Jan 26, 2022
नारीवादी

स्त्रीत्व भाग २

Read Later
स्त्रीत्व भाग २


स्त्रीत्व भाग २

क्रमशः भाग १
कॉलेज मधून आल्यावर स्पृहा घरातच थांबायची .. ट्रेनचा प्रवास करून घरी येई पर्यंत थकून जायची .. असेल तो थोडा अभ्यास करायचा आणि घरातली काम करायची.
संगीता " स्पृहा .. काय ग हल्ली कसल्या विचारात हरवलेली असतेस ? काही प्रॉब्लेम आहे का ?"
स्पृहाचे लक्षच नव्हते .. आदिराज .. तिच्या मागे हात धुवून लागलाय .. कॉलेज मध्ये सगळे तिला स्पृहा कमी ‘वहिनी ‘जास्त हाक मारतात .. या सगळ्यांतून कसे बाहेर पडावे कळतच नव्हते .. घरात आईला सांगितले तर ती लगेच बाबांना सांगेल आणि मग बाबा शिक्षणच बंद करून टाकतील त्यामुळे बिचारी घरात काहीच सांगत नव्हती ..
संगीता " स्पृहा .. मी काय विचारतेय ?"
स्पृहा " काय ग आई ?"
संगीता " काय ग तू ?कुणीकडे लक्ष आहे तुझे ? काही प्रॉब्लेम आहे का ?
स्पृहा " नाही ग .. काहीच नाही .. प्रॉब्लेम कसला असेल ?"
संगीता " मग तू कसला विचार करत बसतेस हल्ली? "
स्पृहा जरा अडखळत " ते .ते .. अग परीक्षा जवळ आलीय ना ? तेच विचार करत होते "
संगीता " बरं चल .. ताट पाणी घे .. मी जेवायला वाढते "
स्पृहा " हो आई "
संगीताच्या लगेच लक्षात आले कि आपली मुलगी नक्कीच कसल्या तरी विचारांत आहे .. आपल्या मुलीच्या मनात काय आहे ते काढून घ्यायचं कसे यावर ती विचार करू लागली ..
-----------------------------
रागिणी बँकेतुन घरी आली .. आणि लगेच जेवणाला लागली .. प्रसाद म्हणजे तिचा नवरा त्याच्या आवडीचा मेनू बनवला .. छान ब्लॅक साडी नेसली .. केस मोकळे सोडले ..मस्त मंद परफ्युम लावला .. आणि प्रसादची वाट बघत बसली .. कधी एकदा प्रसाद येईल असे तिला झाले होते . आज त्यांच्या लग्नाला एक महिना पूर्ण झाला होता म्हणून काहीतरी सेलेब्रेशन म्हणून ती आज खास मेनू करून खास तयार होऊन राहिली होती .. सकाळ पासून प्रसादने तिला साधे विष पण नव्हते केलं नव्हते म्हणून तर तिचं आज बँकेत कामात लक्ष नव्हते .. कदाचित प्रसाद ऑफिस मध्ये गेल्यावर कॉल करेल .. कॉल नाही तर निदान मेसेज तरी पाठवेल अशी आशा होती तिला पण नाहीच . प्रसाद कदाचित विसरला होता का विसरण्याचे नाटक करत होता त्याचे त्याला माहित ..
अधीरतेने वाट बघत बघत रागिणी बाहेर सोफ्यावरच झोपून गेली .. अचानक तिला जरा जाग आली तर रात्रीचे १२ वाजले होते .. आणि प्रसादअजून आला नव्हता .. तिने पटकन मोबाईल हातात घेतला आणि बघितले कि काही मेसेज कॉल आला असेल .. पण कसले काय ? नाहीच ?
शेवटी नाईलाजने आणि काळजीने रागिणीने प्रसादला कॉल केला
--------------------------------------------
तेजस्विनी कॉलेज मधून आली आणि डायरेक्टच हॉस्पिटलला गेली .. आज तिची डॉक्टर कडे अपॉइंटमेंट होती .. सुनील पण ऑफिस मधून आला होता ..
सुनील " काय ग ? थकल्या सारखी वाटतेस”
तेजस्विनी " सुनील .. आज ओवुलुशन डे आहे त्यामुळे फीवरीश आहे .. खूप पोटात दुखतंय .. त्यात इंजेक्शनच्यामुळे पाय पण दुखतोय "
सुनील " तरी मी तुला बोललो होतो आज सुट्टी घे .. पण तू ऐकत नाहीस राव माझे अजिबात "
