स्त्रीत्व भाग ८० अंतिम भाग

Story Of Women's Facing Tough Situation
स्त्रीत्व भाग ८० अंतिम भाग
क्रमश : बोनस२ भाग
दुसऱ्या दिवशी सकाळी आदिराज शिप वर बाहेर उन्हात शर्टलेस उभा होता .. पाण्याकडे बघत .. स्पृहा अजूनही झोपली होती .. तिला जाग आली तर ती एकटीच झोपली होती .. त्याला शोधत शोधत ती बाहेर आली तो तिथे उभा तिला दिसला .. तिने जाऊन त्याला मिठी मारली.
स्पृहा " गुड मॉर्निंग "
आदी " गुड मॉर्निंग "
स्पृहा " आदी, तुझ्या डोळ्यांत पाणी ? मॉमची आठवण येतेय का ?"
आदीने तिचे दोन्ही हात पकडून तिला जवळ घेतले
आदी " स्पृहा ,मला तुझ्या पासून लांब नाही जायचं कधीच ?"
स्पृहा एकदम आश्यर्य चकित होऊन त्याच्याकडे बघू लागली " मी जाणारच नाहीये लांब तुझ्या पासून कधीच "
आदी बोलता बोलता तिला घट्ट मिठीत घेत होता तो .. कधी डोळ्यांवर , कधी गालावर किशी मिळत होती
स्पृहा "आदी , कसला विचार करतोय ? मी आहे तुझ्या बरोबर .. असं का वागतोय .. मला भीती वाटते ना मग .. काल तर आपण दोघे एकत्र आलो आज लगेच आपल्या दुराव्याच्या गोष्टी का बोलतोय तू ?"
आदी " स्पृहा , मी काय सांगतो ते नीट ऐक .. " म्हणतच तिथल्या चेअर वर तिला बसवले त्याने
आदी " स्पृहा , रिया ऑस्ट्रेलियाच्या बेस्ट युनिव्हर्सिटी मध्ये शिकतेय इकडे .. मी पण माझे शिक्षण तिकडेच केलंय .. "
स्पृहा " मग .. त्याचे काय ?"
आदी " मी तुझे ऍडमिशन त्या युनिव्हर्सिटी मध्ये घेतलंय .. आता दोन वर्ष तू इकडेच आत्याकडे रहा .. मी तिकडे राहीन "
स्पृहा " काय ? काहीपण काय ? मी कशी राहीन इकडे ? काही पण नको बोलू आदी " ती एकदम घाबरून जोरातच बोलली.
आदी " काही पण नाहीये .. हे खरं आहे .. तू माझ्याकडे दोन वर्ष मागितली होतीस ना .. ती दोन वर्ष मी तुला देत आहे .. इकडे छान शिक .. आणि तिकडे ये .. आपण तुझे पण ग्रँड लाँचिंग करू .. मग आपल्या सगळ्या कंपनीजचा HR तुलाच सांभाळायचा आहे .. मला खात्री आहे इकडे शिकल्यावर तू हि जवाबदारी नक्की पेलशील .. "
स्पृहा "आदी, एवढी मोठी जवाबदारी नाही रे जमणार मला .. मी हाऊस वाईफ मटेरियल आहे "
आदी " काही पण .. असे काही नसते .. तू किती हुशार माहितेय का तुला ? आपला रिझल्ट लागलाय .. तू पहिल्या ५ मध्ये आहेस .. आणि त्याच मार्क्स वर तुला इकडे स्कॉलरशिप मिळालीय .. शिवाय इकडे रिया आहे , आत्याआहे , काका आहेत .. तुला काहीही अडचण येणार नाही .. आत्या तुला रिया सारखेच वागवेल .. इकडे माझी रूम आहेच .. "
स्पृहा " आदी , नको ना असे करूस .. मला नाही रहायचे तुझ्या पासून लांब "
आदी " लांब तर मला पण नाही रहायचे ग .. पण हेच आपल्या दोघांसाठी चांगले आहे .. तुझे करिअर सेट होईल .. मी एकटा काय काय सांभाळू ?..मला बिझनेस मध्ये तुझी मदत लागणारच आहे "
स्पृहा रडतच " आदी , मी पाहिजे तर तिकडे शिकेन अजून .. तू मला तुझ्या पासून, आई बाबां पासून एवढे लांब नको करुस ना प्लिज .. "
आदी " रडू नको ना स्पृहा .. आपण डिस्कस करतोय ना "
स्पृहा " मला माहितेय तूझे डिस्कशन .. तू सगळे तुझ्या मनाचं करतो .. तू ऍडमिशन घेऊन पण टाकले बोललास .. म्हणजे आता तू मला इथेच ठेवून जाणार ?.. असे कोण नवीन नवरीला एकटीला ठेवून जाते का ? जा मी नाही बोलणार तुझ्याशी .. म्हणतच ती आत जाऊ लागली ..बिचारी घाबरून गेली होती ..
