स्त्रीत्व भाग ८

Story Of Women's Who Faces Though Situation
स्त्रीत्व भाग ८

क्रमश : भाग ७

रागिणी ने आई बाबांना ताट वाढून दिले
रागिणी " आई तुम्ही दोघे जेवायला बसा .. तुम्हांला गोळ्या खायच्या आहेत ना "
उज्वला " सगळे एकत्र बसलो असतो .. "
रागिणी " अहो आई ते प्रसादच्या प्रोजेक्ट चे काम खूप वाढलेय .. हल्ली खूप उशिरा येतात ते .. मी पण कधी कधी जेवून झोपून जाते .. काय करणार .. मला सकाळी आठ वाजता बाहेर पडायचं असते ना .. मग मी दमून जाते "
बाबा " हमम .. म्हणजे झाले सुरु याचे ऑफिस मध्ये लेट काम करत बसणे .. मी आता आला ना कि चांगला ओरडतो त्याला "
रागिणी " दमून येतात हो ते .. नका ओरडू "
रागिणीला अंदाज आला होता कि आज पण तो नेहमी सारखा उशिरा येईल .. त्याला ओरडा पडू नये म्हणून आधीच विषय काढला
उज्वला " एक काम कर तू पण जेवायला बस ... आणि झोपून जा .. मी तो आला कि वाढेन जेवण त्याला "
ती आधी नकोच म्हणत होती पण आई आणि बाबांनी दोघांनी तिला जेवायला बसायलाच लावले ..
छान गप्पा गोष्टी करत जेवले .. मागचं सगळे आवरलं .. यातच साडे दहा वाजले . इकडे रागिणी बेचैन होऊ लागली .. आज पण उशिरा येतोय म्हणजे खरंच प्रसादला माझ्या बद्दल काहीच वाटत नाहीये .. सकाळी एवढी धमकी देऊन सुद्धा त्याने तेच केलं .. काय कारण असेल नक्की तो का असे वागतोय माझ्याशी ?असा विचार मनात आला कि बेचैनी यायची तिला ..
बाहेर उज्वलाला पण घाम सुटायला लागला होता .. साडे दहा वाजले तरी एकदा पण प्रसादने साधा फोन नाही केला रागिणीला .. हे काय वागणे झाले का ? नवीन लग्न झालेल्या जोडप्या कडून असे वागणे म्हणजे जरा विचित्रच वाटत होते ..आपला मुलगा नक्की असा का वागतोय ? दोघांचे जमतंय कि नाही ?
शेखर बाहेर रागाने लालेलाल झाले होते .. आणि बाहेर हॉल मध्ये येरझाऱ्या घालत होते .. एकतर तो मगाशी खोटं बोलला होता ... आणि आता ११ वाजले तरी अजून आला नाही .. पण फोन केला नाही पुन्हा कारण तो नक्की किती वाजता घरात येतोय ते दोघांना पाहायचं होते
-------------------------------------------------
आदिराज आपल्याला आता रोज भेटणार नाही हे ऐकून स्पृहाला थोडे बरं वाटले ..
आदिराज " मी नसताना .. तू तुझी काळजी घेशील ना ?"
तो असा बोलत होता जसा काय तिचा नवराच आहे तो
स्पृहाने मान हलवून होकार दिला
आदिराज " गुड "
आदिराज " माझे तुझ्यावर प्रेम आहे .. माझी इंटर्नशिप झाली कि मी लग्न करेन तुझ्याशी .. दर मंगळवारी आणि शनिवारी मी तुला भेटायला येत जाईन .. मग आपण फिरायला जात जाऊ "
आदिराजने तिला डायरेक्ट ती आपली प्रेयसी आहे हेच कन्सिडर केले आणि तो बोलत होता .. तिची मात्र धड धड वाढत होती.
आदिराजने ते गिफ्ट ओपन केले ..तिच्या लक्षात आले कि हि वस्तू अत्यंत महागडी आहे .. तो बोलता बोलता तिच्या हातात ते ब्रेसलेट घालत होता तर तिने हात पटकन मागे घेतला
आदिराज " दे ना .. हात "
स्पृहा " आदी .. राज . मला गिफ्ट नकोय "
आदिराज " मला नाही .. नको असले शब्द आवडत नाहीत .. "
स्पृहा " मला बाबा ओरडतील .. आई ओरडेल..आजी तर फटकवून काढेल .. मला प्लिज गिफ्ट नकोय "
आदिराज "अरे तू काय वेडी आहेस का ? तू घाबरते काय मला ? मी .. प्रेम करतो ना तुझ्यावर .. मग तू का अशी वागतेस माझ्याशी ?"
स्पृहा घाबरतच " मी नाही ... करत प्रेम .. मला घरी .. जायचंय "
आदिराजचे जे डोके सणकले .. त्याने तिच्या हाताला धरले .. आणि जवळ जवळ ओढतच पुन्हा देवळात नेले .. मंदिर देवीचे होते .. तिथलेच कुंकू उचलले आणि तिच्या भांगेत भरले .. आणि त्याच्या हातात जे ब्रेसलेट होते ते हातात न घालता त्याने तिच्या गळ्यात घातले.
त्याची चेन थोडी मोठी होती तर तिच्या गळ्यात ते बसले
आदिराज " झाले तुझे समाधान ? आता तू माझी आहेस ? आणि या देवीला साक्षी मानून मी तुझ्याशी आज आत्त्ता इथे लग्न केलंय .. आता तू माझि बायको आहेस "
स्पृहा एकदम घाबरली " हे काय केलेस तू ? का केलेस ? आता मी घरी काय सांगू ? " आणि जोर जोरात रडायला लागली
आदिराज " शु... एकदम शांत .. आज ना उद्या हे होणारच होते .. तू घाबरू नकोस.. "
बिचारी थरथर कापत होती
स्पृहा मंदिरातून धावतच बाहेर पळू लागली .. पायात चप्पल घातली आणि रडतच पुढे पळत होती .. तिला आदिराज पासून लांब जायचे होते ..
आदिराज " थांब स्पृहा .. थांब .. पळू नकोस .. मी काही करत नाहीये तुला .. यार . स्पृहा .. प्लिज डोन्ट रन "
धावतच त्याने तिचा हात पकडला .. मंदिरात आजू बाजूला कोणीच नव्हते ..
स्पृहा रडतच " प्लिज .. मला स्पर्श नको करू .. प्लिज माझा हात सोड ... "
आदिराज " यार .. स्पृहा .. प्लिज घाबरू नकोस ना मला .. तुला माझे प्रेम दिसत नाही का ? माझ्या साईडने थोडा विचार कर ना "
स्पृहा रडतच " मी .. मी .. घरी काय सांगू .. आई बाबांचा विश्वासघात नाही करू शकत मी .. माझ्या वर खूप प्रेम करतात ,, काळजी करतात ,, तू हे काय केलंस .. असे कोणी करत का ? "
आदिराज " आणि माझे काय ? मी पण तर खूप प्रेम करतो तुझ्यावर .. तू माझी आहेस हे तुला कळतच नव्हतं .. मी तुला काय सांगत होतो .. आणि तू काय ऐकत होतीस .. तूला काय प्रॉब्लेम आहे माझा .. मी कधी तुला त्रास दिलाय का ? "
स्पृहा " माझे नाहीये कोणावर प्रेम .. मला नाही आवडत असे प्रेम बीम .. मला शिकायचंय .. मला स्वतःच्या पायावर उभं राहायचंय .. मी मिडल क्लास फॅमिली मधून आहे .. तू .. का माझ्या मागे लागलाय ..जा ना तू .. तुझ्या फ्रेंड्स बरोबर .. "
आदिराज " मला तू हवीय .. माझे प्रेम आहे तुझ्यावर "
स्पृहा " मला आता घरी जायचंय .. प्लिज मला सोड "
आदिराज " ठीक आहे .. चल मी येतो तुझ्या घरी .. तुझ्या वडिलांना भेटतो .. पाहिजे तर माझ्या डॅडला सांगतो तुझ्या वडिलांना भेटायला ... "
स्पृहा " माझे बाबा.. मला तर कानाखाली वाजवातीलच पण तुला पण मारतील .. "
स्पृहाने तिच्या बॅगेतून पाण्याची बॉटल काढली आणि त्याने भरलेले कुंकू धुवून काढू लागली .. घरी गेल्यावर आई ला कळू नये म्हणून पण ते कुंकू नीट जातच नव्हते .. आणि ती अस्वथ होत होती ..
आदिराज " पाणी लावल्याने अजून घट्ट झालंय ते .. आता लगेच नाही जाणार "
स्पृहा " मी आता काय करू .. मी .. घरी कशी जाऊ ? मला घरी जायचय .. "
आदिराज " स्पृहा .. घाबरू नकोस ना .. काही नाही होणार .. मी आहे ना तुझ्या बरोबर .. माझ्यावर विश्वास ठेव ... "असे म्हणे पर्यंत स्पृहाला चक्कर आली आणि ती आदिराज च्या हातात बेशुद्ध होऊन पडली.
----------------------------------------------------
सागर आणि निहारिका दोघेही आज अतिशय आनंदात होते .. निहारिकाला दिल्ली ला जायला सागरची परमिशन मिळाली होती आणि सागरला निहारिका ची आयुष्यभरासाठी साथ पाहिजे होती ते मिळाली होती

