Jan 26, 2022
नारीवादी

स्त्रीत्व

Read Later
स्त्रीत्व


स्त्रीत्व
स्पृहा सकाळी छान तयार होऊन तिच्या रूम मधून बाहेर आली .. देवाला नमस्कार केला .. आजी .. आई आणि वडिलांच्या पाया पडली .आजीने घरातील देवाचा प्रसाद म्हणून हातावर साखर ठेवली .. तिने तीच साखर नेहमी सारखी हसत तोंडात टाकली ..
आईने नाश्ता तयार करून ठेवला होता तो तिने डायनिंग टेबल वर बसून खाल्ला .डब्बा , पाण्याची बाटली घेतली आणि तिची सॅक घेऊन घरा बाहेर हसत बाहेर पडली .
संगीता ( स्पृहा ची आई )" स्पृहा .. नीट जा बाळा .. आणि पोह्चलीस कि फोन कर "
स्पृहा " हो ग मम्मा .. बाय "
संगीता " बाय "
स्पृहा शेअर ऑटोने ट्रेन स्टेशनला आली .. तिकीट तर तिचे महिना भराचा पास काढलेला होता त्यामुळे डायरेक्ट लेडीज डब्ब्या पर्यंत येऊन थांबली ..
स्पृहा " हाय .. सागर .. हाय .. निहारिका "
सागर " गुड मॉर्निंग "
निहारका " कशी आहे हावरे !! काल रात्री फोन नाही केलास ?"
सागर "हावरे !! हे काय ?"
तशा स्पृहा आणि निहारिका दोघी हसल्या ..
निहारिका " आमचा लाडाचा शब्द आहे तो "
सागर " बावळटच आहात दोघी "
दोघी " ए गप रे "
रोज रोज त्याच ट्रेन ने जाणारी तीच तीच माणसे आणि तेच तेच चेहरे दिसायचे .. सगळ्यांचे चढायचे उतरायचे स्टेशन ठरलेले असायचे ..
तेवढयात त्यांची ट्रेन आली ...
सागर " चला ग .. मी बाजूच्या डब्यात चढतो .. तुम्ही चढा लेडीज डब्यात " आणि गेला निघून
निहारिका आणि सागर जवळ जवळ राहायचे आणि स्पृहा त्यांच्या दोघांची जिगरी दोस्त .. तर हे असे त्रिकुट रोज ट्रेन ने कॉलेज ला जायचे आणि यायचे ..
दोघींनी त्यांची नेहमीची जागा जी ठरलेली होती ती पकडली .. आणि तिथे त्या बसल्या .. पलीकडच्या डब्यात सागर मात्र उभा रहायचा अशा ठिकाणी कि ह्या दोघी त्याला दिसतील .. उगाचच त्याला आपली काळजी असायची .. आणि त्याची जवाबदारी असल्या सारखं तो लक्ष देऊन असायचा ..
दोन स्टेशन पुढे गेल्यावर रागिणी चढली .. रागिणी प्रसाद ******.. नुकतेच लग्न झाले होते तिचे .. बँकेत कॅशिअर म्हणून काम करायची .. पुढे गर्दी वाढायची ट्रेन मध्ये म्हणून नेहमी प्रमाणे रागिणी ह्या दोघींच्या शेजारी बसली .. तिघींनी एकमेकींना स्मित हास्य दिले .
समोरच्याच बाकावर तेजस्विनी बसली होती आणि हातात एक भलेमोठे इंग्लिश पुस्तक घेऊन वाचत बसली होती .. इतक्या गर्दीतही ती कशी वाचायची ह्याचेच आश्यर्य .. तेजस्विनी म्हणजे प्रोफेसर तेजस्विनी .स्पृहाच्याच कॉलेज ला होती पण वेगळ्या डिपार्टमेंट ला .पण रोज येता जाता दिसत असे ..
रोज संध्याकाळी पुन्हा हीच सगळी मंडळी ट्रेन मध्ये चढत त्यांच्या जागी बसत .. त्यांचे स्टेशन आले कि उतरत असत .. पण एक वेगळीच मैत्री झाली होती त्यांच्यात .. वेगळाच जिव्हाळा होता एकमेकां बद्दल .. एखादी कोणी आली नाही तर काहीतरी मिसिंग आहे असे वाटायचं .
तेवढ्यात नेहमीचीच एक म्हातारी ट्रेन मध्ये चढली .. कानातले , पिना , रुमाल असली काही काही वस्तू एका टोपलीत घेऊन . ती पण आता ह्या सर्वांची ओळखीची झाली होती तिचे नाव रुक्मिणी होते
रुक्मिणी " काय गो पोरींनो .. आज लयच गर्मी आहे .. " असे म्हणत तिने नऊवारी साडीच्या पदराने स्वतःचा घाम पुसला
निहारिका " आजी .. नवीन कानातले आणलेत का ?"
रुक्मिणी " नाय गो बाय .. ह्यो आधीचा घेतलेला माल डोक्यावर घेऊन फिरतया .. ह्यो संपला ना कि नवीन माल आनंल "
स्पृहा " आजी त्या दिवशी ते मी घेतलेलें कानातले ना माझ्या मैत्रिणीने घेतले .. तेच द्या बरं "