आदी " स्पृहा ,चिडू नको ना प्लिज .. मी तरी राहू शकेन का तुझ्या पासून लांब सांग .. मी दर १५ दिवसांनी येत जाईन ...इकडेच आपला क्लाएंट आहे .. माझ्या मिटिंग असणारच आहेत .. आणि मिटिंग नसली तरी मोअर दयानं १५ डेज .. राहूच शकत नाही मी तुझ्या पासून लांब .. तू मला प्रॉमिस कर मन लावून अभ्यास करशील .. "---------------------------------
आदी जो बोलता है वही करता है .. त्याने स्पृहासाठी एक चांगला निर्णय घेतला होता .. तिला तिथेच ठेवून चक्क तो एकटाच भारतात आला .. सुरुवातीचे दिवस खूपच कठीण होते दोघांना .. रोज तासन तास कॉल वर असायचे ... आणि त्याने म्हटल्या प्रमाणे दर १५ दिवसांनी तो मिटिंगच्या बहाण्याने येऊ लागला .. आणि तसा तो पहिले चार महिने येत राहिला तेव्हा मग स्पृहा ला ते सगळे कठीण वाटे ना .. हळू हळू ऑस्ट्रेलिया मध्ये एकटीने वावरू लागली .. तिकडच्या युनिव्हर्सिटी मध्ये जाऊ येऊ लागली .. मन लावून अभ्यास करू लागली ..
एक वेळेचं जेवण ती बनवायची .. सकाळी आत्या डबा नाष्टा द्यायच्या .. रिया आणि आत्यांनी तिला छान तयार केली .. तिला कार पासून सगळे शिकवले .. तिकडचे राहणीमान , इंग्लिश वर प्रभुत्व मिळवले तिने .. मग स्टेज डेअरिंग , प्रेझेन्टेशन करू लागली .. कधी कधी काकांच्या ऑफिस मध्ये जाऊन बसू लागली .. शिवाय आदी आला कि मग काय पार्टीचं असायची .. १५ दिवसातून एकदाच भेटायचा पण इतके प्रेम तिला देऊन जायचा कि पुढचे १५ दिवस त्याच्याशिवाय ती आणि तो तिच्याशिवाय जगू शकायची .
आई बाबांशी कॉल होयचाच ..
-------------------------------------
दोन वर्षांनंतर ..
आज स्पृहाचा ऑस्ट्रेलिया युनिव्हर्सिटीचा रिझल्टचा दिवस होता .. स्पृहा तिच्या क्लास मधल्या मुलीं बरोबर बसली होती .. रिझल्टच्या दिवशी आदिराज येणार होता तो आला नाही म्हणून जरा नाराज होती ती .. नेमकं त्याला काहीतरी अर्जंट काम आले म्हणून तो आला नव्हता.. थोड्याच वेळात रिझल्ट सांगितला आणि स्पृहाला सर्टिफिकेट देण्यासाठी स्टेजवर बोलावले .. तिने चांगले मार्क्स मिळवले होते .. टाळ्या वाजवत होते सगळे .. तिथल्या गुरुकुलांनी तिच्या गळ्यात मेडल घातले .. तिच्या हातात सर्टिफिकेट दिले . आणि तिने चक्क खाली वाकून नमस्कारही केला.

तर एकजण " मॅम, एक फोटो प्लिज " म्हणाला तसे तिने बघितले तर आदिराज तिचा फोटो काढत होता
स्पृहा आनंदून " आदी .. तू आलास .. " डोळ्यांत पाणी होते तिच्या
तिला हाताला धरूनच तो खाली आला .. कोणाचीच पर्वा नव्हती तिला .. त्याच्या मिठीतच गेली ती
स्पृहा " आदी , मी चांगल्या मार्कांनी पास झाले "
आदी " आय एम प्राऊड ऑफ यु .. माय वाइफ .. "म्हणतच दोघे आदीच्या गाडीत बसले
आदी "चला , इंडियात जायची तयारी कर .. लगेच आजच निघू "
मग काय आदींच्या स्पृहाला डॅडनी असे लाँच केले कि अख्ख्या भारतातली लोकं बघत होती टी व्ही वर ..
