स्त्रीत्व बोनस पार्ट

Story Of Women's Facing Tough Situation


स्त्रीत्व बोनस पार्ट
क्रमश : भाग ६७
आदी एक मिनिट काय होतंय ते बघतच बसला ..
डॅड " ओके .. मग तुमचं फायनल आहे का ? हा मुलगा तुम्हांला जावई म्हणून पसंत आहे हे नक्की का ? बघा हा नंतर मग हा निर्णय कधीच बदलू नका ?"
श्रीधर " हो नक्कीच .. मी याला चांगला ओळखतो .. खूप चांगला मुलगा आहे .. डाऊन टू अर्थ आहे "
आदीला हसावे कि रडावे असे झाले होते ...
अजूनही डॅडने आदी हाच राज आहे आणि तोच त्यांचा मुलगा आहे हे सांगितले नव्हते बिचार्या श्रीधरना
डॅड " बघा हा , म्हणजे तुम्हीं याची फॅमिली बॅग्राऊंड वगैरे चेक केले का ? नाहीतर साधे घरदार पण नसेल त्याचे .. नंतर पश्चताप नको होयला .. माझा मुलगा ह्या मुलापेक्षा कितीतरी सरस आहे आणि शिवाय हि विल बी द ओनर ऑफ माय एम्पायर .. करोडोचा मालक आहे तो "
श्रीधर " सर , नक्कीच तुमचा मुलगा सरस असेल .. तुम्ही चांगले संस्कार पण दिले असतील .. पण मला हाच मुलगा माझ्या मुली साठी पसंत आहे .. संसार करायला एकमेकांबद्दल आदर आणि प्रेम असायला पाहिजे .. राज माझ्या मुलीवर खूप प्रेम करतोय हे मी डोळ्यांनी पाहिले आहे आणि तिच्या मतांचा आदर करतो.. कामात तर अतिशय हुशार आहे .. २ तासाचे काम २० मिनिटात करतो .. आपल्या कंपनीत ह्याला नक्की पर्मनंट करा .. कंपनीला नक्की वरती आणेल तो"
डॅड ला इतका आनंद होत होता .. डोळे भरून आले त्यांचे .. माझ्या मुलाला माझ्या पैशाची आणि पोझिशनची मदत घायवी नाही लागली म्हणजे त्याने अर्धी मजल मारली ..
तेवढयात संगीता संगळ्यांना चहा घेऊन बाहेर आली ..
आदीने पुढे जाऊन संगीताच्या हातातून चहाचा ट्रे घेतला आणि डॅडला चहा सर्व्ह केला .. श्रीधरला दिला
डॅड " चांगलाच रुळलाय तुमच्या कडे हा ? बघा हा .. नाहीतर घर जावई होयचा .. तुमच्या या सुंदर घराची भुरळ पडली असेल त्याला "
आदी गालात खुदु खुदु हसत होता ..
श्रीधर " मला चालेल .. घर जावई झाला तर.. माझी मुलगी माझ्या डोळ्यांसमोर राहील "
श्रीधर " संगीता , हे आमचे सर आहेत .. मी ज्या कंपनीत काम करतो ना त्या कंपनीचे मालक आहेत .. "
संगीताने दोन्ही खांद्यावर पदर घेतला होता .. त्यांना हात जोडून नमस्कार केला .. तेवढयात आजी बाहेर आली
श्रीधर " आई , हे बघ माझे सर आहेत "
श्रीधर पुढे काही बोलणार तर डॅड उठले आणि आजींच्या जाऊन पाया पडले .. आजीने डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला .. आणि जवळून निरखून पहिले
आजी " श्रीधर .. सर माझी आई .. यंदा ७५ वर्षांची झाली "
डॅड " श्रीधर , मला खूप हेवा वाटतोय .. तुमच्या मुलीचा फोटो मी एकदा पाहिला आणि तेव्हाच मनातून ठरवले होते कि तुमच्या मुलीला माझी सून बनवेल .. पण हा मुलगा मध्ये आला .. अजूनही विचार करा .. घरातल्या मोठ्यांचा सल्ला घ्या .. तुमच्या मुलगीचं माझ्या मुला बरोबर लग्न केलेत तर ती करोडोची मालकीण बनेल "
संगीता " सर .. तुम्हीं आमच्याकडे पहिल्यांदा आलात .. मी जेवण बनवतेय .. प्लिज नाही म्हणू नका .. आज आम्ही सगळे खुश आहोत .. माझा होणारा जावई आज घरी आलाय .. त्याच्यासाठी खास स्वयंपाक बनवतेय .. तुम्ही पण थांबा .. आम्हांला खूप आवडेल. "
आदी " डॅड , आता बास झाले .. प्लिज .. सांगून टाका ना खरं "
तसे डॅड उभे राहिले
डॅड " श्रीधर राव , आपण दोघे व्याही आहोत .. राज माझाच मुलगा आहे .. आणि आता तुम्ही काही बोलू नका .. पटकन माझ्या सुनबाईला खाली बोलवा .. मला पाहायचंय तिला "
श्रीधर " काय ? हे काय बोलताय तुम्ही ? हा तर इंटर्न आहे ?"
डॅड " हो नक्कीच इंटर्न आहे .. त्याला चांगले ट्रेनिंग मिळावे म्हणून सगळ्यांत बेस्ट एम्प्लॉयीच्या अंडर मी त्याला पाठवले होते .. "
श्रीधर " म्हणजे या प्लॅन मध्ये तुम्ही पण सामील आहात ?"
