स्त्रीत्व भाग ९

Story Of Women's Facing Tough Situation
स्त्रीत्व भाग ९
क्रमश : भाग ८

रुक्मिणी रात्री घरी आली खरी पण खूपच थकली होती .. म्हातारी झाली होती .. दोन वेळेच्या जेवणासाठीची वणवण काही थांबत नव्हती .. कधी कधी हे जगणे असह्य होऊन जायचे तिला .. कशी बशी ती टोपली तिने ओढत ओढत आत आणली आणि जरा चटई वर अंग टाकून दिले .. आज रोज सारखा उत्साह नव्हता .. झोपून राहीली ..
एकटीच जगणं खूप कठीण .. म्हातारी कधी मरून जाईल कळणार पण नाही .. दोन दिवसांनी प्रेताला वास येईल ना तेव्हा लोकांना कळेल कि म्हातारी गेली वाटतं . तेव्हा ते मुनसिपाल्टी वाल्यांना कळवतील आणि मग रस्त्यावरच्या कुत्र्याला जसे ते मुनिसिपालटीवाले घेऊन जातात तसे आपल्याला पण घेऊन जातील. असा काहीशा विचारांनी तिचं मन नाराज झाले होते ..
-----------------------
प्रसाद रात्री साडे बारा वाजता आला . त्याच्या कडच्या चावीने लॅच उघडत नव्हते याचा अर्थ रागिणीने आज आतली एक्सट्रा कडी लावली असा त्याने अंदाज बांधला ..
प्रसाद " रागिणी .. "जोरात बाहेरून ओरडला
नंतर त्याच्या लक्षांत आले कि साडे बारा वाजलेत बाकीचे लोक हाकलून लावतील म्हणून मग दारावर लाथ मारू लागला
एकदा लाथा मारली " थाड " असा आवाज झाला
दुसऱ्यांदा लाथ मारायला त्याने पाय उचलला होताच कि आतून दार उघडले .. हॉल चे लाईट बंद होते .. त्यामुळे दार उघडणारे खुद्द आपले बाबा असतील याची जराशी हि कल्पना नसलेला प्रसाद
प्रसाद " ए .. तुझे जास्त होतंय आता .. जास्त डोक्यावर बसू नकोस हा "
प्रसाद ने तिथेच शर्ट काढले आणि तसाच नेहमी प्रमाणे सोफ्यावर आडवा पडला ..
उज्वला ने लाईट्स लावले .. त्याच्या समोर पाण्याचा ग्लास धरला .. मुद्दामून त्याच्या खूप जवळ गेल्या होत्या .. त्याने ड्रिंक्स घेतलेत का बघायचं होते त्यांना
प्रसाद " आई .. तू !! " एकदम अश्यर्यचकित झाला तो " आणि सरड्याने रंग बदलावे तसा एकदम वागणे बदलले त्याचे .. एकदम श्रावण बाळ झाला तो .. आई ला घट्ट मिठी मारली त्याने
प्रसाद " आई कशी आहेस ? कधी आलात तुम्ही ? अग मला बोलायचेत ना .. मी आलो असतो ना घ्यायला ?"
शेखर " हि वागायची पद्धत आहे का रे तुझी ? आमच्या अपरोक्ष तू असा वागतोस रागिणीशी ?" शेखर चा आवाज चढला होता "
आणि शेखरच्या आवाजाने रागिणी पण चटकन उठली आणि बाहेर आली .. बाहेरचे वातावरण एकदम तापलंय हे लक्षांत येता
रागिणी " प्रसाद !! काय हे हि वेळ आहे का येण्याची .. तूम्ही तर मेसेज केला होतात ना कि दहा वाजे पर्यंत याल म्हणून .. झाली का मिटिंग ?.. ते इंटरनॅशनल क्लाएंट बरोबर होती ना ?"
प्रसाद जरा नरमुनच " हमम .. झाली .. "
रागिणी " चला फ्रेश होऊन घ्या , मी जेवण गरम करते "
तसा प्रसाद पटकन बॅग उचलून बेडरूम मध्ये पळाला .. आणि रागिणी किचन मध्ये गेली म्हणून आई आणि बाबा दोघे त्यांच्या रूम मध्ये जाऊन झोपले
रागिणीने छान जेवण गरम केले .. त्याचे ताट वाढून दिले .. पाण्याचा ग्लास बाजूला ठेवला .. आणि ती पण एका चेअर वर बसून राहिली .. काही लागलं तर वाढायला ..