डॅड " आपल्या कंपनीची नवीन CEO माझी सून बाई आहे " स्पृहाचा बायोडाटा सांगितला जात होता .. सर्व स्टाफ कडकडून टाळ्या वाजवत होते .. खाली स्टाफ मध्ये श्रीधर बसले होते .. टाळ्या वाजवताना उर अभिमानाने डोळे मायेने भरून आले होते त्यांचे .. हे जे काय स्पृहाचे कॉन्फिडन्ट रूप ते बघत होते ते त्यांनी कधीच स्वप्नात पण पाहिले नव्हते ..
स्पृहाचा इंग्लिशवर कमांड कमालीचा झाला होता .. ऑफिसच्या कामातलं खूप काही कळत होते , बोलायला घाबरत नव्हती , मोठं मोठ्या विषयावर ती फाडफाड बोलत होती .. मिडियावाल्यांना सडेतोड उत्तरे देत होती .. आदी पण बघतच बसला .. किती कमालीचा बदल झाला होता तिच्यात ..
तर मंडळी अशा पद्धतीने साधारण स्पृहाचे रूपांतर दि स्पृहा मध्ये झाले होते .. आणि तिचे लाईव्ह इंटरव्यूह निहारिका , सागर , तेजू सुनील , प्रसाद , रागिणी ,रुक्मिणी , सगळे बघत होते .. आणि अभिमानाने टाळ्या वाजवत होते ..
आई बाबांना आणि आजीला जाऊन घरी भेटून मग स्पृहा तिच्या सासरी आनंदात राहत होती .. सकाळचा डबा तिघांचा ती स्वतः बनवायची .. तिघे आपापल्या कारने ऑफिसला जाऊ लागले .. जेवताना तिघे त्यांच्या प्राव्हेट रेस्ट रूम मध्ये एकत्र बसून जेवायचे ..
कधी आईकडे , कधी इकडे सासरी जिकडे पाहिजे तिकडे दोघे रहायचे . त्यामुळे स्पृहाच्या रूम मधेही त्यांनी जाणे येणे ठेवले होते .. आई बाबा आणि आजीला पण मनसोक्त भेटायची आणि घरी हक्काने भांडी सुद्धा घासायची .. पैसे , पद .. यामुळे तिच्या बेसिक स्वभावात जरा सुद्धा बदल नव्हता .. अजूनही मनातून तितकीच प्रेमळ आणि साधी होती ती .. आणि म्हणूनच आदिराज अजूनही दिवाना होत होता ..
रात्री आदीच्या घरी .. स्पृहाने छान साडी नेसली होती .. खास आदिराजच्या सांगण्यावरून .. आणि ती पोळ्या करत होती .. आदिराज तिला मदत करत होता .. त्याचे दोन्ही हात पोळपाटावर असणाऱ्या तिच्या हातांवर होते .. आणि हनुवटी तिच्या खांद्यावर .. अश्या पद्धतीने ती पोळ्या लाटत होती..
आदी " स्पृहा , काल मला ना एक स्वप्न पडले "
स्पृहा " काय स्वप्न पडले ?"
आदी " एक छोटीशी स्पृहा माझ्या स्वप्नांत आली होती आणि मला " डॅडू .. डॅडू " म्हणत होती "
स्पृहा हसतच " काहीपण असते आदी तुझे ?"
आदी " काही पण नाही ग ? खरं आहे हे स्वप्न पडले मला .. आता आपल्याला पुन्हा एकदा हनिमूनला जायला पाहिजे .. दोन दिवस सुट्टी काढशील का ?"
स्पृहा " सध्या नको ना आदी .. किती काम आहे बाकी "
आदी " अरे .. पण मग माझे स्वप्न त्याचं काय ? आणि मी तिकिट्स बुक केलीत त्याचे काय ?"
स्पृहा हसतच " तू ना आदी .. सगळे ठरवून फायनल करून मग मला सांगतोस "
आदी हसतच " हा मग .. मी डॅडू आहे ना छोट्या स्पृहाचा .. आता तिने मला सांगितले कि तिला यायचंय मग आता तीच ऐकावेच लागेल ना मला "
स्पृहा हसतच " आदी यु आर टू क्युट .. म्हणतच तिने लाटणे तिकडेच टाकले आणि त्याला किस करू लागली .. " आणि दोघांचा रोमान्स तिथेच सुरु झाला ..