स्पृहा ने मुद्दामून आजीबाई कडून काहीतरी खरेदी केले .. तिला माहित होते अजून म्हातारीने नाश्ता पण केला नसेल .. तिला खाणे घेऊन दिले तर आवडायचं नाही .. त्या पेक्षा काहीतरी खरेदी केलं तर तिला १० रुपये मिळतील आणि मग ती निदान नाश्ता तरी करेल .. जसे स्पृहा ने घेतले तसे आजू बाजूच्या पोरी पण म्हातारीच्या टोपलीतलं सामान बघू लागल्या आणि खरेदी करू लागल्या .. म्हातारी एकदम आनंदून गेली .
एकेक जण उतरू लागल्या .. निहारिका आणि स्पृहा दोघी पण उतरल्या .. ट्रेनच्या बाहेरच सागर त्यांना पुन्हा भेटला आणि तिघे मिळून कॉलेज ला गेले .
------
सागर निहारिकाचा लहानपणीचा मित्र आणि आता त्याला निहारिका आवडायला लागली होती .. २४ तास तिच्याच मागेपुढे करत बसावे असे त्याला वाटायंच .. म्हणून तर घरात त्याला इंजिनिअरिंग कर म्हणून मागे लागले असताना त्याने MBA करायचं ठरवलं कारण निहारिका MBA करतेय ..
--------
आज तेजस्विनी चा मूड जरा ऑफ होता .. दिसायला इतकी सुंदर नाजूक हुशार होती नोकरी करत होती .संसार सुरु होऊन ३ वर्ष झाली होती .. दोघे नवरा बायको एकमेकांवर जीवापाड प्रेम करत होते .. घरचे चांगले होते .. सासू बाई तर आई सारखाच जीव लावत होती .. आर्थिक परिथिती सुद्धा बरी होती .. काहीच प्रॉब्लेम नाही तरी पण काहीतरी जीवाला घोर लागतोच तसे काहीसे झाले होते .. प्रयत्न करूनही त्या दोघांना मुलं होत नव्हते .. चांगल्या डॉक्टरांकडे जाऊन आय व्ही एफ ची ट्रीटमेंट चालू होती .. रोज रोज ची ती मोठं मोठी इंजेक्शन्स .. गोळ्या खाऊन ती कंटाळली होती .. इतर जोडप्यांना सहज मिळणारी गोष्ट देव मला का देत नाहीये या विचाराने मन भरून यायचं तिचं
------------------
स्टेशन वरून उतरून ऑटोने रागिणी बँकेत आली .. नेहमी प्रमाणेच बँकेत मरणाची गर्दी होती .. कशी बशी लोकांमधून वाट काढत रागिणी आत मध्ये गेली .. बाजूच्या कपाटात तिची पर्स तिने कोंबली .. बाटलीतले थंडगार पाणी प्यायली . तिच्या डेस्क वर जाऊन बसली .. आणि असंख्य लोकांची कामं करू लागली .मध्ये मध्ये तिचा फोन चेक करत होती .. कदाचित एखादा मेसेज येईल ..आणि त्या मेसेजला रिप्लाय द्यायला उशीर नको होयला .. म्हणून काम करताना सतरा वेळा मोबाईल बघत बसायची .
--------------------------------------------
रुक्मिणी आजी ला आज सकाळच्या ट्रेन मध्ये नाही म्हटले तरी १५० रुपये मिळाले होते .. ट्रेन मधून उतरून १० रुपयांचा वडापाव आणि एक कप चहा तिने घेतला आणि ट्रेन स्टेशन च्या एका खांबा जवळ बसून खाऊ लागली .. .. रुक्मिणी लहानपणा पासूनच एकटी होती .. कधी आई बाप भाऊ बहीण बघितलेच नाही .. भीक मागून मागून लहानाची मोठी झाली .. कसे बसे पैसे मोजायला यायचे .. बाकी शिक्षण शून्य .. बायकांना सांगायची तुम्हीच हिशोब करा आणि पैसे द्या .. काही काही बायका मुद्दामून पैसे जास्त द्यायच्या तर काही काही मुद्दामून कमी द्यायच्या .. टोपलीतला माल संपवायचा आणि ठेके दाराकडून पुन्हा मिळवायचा .. आणि विकायचा .. ट्रेन मधून टोपली डोक्यावर घेऊन घेऊन फिरायचं .. हेच तीच काम .. ट्रेन स्टेशन च्य बाजूला असलेल्या झोपडपट्टीत एक खोपडं तीच पण होते .. तिथेच रात्र घालवायची ..
------------------------------
निहारिका ची स्वप्न खूप मोठी होती ... काहीतरी बनायचंय .. काहीतरी करायचंय .. हुशार तर होतीच पण डेअरिंग बाज पण होती .. एकटी कुणीकडे जायची वेळ आली तरी तयारी असायची तिची .. तर स्पृहा म्हणजे फुलपाखरू .. नाजूक .. आपल्या कामाशी काम .. खाली मान घालून जगायचं .. कोणी सिनिअर मंडळी बोलायला जरी आले तरी तिची बोबडी वळायची .. मग निहारिका तिला सांभाळून घ्यायची ..