तेजस्विनी " नाही रे .. अशी कितिदा मी सुट्टी घेऊ सांग ? पहिल्या पहिल्यांदा अशा वेळेला सुट्टी घेतच होते ना मी .. पण काहीच उपयोग झाला नाही "
सुनील " नको ना त्रास करुस घेऊस तेजू .. नकोय मला हे असेल बाळ.. नकोय .. मला आता भीती वाटायला लागलीय .. किती खराब झालीय तुझी तब्बेत .. किती काळजी करतेय .. अग होईल आपल्याला बाळ .. काही काही लोक ५ वर्षांचे फॅमिली प्लॅनिंग करतात .. आताशी तीनच वर्ष झालीत आपल्या लग्नाला .. प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते .. तुला का समजत नाहीये? "
तेजूच्या डोळ्यांतून पाणी ओघळू लागले .. " तूला काय चिडायला ? मला आई होयचंय .. कधी एकदा माझ्या या हातात आपले बाळ असेल असेल झालंय मला .. दर महिन्याला आशा लावून असते .. पण या देवाला माझी दया नाही येत आहे .. मला का तरसवतोय तो देव .. सांग ना सुनील "
तेवढ्यात रिसेप्शनिस्ट बाहेर आली .. तशी तेजू ने अश्रू पुसले
सुनील " मॅडम .. ते आज तिला जरा ताप आहे असे वाटतंय .. आजची ट्रीटमेंट उद्या नाही का करता येणार "
रिसेप्शनिस्ट " नाही ना .. सर .. आज त्यांचा ओवुलुशन डे आहे .. आज नाही झाले तर महिना भर घेतलेली सगळी ट्रीटमेंट फुकट जाईल "
सुनील " तुम्ही डॉक्टरांना विचारून आधी ताप जायचं एखाद इंजेक्शन द्या मग .. आणि अर्ध्या तासा नंतर ट्रीटमेंट करू आपण "
रिसेप्शनिस्ट " ठीक आहे मी मॅडम शी बोलते आणि सांगते " आणि ती निघून गेली
सुनील " मी काहीतरी खायला आणू का ? किंवा खाली कॅफे आहे तिथे जाऊन आपण "
तेजस्विनी " नाही नको .. मी नाही येणार .. मला खूप थकायला झालेय "
तेवढ्यात रिसेप्शनिष्ट आली
रिसेप्शनिस्ट " सर , मॅडम नि काही खाल्लंय का ? मी तापाचे इंजेक्शन देते "
सुनील " नाही .. मी घेऊन येतो पटकन खालून काहीतरी "
रिसेप्शनिस्ट " ओके .. जर लवकर या ?"
सुनील धावतच खाली गेला आणि इडली सांबार घेऊन आला .. तिला खाऊ घातले .. पाणी प्यायला दिले .. मग तिला नर्स ने इंजेक्शन दिले आणि झोपवली .. सुनील तिथेच बाजूला बसला .. तिच्या डोक्यावर हात ठेवून सारखा चेक करत होता .. घरी फोन करून सांगितले कि यायला खूप उशीर होईल .. वेळ आली तर आजची रात्र इकडेच हॉस्पिटल ला काढू
----------------------------------------------------
सागर घरी आला .. अर्धा एक तासांत फ्रेश झाला असेल नाही तर लगेच सायकल घेऊन निहारिका च्या घरी गेला .. निहारिका च्या घरी रोज जायचा तो .. चहा पाणी झाले तर निहारिकची लहान बहीण निशिता आली .. निशिता सहावीत शिकायला होती ..
निशिता " सागर दादा .. मला ड्रॉईंग काढून दे ना "
सागर " थोडा बाहेर राउंड मारून येतो मग काढून देईल .. चालेल का ?"
निहारिका " निशिता .. तुझा होमवर्क तू कर ना .. त्याला कशाला त्रास देतेस ?"
सागर " अग .. नीट बोल ना तिच्याशी .. किती लहान आहे ती .. "
निहारिका " काही नाही रे चालू आहे ती .. लाड करतो ना आम्ही सगळे म्हणून आमच्याकडून कामं करून घेते सगळी तिची .. आता तर तुला पण वेठीस धरायला लागलीय "
सागर मनात " असुदे द .. माझी एकुलती एक मेव्हणी आहे ती "
सागर " निशिता मी तुला ड्रॉईंग करून देईल पण तू ना मला दादा नको म्हणूस "