लवकरच छोटी स्पृहा आणायची होती ना त्याची तयारी जोरदार सुरु झाली ..
स्पृहा सारख्या घाबरट , लाजवट मुलीच्या आयुष्यातल्या वेग वेगळ्या छटा दाखवण्याचा प्रयास या कथे मध्ये होता .. स्पृहा वर तिच्या आई वडिलांनी केलेले मध्यमवर्गीय संस्कार तिला प्रेमात पुढे पाऊल टाकून देत नव्हते .. प्रेमात तर ती पडली होती पण आई वडिलांना आपण फसवतोय कि काय अशा भीतीने ती तिच्या प्रियकराला तिच्या पासून जितके होईल तितके लांब पाठवत होती .. कोणी आपल्याला ,आपल्या नात्याला , आपल्या आई वडिलांना नावे ठेवू नये असेच वागत होती .. पण मन बंड करायला उठायचं .. तरीही त्यावर मात करून .. आदिराजशी सगळाच कॉन्टक्ट तोडून टाकला .. प्रेम मात्र करत राहते ..
आदिराज तिला नीट समजून घेऊन तिच्याशी वागला .. तिच्या विचारांना मान दिला .. आणि तिच्या पासून तो हि लांब राहिला .. तिच्या मताचा आदर करतो जरी मनापासून ते त्याला पटत नसले तरी .. मग मोठ्या परिश्रमा नंतर लग्नांना परमिशन मिळाली .. आणि लगेचच लग्न करून मोकळे झाले .. इथेच हिची कथा संपत नाही ..आता तीने मनापासून जे आहे ते स्वीकारले आणि हाऊस वाईफ बनायचं ठरवले किंवा त्या मानसिकतेत असतानाच तिला आदिराज ने ऑस्ट्रेलिया मध्ये शिक्षकाला ठेवले आणि तिला सर्व सामान्य मुली पासून एकदम प्रॉमिनंट डॅशिंग स्पृहा बनवले .. मिळालेल्या संधीचा फायदा घेत तिनेही आपले करिअर छान सेट केले .. आणि आता संसारही छान चालू आहे ..
पैसा पद आणि प्रतिष्ठां हे कष्ठाने मिळवावे लागते .. नुसती आदीची बायको म्हणून सुद्धा तिला मिरवता आले असते .. पण आदी ने चांगला निर्णय घेतला होता .. तिच्या बुद्धिमत्तेचा उपयोग छान करून घेतला .तिच्या ऑफिसला जायच्या स्वप्नाला साथ दिली ..
स्पृहाची आजी जरी वयस्कर असली तरी तिने घराला अजूनही बांधून ठेवले आहे .. वेळोवेळी आपल्या मुलाला , सुनेला , नातीला आणि आता जावयाला सुद्धा त्या मार्गदर्शन करतात .. आशीर्वाद देतात .. अशा स्त्रिया या घराच्या आधार असतात यांच्यामध्ये लक्ष्मी वास करत असते .. आणि लक्ष्मी सुद्धा एका देवीचे रूप आहे ..
संगीताने आपले संपूर्ण आयुष्य आपला संसार चालवण्यात घालवले .. तेही आनंदाने .. सचोटीने संसार केला , मुलीवर चांगले संस्कार केले .. एक आई जेव्हा आपले सगळे आयुष्य आपल्या घरा साठी देते तेव्हा स्पृहा सारख्या संस्कारी मुली बनतात .. खूप मोठा त्याग असतो त्या मागे .. त्या त्यागाचा मान राखण्याची जवाबदारी घरातल्या सर्व मेम्बर्सची असते ..
घर हे जर कोणत्या तत्वावर चालत असेल तर स्त्रीत्वाच्या तत्वावर चालते .. स्त्रीत्व घराला घरपण देते .. घराला आकार देते , संस्कार देते ..
स्त्रीत्व हा विषयच मुळात फार अगाध आहे .. लिहू तितके कमी आहे .. एक स्त्री जितकी हळवी असते तितकीच ती खंबीर असते , एक स्त्री जितकी नाजूक असते तितकीच ती शक्तिशाली असते , एक स्त्री जितकी अवखळ असते तितकीच ती वैचारिक रित्या परिपक्व सुद्धा असते .. म्हणूनच असे म्हटले जाते कि या स्त्रियांना नक्की काय हवे असते हे कळतच नाही ..