तिघे कॉलेज च्या गेट वर आली तसे सागर त्याच्या मित्रांच्यात गेला.. आणि ह्या दोघी जणी त्यांच्या वर्गाकडे निघाल्या तर मागून धावतच आदिराज आला.
आदिराज .. बघताच क्षणी त्याला स्पृहा आवडली होती ..
स्पृहा ला दोन वर्ष सिनिअर आहे आदिराज ...
एकदा कॉलेज च्या गेट वर आदिराज आणि त्याचे सगळे मित्र मित्र गप्प्पा टाकत बसले होते आणि तिकडून स्पृहा आणि निहारिका चालत येताना आदिराज ने बघितले .. नॉर्मल पंजाबी ड्रेस मध्ये .. केसांना बनाना क्लिप मध्ये लावलेली .. घोड्याच्या शेपटी सारखा केसाचा झुपका तिच्या माने बरोबर हालत होता .. कानात सिल्वर ओकसाईड चे झुमके .. डोळ्यांत बारीक काजळाची रेघ .. क्युट स्माईल .. बास आदिराज च्या हृदयात समथिंग वाजायला जणू सुरुवातच झाली होती .. कॉलेज मध्ये स्पृहा च्या मागे मागे रहायचा .. सिनिअर असल्यामुळे त्याने त्याच्या मित्रांच्यात सांगून टाकले होते " हि माझ्या हृदयाची राणी आहे .. हिच्याकडे कोणी वाकडी मान करून बघायचे नाही ..
स्पृहा ला मात्र त्याची भीती वाटायची .. एकतर सिनिअर आहे .. त्याला उलट बोलू शकत नाही त्यातच कॉलेज च्या ट्रस्टी चा मुलगा म्हणून खूपच शेफारला होता तो .. कोणाची आणि कशाची च भोती नव्हती त्याला .. पण स्पृहा च्या बाबतीत एकदम नरम .. ती समोर असली कि एकदम गरीब गाय होऊन जायचा .. सगळे मित्र त्याला जाम हसायची .. " प्रेमात पागल झालास रे तू म्हणून चिडवायची .. आणि आदिराज ला त्यांचे ते चिडवणं खूप आवडायचं..
आदिराज " हे स्पृहा .. कशी आहेस ?"
स्पृहा घाबरत " मी ठीक आहे "
आदिराज " आज खूप छान दिसतेय तू "
स्पृहा काहीच बोलली नाही .. नुसती मान खाली घालून उभी राहिली आणि नकळत तिचा हात तिच्याच ओढणीकडे गेला
आदिराज " आज माझ्या बरोबर येशील का ? मी कार ने तुला घरी सोडेन .. "
स्पृहा पटकन " नाही .. नको "
निहारिका " लेक्चर आहे आमचं आता "
आदिराज " ओके ठीक आहे जा "
स्पृहा आणि निहारिका दोघी वर्गात जायला निघाल्या .. आणि आदिराज स्पृहाला पाठमोरी बघत बसला तेही एकटक .. आणि बाकीचे त्याचे मित्र मैत्रिणी त्याला हसत होते
आदिराज चे फ्रेंड्स " मग .. आमची वहिनी काय बोलली आज ? "
तसा आदिराज एकदम लाजला .. आणि गोरामोरा झाला
आदिराज चे फ्रेंड्स " ऑ ... कसा लाजतोय मुलगी सारखा ? मग कधी आहे लग्न ?"
आदिराज " गपा रे !! आधी ती माझि गर्ल फ्रेंड बनेल .. मग आम्ही मस्त बाईक वर बसून लॉन्ग ड्राईव्ह ला जाऊ "
आदिराज चे फ्रेंड्स " हुम्म्म्म .. लॉन्ग ड्राईव्ह "
आदिराज "मग मी तिच्या घरी मागणी घालायला जाईन "
फ्रेंड्स " हुम्म्म ... लगेच लग्नाची मागणी
आदिराज " मग लग्न .. "
फ़्रेंड्स "हुम्म्म .."
आदिराज .. उघड्या डोळ्यांनी स्वतःला नवरदेव आणि स्पृहाला नवरी च्या वेशात बघत होता
फ्रेंड्स " हमम .. मग .. पुढे .. "
आदिराज " पुढे .. हनी ... " आदिराज ला समजले आपण काय बोलतोय ते आणि एकदम
आदिराज " ए .. गपा रे !! साल्यानो .. तुम्हांला भारी इंटरेस्ट "
तसे सगळे हसत सुटले

(नमस्कार वाचकहो ,

नवीन कथा सुरु करतेय .सर्व पात्र हळू हळू ओपन होत आहेत .. कथेचा भाग एक दिवसा आडपोस्ट करायचा प्रयत्न करेन .. पहिला भाग वाचून कसा वाटलं नक्की सांगा .. कमेंट्स आणि लाईक्स मुळे पुढे लिहायला हुरूप येतो आणि डोक्याला आपोआप चालना मिळते ..

धन्यवाद !!
सौ. शीतल महेश माने
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now