निहारिका मनात " सागर .. सॉरी .. तुझ्या माझ्यावर असलेल्या प्रेमाचा मी असा फायदा घेतेय .. तुझ्याशी साखरपुडा झाला कि बाबा मला दिल्लीला पाठवायला तयार होतील .. आणि आता मी तुला पण पटवलेय .. माझा होणारा नवरा माझ्या बाजूने आहे म्हटल्यावर आई बाबा पण काही जास्त विरोध करणार नाहीत "
सागर मनात " निहारिका .. देव करो आणि तुझे रिसर्च पेपर त्या दिल्ली युनिव्हर्सिटी कडून रिजेक्ट होऊ दे .. एवढी जर नशिबाने साथ दिली ना तर मग बघायलाच नको .. सगळे छान होईल .. मग तुला डायरेक्ट आपल्या कंपनीची मॅनेजिंग डायरेक्टरच करून टाकतो "
निहारिका जशी घराच्या जवळ आली तशी थोडी मागे सरकून बसली ..
सागर ने तिला घरा जवळ सोडले
सागर " बाय .. संध्याकाळी आरतीला भेटू .. मी जातो आता "
निहारिका " ओके बाय "
सागरने गाडीला किक मारली तर
निहारिका " सागर . माझा फोन देतोस का ?"
सागरने त्याच्या बॅगेतून निहारिका चा मोबाईल दिला आणि निघून गेला
निहारिकाने मोबाईल चेक केला तर स्पृहा चे ३ मिस्ड कॉल होते . म्हणून लगेचच तिने स्पृहा ला कॉल लावला .. पण स्टेंज आज तिने तिचा कॉल उचलला नाही .. एकदा नाही दोनदा पूर्ण वेळ रिंग वाजली तरी स्पृहा ने कॉल उचलला नाही

🎭 Series Post

View all