मला विचाराल तर एका स्त्रीला प्रेम , विश्वास आणि आदर ह्या तीन गोष्टी मिळाल्या तर कोणत्याही परिस्थितीत ती ठामपणे उभी राहून पुरुषत्वाला नक्कीच साथ देईल .
बहिणाबाई ह्या शिकल्या नव्हत्या पण त्यांच्याओव्यांचा अभ्यास मोठं मोठ्या युनिव्हर्सिटी मध्ये PHD साठी घेतात .. सिंधुताई सपकाळ ह्या एकेकाळी घर नाही म्हणून स्मशानात राहिल्या पण तीच स्त्री अनेक अनाथांची माय झाली .. स्त्री ची आंतरिक शक्ती समुद्रा इतकी खोल आहे .. त्याची खोली मापूच शकत नाही .. वर वर उठणाऱ्या लाटांवरून तर नक्कीच नाही .. सृष्टीच्या रचयिताने सृष्टी चा समतोल राखण्यासाठी स्त्रीत्व आणि पुरुषत्व दोन्हीची एकदम स्थापना केली .. आणि हे सगळ्या पुरणात , धर्म ग्रंथात लिहिले आहे. ऍडम बरोबर इव्ह होती , लक्ष्मी बरोबर नारायण , शिव शंकरा बरोबर पार्वती हे सगळे एकमेकांना पूरक आहेत ..तसेच साधारण स्त्री पुरुष हे हि पूरक आहेत .. म्हणूनच स्त्रीत्वाला पुरकत्व देण्यासाठी अनेक सक्षम पुरुषहि या कथेमध्ये आहेत.
परंतु कलयुगा मध्ये अर्थाजन करणार्या पुरुषाने स्त्रीला कमी लेखायला सुरुवात केली .. आणि मग स्त्रीत्वाचा विषय उभा राहू लागला ..
तर अशी हि स्पृहा भावनिक , प्रेमळ , तितकीच खंबीर , तितकीच आदिराज ला समजून घेणारी , प्रसंगी त्याची आई , प्रसंगी प्रेयसी , प्रसंगी आपली आई बाबांची मुलगी ,प्रसंगी नात , प्रसंगी मैत्रीण , प्रसंगी सुनबाई , प्रसंगी विद्यार्थिनी , प्रसंगी ऑफिस ची CEO , आणि आता लवकरच प्रसंगी एक प्रेमळ आई होईल .. थोडीशी रोमँटिक कथा, ज्यामुळे समस्त जगाचा प्रेमावरचा विश्वास अजून घट्ट होईल .. आणि हळू हळू सगळे जग प्रेमात पडेल इतकी रोमँटिक कथा इथेच संपवू .. त्यांच्या दोघांच्या पुढील संसाराला शुभेच्छा देऊन त्यांचीही रजा घेऊया.
समाप्त !!
नमस्कार वाचकहो !!
स्त्रीत्व ह्या कथेत खूप साऱ्या जोड्यांना घेऊन आले होते .. एकाच स्टोरी मध्ये रागिणी प्रसाद , लिझा डॅनी , अभय - त्रिवेणी , निहारिका सागर , सागरचे आई बाबा , निशिता ,तेजू -सुनील , मोहिनी , रुक्मिणी आजी , शरयू ,शरयूची आई , अफसाना , प्रसादची आई - बाबा ,संगीता- श्रीधर , स्पृहाची आजी , सुनील ची आई , सुनील ची सासूबाई , डॅड आणि मॉम ( जरी एकत्र नसले तरी त्यांचे प्रेम ) निशा आणि विक्रांत , आणि आदिराज आणि स्पृहा अशा अनेक पात्रांना आपल्या समोर आणले आणि त्याच्या काल्पनिक कथांमधून स्त्रीत्वाचे अनेक पदर उलगडून दाखवले ..
वेगवेगळ्या स्त्रिया , वेग वेगळ्या वयातील स्त्रिया , वेग वेगळ्या परिस्थितीत लहानच्या मोठ्या झालेल्या स्त्रिया , वेग वगेळ्या कठीण प्रसंगांना कश्या सामोऱ्या गेल्या आणि त्यातून बाहेर आल्या .. प्रत्येकीचा संकटाशी सामना करताना तिच्या स्त्रीत्वाचा लागलेला कस या कथेत मांडला आहे
हि मल्टी स्टारर कथा कशी वाटली ? .. नक्की सांगा ..
ईराचे आणि वाचकांचे मनपूर्वक आभार .. आणि धन्यवाद
लवकरच पुन्हा भेटू थोड्या विश्रांती नंतर -

🎭 Series Post

View all