टॉम अँड जेरी वाला शर्ट आणि पॅन्ट नाईट ड्रेस घातला होता तिने .. केसांचा मेस्सी बन .. गालावर दोन्हीकडून बटा आल्या होत्या .. प्रसाद जेवता जेवता तिला बघत होता .. बोलत काहीच नव्हता ..
प्रसाद मनात " आज बाबांची कानाखाली खाता खाता वाचलोय .. "
रागिणी " आज एक कानाखाली पडलीच असती .. खरंतर पडलायचं पाहिजे होती "
प्रसाद मनात " थँक यु म्हणू का ? नको .. च्यायला .. डोक्यावर बसेल लगेच "
रागिणी मनात " काय माणूस आहे .. साधे थँक यु पण म्हणवत नाहीये .. कुठून येतो असला ऍटिट्यूड काय माहित ?"
प्रसाद " भाजी वाढ "
रागिणी मनात " तुझ्या बापाची नोकर आहे का मी ? कसा बोलतोय .. ह्याच्या तर एकदिवस मार खाणार आहे माझ्याकडून "
रागिणी ने भाजी वाढली
प्रसाद " आई बाबा कधी आले ?"
टाळ्या टाळ्या .. पहिल्यांदा स्वतःहून प्रश्न विचारला होता त्याने
रागिणी " मला नाही माहित .. "
प्रसाद " मी तरी कोणाकडून अपेक्षा ठेवतोय .. धड बोलायची "
रागिणी " मी ऑफिस मधून आले तेव्हा आधीच आलेले होते "
प्रसाद जेवताना बोलत होता तर त्याला ठसका लागला ..
तशी रागिणीने पटकन पाण्याचा ग्लास पुढे धरला ... आणि पाठ चोळू लागली ..
रागिणी " वर बघ .. वर बघ "
प्रसाद " पुरे .. थांबलाय ठसका ?"
रागिणी " नीट शांतपणे जेवता येत नाही का ?"
प्रसाद " ए .. माझ्याशी जास्त अरेरावीत बोलायचे नाही बरं का ?"
रागिणी " ठीक आहे .. एक काम कर सगळे किचन आवरून झोपायला ये .. डायनींग टेबल स्वछ पूस " आणि जायला निघाली
प्रसाद " मी नाही करणार .. तू मला काम सांगायचं नाही .. "
रागिणी " आईंना सांगू .. आ... "
प्रसाद " पुसतो टेबल .. "
तशी रागिणी हसतच बेडरूम मध्ये गेली.
--------------------------
स्पृहा ला जेव्हा जाग आली तेव्हा स्पृहा एका मोठ्या रूम मध्ये होती .. केवढा मोठा तो बेड होता .. तिने एक नजर फिरवली तर .. रूम चे इंटेरिअर बघूनच तिला कळले कि आपण कुठे तरी मोठ्या हॉटेल रूम मध्ये आहोत .. समोर लक्ष गेले तर आदिराज हेडफोन वर गाणी ऐकण्यात गुंग होता .. आदिराजला त्याच्या रूम मध्ये बघून .. ती घाबरली .. पटकन उठली .
स्पृहा रडतच " तू .. तू .. काय केलंस . माझ्या बरोबर ... मला इथे का आणलंस ? "
आदिराज ने हे वाक्य ऐकलेच नाही .. तो गाणे ऐकत होता .. पण ती उठलीय हे बघितल्यावर त्याने गाणी बंद केली
आदिराज काळजीने एकदम तिच्या जवळ गेला .. त्याच्या हाताने तिच्या डोक्यावरून तो हात फिरवायला त्याने हात पुढे केला तर ती पटकन मागे सरकली
आदिराज " हॅलो .. कसे वाटतंय ?"
