणजे पाहिजेच असते पेशन्स नसतात .. "
स्पृहा " आदी , असे तुला वाटते .. तुझ्याकडे किती पेशन्स आहेत हे मी बघितले आहे .. तू मला किती शांतपणे समजूंन घेतोस हे मी बघितले आहे .. दोन महिने भेटायचं नाही , कॉल करायचा नाही हा माझा हट्ट सुद्धा तू पुरवलास .. "
आदी " तू जवळ असलीस कि कसलीच चीड चीड नसते .. फक्त तू जवळ पाहिजेस ,, बाकी काही नकोय मला ... "
स्पृहा " मला पण फक्त तू हवा आहेस .. परीक्षा झाल्यावर आधी तुझे लाँचिंग होऊ दे .. मग लग्न करू .. तोपर्यँत माझी पण परीक्षा होऊन जाईल "
आदी " ओके मॅडम .. तू म्हणशील तसे .. पण आता मला भेटशील ना .. मला रोज कॉल करशील ना .. म्हणजे आता आपण रिलेशन मध्ये आहोत हे उघडपणे सर्वांना सांगून तू मला माझी हवी आहेस .. कोणालाही न घाबरता तू माझ्या जवळ आली पाहिजेस.. मला तुझ्या जवळ येता आले पाहिजे .. "
स्पृहा " मी प्रयत्न करेन .. "
आदी " बघ हा मला चिडायला लावू नकोस .. नाहीतर मी ना तुला अशी उचलून घेऊन जाईन आपल्या घरी " बोलतच त्याने तिला दोन्ही हातात उचलून घेतले "
स्पृहा " आदी .. नको ना .. मला लाज वाटतेय .. कोणी तरी येईल ना वर ..बाबा ओरडतील " आणि घाबरून तिने दोन्ही डोळे घट्ट मिटले
आदी " आता मी कोणाच्या बापाला नाही घाबरत .. बायको आहेस तू माझी " असे तो बोलतच होता तर समोर श्रीधर आणि डॅड दोघेही टेरेसच्या दारात उभे होते .. त्याचे शब्द त्याच्या तोंडातच राहीले .. स्पृहाने त्याने उचलून घेतले म्हणून डोळे मिटले होते ..
आदीने डोळ्यांनीच खुणावले दोघांना "आय नीड सम टाईम विथ हर" आणि ते दोघे बिचारे हसतच खाली गेले
डॅड "श्रीधर, सॉरी राग मानू नका .. तो फार पुढे जाणार नाही .. "
श्रीधर " माझी मुलगी त्याला फार पुढे जाऊनही देणार नाही याची खात्री आहे मला " आणि दोघेही हसले
तेवढयात संगीता वरती टेरेस वर चालली होती
श्रीधर " संगीता , ते जरा चहा पाहिजे होता .. आम्हांला दोघांना "
संगीता " आता ? अहो .. जेवण वाढणार होते .. फक्त पोळ्या राहिल्यात स्पृहा म्हणाली होती ती करणार आहे .. तेच तिला बोलवत होते
डॅड " हा ते वहिनी , आता स्पृहाच्या हातच्या पोळ्या खाण्याचा योग येईलच .. आज तुमच्या हातच्या खायच्यात मला .. "
श्रीधर "आणि अग त्यांना ना भूख लागलीय .. तू कर ना पटकन "
तर अशा पद्धतीने संगीताला पुन्हा किचन मध्ये पाठवली दोघांनी .. कारण आदिला तिच्या बरोबर वेळ मिळावा म्हणून
मग काय बराच वेळ दोघे टेरेस वर आनंदात बागडत होते .. आपल्याच टेरेस वर आहे म्हणून स्पृहा एकदम बिनधास्त वावरत होती त्याच्या सोबत ..
चाँद छुपा बादल में शरमाके मेरी जाना
सीने से लग जा तू, बलखाके मेरी जाना
गुमसुम सा है, गुपचुप सा है
मद्होश है, खामोश है
ये समा हाँ ये समा, कुछ और है
चाँद छुपा ...

नज़दीकियाँ बढ़ जाने दे
अरे नहीं बाबा, नहीं अभी नहीं नहीं
ये दूरियाँ मिट जाने दे
अरे नहीं बाबा, नहीं अभी नहीं नहीं
दूर से ही तुम, जी भर के देखो
तुम ही कहो कैसे दूर से देखूँ
चँद को जैसे देखता चकोर है
गुमसुम सा है ...
चाँद छुपा ...

आजा रे आजा चन्दा कि जब तक तू न आयेगा
सजना के चेहरे को देखने, ये मन तरस जायेगा
न न चन्दा तू नही् आना, तू जो आया तो
सनम शरमा के कहीं चला जाये न
आजा रे आजा चन्दा, तू लाख दुआएं पायेगा
न न चन्दा तू नहीं आना, वरना सनम चला जायेगा

आँचल में तू छुप जाने दे
अरे नहीं बाबाम नहीं अभी नहीं, नहीं
ज़ुल्फ़ों में तू खो जाने दे
अरे नहीं बाबा, नहीं अभी नहीं नहीं
प्यार तो नाम है सबर का हमदम
वो ही भला बोलो कैसे करें हम
सावन की राह जैसे देखे मोर है
रहने भी दो जाने भी दो, अब छोड़ो न
यूँ मोड़ो न
ये समा, हाँ ये समा, कुछ और है
आया रे आया चन्दा, अब हर ख़्वाहिश पूरी होगी
चान्दनी रात में हर सजनी अपने, सजना को देखेगी
चाँद छुपा ...
(गाणे नक्की बघा एकदा .. स्पृहा आणि आदी डोळ्यांसमोर येतील)

🎭 Series Post

View all