निहारिका जोरात हसायला लागली .. " मग काय म्हणेल ती ?"
सागर " अग.. हसते काय ?ती तुला ताई हाक मारते !!"
निहारिका " सो व्हॉट ? मग ती लहान आपल्या पेक्षा "
सागर " नाही .. मला नाही आवडत दादा हाक मारलेली .. मी काय या अख्ख्या गावाचा दादा आहे का ?"
निशिता " ओके फाईन .. “
तेवढयात निहारिकाला आईने हाक मारली म्हणूनती आत गेली
निशिता " सागर दादा मी तुला भाऊजी म्हंटले तर चालेल का ?"
तसा सागर गालातल्या गालात हसला " ए .. हळू बोल .. तुझ्या ताईने ऐकले ना तर फटके देईल ती मला "
निशिता " सांग ना पण हो कि नाही ?"
सागर " हे आपल्या दोघांचे टॉप सिक्रेट.. ओके "
आणि दोघांनी एकमेकांना थम्प्स अप केले .. तेवढयात निहारिका आली
निहारिका " काय रे काय ? ठरवलं ?"
निशिता " मी आज पासून सागरभाऊ बोलणार”
निशिता सागर च्या कानात " नंतर फक्त भाऊ च्या पुढे ‘जी ‘लावेन म्हणजे भाऊजी होईल
आणि दोघांनी एकमेकांना टाळ्या दिल्या..
----------------------
आदिराज म्हणजे स्पृहाच्या प्रेमात एकदम बुडाला होता .. एकटाच त्याच्या रूम मध्ये आडवा होऊन स्पृहाच्या स्वप्नात होता . तेवढयात त्याच्या डॅड नि फोन करून ऑफिस ला बोलावले म्हणून आदिराज टीशर्ट आणि जीन्स घातलीच होती त्याने .. वरती लेदरचे जॅकेट चढवले .. डोळ्यांवर गॉगल आणि बाईक वर बसून १० व्या मिनिटाला ऑफिस मध्ये पोहचला
चकचकीत काचेची बिल्डिंग .. अख्खी बिल्डींगच त्यांची होती ..
आदीराज ला बाईक वर उतरून येताना स्टाफ मधल्या बऱ्याच मुलींनी बघितले आणि उफ्फ !! त्याच्या नजरा घायाळ होऊन वळून वळून त्याच्याकडे बघत होत्या .. व्हॉट अ स्टायलिश .. हँडसम हंक "
डॅडच्या केबिन मध्ये गेला
डॅड " आदी .. काम सीट हिअर "
डॅड च्या केबिन मध्ये एक सोफा होता त्यावर आदिराज बसला .. डॅडच्या हातातले काम त्यांनी संपवले आणि मग
डॅड " मग कसा चाललाय अभ्यास ?"
आदिराज " चालू आहे नीट "
डॅड " चल तुला दाखवतो काही " आणि त्याला पलीकडच्या रूम मध्ये नेले तिथे एक बिझनेस मॉडेल होते
डॅड " लवकरच आपण नवीन फॅक्टरी सुरु करणार आहोत .. हे त्याचे मॉडेल आहे .. या नवीन फॅक्टरीचे नाव अजून सुचले नाहीये .. ते तू सुचवा असे मी सांगत होतो "
आदिराज " डॅड .. प्लिज .. आय डोन्ट नो एनिथिंग इन बिझनेस .. यु कॅरी ऑन .. आय एम लिविंग "
डॅड " स्टॉप धिस नॉन्सेन्स .. ते इअर फोन आधी काढून ताक .. मी काय सांगतोय ते नीट ऐक "
आदिराज " डॅड कुल .. "
डॅड " हा अख्खा बिझनेस तुला रन करायचाय .. पुढल्या सहा महिन्यात तुला लाँच करणार आहे मी .. "
आदिराज " डॅड .. नको ना .. मी अजून किती लहान आहे "
डॅड " लहान .. तुझ्या एवढा मी होतो तेव्हा मला तू झाला होतास आल्रेडी "

(नवीन कथा आहे .. पात्र भरपूर आहेत .. हळू हळू लिंक लागत जाईल .. सुरुवातीला थोडे भरपूर पात्र असल्यामुळे कॉन्फ्यूजन होऊ शकते .. पहिला भाग आधी वाचा मग दुसरा असे केल्याने लिंक लागेल .. पुढे कथा जी मी पाहतेय ती खूप मस्त आहे . वेगळी आहे .. ट्विस्ट आणि टर्न्स आहेत .. लाईक्स ,कमेंट्स नक्की करा ..)

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now