स्पृहा “मी कुठे आहे ? मला घरी जायचंय ? घरी आई वाट बघत असेल ? तिने इकडे तिकडे पाहिले तिची पर्स एका टेबल वर साईडला होती .. ती घ्यायला उठत होती तर
आदिराज " अ ..हा अहा .. नको उठुस .. तुला बरं नाहीये ? मी आहे ना ? तुला काय हवंय ते सांग .. सगळे तुझ्या हातात देतो "
स्पृहा " मला घरी जायला हवे .. तू मला इथे का आणलेस ? तू काय केलस माझ्या बरोबर .. तू माझ्या बेशुद्धीचा गैर फायदा घेतलास ? तुझा फोन दाखव .. मला बघायचंय .. तू .. तू तसले फोटो काढलेस माझे .. तुला लाज नाही वाटत .. प्रेम आहे म्हणतोस आणि असे वागतोस .. हॉटेल वर घेऊन आलास .. "
स्पृहा काय वाटेल ते बोलत होती .. बरळत होती
आदिराज " अग ए.. वाटेल ते काय बोलते ग ? स्वतःच्या बायको बरोबर असे कोण वागत ? तू विसरलीस का ? आपण दोघे आता नवरा बायको आहोत ते .. आणि मॅडम हे हॉटेल नाहीये .. माझे घर आहे .. माझ्या .. म्हणजे आपल्या बेडरूम मध्ये आहेस तू "
स्पृहा आणखीनच घाबरली
स्पृहा " काय ? तू मला तुझ्या घरी आणलीस .. तुझ्या आई बाबांना कळले तर .. ते माझ्या आई बाबांना फोन करतील ?" आणि स्पृहा रडायलाच लागली
आदिराज " अरे बायको .. तू काय डोक्यावर पडलीस काय ? चल तुला घरी सोडायला येतो मी .. "
स्पृहा " नको माझी माझी मी जाईन "
आदिराज " सिली गर्ल .. रात्रीचे १० वाजलेत .. ट्रेन ने एकटीने जाणार आहेस ?"
स्पृहा " काय ? रात्रीचे दहा ? बाबा .. मला मारतील .. मला शोधत असतील ते .. आतापर्यन्त आईने रडून घर डोक्यावर घेतलं असेल ? मी काय सांगू त्यांना ? मी कशी तोंड देणार त्यांना ? माझ्या बाबांचे समाजात नाव खराब होईल .. मग माझ्याशी कोणी लग्न नाही करणार ?"
आदिराज " पण लग्न तर झालं ना तुझं ? माझ्याशी ? त्याचे टेन्शन नको घेऊस ग ?"
स्पृहा " ते लग्न मी मानत नाही.. माझ्या आई वडिलांनी निवडलेल्या मुलाशीच मी लग्न करणार आहे .. आणि आज जे काही घडले ते तू कोणाला सांगू नकोस ..प्लिज "
आदिराज " स्पृहा .. वेड्या सारखं बोलू नकोस "
-----------------------
सुनील ऑफिस मधून आला ..आज बायकोची सेवा करण्यात संध्यकाळ घालवायची असा विचार करून त्याने किचन गाठले .. आज इटालियन सलाड विथ ऑलिव्ह आणि ग्रील सँडविच असा मस्त मेनू होता ..
तेजस्विनी त्यांच्या रूमच्या गॅलरीत असलेल्या ओव्हल शेपच्या पांढऱ्या झोपाळ्यात बसून मस्त लव्ह स्टोरी वाचत होती .. अलेक्सा मंद गाण्यानी वातावरण अजूनच रोमँटिक बनवत होती ..
लग जा गले के फिर ये हँसी रात हो ना हो ........
तेवढ्यात सुनील डोक्यावर शेफ ची कॅप घालून .. गळ्यात ऍप्रन अडकवून हातात मस्त डेकोरेट केलेलं ग्रिल सँडविच घेऊन आला
सुनील " मदाम .. युअर ऑर्डर " आणि एक पाय मागे घेऊन मोठ्या अदबीने उभा राहिला .. त्यांची ती सगळी नाटकं पाहून तेजस्विनीने पुस्तक बाजूला ठेवले आणि खो खो हसू लागली
सुनीलने ती डिश तिथल्या टेबलवर ठेवली आणि तशीच तिला हातात घेऊन एक गिरकी मारली .. दोघे कमरेत हात घालून बॉल डान्स करू लागले .. गिरक्या काय घेत होते .. मागे पुढे काय होत होते .. खूप आनंदात होते .. हसत होते मोठं मोठ्याने .. तेवढ्यात तेजूला एकदम चक्कर आली आणि सुनीलच्या खांद्यावर तिने मानच टाकली
नमस्कार वाचकहो
खूप वाट बघायला लागली ना ? काय करू तब्बेतच बरी नव्हती .. आणि नुसती माझीच नाही तर घरातल्या सगळ्या मेंबर्स ची त्यामुळे लॅपटॉप काढून लिहिणे शक्यच नव्हते .. असो आज ताप नाही आला तर लगेच भाग लिहून पोस्ट केलाय ..
कसा वाटला नक्की सागा
सर्वांनी तब्बेतीची काळजी घ्या वातावरण खूप खराब आहे ..

🎭 Series Post

View all