डॅड " अजिबात नाही ? कोणीही कसलाही प्लॅन केलेला नाहीये ?"
श्रीधर " मग ? "
डॅड " काही महिन्यांपूर्वी मी तुमच्या मुलीचा फोटो तुमच्या डेस्क वर पाहिला आणि असे वाटले कि हि मुलगी आदीची बायको झाली पाहिजे .. हे मी आदिला बोललो तर तर तो मला म्हणाला कि आल्रेडी कॉलेज मध्ये एक मुलगी मला आवडलीय .. आणि तिने जर मला होकार दिला तर मी तिच्याशीच लग्न करणार आहे.. मग मी तुमच्या मुलीचा नाद सोडून दिला कारण आदिराज खुश असणे जास्त महत्वाचे आहे माझ्यासाठी .. मग मला कळले कि कॉलेज मधली मुलगी हि तीच मुलगी आहे जी मला पसंत आहे .. आणि ती तुमची मुलगी आहे .. मग मी विषयच सोडून दिला .. आदी ठरवेल त्याला काय आणि कसे करायचंय ते आणि वेळ आला कि त्यो मला सगळे सांगेलच ..
त्याच्या आईने मरताना मला सांगितले होते कि त्याला नॉर्मल माणसांचे आयुष्य कळले पाहिजे तरच तो कंपनी नीट रन करू शकेल म्हणून त्याला इंटर्न म्हणून टर्निंग साठी कंपनीत आणले .. सेक्रेटरीला विचारले कि आपल्या कंपनीतल्या बेस्ट एम्प्लॉयी कोण आहे ते चेक करून सांगा .. तर तुमचे नाव समोर आले म्हणून आदी तुमच्या अंडर आला .. ह्यातले त्याला काहीच माहित नव्हते ..
पुढचे सगळे तुम्हांला माहीतच आहे .. आमच्या घराला घरपण येण्यासाठी स्पृहाला लवकरच आमच्या घरी पाठवा .. मुली सारखा सांभाळ करेन मी .. डॅडने हात जोडले
श्रीधर " सर , हे काय करताय .. प्लिज हात जोडू नका .. पण आपल्यात श्रीमंतीची दरी आहे.. मी खूपच सर्व सामान्य आहे.. "
डॅड " आत्ताच तुम्ही म्हणालात संसार करायला प्रेम आणि आदर असला पाहिजे .. ह्या दोन्हीही गोष्टी आहेत"
आदी " श्रीधर सर , आता नका ना प्लिज .. जास्त विचार करु .. प्लिज ग्रीन सिग्नल द्या "
डॅड " हो .. खरं आहे .. " बोलतच त्यांनी बॅगेतून एक साडी आणि पेढ्यांचा बॉक्स बाहेर काढला .. आमच्या सूनबाईला द्यायचंय .. तिला खाली बोलावा "
श्रीधर , संगीता आणि आजी .. एक क्षण शांतच बसले .. काय काय कळत होते त्यांना ..
श्रीधर " म्हणजे आता राज हा माझा बॉस आहे एक प्रकारे .. आणि तो माझ्या कंपनीत नाही मी त्याच्या कंपनीत एम्प्लॉयी आहे " आणि हसू लागले
डॅड " अहो श्रीधर , तुम्ही आमचे आणि आम्ही दोघे तुमचे फॅमिली मेम्बर्स आहोत .. तुमच्या घरचे जेवण खूप छान असते .. खूप भूक लागलीय .. चला लवकर जेवणाची तयारी करू "
तसे सगळे हसायला लागले ..
स्पृहा आहे त्या ड्रेस वर खाली आली .. जरा केस नीट करून आली होती फक्त ..
डॅडने तिच्या हातात साडी आणि पेढे दिले .. संगीता ने तिला कुंकू लावले ..
स्पृहा आणि आदीने घरातल्या सगळ्या मोठ्यांना वाकून नमस्कार केला..
डॅड " औक्षवंत व्हा .. असेच आनंदी रहा .. सुखाने संसार करा .. खूप प्रगती करा .. "
श्रीधर आणि संगीताचे डोळे सारखे भरून येत होते .. एका आई वडिलांची मनाची स्थिती तेच जाणू शकतात .. काही क्षणांतच ती त्यांची झाल्या सारखी वाटू लागली त्यांना ..
संगीता " स्पृहा , जा हि त्यांनी दिलेली साडी नेसून खाली ये .. आणि मग मला जेवणाला मदत कर "
स्पृहा मान होकारार्थी हलवून वरती जाऊ लागली .. आदी कडे तर बघतच नव्हती .. आणि तो मात्र तिच्याकडेच बघत होता .. तिला आत्ता इथेच मिठीत उचलून घ्यावं आणि कुठेतरी गायब व्हावं असे वाटतं होतं त्याला "
स्पृहाला तर उड्याच माराव्याश्या वाटत होत्या ..
डॅड " श्रीधर , तुमच्या इतका श्रीमंत माणूस कोणी नाही ,, माहितेय तुम्हांला तुमच्याकडे कोहिनुर हिरा आहे .. तुमची मुलगी हिरा आहे "
श्रीधर " सर , एक सांगू तुम्ही खरे भाग्यवान ,, देवाने तुम्हांला आर्थिक सबळता तर दिलीच पण आदी सारखा पुत्ररत्न दिला .. "
दोघे व्याही एकमेकांची तारीफ करत होते ..
(काही वाचकांनी सांगितले आणि लगेच ऐकले मी .. घेऊन आले एक बोनस पार्ट .. नक्की सांगा कसा वाटला भाग.)

🎭 Series Post

View all